माध्यमातील संधी
माध्यमातील संधी
जनसंवाद, जनसंपर्क, पत्रकारिता, जाहिरात या क्षेत्रामध्ये करिअर
करण्यासाठी उत्तमोत्तम संधी सध्याच्या काळात मिळू शकते. विविध माध्यमांचा स्फोट
झाला असून, त्यांच्या गरजा भागवणाऱ्या प्रशिक्षित उमदेवारांची चणचण भासू लागली
आहे. पूर्वी जसे, काही होता येत नसेल तर डीएड - बीएड करा आणि शिक्षक व्हा, असे
म्हंटले जायचे. पत्रकारितेच्या बाबतही असाच एक खुळा दृष्टिकोन ठेवला जातो.
त्यामुळे काहीही जमत नाही तर पत्रकारितेत जाऊन हातपाय मारु या असे बऱ्याच तरुण -
तरुणिंना वाटते. असे ज्यांना वाटते, त्यांचा कपाळमोक्ष ठरलेलाच असतो, हे सांगायला
ज्योतिषाची गरज भासू नये. पत्रकारितेचा किंवा जनसंवादाचा अभ्यासक्रम आणि नंतरचे
पुढील करिअर हे अतिशय गांभीर्याने घ्यायला हवे. केवळ काहितरी लिहिता येते म्हणजे
आपण पत्रकारिता करण्यासाठी सक्षम झालो, असे समजणे चूक आहे.
भाषेवर प्रभुत्व
पत्रकारिता आणि जनसंवादाच्या
क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व हवे.
फक्त मराठीच पत्रकारिता करायची असेल तरीसुध्दा इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेवर
प्रभुत्व असायला हवे. प्रभुत्व याचा अर्थ चांगला शब्दसंग्रह, म्हणी, वाक्रप्रचार
यांचा संग्रह, साधे आणि सोपे लिहिण्याची क्षमता, व्याक्रणाच्या किमान नियमांची
माहिती व त्याचा उपयोग करता येण्याची क्षमता, चालू घडामोडिंचे चौफेर वाचन,
विश्लेषण करण्याची क्षमता, साहित्य - राजकारण- अर्थकारण- समाजकारण- बदलते सामाजिक
प्रवाह, आंतरराष्ट्रीय राजकारण आदीबद्दल सजगता, या सर्व बाबी उत्कृष्ट पत्रकार
बनण्यासाठी आयुधे ठरतात. पत्रकारितेच्या किंवा जनसंवादाच्या एखाद्या अभ्यासक्रमाला
प्रवेश मिळाला म्हणजे भरुन पावले असा घेतला तर, अपयशाचे धनी व्हावे लागते.
देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था
(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास क्यमुनिकेशन - नवी दिल्ली, अभ्यासक्रम- (१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स
इन जर्न्यालिझम (इंग्रजी), (२) पोस्ट
ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन जर्न्यालिझम
(हिंदी), (३) पोस्ट ग्रॅज्युएट
डिप्लोमा कोर्स इन जर्न्यालिझम (मराठी), (४) पोस्ट ग्रॅज्युएट
डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग आणि पब्लिक
रिलेशन, संपर्क -iimc.nic.in
(२) एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर ,जामिया मिलिया, नवी दिल्ली, अभ्यासक्रम
- (१) एमए इन मास कम्युनिकेशन,
(२) एमए इन कन्व्हर्जनंट जर्न्यालिझम, (३) एमए इन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन, संपर्क-jmi.ac.in
(३) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन, पुणे,
अभ्यासक्रम - एम
ए इन मास कम्युनिकेशन (संपर्क- simc.edu/ma-mc).
(४) सिम्बॉयसीस सेंटर फॉर मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन पुणे, अभ्यासक्रम- बीए इन
मास कम्युनिकेशन (संपर्क-scmc.edu.in)
(५) डिपार्टमेंट ऑफ मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन ॲण्ड स्टडीज, सावित्रीबाई फुले
विद्यापीठ पुणे, अभ्यासक्रम - एम.एस्सी इन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन स्टडीज,
कालावधी - दोन वर्षे. अर्हता - कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेश चाळणी
परीक्षेव्दारे दिला जातो. (इतर अभ्यासक्रम- पीएचडी इन मीडिया
ॲण्ड कम्युनिकेशन स्टडीज आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडियन फिल्म स्टडीज), संपर्क-dmcs.unipune.ac.in
(६) डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, हैदराबाद युनिव्हर्सिटी, अभ्यासक्रम - एम ए
इन कम्युनिकेशन आणि पीएचडी इन कम्युनिकेशन. (संपर्क-snschool.uohyd.ac.in)
(७) मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, मनिपाल, अभ्यासक्रम -(१) बीए ऑनर्स इन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन, कालावधी
चार वर्षे, (२) एमए ऑनर्स इन मीडिया
ॲण्ड कम्युनिकेशन, कालावधी दोन वर्षे, (३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स कम्युनिकशेन, कालावधी एक वर्षं,
(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉर्पोरेट
कम्युनिकशेन, कालावधी एक वर्षं, (५)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हेल्थ कम्युनिकशेन, कालावधी एक वर्षं, (६) सिर्टिफिकेट कोर्स इन स्पोर्ट्स कम्युनिकशेन,
कालावधी- दोन महिने.
(७)
झेव्हियर इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन - मुंबई , अभ्यासक्रम- (१) डिप्लोमा इन जर्न्यालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन,
कालावधी- १० महिने, अर्हता - कोणत्याही विषयातील पदवी. (२) डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन ॲण्ड कॉर्पोरेट कम्युनिकेशन, कालावधी- १०
महिने, अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी. (३) डिप्लोमा इन अॅडर्व्हटायजिंग मार्केटिंग कम्युनिकेशन, कालावधी - १०
महिने, अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी. (४) सर्टिफिकेट कोर्स इन बिझिनेस कम्युनिकेशन ॲण्ड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट.
संपर्क-xaviercomm.org
(९) डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीज, ख्रिस्तू डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी,
बेंगळुरू, अभ्यासक्रम- (१) बीए इन
मीडिया ॲण्ड पब्लिक रिलेशन, (२) बीए इन
कम्युनिकेशन ॲण्ड मीडिया, सायकॉलॉजी, (३) बीए इन कम्युनिकेशन ॲण्ड मीडिया, इंग्लिश, सायकॉलॉजी, (४) बीए इन जर्न्यालिझम, सायकॉलॉजी, इंग्लिश,
(५) बीए इन जर्न्यालिझम- ऑनर्स, (६) एमए इन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन स्टडीज, संपर्क-christuniversity.in
(१०) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड न्यू मीडिया, बेंगळुरु,
अभ्यासक्रम - (१) पोस्ट ग्रॅज्यूएट
डिप्लोमा इन प्रिंट जर्न्यालिझम ,कालावधी -एक वर्षं, (२) पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ब्रॉडकास्ट जर्न्यालिझम, कालावधी - एक
वर्षं, (३) पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा
इन ऑनलाईन/ मल्टिमीडिया जर्न्यालिझम, कालावधी -एक वर्षं, संपर्क- www.iijnm.org
(११) मनोरमा स्कूल ऑफ कम्युनिकेशन- कोट्टायम, अभ्यासक्रम- (१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रिंट ॲण्ड डिजिटल
जर्न्यालिझम, (२) पोस्ट ग्रॅज्युएट
डिप्लोमा इन ब्रॉडकास्ट ॲण्ड डिजिटल जर्न्यालिझम, संपर्क-manoramajschool.com
(१२) माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड कम्युनिकेशन,
अभ्यासक्रम- (१) एमए इन ब्रॉडकास्ट जर्न्यालिझम, (२) बीएस्सी इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, (३) एमएस्सी इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, (४) एमए इन जर्न्यालिझम, (५) एमए
इन डिजिटल जर्न्यालिझम, (६) बीए इन
जर्न्यालिझम ॲण्ड क्रिएटिव्ह रायटिंग, (७) एमए इन मास कम्युनिकेशन, (८)
बीए इन मास कम्युनिकेशन, (९) एमएस्सी
इन न्यू मीडिया, (१०) एमए इन
ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड पब्लिक रिलेशन, (११) बीए इन ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड पब्लिक रिलेशन, (१२) एमएस्सी इन मीडिया रिसर्च (१३) एमबीए इन मीडिया बिझिनेस मॅनेजमेंट , संपर्क-mcu.ac.in
(१३) केसी कॉलेज मुंबई, अभ्यासक्रम - (१) बॅचलर ऑफ मास मीडिया, (२) बीए
इन फिल्म, टीव्ही ॲण्ड न्यू मीडिया, संपर्क-kccollege.edu.in
(१३) सोशल कम्युनिकेशन मीडिया डिपार्टमेंट सोफिया कॉलेज - मुंबई, अभ्यासक्रम -
बॅचलर ऑफ मास मीडिया, संपर्क- https://sophiacollegemumbai.com/
संधी आणि प्रगती
आपणास पत्रकारितेची आवड आहे, म्हणजे नेमके काय आहे, हा प्रश्न स्वत:ला
विचारायला हवा. या क्षेत्रात दिसणारे ग्लॅमर दिव्याखालचा अंधारही राहू शकतो.
ग्लॅमर आहे समजून आकर्षित होणे योग्य नाही. पत्रकारितेचा व्यवसाय हा अतिशय खडतर
आहे. अत्यंत परिश्रम करायला लावणारा आहे. २४ तास जागृत ठेवणारा आहे. स्वत:ला सतत
अपग्रेड करण्याची तयारी ठेवा असे सांगणारा आहे. या घटकांना जे उमेदवार आनंदाने,
उत्साहाने स्वीकारतात, ते यशाच्या पायऱ्या चढत राहतात.
माध्यमांमधील अस्थिरतेबाबत बरीच चर्चा होत असते. अशा चर्चांना तसा
अर्थ नसतो. करिअरच्या सुरुवातीला अशा चर्चांकडे लक्ष देण्याची गरज नाही. मुद्रित
माध्यमांमध्ये प्रवेश हा संपर्क साखळीतून होऊ शकतो किंवा मोठ्या माध्यमसमुहांमध्ये
मनुष्यबळासाठी जाहिराती वेळावेळी प्रकाशित होतात. त्याकडे लक्ष ठेवावे लागेल.
मुद्रित माध्यमांमध्ये एकदा प्रवेश झाल्यावर आपले नाणे खणखणित असेल तर, वेगवेगळया
संधी आपोआप मिळत राहतात. विस्मयचकित करणारी प्रगतीची संधी सुध्दा आपल्यापर्यंत येऊ
शकते, हे लक्षात ठेवावे.
पत्रकारिता, जनसंवाद, जनसंपर्क अशा सारखे अभ्यासक्रम केल्यावर,
मुद्रित माध्यमाचे मोठे विश्व आपणासाठी खुले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक
जिल्ह्यात किमान दोन तरी दैनिके आहेतच. मोठ्या शहरात, दैनिके, सायंदैनिके,
साप्ताहिके आणि, मासिके निघतात. ती वेगवेगळया प्रकारची आणि धाटणीची आणि विषयाची
असतात. या सर्वांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासते. आपली बौध्दिक क्षमता
आणि इतर कौशल्य लक्षात घेऊन नोकरी मिळू शकते आणि टिकू शकते ही बाब लक्षात ठेवायला
हवी.
पत्रकारितेतील अनुभव आणि पत्रकारिता/ जनसंवाद अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना
माहिती जनसंपर्क, प्रसारभारती, एफ.एम. वाहिन्या, डिजिटल वाहिन्या, खाजगी जनसंपर्क,
जाहिरात कंपन्या अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
०००

Comments
Post a Comment