पर्यटन उद्योगाला नवी झळाळी
पर्यटन उद्योगाला नवी झळाळी
एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात आणि देशात
इतरत्रही करोनाविषयक बहुतेक सर्वच निर्बंध उठवण्यात आले. हे निर्बंध उठताच
सर्वाधिक जाहिराती यायला लागल्या त्या पर्यटन क्षेत्राच्या. गेले दीड ते दोन वर्ष
थोपवून धरलेल्या भ्रमंतीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतील, हा पर्यटन
कंपन्यांचा अंदाज होता. हा अंदाज वास्तवाला धरुन असल्याचे दिसून आले.एप्रिल
महिन्यात काश्मिरमध्ये दररोज ८० हजार पर्यटक आल्याची नोंद करण्यात आली.गेल्या ५०
वर्षात इतक्या प्रचंड प्रमाणात पर्यटक आल्याचे,या क्षेत्रातील व्यावसायिकांचे
निरीक्षण आहे.
अनेक
पर्यटन कंपन्यांच्या सहली फुल्ल झाल्या. ज्यांना शक्य आहे, असे नागरिक स्वत:च
पर्यटनास निघाले. आता तर परदेशात जाण्यासाठीचे निर्बंध शिथिल झाल्याने तिकडेही
जाण्याची मनोमन तयारी बऱ्याच जणांनी केली आहे. याचाच अर्थ असा की करोनामुळे थबकून
आणि हबकून गेलेल्या या क्षेत्रास पुन्हा नवी झळाळी मिळण्यास प्रारंभ झाला आहे. आता
या क्षेत्रात पुन्हा नव्याने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासेल. पुढे दोन ते
तीन वर्षात आणखी चांगल्या संधी नक्कीच निर्माण होतील. त्यामुळे या क्षेत्रात
मनापासून करिअर करण्याची आवड आणि इच्छा असल्यास आणि पालकांचाही सकारात्मक
दृष्टिकोन असल्यास पर्यटन क्षेत्रातील
पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना यंदा प्रवेश घ्यायला हवा.
(१) गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करीयर एज्युकेशन ॲण्ड
डेव्हलपमेन्ट –
संस्थेचे अभ्यासक्रम (१) बीएस्सी इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल इन्डस्ट्री
मॅनेजमेंट. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी. कालावधी- तीन वर्षे
(२) मास्टर ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट.
अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी. कालावधी-
दोन वर्षे
(३) अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूर
मॅनेजमेंट.अर्हता-कोणत्याही विषयातील १२ वी. कालावधी-एक वर्षं.
संपर्क- गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करीअर
एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेन्ट, विद्यानगरी,कालिना कॅम्पस, सांताक्रुज पूर्व, मुंबई-400098, दूरध्वनी- 022-26530258,फॅक्स- २६५३०२६३,ईमेल-gicedenquiry@giced.mu.ac.in, संकेतस्थळ -www. gicededu.co.in
(२) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
उत्तरपदेश सरकारच्या पर्यटन विभागाने मान्यवर कांशिराम इन्स्टिट्यूट ऑफ
मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली आहे. त्यामार्फत पर्यटन विषयक विविध
क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरतील असे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत. १) बॅचलर ऑफ टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन, अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. कालावधी-तीन वर्षे.२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रॅव्हल
ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट. कालावधी - एक वर्षं. अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी. ३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम मॅनेजमेंट.
कालावधी-एक वर्षं. अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी. ४) डिप्लोमा इन एअर टिकेटिंग वुईथ कॉम्प्युटर रिझर्वेशन
सिस्टिम. अभ्यासक्रमाचा कालावधी-एक वर्षं. कोणत्याही विषयातील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा
अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम उत्तर प्रदेश पर्यटन संस्थेशी संलग्न आहे.
चाळणी परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
५) डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड एअरलाइन टिकेटिंग
अभ्यासक्रमाचा कालावधी-एक वर्षं. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा
अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क- विकल्प खंड-२, सीबी-सीआयडी ऑफिस, गोमती
नगर,लखनौ-226010,दूरध्वनी- ९४५५८०४८५३
संकेतस्थळ- www.mkitm.com, ईमेल-info@mkitm.com
३) कुमाँऊ युनिव्हर्सिटी
उत्तरखंड राज्यात नैनितालस्थित या युनिव्हर्सिटीने पुढील अभ्यासक्रम सुरु
केले आहेत- 1) मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन
टुरिझम (अर्हता-कोणत्याही विषयातील ४५ टक्के गुणांसह पदवी/ एकूण जागा-३०/.प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते), २) पोस्ट
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी (अर्हता- ४५ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील १२वी/एकूण जागा-४०), अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी मध्ये
४५ टक्के गुण)
संपर्क- कुमाँऊ युनिव्हर्सिटी ,स्लीपी हॉलॉव, नैनिताल-263001, दूरध्वनी-05942-235563, संकेतस्थळ- http://kunainital.ac.in,
ईमेल- registrar@ http://kunainital.ac.in
४) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ-
अभ्यासक्रम- (१) मास्टर ऑफ
आर्ट्स इन ट्रॅव्हल
ऍ़ण्ड टुरिझम, कालावधी-
दोन वर्षे आणि (२) पोस्ट
ग्रॅज्युएट डिप्लोमा
इन ट्रॅव्हल
ऍ़ण्ड टुरिझम,कालावधी-एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
संपर्क-डिपार्टमेंट
ऑफ ट्रॅव्हल
ॲण्ड टुरिझम
,भाषा भवनच्या
पाठिमागे, राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज
नागपूर विद्यापीठ, महात्मा जोतिबा फुले
एज्युकेशनल कॅम्पस-
अमरावती रोड
नागपूर-440033,दूरध्वनी-९६२३१८४७४२,संकेतस्थळ-www.nagpuruniversity.org
(५)
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ-
मास्टर ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट हा दोन
वर्षं कालावधीचा
अभ्यासक्रम सुरु
केला आहे. अर्हता-कोणत्याही विषयातील
पदवी.
पत्ता- डिपार्टमेन्ट ऑफ टुरिझम डिपार्टमेन्ट,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर औरंगाबाद,दूरध्वनी-0240-2403372,संकेतस्थळ- www.
bamu.net ईमेल-head.tourismadmin@bamu.net
या संस्थेने टुरिझम ॲडिनिस्ट्रेशन या विषयात
पीएचडी करण्याचीही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
६) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त
विद्यापीठ-
संस्थेचे अभ्यासक्रम- (१) डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी, (२) मास्टर ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, (३) बॅचलर
ऑफ आर्ट इन टुरिझम स्टडीज ,
(४) बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज इन टुरिझम मॅनेजमेंट
,(५) डिप्लोमा इन टुरिझम स्टडीज, (६) सर्टिफिकेट इन टुरिझम स्टडीज
संपर्क- (१) स्कूल ऑफ टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी
सर्व्हिस मॅनेजमेंट, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मैदान घारी नवी दिल्ली- 110068, संकेतस्थळ- www.ignou.ac.in ,ईमेल-sothssm@ignou.ac.in दूरध्वनी-०११-२९५३६१८९ (२) आयजीएनओयू, विभागीय केंद्र,पहिला
माळा,एमएफएसी बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग,270,पुणे-411016,
(७) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड
ट्रॅव्हल मॅनेजमेंट
पर्यटन क्षेत्राला मोठ्या संख्येने तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज
लागणार ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड
ट्रॅव्हल मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली. पर्यटन, प्रवास आणि संबधित क्षेत्रात शिक्षण
आणि प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी देशातील आघाडीची संस्था आहे.
संस्थेचे
अभ्यासक्रम- (१) बॅचलर
आफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल (बीबीए-टुरिझम ॲण्ड
ट्रॅव्हल ) हा पदवीस्तरीय तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा
अभ्यासक्रम ग्वॉल्हेर, भूवनेश्वर,नॉयडा आणि नेल्लोर या कॅम्पसमध्ये
शिकवण्यात येतो.या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट घेतली जाते.
यंदा ही टेस्ट ५ जून २०२२ रोजी घेतली जाणार आहे.
अर्हता- कोणत्याही
शाखेतील 50 टक्के गुणांसह 12 वी
उत्तीर्ण विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग प्रवर्गासाठी गुणांमध्ये 5 टक्क्यांची सूट देण्यात येते.
या अभ्यासक्रमाच्या एकूण 375 जागा आहेत. ग्वाल्हेर कॅम्पसमध्ये 112, भूवनेश्वर कॅम्पसमध्ये 113, गोवा
आणि नॉयडा कॅम्पसमध्ये प्रत्येकी 75 विद्यार्थ्यांना
प्रवेश दिला जातो.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमामध्ये व्यवस्थापनाची तत्वे आणि संकल्पना, पर्यटनाची
तोंडओळख, भारतीय इतिहास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, लेखाविषयक मुलभूत तत्वे,
आतिथ्यसेवेची तोंडओळख, भुगोलाची तत्वे, व्यवसायाचे अर्थकारण, विपणन व्यवस्थापन,
पर्यटनासाठी माहिती तंत्रज्ञान, यात्रा/ प्रवास/ पर्यटनाचे आयोजन, वाहतूक
व्यवस्था, पर्यटन संसाधने, परदेशी भाषा (फ्रेंच किंवा जर्मन), पर्यटनाच्या कायदेशीर चौकटी, भारतीय संस्कृती
आणि परंपरा, सांख्यिकी शास्त्राची तोंडओळख, हवाई वाहतुकीची तिकिटे आणि मूल्य
निर्धारण, हवाई वाहतूक व्यवस्थापन, कार्यान्वयन व्यवस्थापन, पर्यटन छायाचित्रण,
मनुष्यबळ व्यवस्थापन, साहस पर्यटन, योग आणि सुदृढ आरोग्य, इव्हेंट व्यवस्थापन या
विषय घटकांचा समावेश आहे.
संपर्क - इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल
मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर- ४७४०११, दूरध्वनी- ०७५१-२३४५८२१, ईमेल- admissions@iittm.ac.in, संकेतस्थळ-www.iittm.ac.in
(८) डॉ.वायएसआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी –
अभ्यासक्रम-
१) बॅचलर
ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी. अर्हता- १२ वी मध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यास किमान
५० टक्के आणि राखीव संवर्गातील उमदेवारास किमान ४५ टक्के गुण मिळायला हवेत. या
अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग
टेक्नॉलाजी मार्फत घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशनचे गुण ग्राह्य
धरले जातात. ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली नसेल अशा विद्यार्थ्यांना या
संस्थेची ॲनलिटिकल रायटिंग टेस्ट ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण
मिळून अंतिम यादी तयार केली जाते. कालावधी- तीन
वर्षे
संपर्क- डॉ.वायएसआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड
हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट,टेलिकॉम नगर,गाचीबौली हैदराबाद-500032, दूरध्वनी- 040- 23000 472, संकेतस्थळ - www.nithm.ac.in
admissions@nithm.ac.in
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment