आरोग्य व्यवस्थेचा आधार


 

आरोग्य व्यवस्थेचा आधार

करोना काळ हळूहळू संपत जाईल आणि पुन्हा सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असताना करोना विषाणूने उचल खाल्ली. मार्च २०२० पासून करोनाचा सामना करताना वैद्कीय क्षेत्रातील मनुष्यबळाची दमछाक झाली. एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा तशीच अवस्था निर्माण झाली या मनुष्यबळास पुन्हा रांत्रदिन युध्दाचा प्रसंग, असा अनुभव येत आहे. संकटाची तीव्रता प्रचंड मोठी असल्याने या मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे.

 यापुढील काळात आरोग्य व्यवस्थेचा अधिक विस्तार केला जाईल. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करतील. तशी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.

आरोग्य व्यवस्थेमध्ये केवळ डॉक्टरांचा समावेश होत नाही. ते आघाडीवरील सेनापती आहेत. पण कोणत्याही सेनापतीच्या साहाय्यास सैनिकसुध्दा हवे असतात. करोना काळात डॉक्टरांच्या सोबतीनेच जगभरातील नर्सेस (परिचारकांनी) नी मोठी भूमिका बजावली. सध्या चांगल्या प्रशिक्षित नर्सेसची गरज आणि उपलब्धता यात बरीच तफावत आहे. त्यामुळे नर्सिंगमध्ये करिअरच्या उत्तमोत्तम संधी देशविदेशात मिळू शकतात. या करिअरचा गाभा सेवा हाच असला तरी, ही एक स्वत:साठी कुटुंबियांसाठी उत्तम आयुष्य जगण्यासाठी संधी सुध्दा देत असते. चांगले वेतन/ मानधन मिळणारे हे क्षेत्र आहे. शासकीय खाजगी रुग्णालयांमध्ये नर्सेसची गरज कधीच कमी होणारी नाही. रुग्णालयांची संख्या वाढत जाणारी आहे. त्यामुळे यापुढील काळात प्रशिक्षित नर्सेसची गरज अधिकाधिक भासणार आहे. शिवाय आता मोठया संख्येन पर्सनलाईज्ड म्हणजे व्यक्तिगत स्तरावरही नर्सेसची सेवा घेण्याकडे कल वाढत चाचला आहे. शा नर्सेसना चांगले सेवा-शुल्क दिले जाते. या क्षेत्रातही पदव्युत्तर पदवी आणि सूक्ष्म स्पेशलायझेशनची सुविधा आहेत. त्यामुळे आणखी संधी मिळू शकतात.

  करोना प्रकोप सुरु होण्यापूर्वी एक किंवा दोन प्रयोगशाळा राज्यात होत्या. आता ०० च्या आसपास ही संख्या पोहचली आहे. वर्षभरातला हा विस्तार मोठा आहे. इतक्या प्रयोगशाळा म्हणजेच तितक्याच प्रमाणात मनुष्यबळाची गरज वाढली आहे. वैद्कांना अधिक उत्तमपध्दतीने निदान करण्यासाठी किंवा अचुकतेपर्यंत जाणार औषधौपचार सुचवण्यासाठी प्रयोगशाळेतील वैद्यकीय अहवाल हे उपयुक्त ठरतात. वेगवेगळया वैद्यकीय समस्यांसाठी वैद्यकांकडून चाळणीचा सल्ला दिला जातो. ही संख्या वाढलेली आहे, त्या प्रमाणात प्रयोशाळा तंत्रज्ञांची गरज वाढतीच राहणार आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम करुन कौशल्यप्राप्त केलेल्या उमेदवारांना चांगल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराची संध मिळू शकते. ऑपरेशन थिएटर मधील मदतनीस, दंतवैद्यकांचे साहाय्यक, एक्स्-रे तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सकांचे तंत्रज्ञ, भूलतज्ज्ञांचे मदतनीस अशा अनेक बाबींसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज पुढील काळात मोठ्या प्रमाणावर लागेल. या विषयाशी संबंधित पदवीस्तरीय अभ्यासक्रमही सध्या उपलब्ध झाले आहेत. हे अभ्यासक्रम शासकीय आणि खाजगी वैद्कीय महाविद्यालयांमध्ये करता येतात. एमबीबीए, बीएएमस, डेंटल, फिजिओथेरपी अशा सारख्या वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश मिळत नसेल तर या दुसऱ्या मार्गाने वैद्यकक्षेत्रात तुलनेने कमी खर्चात प्रवेश करता येणे शक्य आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

या विद्यापीठाने आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यामध्ये बी.एस्सी इन पॅरॉमेडिकल टेक्नॉलॉजी इन () एंडोस्कोपी, () फॉरेंसिक मेडिकल सायन्स, () हिस्टोपॅथॉलॉजी, () न्युरॉलॉजी, () ऑपरेशन थिएटर, () ऑप्टिमेट्री, () परफ्युजन, () प्लॅस्टर, () रेडिओग्रॅफी, (१०) रेडियोथेरपी, (११) ट्रान्सफ्युजन मेडिसीन . (१२) ॲनेस्थिसीया, (१३) ब्लड ट्रान्सफ्युजन, (१४) कॉर्डिऑलॉजी, (१५) क्लिनिकल सायलॉजिस्ट, (१६) कम्युनिटी मेडिसीन , (१७) इर्मजन्सी मेडिसीन या विषयांचा समावेश आहे.

या विषयांच्या नावावरुन नजर फिरवल्यास, वेगवेगळया आरोग्यविषयक बाबींसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज लक्षात येते. हे अभ्यासक्रम कौशल्य विकसित करणारे आहेत. त्यामुळे विषयाचे ज्ञान आणि कौशल्य यात पारंगतता मिळवल्यास अशा उमेदवारांना करिअरच्या संधी मिळू शकतात. १२ वी विज्ञान शाखेतील जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेले ‍विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरतात.

संपर्क- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, म्हासरुल, वणी दिंडोरी रोड - नाशिक, -४२२००४, दूरध्वनी- ०२५३- २५३९१००, २५३९१११, संकेतस्थळ-https://www.muhs.ac.in/contact_us.aspx,ईमेल-academic1@muhs.ac.in

०००

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)

एम्सच्या दिल्ली कॅम्पस मध्ये बी.एस्सी इन मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्रॅफी (कालावधी ३ चार वर्षे), डेंटल ऑपरेटिंग रुम असिस्टंट (कालावधी साडेतीन वर्षे), डेंटल हायजिन (कालावधी साडेतीन वर्षे), ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी (कालावधी साडेतीन वर्षे), ऑप्टिमेट्री (कालावधी ४ चार वर्षे) हे अभ्यासक्रम करता येतात.

एम्स भुवनेश्वर येथे बीएस्सी इन () मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, () ऑपरेशन थिएटर ॲण्ड ॲनेस्थिसिऑलॉजी टेक्नॉलॉजी, () मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओथेरपी, () मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्रॅफी हे अभ्यासक्रम करता येतात. या चारही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे.

एम्स ऋषिकेशमध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात. () कालावधी चार वर्षे/ बी.एस्सी इन () ॲनेस्थिसीया टेक्नॉलॉजी, () परफ्युजन टेक्नॉलॉजी, () न्युक्लियर मेडिसीन टेक्नॉलॉजी, () बॅचलर ऑफ ऑप्टेमेट्री. () कालावधी  साडे चार वर्षे- ी.एस्सी इन () स्लीप लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, () रेस्पिरेटरी थेरपी, () डेंटल हायजिन, () डेंटल रुम ऑपरेटिंग असिस्टंट

() कालावधी तीन वर्षे/ बी.एस्सी इन () युरॉलॉजी टेक्नॉलॉजी, () रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, () न्युरो मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी, () आर्थोपेडिक्स टेक्नॉलॉजी, () मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, हे अभ्यासक्रम करता येतात.

नागपूर एम्स येथे बी.एस्सी इन लॅब टेक्नॉलॉजी आणि बी.एस्सी इन मेडिसिन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम करता येतात. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे.

अर्हता- () बी.एस्सी (ऑनर्स)        नर्सिंग/ बी.एस्सी-मेडिकल टेक्नॉलॉजी-रेडिओग्रॅफी/ डेंटल हायजिन/ डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट/ ऑप्टेमेट्री - १२ वी विज्ञानशाखेची परीक्षा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ गणित आणि इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण. (डेंटल हायजिन/ डेंटल ऑपरेटिंग रुम असिस्टंट/ ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी या तीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयाचा अभ्यास करणे आवश्यक.)

बी.एस्सी नर्सिंग (ऑनर्स)

एम्सच्या दिल्ली, जोधपूर, पाटणा, भोपाळ, भूवनेश्वर, रायपूर आणि ऋषिकेश या सहा कॅम्पस सोबतच २०२१ च्या शैक्षणिक सत्रापासून नागपूर आणि देवघर येथेही बी.एस्सी नर्सिंग (ऑनर्स) अभ्यासक्रम करता येतो. या सर्व एम्समध्ये एकूण ६७१ जागा चाळणी परीक्षेव्दारे भरल्या जातात. भारत सरकारच्या नियमानुसार वेगवेगळया संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमाला केवळ महिला उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो. १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात, खुल्या सवंर्गातील विद्यार्थ्यांना सरासरीने किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट.

संपर्क- असोशिएट डिन (एक्झाम), एआयआयएमएस, नवी दिल्ली- ११०६०८, संकेतस्थळ-www.aiims.edu. ईमेल

parr.aiims.bscmsc@gmail.com

 

 

००००

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी