सागराचे सरदार (२)
सागराचे सरदार (२)
भारतीय कोस्ट गार्डमध्ये वेगवेगळया
ज्ञानशाखेतील महिला आणि पुरुष पदवीधरांना नोकरीची संधी दरवर्षी दिली जाते. पदवीनंतरच्या
संधी.या संधी पुढीलप्रमाणे आहेत-
(१) जनरल
ड्युटी- वयोमर्यादा- किमान २१ आणि कमाल २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती
संवर्गातील उमेदवारांना वयात ५ वर्षांची आणि इतर मागास वर्ग संवर्गातील
उमेदवारांना ३ वर्षाची सूट दिली जाते. या पदासाठी कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी प्राप्त
पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. तथापि त्याने १२ वीमध्ये भौतिकशास्त्र अभ्यास केलेला
असावा.
(२) जनरल
ड्युटी (महिला- लघु सेवा कमिशन)- वयोमर्यादा- किमान २१ आणि कमाल २५ वर्षे.
अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वयात ५ वर्षांची आणि इतर मागास
वर्ग संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट दिली जाते. या पदासाठी कोणत्याही
ज्ञानशाखेतील पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतो. तथापि त्याने १२ वीमध्ये
भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा.
(३) जनरल
ड्युटी/ पायलट नेव्हिगेटर एन्ट्री- वयोमर्यादा- किमान १९ आणि कमाल २५ वर्षे.
अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वयात ५ वर्षांची आणि इतर मागास
वर्ग संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट दिली जाते. या पदासाठी कोणत्याही
ज्ञानशाखेतील पदवी प्राप्त पुरुष उमेदवार अर्ज करु शकतो. तथापि त्याने १२ वीमध्ये
भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा.
(४) कमर्शिअल पायलट लायसंस (लघु सेवा)/ पुरुष
-वयोमर्यादा- किमान १९ आणि कमाल २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील
उमेदवारांना वयात ५ वर्षांची आणि इतर मागास वर्ग संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची
सूट दिली जाते. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे
कर्मशिअल पायलट परवाना असावा.
(५) कमर्शिअल पायलट लायसंस (लघु सेवा)/ महिला - वयोमर्यादा-
किमान १९ आणि कमाल २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वयात
५ वर्षांची आणि इतर मागास वर्ग संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट दिली जाते.
कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे कर्मशिअल पायलट परवाना
असावा.
(६) टेक्निकल एन्ट्री (पुरुष)- वयोमर्यादा-
किमान २१ आणि कमाल २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वयात
५ वर्षांची आणि इतर मागास वर्ग संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट दिली जाते.
अर्हता- पुढील अभियांत्रिकी शाखेतील पदवी- नॅवल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल किंवा
ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रिअल किंवा प्रॉडक्शन किंवा
मेटॅलर्जी किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस/ इलेक्ट्रिकल किंवा
इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड
कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनीअरिंग किंवा पॉवर. या शाखांमधील उमेदवारांनी १२
वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे किंवा तीन वर्षे
कालावधीची पदविका
(६) लॉ एन्ट्री (पुरुष/महिला)-वयोमर्यादा- किमान २१ आणि कमाल ३० वर्षे.
अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वयात ५ वर्षांची आणि इतर मागास
वर्ग संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट दिली जाते. अर्हता- १२ वीनंतर पाच
वर्षे कालावधीची किंवा पदवीनंतर ३ वर्षे कालावधीची विधि विषयातील पदवी.
प्रगतीची संधी
उमेदवारांची निवड असिस्टंट कमांडंट या पदावर होऊन
त्यांची पदोनत्ती कमांडंट (ज्युनियर ग्रुप)- कमांडंट- डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल-इन्स्पेक्टर
जनरल-ॲडशिनल डायरेक्टर जनरल- डायरेक्टर जनरल या क्रमाने होत जाते.
प्रशिक्षण
जनरल ड्युटी ब्रँच (सामान्य सेवा शाखा)- या शाखेसाठी (आणि) इतर शाखांसाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना
२२ आठवड्यांचे प्रशिक्षण केरळ राज्यातील
एजिमाला येथील इंडियन नॅव्हल ॲकॅडेमीमध्ये दिले जाते. त्यानंतर २४ आठवड्याचे सागरी
प्रशिक्षण त्यापाठोपाठ दुसऱ्या टप्प्यातील १६ आठवड्यांचे सागरी प्रशिक्षण कोस्ट
गार्डच्या जहाजांवर दिले जाते. या नंतर उमेदवारांना सिमॅनशिप बोर्ड परीक्षा द्यावी
लागते. या परीक्षेव्दारे सागरीविज्ञानाशी निगडित कौशल्याची चाचपणी केली जाते.
यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांना ४३ आठवड्यांचे तांत्रिक प्रशिक्षण वेगवेगळया ठिकाणी
दिले जाते. त्यानंतर वॉच किपिंग सर्टिफिकेट, देण्यासाठी, ६ महिन्यांसाठी कोस्ट
गॉर्डच्या जहाजावर नियुक्ती दिली जाते. जनरल ड्युटी- पायलट यासाठी निवड झालेल्या
उमेदवारांना वॉच कीपिंग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, हवाई उड्डाणासाठी संबंधित
उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे तपासणासाठी दिल्लीमध्ये बोलावले
जाते. त्यानंतर त्यांना हवाई दल किंवा नागरी हवाई उड्डाण प्रशिक्षण ॲकॅडेमीमध्ये
सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. त्यानंतर कोस्ट गार्डच्या दमन येथील फ्लाइंग
ट्रेनिंग स्क्वॅड्रॉन, दमन किंवा राजाळी येथील हेलिकॉप्टर ट्रेनिंग स्कूल मध्ये
सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. यशस्वी प्रशिक्षणानंतर त्यांची
नियमित नियुक्ती केली जाते. तांत्रिक शाखेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना एजिमाला
येथे आयएनएस शिवाजी किंवा वलसुरा या जहाजांवर अभियांत्रिकी किंवा विद्यूत शाखेतील
वेगवेगळया अभियांत्रिकी शाखांचे प्रारंभिक प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा
कालावधी १०५ ते ११० आठवड्यांचा असतो. त्यानंतर २४ आठवड्यांचा वाचकीपिंग किंवा
कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट प्रशिक्षण कोस्ट गार्डच्या जहाजांवर दिले जाते. हे
प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांना नियुक्ती दिली जाते. चार वर्षाच्या सेवेनंतर
एव्हिएशन टेक्निकल कोर्सेसची संधी दिली जाते. हे या घटकासाठी सुपर स्पेशलायझेशन (अतिविशिष्ट
ट्रेनिंग) समजले जाते. महिलांसाठी लघुसेवा नियुक्ती-
एझिमाला येथील प्रशिक्षणानंतर कोस्ट गार्ड किंवा नाविक प्रशिक्षण केंद्रामध्ये ७०
आठवड्यांच्या प्रशिक्षणाठी पाठवले जाते. हे प्रशिक्षण तीन टप्प्यांमध्ये विभाजित
करण्यात येते. कमर्शिअल पायलट परवानाधारकासांठी लघुसेवा- एजिमाला येथील प्रारंभिक
प्रशिक्षणानंतर कोस्ट गार्डच्या वेगवेगळया प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी
पाठवले जाते. त्यानंतर कोस्ट गार्डच्या, फ्लाइंग ट्रेनिंग स्क्वॅड्रॉन, दमन किंवा
हेलिकॉप्टर ट्रेनिंग स्कूल -राजाळीमध्ये सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवले
जाते.
गुणवत्ता
यादी आणि निवड
या पदासांठी
अर्ज केलेल्या उमेदवारांच्या प्रारंभिक
निवडीसाठी संबधित विषय/शाखेमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार
केली जाते. त्यांनतर यामधील निवडक उमेदवारांना मानसिक क्षमता चाचणी (मेंटल ॲबिलिटी टेस्ट)
आणि पिक्चर पर्सेप्शन टेस्ट (चित्र
समज/आकलन चाचणी) आणि समूह
चर्चेसाठी बोलावले जाते. समूह चर्चेमध्ये उमदेवारांनी आपले विचार इंग्रजित मांडणे
अपेक्षित आहे. त्यांची इच्छा असल्यास ते हिंदीमध्ये संभाषण करु शकतात. या परीक्षेत
उत्तीर्ण उमदेवारांना अंतिम निवड
प्रकियेसाठी पाचारण केले जाते. यामध्ये मानसशास्त्रीय चाचणी, समूह कार्य, आणि
मुलाखतीचा समावेश असतो. या टप्प्यातच मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे सादर करावी
लागतात. अंतिम निवडीसाठी पात्र उमेदवारांना नजिकच्या लष्करी रुग्णालयात पाठवले
जाते.
सामान्य
सेवा-वैमानिक आणि कमर्शिअल पायलट परवाना सेवा यासाठी निवड झालेल्या उमेदवारांची
वैद्यकीय चाळणी दिल्ली किंवा बेंगळुरु येथे होते. त्यानंतर या उमेदवारांना पुढील चाळणीसाठी
लष्कराच्या देहरादून किंवा म्हैसुरू केंद्रावर उपस्थित राहावे लागते. अंतिम यादित
नाव समाविष्ट न झालेल्या उमेदवारांचा प्रवास इथेच थांबतो. त्यांना पुन्हा नव्याने
सर्व चाळणी परीक्षा द्याव्या लागतात. उमेदवारांनी
दिलेली वय/शिक्षण/जात प्रमाणपत्र आदी बाबतची माहिती असत्य असल्याचे
आढळल्यास कोणत्याही टप्प्यांवर उमदेवारांना घरी पाठवले जाते. अंतिम निवड यादी वैद्यकीय /शारीरिकदृष्ट्या योग्य/सक्षम उमदेवारांची
व जागेच्या उपलब्धतेनुसार केली जाते. प्रत्येक
तुकडीनुसार रिक्त पदे बदलत राहू शकतात. प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध जागांची माहिती
उपलब्ध झाल्यावर रिक्त जागांबाबत निर्णय घेतला जातो. अंतिम निवड झालेल्या
उमेदवारांची यादी कोस्ट गार्डच्या www.joinindiancoastguard.gov.in या
संकेतस्थळावर अपलोड करण्यात येते. या
पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी, अर्जात नमूद केल्यानुसार शारीरिक
पात्रतेचे निकष-(वयोमर्यादा,
उंची, छाती, वजन, कान/दातांची स्वच्छता, टॅटू, दृष्टी/रंगआंधळेपणा इत्यादी) स्वत:ला लागू होतात किंवा नाही, याची काटेकोरपणे
तपासणी करणे आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही निकषात बसत नसल्यास उमेदवार अपात्र
ठरतो. काही कारणास्तव प्रारंभिक पातळीवर अर्ज स्वीकृत झाल्यावर ,नंतर कोणत्याही
टप्प्यावर निकषानुसार उमेदवार पात्र नसल्याचे आढळल्यास त्याला घरी पाठवले जाते.
००००

Comments
Post a Comment