डिजिटल फिटनेस
डिजिटल फिटनेस
फिटनेस इंडस्ट्रीचा विस्तार आणि वाढ अतिशय
वेगाने होत आहे. करोनोत्तर काळात ही वाढ
विशेषत्वाने लक्षात आली. उत्तम जीवनशैलीसाठी
तंदुरुस्त असण्याची निवड बहुतेकांना पटली. फिटनेस इंडस्ट्रीच्या
परिघात व्यायामासाठी लागणारी विविध उपकरणे, आधुनिक साहित्यासह उभारलेले जीम/ फिटनेस स्टुडियो/ व्यायामशाळा/ फिटनेस क्लब, हेल्थ ड्रिंक्स/ फूड निर्मिती करणारे व्यवसाय या बाबींचा
समावेश होतो.
करोना काळात होम व्हीडीओ, लाइव्ह ऑनलाइन सेशन या पर्यायांकडे अनेक व्यक्ती वळल्या. फिटनेस उद्योगाचा मुख्य ग्राहक हा १५ ते ४०
वर्षे वयोगटातील व्यक्ती अधिक दिसतात. या वयोगटातील
व्यक्तींमध्ये सुदृढ आरोग्यासाठी बरीज जाणिवजागृती झाली असून ते फिटनेसशी संबंधित
बाबींवर मुक्तपणे खर्च करतात. फिट इंडिया मुव्हमेंट सारख्या उपक्रमांव्दारे, भारत सरकारही फिटनेसचे महत्व नागरिकांपर्यंत
पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मार्च २०२० नंतर करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिम आणि हेल्थसेंटर्स बंद करण्यात आली.
त्यानंतर टप्प्याटप्याने ही केंद्र सुरु करण्यात आली. पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये ही
केंद्रे बंद करण्यात आली. बंद झालेल्या काही केंद्रांनी डिजिटल सेवा द्यायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. डिजिटल सेवा देणा-या स्टार्टअपचा उदय या काळात झाला. अधिकाधिक लोकांचा ओढा घरीच
व्यायाम करण्याकडे असल्याने, फिटनेस ॲपवरील लोकांचा वेळ या काळात ४०
टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. याच काळात अशा ॲपचा वापर
करणाऱ्या लोकांच्या संख्येत दुपटिने वाढ झाल्याचे, बेंगळुरुस्थित इंडियन
डिजिटल फिटनेस ॲण्ड वेलनेस प्लॅटफॉर्म - हेल्थीफायमीने केलेल्या
सर्वेक्षणात आढळून आले. फिटनेस फ्रीलान्सर्स, इंफ्ल्युअंसर्स, फिटनेस ट्रेनर्स आणि फिटनेस चैन या घटकांनी आपल्या सेवा ऑनलाइन देणे सुरु केले. एनिटाइम फिटनेस या संस्थेनेही फेसबूक पेजवर ऑनलाइन क्लासेस सुरु केले. फिटर संस्थेने न्युट्रिशन (पोषक आहार), व्यायाम या विषय घटकांशी
संबंधित ऑनलाइन वर्ग सुरु केले. करोनातील
टाळेबंदीमुळे फिटनेस उद्योगाला जो फटका बसला तो त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे भरुन काढण्यास सुरुवात केली.
शारीरिक अंतराचे
(दो गज की दुरी) नियम हे काही काळ
तसेच पाळावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे पूर्वीइतकाच प्रत्यक्ष प्रतिसाद फिटनेस क्लब/ जिम/ स्टुडियो/ व्यायामशाळा यांना मिळण्यास वेळ लागेल. मात्र तोपर्यंत ऑनलाइन वर्गाव्दारे ग्राहकांना सेवा देणे आणि त्यातून उत्पन्न मिळवणे शक्य
असल्याचे दिसून आले. घरातील ऑनलाइन व्यायामशाळा ही जाण्यायेण्याचा वेळ वाचवणारी असल्याचे
दिसून आल्याने नागरिकांचा ओढाही अशा डिजिटल वर्गाकडे वाढला. त्यामुळे या क्षेत्रातही करीअर करता येणे शक्य
आहे. त्यासाठी स्वत:ला चांगल्या संस्थेतून प्रशिक्षित करुन घेणे, तंत्रज्ञानाची माहिती करुन
घेणे आणि अत्यल्प भांडवलाची गुंतवणूक करावी लागेल.
काही अभ्यासक्रम
(१) स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या थिरुवनंतपुरम स्थित लक्ष्मीबाई नॅशनल
कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेत, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिटनेस मॅनेजमेंट, हा एक वर्षे कालावधीचा
अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के
गुणांसह पदवी. या अभ्यासक्रमाला
चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमामध्ये पुढील विषय
घटकांचा समावेश आहे-फिटनेस ॲण्ड वेलनेस, फंडमेंटल्स ऑफ ॲनॉटॉमी ॲण्ड फिजिऑलॉजी ॲण्ड कायनेसिऑलॉजी, स्पोर्ट्स ट्रेनिंग, वेट मॅनेजमेंट, फंडामेंटल्स ऑफ न्युट्रिशनल ॲप्लिकेशन इन हेल्थ ॲण्ड फिटनेस, फंडामेंटल्स ऑफ एक्झरसाइज टेस्टिंग ॲण्ड प्रिस्क्रिप्शन, डिझायनिंग फिटनेस ट्रेनिंग
प्रोग्रॅम, इंज्युरिज ॲण्ड
थेरपॅटिक मॉड्युलेशन, योग ॲण्ड
मेडिटेशन, फिटनेस ट्रेनिंग
फॉर यूथ, वुमेन ॲण्ड ओल्ड
एज.
संपर्क- लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन- करिआवट्टम, पोस्ट-थिरुवनंतपुरम-६९५५८१. दूरध्वनी- ०४७१-२४१८७१२, ईमेल-sailncpe@gmail.com, संकेतस्थळ- https://www.lncpe.gov.in/
(२) ग्वाल्हेर स्थित लक्ष्मीबाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फिजिकल
एज्युकेशन या संस्थेत, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिटनेस मॅनेजमेंट, हा एक वर्षं कालावधीचा
अभ्यासक्रम करता येतो. या संस्थेस डीम्ड
टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. शारीरिक शिक्षण/ प्रशिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक संस्थेला असा
दर्जा पहिल्यांदाच मिळाला असून ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे.
काय शिकाल ?
या
अभ्यासक्रमात फिटनेस ॲण्ड वेलनेस, हेल्थ क्लब
मॅनेजमेंट ॲण्ड थेरॅपेटिक ॲस्पेक्टस ऑफ फिटनेस, अप्लाइड ह्युमन ॲनॉटॉमी ॲण्ड फिजिऑलॉजी, योग ॲण्ड नॅचरोपथी, फिटनेस मॅनेजमेंट, मॅनेजमेंट ऑफ स्पेशल एरिआज इन
फिटनेस इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
या
अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. संपर्क- शक्तीनगर, मेला रोड, ग्वाल्हेर ४७४००२, दूरध्वनी-०७५१-४०००९१७, फॅक्स-४०००९९२, ईमेल- registrar@http://lnipe.edu.in, संकेतस्थळ-
०००
(३) बीपीसीए कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन ॲण्ड गायो फिटनेस ॲकॅडमी
या संस्थांच्या वतिने, प्रोफेशनल
एज्युकेशनल कोर्स इन फिटनेस
ॲण्ड एक्झरसाइज ॲण्ड
न्युट्रिशन सायन्स, हा अभ्यासक्रम
सुरु करण्यात आला आहे.
बीपीसीए
कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन ही , शारीरिक शिक्षण
क्षेत्रातील महत्वाची संस्था समजली जाते. ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे. गायो फिटनेस ॲकॅडमी १९९९ पासून या क्षेत्रात कार्यरत आहे.
अभ्यासक्रम
(अ) सर्टिफिकेट कोर्स इन फिटनेस सेंटर मॅनेजमेंट (अभ्यासक्रमाचे विषय घटक- हिस्ट्री ऑफ फिटनेस – वर्ल्ड ॲण्ड इंडिया, बिलिफ ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ फिटनेस कंझ्युमर, मेंबरशीप, मार्केटिंग-ब्रँडिंग-सेल्स, मेंबरशीप सर्व्हिस-बिल्डिंग अ प्रॉडक्ट, बिझिनेस ऑफ फिटनेस, ह्युमन रिसोर्सेस, फॅसिलिटिज ॲण्ड इक्विपमेंट्स, फ्रंट ऑफिस ॲण्ड बॅक ऑफिस ऑपरेशन, क्लब स्पा इत्यादी), (ब) सर्टिफिकेट कोर्स इन पर्सनल फिटनेस ट्रेनिंग ( अभ्यासक्रमाचे विषय घटक-थेअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ फिटनेस, प्रिंसिपल्स ऑफ ॲनॉटॉमी ॲण्ड फिजिऑलॉजी, प्रिंसिपल्स ऑफ एक्झरसाइज, बायोमेकॅनिक्स, प्रिंसिपल्स ऑफ डायट मॅनेजमेंट ॲण्ड परफार्मन्स, न्युट्रिशन, थिअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग,) (क) सर्टिफिकेट कोर्स इन स्ट्रेन्ग्थ ॲण्ड स्पोर्ट्स कंडिशनिंग- (अभ्यासक्रमाचे विषय घटक- इंट्रोडक्शन टू स्ट्रेन्ग्थ ॲण्ड कंडिशनिंग, प्रिंसिपल्स ऑफ डायटेटिक्स, न्युट्रिशन फॉर स्पोर्ट्स परफार्मन्स, फॅसिलिटी मॅनेजमेंट, स्पोर्ट्स कंडिशनिंग, इत्यादी)
अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण आणि शारीरिकदृष्टया सक्षम असावा.
संपर्क- (१) चौथा माळा,प्लॉट बी, फेअरलिंक सेंटर, लिंकरोडच्या विरुध्द दिशेला, मॉनगिनीस
फॅक्ट्रिच्या बाजूला, वीरा देसाई इंडस्ट्रिअल इस्टेट, अंधेरी
(पश्चिम), मुंबई-४००००५३, संकेतस्थळ- https://www.gayofitnessacademy.com, ईमेल- info@gayofitnessacademy.com (२) कॉलेज
ऑफ फिजिकल एज्युकेशन, भारतीय क्रीडा मंदिर, नायगाव क्रॉस रोड, वडाळा, मुंबई-४०००३१, दूरध्वनी- ०२२- २४१६८६०९ , फॅक्स- २४७१ २४५७ बॉम्बे फिजिकल
कल्चरल असोशिएशन.
(४) चंद्रशेखर आगाशे, कॉलेज
ऑफ फिजिकल एज्यूकेशन पुणे- या संस्थेतील अभ्यासक्रम- आउुटडोअर
फिटनेस इंस्ट्रक्टर कोर्स, एरोबिक्स इंस्ट्रक्टर कोर्स, स्केटिंग
इंस्ट्रक्टर कोर्स, योगा इंस्ट्रक्टर कोर्स, स्पोर्ट्स
ॲण्ड फिटनेस इंस्ट्रक्टर कोर्स, जिम इंस्ट्रक्टर कोर्स, स्पोर्ट्स
न्युट्रिशन कोर्स.
अर्हता- कोणत्याही
विषयातील १२वी.
संपर्क- चंद्रशेखर
आगाशे, कॉलेज
ऑफ फिजिकल एज्युकेशन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विरुध्द दिशेला, गुलटेकडी
पुणे- ४११०३७, टेलेफॅक्स- २४२६१८७२, संकेतस्थळ- https://agashecollege.org, ईमेल- agashecollegepune@gmail.com
०००
(५)
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन,या संस्थेने, बी.एस्सी इन फिटनेस
ॲण्ड लाइफस्टाइल मॉडिफिकेशन, हा तीन वर्षे कालावधीचा
अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- विज्ञानविषयातील विषयातील
१२वी. अभ्यासक्रमामध्ये
ॲनॉटॉमी, फिजिऑलॉजी, एक्जरसाइज फिजिऑलॉजी, फिटनेस असेसमेंट, न्युट्रिशन, लाइफस्टाइल मॉडिफिकेशन, योग, सायकॉलॉजी, फिटनेस फॉर वुमेन,चिल्ड्रेन ॲण्ड एल्डरली पिपल, डान्स फॉर फिटनेस ॲण्ड लाइफस्टाइल मॉडिफिकेशन आदी विषय घटकांचा समावेश आहे.
संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ
स्पोर्ट्स मेडिसीन, थर्ड फ्लोअर, नंबर ९३६/११६, सिक्स्थ
अव्हेन्यू, अण्णानगर, चेन्नई-४०, दूरध्वनी- ०४४-२६१८१८१९, ईमेल-info@iism-edu.com, संकेतस्थळ- iism-edu.com
(६)
गोल्ड जिम - या संस्थेचे अभ्यासक्रम- ॲडव्हान्स्ड
पर्सनल ट्रेनिंग कोर्स, कालावधी-चार महिने, ऑनलाइन फास्ट ट्रॅक रोड, कालावधी- एक महिना. संपर्क- २०२-२०३, ट्रेड अव्हेन्यू, सुरेन रोड, पश्चिम द्रुतगती मार्गाच्या
विरुध्द दिशेला, अंधेरी पूर्व-४००००९३, भ्रमणध्वनी- ८९७६८३४८३१, ईमेल- WeCare@GoldsGym.in, संकेतस्थळ-
https://goldsgym.in/contact

Comments
Post a Comment