पादत्राणे डिझाइन:कौशल्यातून स्वयंपूर्णतेकडे
पादत्राणे डिझाइन:कौशल्यातून स्वयंपूर्णतेकडे
भारतामध्ये
पादत्राणे उद्योग हा पूर्वापार चालत आहे. मात्र या क्षेत्राचा संघटित स्वरुपात
विकास साध्य होऊ शकला नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६० च्या दशकात या
दिशेने सूत्रबध्द प्रयत्न सुरु झाले. या प्रयत्नांना यश येऊन पादत्राणे निर्मिती
आणि चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या विविधांगी वस्तूंच्या उत्पादनाला संघटित
स्वरुप आले. एक उद्योग म्हणूनही या क्षेत्राला आकार आला.
या
क्षेत्रात पादत्राणे निर्मितीचे कौशल्य प्राप्त करणारे कारागीर मोठ्या प्रमाणावर आहेत.
मात्र व्यवस्थापकीय आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या मनुष्यबळाची वाणवा आहे. यामुळे या
उद्योगाच्या विकास आणि वाढीसाठी अडथळे निर्माण झाले. या समस्येच्या निराकरणासाठी
केंद्र सरकारने १९६३ साली आग्रा येथे सेंट्रल फूटवेअर इंस्टिट्यूटची स्थापना केली.
सध्या हे केंद्र सूक्ष्म-लघु- मध्यम (मायक्रो-स्माल-मीडियम) मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक
यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तिंना
उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य प्राप्त करुन देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट्य आहे. १९९६ साली
या संस्थेला स्वायतत्ता प्रदान करण्यात आली.
पादत्राणे
निर्मितीच्या क्षेत्रातील आधुनिक काळातील आव्हाने आणि गरजा स्वीकारण्याची क्षमता
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, याअनुषंगाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली
आहे. पादत्राणे डिझाइन आणि निर्मितीच्या क्षेत्रात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर
होत असल्याने, जगातील कोणत्याही ठिकाणी अशा यंत्रसामग्री हाताळण्याचे कौशल्य
उमेदवारांना प्राप्त करुन दिले जाते. या संस्थेतील उमदेवारांना १०० टक्के प्लेसमेंट मिळाले आहे.
इंग्लड मधील सात्रा तंत्रज्ञान
केंद्राचे सदस्यत्व या संस्थेस मिळाले आहे. ही संस्था पादत्राणे संशोधन, विकास आणि
परीक्षण या बाबतील महत्वाची संस्था समजली जाते. पादत्राणे डिझाइन क्षेत्रातील मोठा
अनुभव असलेल्या इंग्लंडमधीलच लिसेस्टर कॉलेज आणि टेक्सटाइल इंस्टिट्यूटसोबत
संस्थेने सहकार्याचा करार केला आहे. प्रवेश मिळालेल्या मुले आणि मुलींची राहण्याची
सोय वसतिगृहात केली जाते.
प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या- टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, बाटा इंडिया लिमिटेड, लिबर्टी
फूटवेअर, रिलॅक्सो, मोजा शूज, एरो ग्रुप्स, निखिल उद्योग, दावर ग्रुप, तेज ग्रुप, केनमोर
फरिदा ग्रुप, ॲक्शन ग्रुप, मिर्झा इंटरनॅशनल, गुप्ता एचीसी ओव्हरसीज, सूपर हाऊसेस
ग्रुप.
अभ्यासक्रम
(१) डिप्लोमा इन
फूटवेअर डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग- कालावधी १२ महिने. या
अभ्यासक्रमास इंग्लंडमधील टेक्स्टाइल इंस्टिट्यूटने मान्यता प्रदान केली आहे. भारत
सरकारने (नॅशनल स्किल
क्वालिफिकेशन फ्रेमवर्क) या
अभ्यासकमाची कौशल्यप्राप्त पातळी सहा, अशी निर्धारित
केली आहे. कनिष्ठ आणि मध्यम पातळीवर तंत्रो-व्यवस्थापकांची(टेक्नो मॅनेजर्स) गरज भागवणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती या
अभ्यासक्रमाव्दारे केली जाते.
नव्या
पध्दतीच्या चामड्यांच्या वस्तुंचे डिझाइन, पादत्राणे मूल्य नियंत्रण, उत्पादकतेत
वाढ, गुणवत्ता नियंत्रण आदी बाबींवर या उमेदवारास लक्ष द्यावे लागते. अभ्यासक्रमाच्या
निवडीसाठी १२ वीतील गुण आणि संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील गुण ग्राह्य
धरले जातात.
(२) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर मॅन्युफॅक्चुरिंग- कालावधी-एक वर्षं. अर्हता- १०वी. नॅशनल स्किल
क्वालिफिकेशन फ्रेमवर्कने या अभ्यासक्रमाची कौशल्य पातळी पाच, अशी निर्धारित केली
आहे. उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रणावर लक्ष ठेवण्यासाठी या तंत्रज्ञांना सुपरवायजरी(पर्यवेक्षीय)स्वरुपाचे/दर्जाचे काम सुपूर्द करण्यात येते.
(३) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर डिझाइन ॲण्ड
प्रॉडक्ट डेव्हलपमेंट - कालावधी १२ महिने. अर्हता- १२ वी उत्तीर्ण. हा
अभ्यासक्रम केल्यानंतर उत्तम पध्दतीने पादत्राणांचे डिझाइन करता येणे शक्य व्हावे
यासाठी विद्यार्थ्यांना सैध्दांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान प्रदान केले जाते.
(४) सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर डिझाइन ॲण्ड
प्रॉडक्ट डेव्हलपमेंट - कालावधी ६ महिने. अर्हता- १० वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना
पादत्राणे निर्मितीचे वेगवेगळी तंत्रे शिकवली जातात. या
उमेदारावारास प्रत्यक्ष कामासोबतच सुपरवायझरी स्वरुपाची जबाबदारी स्वीकारता यावी
यासाठी प्रशिक्षित केले जाते. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कने या
अभ्यासक्रमाची कोशल्यपातळी आठ, अशी निर्धारित केली आहे. (५) पोस्ट
ग्रॅज्युएट हायर डिप्लोमा इन फूटवेअर टेक्नॉलॉजी
ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज - कालावधी १८ महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी
किंवा तंत्रज्ञान किंवा विज्ञान पदवी किंवा एमबीए. या अभ्यासक्रमास इंग्लंडमधील टेक्स्टाइल
इंस्टिट्यूटने मान्यता प्रदान केली आहे. लिसेस्टर इंस्टिट्यूट
ऑफ फुटवेअर या संस्थेच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम चालवला जातो. लिसेस्टर येथे सहा
आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाते. नॅशनल स्किल
क्वालिफिकेशन फ्रेमवर्कने या अभ्यासकमाची
कौशल्यप्राप्त पातळी आठ, अशी निर्धारित
केली आहे. मध्यम श्रेणीतील तंत्रोव्यवस्थापकांची गरज भासवणाऱ्या
मुनष्यबळाची निर्मिती या अभ्यासक्रमाव्दारे केली जाते.
या
अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी पदवीस्तरीय गुण
आणि संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
(६) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
इन फूटवेअर
टेक्नॉलॉजी - कालावधी १८ महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी.
विज्ञान पदविधारकांना प्राधान्य दिले जाते. नॅशनल
स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कने या अभ्यासकमाची
कौशल्यप्राप्त पातळी सात, अशी निर्धारित
केली आहे. पादत्राणे निर्मिती
उद्योगातील वेगवेगळया घटकांमध्ये काम करण्याचे कौशल्य (निर्मिती
सुपरव्हायजर, गुणवत्ता नियंत्रण, नियोजन, डिझायनिंग, कच्चा मालाचे परीक्षण, विक्री
आदी)
उमदेवारांना प्राप्त व्हावे या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली
आहे. मध्यम श्रेणीच्या तंत्रोव्यवस्थापकाची
गरज भासवणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती या अभ्यासक्रमाव्दारे केली जाते. कंपनी/उद्योगाची
सर्वंकष स्पर्धात्मकता वाढीसाठी या उमेदवाराने प्रयत्न करणे अपेक्षित असते.
या
अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी पदवीस्तरीय गुण
आणि संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
(७) पोस्ट डिप्लोमा
इन फूटवेअर
टेक्नॉलॉजी - कालावधी एक
वर्षं. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदविका.
विज्ञान पदविधारकांना प्राधान्य दिले जाते. नॅशनल
स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कने या अभ्यासकमाची
कौशल्यप्राप्त पातळी सहा, अशी निर्धारित
केली आहे. पादत्राणे निर्मिती उद्योगातील वेगवेगळया घटकांमध्ये
काम करण्याचे कौशल्य (निर्मिती
सुपरव्हायजर, गुणवत्ता नियंत्रण, नियोजन, डिझायनिंग, कच्चा मालाचे परीक्षण, विक्री
आदी)
उमदेवारांना प्राप्त व्हावे या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली
आहे. कंपनी/उद्योगाची सर्वंकष स्पर्धात्मकता
वाढीसाठी या उमेदवाराने प्रयत्न करणे अपेक्षित असते.
या
अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी पदवीस्तरीय गुण
आणि संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
पत्ता- एसआयटीई - सी,सी-४१ आणि
४२, इन्डस्ट्रिअल एरिआ, सिकंदरा आग्रा, दूरध्वनी- ०५६२-२६४२००५, संकेतस्थळ -
www.cftiagra.org.in, ईमेल-info@cftiagra.org.in
००००
सेंट्रल
फूटवेअर इंस्टिट्यूट चेन्नई
या संस्थेची स्थापना १९५७ साली करण्यात आली. हे केंद्र सुध्दा सूक्ष्म--मध्यम-
लघु उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहेत.
संस्थेचे
अभ्यासक्रम
(१) डिप्लोमा इन फूटवेअर मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड डिझाइन, कालावधी-दोन
वर्षे, अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम लिसेस्टर कॉलेज ऑफ
फुटवेअरशी संलग्नित असून याच संस्थेमार्फत पदविका प्रदान केली जाते.
(२) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेशन इन फूटवेअर डिझाइन ॲण्ड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, कालावधी-एक वर्ष,
अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.
(३) पोस्ट डिप्लोमा इन फूटवेअर टेक्नॉलॉजी, कालावधी-एक वर्षे, अर्हता-
कोणत्याही विषयातील पदविका.
(४) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर मॅन्युफॅक्चुरिंग टेक्नॉलॉजी, कालावधी-एक
वर्ष, अर्हता- १०वी उत्तीर्ण.
(५) सर्टिफिकेट कोर्स इन लेदर गुड्स मेकर, कालावधी-एक
वर्ष, अर्हता- १०वी उत्तीर्ण,
(६) सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर डिझाइन ॲण्ड प्रॉडक्शन, कालावधी- सहा महिने, अर्हता- १०वी
उत्तीर्ण.
(७) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फूटवेअर टेक्नॉलॉजी, कालावधी-दीड वर्षे, अर्हता-
कोणत्याही विषयातील पदविका.
डिप्लोमा
इन फूटवेअर मॅन्युफॅक्चर ॲण्ड डिझाइन या अभ्यासक्रमाची
पदविका वगळून इतर अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र भारत सरकारच्या वतिने दिले जाते.
१० टक्के
जागा महिलांसाठी राखीव
ठेवण्यात येतात. प्रथम येणाऱ्यास प्रथम
या तत्वावर या सर्व
अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
संपर्क- डायरेक्टर, सीएफटीआय,65/1
जीएसटी रोड गिंडी[GUINDY] चेन्नई
600032, तामीळनाडू, दूरध्वनी:044-स22501529, फॅक्स-22500876, संकेतस्थळ:
www.cftichennai.in , ई-मेल- admissions@
cftichennai

Comments
Post a Comment