अभियांत्रिकीमधील संधी दोन
अभियांत्रिकीमधील संधी दोन
मनिपाल
अकॅडेमी फॉर हायर एज्युकेशन
एनआयआरएफ रँकिंगमध्ये या संस्थेला 32 वा क्रमांक मिळाला आहे. गुणवत्ता आणि दर्जा या
बाबत या संस्थने गेल्या काही वर्षात सातत्य राखले आहे.
या संस्थेंतर्गत कार्यरत,मनिपाल
इंस्टिटट्यूट ऑफ टेक्नॅालॉजी या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.-(1)बी.टेक इन कॉम्प्युटर
सायन्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग. (2)बी.टेक
इन डेटा सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (3)बी.टेक इन मेकॅट्रॉनिक्स.
संस्थेच्या प्लेसमेंटसेलद्वारे करिअरसंधी मिळवून दिली जाते.
निवड प्रकिया
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते.अर्हता- 12 वी विज्ञान परीक्षेत
गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात किमान 50 टक्के गुण
मिळणे आवश्यक.
संपर्क-मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,उडुपी-576104,दूरध्वनी-0820-2571060, ईमेल- admissions@manipal.edu, संकेतस्थळ- https://manipal.edu/
ॲमिटी
युनिव्हर्सिटीला एनआरएफ रॅकिंग ३२ मिळाला आहे. या युनिव्हर्सिटीच्या गुरुग्राम
कॅम्पस मधील अभ्यासक्रम-(1)बी.टेक-एम.टेक(इंटिग्रेटेड)इन
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, (2)बी.टेक-एम.टेक(इंटिग्रेटेड)इन नेटवर्क ॲण्ड सायबर सेक्युरिटी,
(3)बी.टेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग,
अर्हता-12वी विज्ञान शाखेत
भौतिकशास्त्र,गणित आणि रसायनशास्त्रात किमान 50 टक्के गुण
आवश्यक.
निवड
प्रकिया-चाळणी परीक्षेव्दारे.
संपर्क-ॲमिटी
एज्युकेशन व्हॅली,गुरुग्राम-मानेसर,हरयाणा-122413,टेलेफॅक्स- 0124-2337015,ईमेल-admissions@ggn.amity.edu संकेतस्थळ- amity.edu/gurugram
(5)हिंदुस्थान इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड
सायन्स-
डीम्ड युनिव्हर्सिटी श्रेणित या संस्थेचे एनआरएफ
रँकिंग 25 आहे. या संस्थेने आधुनिक काळाशी
सुसंगत असे अभ्यासक्रम आणि पारंपरिक ज्ञानशाखेत स्पेशलायझेशन सुरु केले आहेत. अभ्यासक्रम-
बी.टेक इन कॉम्प्युटर
सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन (1) आर्टिफिशिअल इंटेलिजंस ॲण्ड मशिन लर्निंग ,(2) डेटा सायन्स, (3) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (4) क्लॉउड कॉम्प्युटिंग ॲण्ड व्हर्च्युअलायझेशन. बी.टेक इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी वुइथ स्पेशलायझेशन इन (1) सायबर सेक्युरिटी, (2) क्लॉउड
कॉम्प्युटिंग,
मेकॅनिकल- (1) ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग या शाखेत
ऑटोट्रॉनिक्स, मोटोरस्पोर्ट इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल व्हेइकल ॲण्ड मोबिलिटी या
विषयांमध्ये स्पेशलाझेशन करता येते.(2) मेकॅट्रॉनिक्स या
शाखेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड रोबोटिक्स या विषयात स्पेशलाझेशन करता येते.
(3) मेकॅनिकल इंजिनीअरिंग या शाखेत इंजिनीअरिंग डिझाइन आणि ॲडिटिव्ह
मॅन्युफॅक्चुरिंग या विषयांमध्ये स्पेशलाझेशन करता येते.
इतर
अभ्यासक्रम - बी.टेक इन (1) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड
कम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखेत डिजिटल इमेज प्रोसेसिंग या विषयामध्ये स्पेशलाझेशन
करता येते. (2) इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
शाखेत रिन्युएबल एनर्जी सिस्टिम आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज ॲण्ड एम्बेडेड सिस्टिम्स या
विषयांमध्ये स्पेशलाझेशन करता येते.
निवड प्रकिया
प्रवेशासाठी हिंदुस्थान इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड
सायन्स इंजिनीअरिंग एन्ट्रन्स एक्झामिनेशन, ही ऑनलाइन चाळणी परीक्षा देशातील विविध
शहरांमध्ये घेतली जाते.महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र-पुणे.
या संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेत अनेक महत्वाच्या
कंपन्या दरवर्षी सामील होतात. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात या
संस्थेतील 900 हून अधिक विद्यार्थी वेगेवगळया पदांसाठी निवडली गेली आहेत.
संपर्क - 1 , राजीव गांधी सलाय, पदूर, व्हाया केलाम्बक्कम,
चेन्नई- 603103, दूरध्वनी- 044-27474262, फॅक्स-27474208, ई-मेल- info@hindustanuniv.ac.in,
संकेतस्थळ- hindustanuniv.ac.in,
०००
नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स युनिव्हर्सिटीच्या
अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ॲण्ड
इंजिनीअरिंग-या संस्थेला एनआरएफ २०२० मध्ये ५७
वा क्रमांक मिळाला आहे.
अभ्यासक्रम- (१) बी.टेक इन डेटा सायंस,(2)बी.टेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स,(३)बी.टेक
इन सायबर सेक्युरिटी.
(4)बी.टेक इन मेकॅाट्रॉनिक्स कालावधी- चार वर्षे. अर्हता- १२ वी
विज्ञान शाखेत (गणित,भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र) ५० टक्के गुण. अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी विद्यार्थ्याला एनपीएटी (एनएमआयएमएस प्रोग्रॅम आफ्टर व्टेल्फ्थ) ही
चाळणी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा मुंबई, नवी मुंबई, शिरपूर, बेंगळुरु,
इंदौर या ठिकाणी घेतली जाते.
१०
वीनंतर बी.टेक- या संस्थेने १० वी नंतर सहा
वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड बी.टेक अभ्यासक्रम सुरु केला आहे.यामध्ये बी.टेक इन
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा
सिस्टिम सेक्युरिटी आणि बी.टेक इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन
ऑटोमेशन ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्च्युरिंग या
स्पेशलायझेशनचा समावेश आहे.
संपर्क-
मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनीअरिंग,भक्ती वेदांत स्वामी
मार्ग,कूपर रुग्णालयाजवळ,जेव्हीपीडी स्कीम,विलेपार्ले(पश्चिम), टोल फ्री क्रमांक- १८०० १०२ ५१३८, दूरध्वनी- ०२२-४२३३४०००,४२३५
५५५५, ईमेल-enquiry.mpstme@nmims.edu,
संकेतस्थळ- http://www.npat.in आणि NPAT.Admission@nmims.edu
०००
डी.वाय.पाटील
युनिव्हर्सिटी
या
युनिव्हर्सिटीचा एनआरएफ रँकिग ४७ आहे.या
संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या संस्थेत बी.टेक
इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स हा अभ्यासक्रम करता येतो.कालावधी-चार
वर्षे.संपर्क-डी.वाय.पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स,सेक्टर२९,निगडी
प्राधिकरण,आकुर्डी पुणे-४११०४४,दूरध्वनी-०२०-२७६५३०५८,फॅक्स-२७६५३०५७,ईमेल-dyppeca@gmail.com,संकेतस्थळ-dycoeakurdi.ac.in
०००
इंद्रप्रस्थ
इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
अभ्यासक्रम- एम.टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल
इंटेलिजन्स.
एम.टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन डेटा मायनिंग.
बी.टेक इन कॉम्प्युटर सायंस वुइथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
एनआयआरएफ रँकिंग-५६
संपर्क- ओखला इंडस्ट्रिअल इस्टेट फेज थ्री, गोविंदपुरी मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली-
११००२०, दूरध्वनी-०११-२६९०७४००, फॅक्स- २६९०७४०५,ईमेल-doaa@iiitd.ac.in संकेतस्थळ-
०००
बिट्स इंस्टिटयूट ऑफ
टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्स, पिलाणी - या संस्थेचा यंदाच्या
रँकिंगमध्ये 9 वा क्रमांक आहे. अभियांत्रिकी शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात
या संस्थेचा दबदबा आहे . ब-याच आयआयटीपेक्षाही या संस्थेतील अभियांत्रिकी
अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देतात. या संस्थेचे पिलाणी, गोवा, हैदराबाद
आणि दुबई येथे कॅम्पस आहेत. संस्थेमार्फत बी.ई.(ऑनर्स) हा अभ्यासक्रम चालवला जातो.
पिलाणी कॅम्पसमध्ये मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चुरिंग,
सिव्हिल, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंस्ट्रुमेंटेशन ,
केमिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या
शाखांमध्ये बी.ई. करता येते. गोवा कॅम्पसमध्ये मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चुरिंग,
इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंस्ट्रुमेंटेशन
केमिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या
शाखांमध्ये बी.ई करता येते. हैदराबाद कॅम्पसमध्ये मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चुरिंग, सिव्हिल
,इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल
आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये बी.ई करता येते. दुबई कॅम्पसमध्ये
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, बायोटेक्नॉलॉजी आणि
कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये बी.ई करता येते.
संस्थेने इंटिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रम
सुरु केले आहेत. बारावी विज्ञान शाखेत 75 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या
अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. पिलाणी, गोवा आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये फिजिक्स, बायॉलॉजिकल
सायन्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स या शाखांमध्ये हा अभ्यासक्रम करता
येतो. हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून तो सत्रनिहाय म्हणजे सेमेस्टर पध्दतीने शिकवला
जातो.
बी.ई.(ऑनर्स) आणि
इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशस्तरावर चाळणी परीक्षा घेण्यात येते.
ही कॉम्प्युटराइज्ड ऑनलाइन परीक्षा असून आयआयटी-जेइइ(परीक्षे)साठी उत्तम तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सुलभ जाऊ शकते.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या 30 टक्के
विद्यार्थ्यांना सत्रनिहाय 25 ते 100
टक्के अशी शैक्षणिक शुल्कात सूट दिली जाते. ही सूट विद्यार्थ्यांची प्रत्येक
सत्रातील शैक्षणिक कामगिरी लक्षात घेऊन दिली जाते. पुढच्या सत्रात अशीच कामगिरी
कायम राहिली तरच ही सुट पुढे चालू राहू शकते. महाराष्ट्राच्या 12 वी बोर्डाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा साकल्याने
अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा कठीण जात नाही.
या संस्थेचा अभ्यासक्रम करणाऱ्या विविध शाखांमधील 600 च्या आसपास
विद्यार्थ्यांना दरवर्षी प्लेसमेंट सेलच्या मार्फत चांगली संधी मिळते.
संपर्क-
बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलाणी-333031, दूरध्वनी-01596-255221,ईमेल-director@pilani.bits-pilani.ac.in,
,
संकेतस्थळ- https://www.bits-pilani.ac.in/
०००
.jpg)
Comments
Post a Comment