एरोस्पेस टेक्नॉलॉजी
एरोस्पेस टेक्नॉलॉजी
अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत
होण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी ज्ञानशाखेच्या उमदेवारांना संधी मिळू शकते.
प्रत्येक ज्ञान शाखेचा संबंध अंतराळाशी येतो. मेकॅनिकल अभियंते हे अवकाश यानांचे
डिझाइन, बांधणी आणि निर्मितीमध्ये सहभागी होऊ
शकतात. केमिकल अभियंते हे अवकाश यानांच्या इंधनप्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. संगणक
शास्त्रातील अभियंते माहिती विश्लेषणात सहभागी होतात. तथापी एरोस्पेस अभियांत्रिकी
आणि तंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात प्राधान्याने
संधी मिळू शकते.
करिअर संधी
एरोस्पेस तंत्रज्ञानाशी संबंधित पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या
विद्यार्थ्यांना करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात.
नॅसकॉम संस्थेच्या अंदाजानुसार पुढील
काही वर्षात एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रात अब्जावधीची उलाढाल होण्याची शक्यता
आहे. भारताकडून या क्षेत्रातील निर्यातसुध्दा मोठया प्रमाणावर वाढू शकते. भारताने
अंतराळ संशोधनाचा बहुआयामी कार्यक्रम राबवण्याचे ठरविले असून यामध्ये दळणवळणीय
उपग्रहांचा विकास, प्रगत दूरसंदेश वहन, उपग्रहीय आधारित दिशादर्शन कार्यप्रणाली, मानवी अंतराळ संशोधन, प्रगत अंतराळ वाहतूक कार्यप्रणाली, अवकाशयानांसाठी नव्या तंत्रांचे अधिक
प्रगत इंजिन आदींचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांना कालबध्दरीत्या आणि प्रभावीपणे
कार्यान्वित करण्यासाठी मोठया प्रमाणावर तज्ज्ञमनुष्यबळाची गरज भासणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, एरोस्पेस, केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन
टेक्नॉलॉजी या विषयातील बी.टेक पदवी प्राप्त उमेदवारांना या क्षेत्रात करिअरची
संधी मिळू शकते.
इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील डिजिटल
इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोवेव्ह, ॲन्टेना/रडार,
व्हीएलएसआय ॲण्ड एम्बेडेड
इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स याविषयातील
स्पेशलायझेशनसह एमटेक, मेकॅनिकल शाखेतील स्ट्रक्चरल
इंजिनिअरिंग, थर्मल, एरोनॉटिक्स या विषयातील स्पेशलायझेशनसह एमटेक केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.
एरोस्पेस टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम - १
(१) एसआरएम इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड
टेक्नॉलॉजी- या
संस्थेने बी.टेक इन एरोस्पेस इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी-
चार वर्षे, अर्हता - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.
प्रवेश-
एसआरएम एन्ट्रन्स इंजिनिअरिंग एक्झामिनद्वारे.
संपर्क - डायरेक्टर ॲडमिशन, एसआरएम, एसआरएम नगर,
कट्टनकुलाथूर, जिल्हा कांचिपुरम - तमीळनाडू- ६०३२०३, दूरध्वनी-
०४४-२७४१७०००, संकेतस्थळ-srmuniv.ac.in, ई-मेल- admissions.india@srmuniv.ac.in
(२)
एरोस्पेस टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम -२
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
कानपूर-
या संस्थेने बी.टेक इन एरोस्पेस इंजिनीअरिंग हा अभ्याक्रम सुरु केला आहे. कालावधी-
चार वर्षे, अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
आणि गणित विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. प्रवेशासाठी JEE - MAIN आणि JEE - ADVANCED
या
दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करावे लागतात. या संस्थेतच एम.टेक इन
एरोस्पेस इंजिनीअरिंग (अर्हता-बी.टेक, कालावधी -दोन वर्षे, प्रवेश- जॉईंट ॲडमिशन्स फॉर मास्टर्स-JAM) आणि पीएचडी इन एरोस्पेस इंजिनअरिंग (अर्हता- एम.टेक इन न्यूक्लिअर
इंजिनहअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, प्रवेश
- ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स- GATE) हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
संपर्क-
डिन ऑफ अॅकेडमिक अफेअर्स,
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
कानपूर, दूरध्वनी- ०५१२-२५९०१५१, संकेतस्थळ - www.iitk.ac.in, ई-मेल - doaa@iitk.ac.in
(२)
एरोस्पेस टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम -३
ॲमिटी इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस
सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने पुढील अभ्यासक्रम
सुरु केले आहेत - (१) बी.टेक- एरोस्पेस इंजिनीअरिंग,(2) बी.टेक ॲण्ड एम.टेक इन एरोस्पेस
इंजिनिअरिंग (इंटिग्रेटेड), कालावधी - पाच वर्षे, अर्हता
- ६० टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
आणि गणित विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण
संपर्क - जे दोन, गेट नंबर-३,
ब्लॉक, ॲमिटी युनिव्हर्सिटी कॅम्पस, सेक्टर १२५, नॉयडा- २०१३१३, दूरध्वनी- ०१२०-४३९२०००,२४४५२५२, टेलेफॅक्स
- ४७१३६००, संकेतस्थळ - www.amity.edu, ई-मेल-admissions@amity.edu
(५)
एरोस्पेस टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम -४
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास - या
संस्थेने बी.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग हा चार वर्षे कालावधीचा आणि
बी.टेक-एम.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (ड्युएल डिग्री इंटिग्रेटेड) पाच वर्षे
कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. प्रवेशासाठी JEE - MAIN आणि JEE - ADVANCED
या
दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करावे लागतील. याच संस्थेने एम.टेक इन
एरोस्पेस इंजिनीअरिंग (अर्हता-बी.टेक, कालावधी - दोन वर्षे, प्रवेश- जॉईंट ॲडमिशन्स फॉर मास्टर्स) आणि एम.एस्सी इन एरोस्पेस
इंजिनिअरिंग ( कालावधी- दीड वर्षे) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
संपर्क
- डिपार्टमेन्ट ऑफ एरोस्पेस इंजिनीअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
मद्रास, चेन्नई - ६०००३६, दूरध्वनी- ०४४-२२५७४०००, फॅक्स-२२५७८२०४, संकेतस्थळ - www.ae.iitm.ac.in, ई-मेल - office@ae.iitm.ac.in,
(५)
एरोस्पेस टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम -५
युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलिअम ॲण्ड
एनर्जी स्टडीजच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ एरोस्पेसन इंजिनिअरिंगने बी.टेक इन एरोस्पेस
इंजिनिअरिंग आणि बीटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन एविऑनिक्स हे
चार वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह १२वी
विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. प्रवेशासाठी
यूपीईएस चाळणी परीक्षा द्यावी लागेल.
संपर्क
- यूपीइएस कॅम्पस, पोस्ट ऑफिस बिधोली व्हाया, प्रेमनगर डेहरादून- २४८००७, दूरध्वनी - ०१३५-२७७०१३७, फॅक्स- २७७६०९१, संकेतस्थळ -www.upes.ac.in, ईमेल-enrollments@upes.ac.in.
७)
एरोस्पेस टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम -६
हिंदुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ॲण्ड सायन्स
या
संस्थेअंतर्गत कार्यरत स्कूल ऑफ एरोनॉटिक सायन्सने बी.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग
हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी - चार वर्षे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह १२वी
विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. प्रवेशासाठी, एचआयटीएसईईई ही ऑनलाइन चाळणी परीक्षा
द्यावी लागेल.
संपर्क
- नंबर ४०, जीएसटी रोड, सेंट थॉमस माऊंट, चेन्नई-६०००१६, दूरध्वनी-०४४-२२३४१३८९,फॅक्स-२२३४२१७०, संकेतस्थळ- www.hindustanuniv.ac.in, ई-मेल-hetc@vsnl.com
(८)
एरोस्पेस टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम -७
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड
टक्नॉलॉजी
या
संस्थेमध्ये बी.टेक इन एरोस्पेस इजिनिअरिंग हा अभ्यासक्रम करता येतो. या
अभ्यासक्रमात अवकाशयान निर्मिती, अवकाशयान
अंतराळात धाडण्यासाठी लागणारी वाहनांची निर्मिती, स्पेसक्रॉफ्ट,
उड्डाणतंत्र अशासारखे विषय शिकवले
जातात. ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या संस्थेत एरोस्पेस इंजिनिअरिंग या
विषयात डॉक्टोरल आणि पोस्ट डॉक्टोरल अभ्यासक्रम करण्याची सुध्दा संधी उपलब्ध करुन
दिली जाते.

Comments
Post a Comment