गुंतवणुकीवरील परतावा
गुंतवणुकीवरील परतावा
जनसंवाद आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रम चालवणाऱ्या काही शैक्षणिक
संस्थांमधील शैक्षणिक शुल्क मोठे असते. तर
काही संस्थांमध्ये हे शुल्क परवडणारे असते. शैक्षणिक शुल्काच्या अनुषंगाने गुंतवणुकीवरील
परताव्या संदर्भात (रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट) काही महत्वाच्या संस्था पुढील प्रमाणे आहेत. (रिटर्न
ऑफ इन्व्हेस्टमेंट या अर्थ, संपूर्ण शैक्षणिक शुल्काच्या तुलनेत अधिक रक्कमचे
सरासरी पॅकेज अथवा वार्षिक वेतन.)
(१) डिपार्टमेंट ऑफ मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन ॲण्ड स्टडीज, सावित्रीबाई फुले
विद्यापीठ पुणे - वार्षिक वेतन १० लाख रुपये, (२) डिपार्टमेंट ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन, कोईम्बतूर - ८ लाख
रुपये, (३) एजेके मास कम्युनिकेशन
रिसर्च सेंटर , जामिया मिलिया, नवी दिल्ली-साडेपाच लाख रुपये, (४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास क्यमुनिकेशन - नवी
दिल्ली-साडेपाच लाख रुपये, (५) अल्वाज
कॉलेज- मदुराई- साडेचार लाख रुपये, (६)
माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड कम्युनिकेशन,
भोपाळ-सव्वा चार लाख रुपये, (७)
डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, हैदराबाद युनिव्हर्सिटी - चार लाख रुपये, (८) ॲमिटी कॉलेज ऑफ कम्युनिकेशन - अडीच लाख रुपये, (९) इंस्टिट्यूट ऑफ मीडिया स्टडीज, चंदिगढ
युनिव्हर्सिटी - अडीच लाख रुपये, (१०)
मनोरमा स्कूल ऑफ कम्युनिकेशन - कोट्टायम- अडीच लाख रुपये.
इतर महत्वाच्या
संस्था
(१) मेहरचंद महाजन कॉलेज फॉर वुमेन - चंदिगढ, (२) हिंदुस्थान कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायंस-कोईम्बतूर, (३) मराठवाडा मित्र मंडळाचे महाविद्यालय- पुणे, (४) कन्या महाविद्यालय- जालंदर, (५) मद्रास खिस्तियन कॉलेज-चेन्नई, (६) ॲपिजे इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन- न्यू दिल्ली, (७) स्कूल ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन,
इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज - नॉयडा, (८) डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीज, जैन- डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी-
बेंगळुरु, (९) जागरण स्कूल ऑफ
जर्न्यालिझम ॲण्ड कम्युनिकेशन - भोपाळ, (१०) स्कूल ऑफ मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन स्टडीज, गॅलगातिॲस युनिव्हर्सिटी-
ग्रेटर नॉयडा, (११) स्टॅनी मेमोरिअल
पीजी कॉलेज - जयपूर, (१२) के.जी.जोशी
कॉलेज ऑफ आर्ट्स अण्ड कम्युनिकेशन-ठाणे
००
टीव्ही ॲण्ड रेडियो जर्न्यालिझम
टीव्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्लीने सुरु केलेला, पोस्ट
ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन टीव्ही ॲण्ड रेडियो जर्न्यालिझम हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु
शकतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी १० महिने.
या कालावधीत टीव्ही पत्रकारितेतील नामवंत तज्ज्ञांना सातत्याने विविध विषय घटकांना
शिकवण्यासाठी बोलवण्यात येते. त्यामुळे सध्याचे प्रवाह आणि या माध्यमांच्या गरजा
समजणे सुलभ जाते.
माध्यमांच्या जगात इंडियन इंस्टिट्यूट
ऑफ मास कम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमाच्या दर्जा आणि गुणवत्तेबाबत आदराने बोलले जाते.
त्यामुळे हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांमध्ये
सुलभतेने प्रवेश होऊ शकतो.
काय शिकाल ?
जनसंवाद - सिध्दांत, संकल्पना, प्रक्रिया आणि संशोधन, पत्रकारितेची ओळख -
नैतिक मूल्ये आणि माध्यमांशी संबंधित कायदे,
मुद्रित पत्रकारिता, रेडियो पत्रकारिता, टेलिव्हिजन पत्रकारिता, विकास
पत्रकारिता, टीव्ही बातम्या - वार्तांकन आणि संपादन, रेडियो बातम्या - वार्तांकन
आणि संपादन, नव्या माध्यमांची पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क आणि कार्पोरेट
जनसंवाद. जनसंवाद - संकल्पना, प्रक्रिया आणि सिध्दांत,
रेडियो आणि टीव्ही पत्रकारितेचा इतिहास, रेडियो
आणि टीव्ही पत्रकारिता - संकल्पना आणि प्रक्रिया, रेडियो
बातम्या- वृत्तसंकलन, संपादन, बातम्यांचे
सादरीकरण, निर्मिती, प्रसार माध्यम
व्यवस्थापन, नवी माध्यमे आणि वेब पत्रकारिता, माध्यम व्यवस्थापन-जाहिरात आणि जनसंपर्क
या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेव्दारे
प्रवेश दिला जातो. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजंसीव्दारे घेतली जाईल. महाराष्ट्रातील
परीक्षा केंद्रे- मुंबई,पुणे आणि नागपूर
प्लेसमेंट
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या
संस्थेतील अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या
संधी मिळाल्या आहेत.
नेटवर्क १८, झी मीडिया, सोनी, रेड
एफ.एम, रेडियो मिर्ची, पीटीआय, आकाशवाणी-बातम्या, आयएएनएस, क्विंट, टीसीएस,
अक्सेंच्युअर, एचसीएल, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, हिंदुस्थान टाइम्स/हिंदुस्थान,
बिझिनेस स्टॅडर्ड, आऊटलूक मनी, एनटीपीसी, टाटा स्टील, जिंदाल स्टील, एक्सचेंज फोर,
मीडिया कॉग्नेसिस न्यूज, मेडिसन ॲडर्व्हटायजिंग, कान्ट्रॅक्ट ॲडर्व्हटाजिंग,ॲड
फॅक्टर्स, दिल्ली प्रेस, पब्लिकेशन डिव्हिजन इत्यादी
संपर्क - जेएनयू कॅम्पस, अरुणा आसफ अली मार्ग, नवी दिल्ली - 110067, दूरध्वनी- 011 -
26741352 ,फॅक्स-011 - 26742920 ईमेल-iimc1965@gmail.com
०००
नवं शिका- डेटा सायन्स ॲण्ड मॅनेजमेंट
आयआयटी इंदोर आणि आयआयएम इंदोर या दोन
महत्वाच्या संस्थांनी एकत्र येऊन मास्टर
ऑफ सायन्स इन डेटा सायन्स ॲण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या
अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना माहिती विश्लेषण आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे
तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. अशा स्पेशलाईज्ड तज्ज्ञांना मोठ्या कंपन्यांमध्ये
सध्या मोठी मागणी आहे. कालावधी २ वर्षे. अर्हता-
प्रथम श्रेणीसह बीटेक/ बीई/ बी आर्क/बी डिझाइन/चार वर्षे कालावधीचा
बीएस्सी/ एमएस्सी/ एमसीए/ एमबीए.मागील तीन वर्षातील कॅट /जीमॅट/ गेट/ जीआरई/ जॅम
मधील गुणांचा आधार प्राथमिक चाळणीसाठी घेतला जाईल. किंवा डेटा सायंस ॲण्ड
मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट-डीमॅट या चाळणी परीक्षेतील गुण प्रवेशासाठी ग्राह्य
धरले जातील.ही परीक्षा ३ जुलै २०२२ रोजी इंदोर येथे घेतली जाईल.
संपर्क- msdsm.iit.ac.in
msdsm-office@iiti.ac.in दूरध्वनी- ०७३१-६६०३३३३
००
मुंबई विद्यापीठाचे नवे अभ्यासक्रम
(अ)मुंबई
विद्यापीठाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सेंटर फॉर एक्सलंस इन मेरिटाइम
स्टडीज या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेने पुढील आंतरज्ञानशाखीय
अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे. सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी दोन
वर्षे.
(१)एम.ए इन मेरिटाईम स्टडीज, अर्हता-५० टक्के
गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
(२)एम.कॉम इन मेरिटाईम स्टडीज, अर्हता-५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील बीई किंवा बीटेक/बी
फार्म /बीएस्सी(भौतिक शास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित/
सांख्यिकी/ जैविकशास्त्र या विषयांसह)किंवा बी कॉम.
(३) एम.एस्सी इन मेरिटाईम स्टडीज, अर्हता-५०
टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील बीई किंवा बीटेक/बी फार्म /बीएस्सी(भौतिक
शास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित/सांख्यिकी/जैविकशास्त्र या विषयांसह)
संपर्क- सेंटर फॉर एक्सलंस इन मेरिटाइम स्टडीज,राजीव गांधी सेंटर
फॉर कंटेप्रररी स्टडीज, युनिव्हर्सिटी कॅम्पस,कुर्ला,मुंबई-४०००९८, संकेतस्थळ- cemas.mu.ac.in
ईमेल- admission@cemas.mu.ac.in
०००
(ब)मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल
रिलेशन्स ॲण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज या विभागाने पुढील दोन अभ्यासक्रम सुर केले आहेत.
(१)एम.ए (ऑनर्स)इन इंटरनॅशनल रिलेशन्स ॲण्ड स्ट्रॅटजिक
स्टडीज- कालावधी दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनॅशनल
रिलेशन्स ॲण्ड स्ट्रॅटजिक स्टडीज- कालावधी एक वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील
पदवी.
संपर्क- स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ॲण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज,
राजीव गांधी सेंटर फॉर कंटेप्रररी स्टडीज,युनिव्हर्सिटी कॅम्पस,कुर्ला,मुंबई-४०००९८,संकेतस्थळ-mu.ac.in
ईमेल-sirss@ mu.ac.in
००
(क)मुंबई विद्यापीठाच्या ॲकॅडेमी ऑफ थिएटर
आर्टस या विभागाने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स-कालावधी- दोन
वर्षे.अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी आणि नाटकाचा अनुभव
(२) डिप्लोमा इन ॲक्टिंग - कालावधी एक वर्षं/
अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी आणि नाटक/ चित्रपट/ लघु चित्रपटात काम करण्याचा
अनुभव
संपर्क
- पहिला मजला, सांस्कृतिक भवन, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी उत्तर गेट समोर,
कलिना, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००५५,
भ्रमणध्वनी-९०२९६२६६८९
०००
हैदराबाद सिंध
नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी चे अभ्यासक्रम-
(१)
बीएस्सी डेटा सायंस, (२)
बीएस्सी योग वुईथ कल्चर सिंथेसीस, (३)
बीएस्सी - एमएस्सी- आयटी वुईथ मॅनेजमेंट, डेटा ॲण्ड बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (४) बीएस्सी-एमएस्सी-योगा वुईथ मॅनेजमेंट
संपर्क- दूरध्वनी- ०२२- २४९३५२८१ संकेतस्थळ-
www.hsncu.edu.in, ईमेल-integrated@
hsncu.edu.in
०००
क्रीडापटूंसाठी
शिष्यवृत्ती
कीप इंडिया स्मायलिंग फाउंडेशन प्रोग्रॅम अंतर्गत,
गुणवंत क्रीडापटूंना अर्थसाहाय्य केले जाते.अर्हता-संबंधित खेळाडूने मागील दोन ते
तीन वर्षे देश किंवा राज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर,राज्य किंवा देशाचे
प्रतिनिधित्व केले असावे. या क्रीडपटूच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये
किंवा त्यापेक्षा कमी असावे.या विद्यार्थ्यांना तीन वर्षाच्या कालावधीसाठी दरवर्षी
प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.
संपर्क-https://www.buddy4study.com/page/keep-india-smiling-foundational-scholarship-programme
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment