गणिताचे महत्व


गणिताचे महत्व

 

गणितीय आकडेमोड किंवा प्रारुपांचा आधार घेऊन अनेक जटील समस्या, प्रश्न याच्या मुळाशी जाता येणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. करोना काळात त्याच्याशी लढा देण्यासाठी वेगवेगळया प्रयत्नांमध्ये गणितीय सिध्दांत/ प्रारुप/ आलेख यांचा मोठा हातभार लागला.

गणिताचे हे महत्व अनन्यसाधारण असे आहे. मात्र झोकून देऊन शुध्द गणिताचा अभ्यास करण्याकडे म्हणावा तितका ओढा दिसत नाही. गणितात गती असणारी मुले/मुली अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखांकडे ठरवून जातात. अर्थात तिथेही त्यांच्या प्रज्ञेमुळे त्या शाखांशी संबंधित गणितीय भाग उत्तमरीतिन समजून त्याचा उपयोग आपले ज्ञान अधिक सखोल करण्यासाठी करतात. मात्र अशा हुषार मुलांनी शुध्द गणिताचाच रस्ता पकडला तर त्यांच्याकडून अधिक भर आणि ठसठशित कामगिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया हा गणिताचाच राहिला आहे. गणितीय सूत्रांचा वापर करुन नवे शोध लावले जात आहे. चंद्रावरील स्वारी पासून ते मंगळाव हेलिकॉप्टर उडवण्यापर्यंतची किमया गणितीय सूत्रे/ प्रमेय/ सिध्दांत यांच्या मदतीनेच मानवास शक्य होऊ शकली. जगातील सर्व उंच इमारतीचा पाया, हा गणितीय सिध्दांतांनी सिध्द केल्यावरच  पक्का होऊ शकला. संगणक, विमान वाहतूक, स्कॅनिंग, कोडिंग, सॉफ्टवेअर, कृत्रिम बुध्दिमत्ता आदी क्षेत्रांचा विस्मयकारक विकास हा गणितामुळेच होउ शकला. गणितीय सूत्रांना समजून त्यांचा वापर वेगवेगळया उत्तरासाठी शोधण्यात कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्ती प्रत्यक्ष जीवनातील अनेक जटील समस्यांना वस्तुनिष्ठपणे हाताळू शकतात. या समस्या सोडवण्यासाठी अचुकतेपर्यंत पोहचणारे उपाय सुचवू शकतात.

गणिताचा अभ्यास

सर्वव्यापी अशा गणिताचे हे महत्व लक्षात घेऊन प्रज्ञावंत मुला/मुलींनी गणिताच्या अभ्यासाकडे वळायला हवे. आयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) आणि एनआयटी (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विषयांसोबत १२ वी नंतर गणिताचा म्हणजेच इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स हे अभ्यासक्रम करता येतात. शिवाय एम.एस्स्सी  आणि पीएचडी हे अभ्यासक्रम करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 () आयआयटी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स या विभागाने बी.टेक ॲण्ड डयुएल डिग्री इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग (मॅक) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. जेईई (जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन) ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांवर आधारित या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाच्या वैशिष्ट्यपूर्ण विषयघटकांमुळे हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना  सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील  अनेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्त्मोत्तम संधी सातत्याने मिळल्या आहेत. यामध्ये फायनांस (वित्त्‍), ॲनॅलिटिक्स (विश्लेषण), कंसल्टिंग (सल्ला-सेवा), क्रिप्टोग्रॅफी (डिजिटल डेटा सुरक्षितरीत्या पाठवण्याचे तंत्र किंवा भाषा. यामुळे पाठवणारा आणि स्वीकारणाराच ही माहिती वाचू/पाहू शकतो.) आधारित सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान आदी कंपन्यांचा समावेश आहे. संपर्क-https://maths.iitd.ac.in/

() आयआयटी गौहाटीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सने बी.टेक इन  मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरु करण्यात या आयआयटीने आघाडी घेतली. संस्थेत एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग आणि पीएचडी (मॅथेमॅटिक्स) अभ्यासक्रमही करता येतात. संपर्क- https://www.iitg.ac.in

() आयआयटी रुरकीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सने पुढील अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. () पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटड एम.एस्सी, () दोन वर्षे कालावधीचा एम.एस्सी,() पीएचडी. संपर्क-https://www.iitr.ac.in

() आयआयटी भूवनेश्वरच्या स्कूल ऑफ बेसिक सायन्सने जॉईंट एम.एस्सी पीएडी इन मॅथेमॅटिक्स हा वैशिष्ट्यपूर्ण इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवी ते संशोधन असा प्रवास करता येणे शक्य होते. याशिवाय केवळ गणित विषयात पीएचडी करण्याची सुविधा या स्कूलमध्ये आहे. संपर्क- https://www.iitbbs.ac.in/

() आयआयटी मद्रासच्या  डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सने एम.टेक इन इंडस्ट्रिअल मॅथेमॅटिक्स हा वेगळा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला विज्ञान पदवीधर किवा बी.टेक पदवीधराला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी गेट-ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स, या परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. याशिवाय दोन वर्षे कालावधीचा एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स आणि पीएचडी अभ्यासक्रमही करता येतो. संपर्क- https://math.iitm.ac.in/

() आयआयटी कानपूरच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सने पुढील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु केले आहेत. () बी.एस (बॅचलर ऑफ सायन्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड सायंटिफिक कॉम्पुटेशन. अभ्यासक्रमाचा कालावधी - चार वर्षे. () बी.एस-एम.एस-(बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स) इन मॅथेमॅटिक्स. अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षे. () एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स, () एम.एस्सी इन स्टॅटिस्टिक्स () पीएचडी- मॅथेमॅटिक्स. संपर्क- https://www.iitk.ac.in/math/bs-ms

() आयआयटी वाराणसी (बनारस हिंदू विद्यापीठ) च्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सने, डयुएल डिग्री इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी पाच वर्षाचा. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक जगतात या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संधी मिळत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा या अभ्यासक्रमाकडे दिसून येतो. या अभ्यासक्रमाला जेईई- ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. या संस्थेत पीएचडी अभ्यासक्रमही करता येतो. या अभ्यासक्रमाला गेट परीक्षेतील गुणांवर प्रवेश दिला जातो. संपर्क-https://www.iitbhu.ac.in/dept/math

() आयआयटी मुंबईने बॅचलर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला जेईई - ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. याच संस्थेत इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम, याच संस्थेतील इतर अभ्यासक्रमांमध्ये पदवीचे पहिले वर्षं पूर्ण केलेल्या विदर्थ्यांना करता येतो. मात्र त्यासाठी त्यांना शाखा बदलून घेण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सकडे विनंती करावी लागते. संस्थेने एम.एस्सी पातळीवरील दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यापैकी एक आहे एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स आणि दुसरा आहे एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड इन्फॉर्मेटिक्स. हे दोन्ही अभ्यासक्रम प्रत्येकी दोन वर्षे कालावधीचे आहेत. त्यासाठी जॉईंट ॲडमिशन फॉर मास्टर्स ही परीक्षा द्यावी लागते. संशोधनात्मक कार्यास प्रोत्साहन देणारे हे अभ्यासक्रम आहेत.

या संस्थेने गणित आणि सांख्यिकी या विषयांमध्ये पीएचडी करण्याची संधी सुध्दा उपलब्ध करुन दिली आहे. पीचडीच्या प्रवेशासाठी  आयआयटी-मुंबईच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सतर्फे स्वतंत्ररीत्या चाळणी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाते. (१२ वीनंतर ज्या हुषार मुलांचे आयआयटी मुंबई वा इतरही आयआयटीमधील प्रवेशाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसेल त्यांना एम.एस्सी आणि पीएचडीच्या मार्गाने ही स्वप्नपूर्ती करता येणे शक्य होऊ शकते. या कालावधीत आयआयटीमधील सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांचा लाभ मिळतोच शिवाय गुणवत्तेनुसार राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर करिअर संधीही मिळू शकते.) संपर्क संकेतस्थळ- http://www.math.iitb.ac.in

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी