अन्न प्रक्रिया उद्योग
अन्न प्रक्रिया उद्योग
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांचा
अन्न निर्मिती करणारा देश आहे. आपल्यापुढे चीन आणि अमेरिका हे दोन देश आहेत. साधारणत:
दरवर्षी ६०० मिलियन टन अन्नधान्याची निर्मिती भारतात होते. तृणधान्ये, दूध, चहा,
सर्वप्रकारचे मसाले यांच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. फळे आणि
भाजिपाला उत्पादनातही आपण कायम आघाडीवर असतो. तेलबिया उत्पादनात आपला क्रमांक
तिसरा लागतो. कुक्कुट उत्पादनात तिसरा तर मत्स्य उत्पादनात पाचवा क्रमांक लागतो. भारतात
पशुंची संख्याही जगात सर्वाधिक आहे.
वरील आकडेवारी जरी अभिमानास्पद असली
तरी जागतिक पातळीवर या क्षेत्रातील आपली निर्यात केवळ दोन टक्के किंवा त्यापेक्षा
कमी आहे. अन्नप्रक्रिया उद्योगात क्षेत्रात असणारी तंत्रकुशल मनुष्यबळाची कमतरता,
या उद्योगात मोठ्या प्रकल्पांचा अभाव, नाशवंत मालामुळे होणारे अधिक नुकसान, तंत्रज्ञानाचा
अभाव अशी अनेक कारणे भारताच्या अल्प निर्यातीसाठी कारणीभूत आहेत. जागतिक पातळीवर
अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे. ही संधी अन्नपदार्थांची साठवणूक, पुरवठा, पुरवठा
साखळी व्यवस्थापन, प्रक्रिया, शितसाखळी व्यवस्थापन आदी घटकांमध्ये आहे.
सध्या भारताचा देशांतर्गत अन्नधान्य
व्यापार हा ९ लाख कोटींचा आहे. सध्या आपला आंतरराष्ट्रातील व्यापरात केवळ दीड
टक्का हिस्सा आहे. तो नजिकच्या काळात ३ टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट्य भारत
सरकारने ठरवले आहे. यातील एक टक्काही उद्दिष्ट्य साध्य केले तरी किमान थेट ५
लाख आणि अप्रत्यक्ष १५ लाख रोजगार आणि
स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. या बाबी लक्षात ठेऊन या क्षेत्रातील
अभ्यासक्रम करण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा.
काही महत्वाच्या शैक्षणिक संस्था
(1) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फूड
टेक्नॉलॉजी,आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड मॅनेजमेंट.
तंजावूर स्थित ही संस्था अन्न
तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन या विषयात शिक्षण प्रशिक्षण देणारी महत्वाची
संस्था आहे. या संस्थेला राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून दर्जा देण्यात आला आहे.
केंद्रिय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या कार्यरत असणारी ही संस्था मासे, मांस
आणि दुग्धजन्य पदार्थाच्या प्रक्रियेसंदर्भात सखोल संशोधन करत असते.
अभ्यासक्रम - बी.टेक इन फूड टेक्नॉलॉजी, अर्हता- १२वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र आणि गणित या विषयात खुल्या आणि इतर मागासवर्ग
संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि
जमातीच्या उमेदवारांना ही अट लागू नाही. या अभ्यासक्रमाला ९० विद्यार्थ्यांना
प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी - ४ वर्षे.
निवड- जॉईंट एन्ट्रन्स टेस्ट (मेन) या
परीक्षेतील गुणांवर आधारीत निवड केली जाते. ही प्रक्रिया सेंट्रल सिट ॲलोकेशन
बोर्डामार्फत पार पाडली जाते.
संपर्क - पुदूकोट्टाई रोड, तंजावूर- ६१३००५, तामिळनाडू, दूरध्वनी- ०४३६२ - २२८१५५, फॅक्स-२२७९७१, ईमेल-info@iift.edu.in संकेतस्थळ -www.iicpt.edu.in
००००
(2) इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रिन्युरशीप
ॲण्ड मॅनेजमेंट (एनआयएफटीइएम)-
ही संस्था केंद्रीय अन्न
प्रकिया मंत्रालयाने स्थापन केली आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी जगातील सर्वोत्कृष्ट
संस्था बनण्याचे उद्दिष्ट्य या संस्थेने ठेवले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थेला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान
केला आहे.
अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन या संस्थेने
अभ्यासक्रमाची संरचना केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचा
अधिकाधिक वापर उमेदवारांना करता यावा यासाठी अभ्यासक्रमात भर दिला जातो. त्यामुळे
विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्तमोत्तम
संधी मिळू लागल्या आहेत.
अभ्यासक्रम- बी.टेक इन
फूड टेक्नालॉजी ॲण्ड मॅनेजमेंट- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जॉईंट
एन्ट्रन्स एक्झामिनेशन - जेइइ (मेन) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. प्रवेश प्रक्रिया जॉईंट सिट
ॲलोकेशन ॲथॉरिटी / सेंट्रल सिट ॲलोकशन बोर्डामार्फत राबविली जाते. या
अभ्यासक्रमाला 199 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
शासनाच्या नियमानुसार राखीव संवर्गाच्या जागा भरल्या जातात. प्रवेश मिळालेल्या दहा
टक्के विद्यार्थ्यांना मेरिट कम मिन्स शिष्यवृत्ती दिली जाते. स्टेट बँक ऑफ
इंडियाच्या सहकार्याने स्कॉलर लोन योजना राबवली जाते.
काय शिकाल ?- बी.टेक अभ्यासक्रमात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या दोन घटकांचा
समावेश आहे.
(1) व्यवस्थापन घटक - व्यवस्थापनाची मूलतत्वे, विपणन व्यवस्थापन, संस्थात्मक वर्तणूक,
भारतातील व्यवसाय, सांख्यिकी आणि माहिती विश्लेषण , व्यवस्थापकीय लेखा,
व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, उद्योजकता विकास, अन्न पुरवठा साखळी व्यवस्थापन, कर नियोजन आणि व्यवस्थापन, कॉर्पोरेट सुशासन, मानवी
मूल्ये आणि नीतिमत्ता, वित्तीय व्यवस्थापन, व्यावसायिक कायदे, निर्णय प्रक्रिया,
संवाद आणि वाटाघाटी कौशल्य.
(2) तंत्रज्ञान घटक- फूड केमिस्ट्री, इंजिनीअरिंग
प्रॉपर्टिज ऑफ फूड मटेरिअल्स, ह्युमन न्युट्रिशन, फ्रुट्स ॲण्ड व्हेजिटेबल्स प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, मिल्क
प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, सिरिअल्स-पल्सेस-ऑइलसीड्स टेक्नॉलॉजी, फूड पॅकेजिंग
टेक्नॉलॉजी, फूड मायक्रोबॉयलॉजी आणि सेफ्टी, नॉव्हल फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी,
फूड ॲडिटिव्हज आणि इंग्रेडियन्ट्स, मिट-पोलुट्री-फिश प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी, बेकरी
आणि कन्फेक्शनरी टेक्नॉलॉजी, फूड इंजिनीअरिंग, मेथड्स ऑफ फूड अॅनालिसीस, एनर्जी
युटिलायझेशन इन फूड इंडस्ट्रीज, फूड लॉज - स्टँडर्डस- रेग्युलेशन्स, फूड प्रॉडक्ट
डेव्हलपमेंट आणि सेन्सरी इव्हॅाल्युशन.
या दोन्ही घटकांतील विषयांच्या अभ्यासामुळे विद्यार्थी संबंधित
उद्योगक्षेत्रात कोणतीही तांत्रिक आणि व्यवस्थापकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळू
शकतो.
उपरोक्त दोन मुख्य विषयांसोबतच पुढीलपैकी काही विषय (इलेक्टिव्ह) संबंधित विद्यार्थी
त्याच्या आवड आणि कल ओळखून निवडू शकतो - अन्न आणि कृषी धोरण, जैवरसायनिक
अभियांत्रिकी, दुग्ध पदार्थ प्रकिया अभियांत्रिकी, अन्न जैवतंत्रज्ञान, भारतीय वित्तीय
संस्था, नॅनो टेक्नॉलॉजी, पोषण, अन्न पेये,
अन्नपदार्थ निर्मिती यंत्रसामग्री डिझाइन, ताजी फळे आणि भाजीपाला उत्पादन
व्यवस्थापन प्रक्रिया, अन्नप्रक्रिया उद्योगातील कचरा आणि उपवस्तुंचे व्यवस्थापन
इत्यादी.
करिअर संधी- हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी
प्राप्त होऊ शकतात- (1) प्रॉडक्ट
डेव्हलपमेंट सायंटिस्ट, (2) सेन्सरी सायंटिस्ट, (3) फूड मायक्रोबायलॉजिस्ट, (4)
फूड अॅनालिस्ट, (5) क्वालिटी कंट्रोल मॅनेजर, (6) फूड प्रोसेसिंग इंजिनीअर, (7) फूड रेग्युलेटरी इंजिनीअर, (8) फूड रेग्युलेटरी
अफेअर्स स्पेशॅलिस्ट,(9) न्युट्रिशन स्पेशॅलिस्ट, (10) सप्लाय चेन, कोल्ड चेन लॉजिस्टिक्स स्पेशॅलिस्ट, (11) फूड फरर्मेंटेशन स्पेशॅलिस्ट, (12) फूड प्रोसेसिंग सेक्टर - स्नॅक फूड, डेअरी फूड,
वायनरी, शितपये, प्राण्यांचे मास, (13) फूड सर्विस सेक्टर -
हेल्थ ॲण्ड वेलनेस सर्विस प्रोव्हायडर्स, फूड रेग्युलेशन,
फूड रिटेलिंग, सप्लाय चेन, पोस्ट हार्वेस्ट, (14) व्यवस्थापक,
(15) तंत्रोव्यवस्थापक, (16) सल्लागार,
संपर्क- प्लॉट नंबर- 97 , सेक्टर-56, एचएसआयआयडीसी
इंडस्ट्रिअल इस्टेट कुंडली, जिल्हा सोनपत, हरयाणा - 131028,
दूरध्वनी - 0130-2281100,टेलेफॅक्स- 228111 आणि 2219759, ईमेल-info@niftm@niftem.ac.in
registrar@niftem.ac.in आणि संकेतस्थ्ाळ- www.niftem.ac.in
(३)इंस्टिट्यूट ऑफ केमिकल
टेक्नॉलॉजी.
अभ्यासक्रम- बी.टेक इन फूड इंजिनीअरिंग ॲण्ड
टेक्नॉलॉजी. कालावधी - चार वर्षे. अर्हता-१२ वी विज्ञानशाखेत रसायनशास्त्र,
जीवशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये ५० टक्के गुण.या संस्थेतील ७० टक्के जागा
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. यासाठी एमएच-सीईटी मधील गुणांचा
आधार घेतला जातो. उर्वरित ३० टक्के जागा या जेईई-मने परीक्षेतील आधारित भरल्या
जातात. यामध्ये महाराष्ट्रासही देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील
विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या संस्थेने आता भूवनेश्वर आणि जालना येथे कॅम्पस
सुरु केली आहेत.
संपर्क- नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा मुंबई- ४०००१९ दूरध्वनी- ०२२- ३३६१११११,
फॅक्स- ३३६११०२०, http://www.ictmumbai.edu.in/, ईमेल- admission@ictmumbai.edu.in,
(४) लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजी-
अभ्यासक्रम- बी.टेक इन फूड टेक्नॉलॉजी
संपर्क- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर
युनिव्हर्सिटी, अमरावती, भारतनगरच्या विरुध्द दिशेला नागपूर,
दूरध्वनी-०७१२-२५६११०७,टेलेफॅक्स-२५३१६५९, ईमेल- rajumankar@gmail.com ,संकेतस्थळ- https://litnagpur.in/ http://litnagpur.in/department-of-food-technology/
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी-

Comments
Post a Comment