बँकिंग क्षेत्रातील उत्तम आणि उत्कृष्ट करिअर
बँकिंग क्षेत्रातील उत्तम आणि उत्कृष्ट करिअर
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे, स्टेट बँक
ऑफ इडिया. भारतीय पोस्ट जसे बहुसंख्य गावांमध्ये पोहचले आहे,तसेच स्टेट बँकही
पोहचली आहे. या बँकेच्या आणखी शाखा नजिकच्या काळात उघडण्यात येऊन, शाखांची साखळी
अधिक सक्षम आणि बळकट केली जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच शासकीय बँक
असूनही ही बँक कार्यक्षमता,नफा,इतर कामगिरी या बाबतीत इतर बँकापेक्षा खूप मोठी
आघाडी घेतली आहे.
बँकिंग क्षेत्रातील उत्तम आणि उत्कृष्ट करिअर घडवण्याची
संधी स्टेट बँक ऑफ इंडिया देत असते. बँकेच्या स्वंतत्र सेवा परीक्षा मंडळामार्फत दरवर्षी
किमान २००० च्या आसपास प्रोबेशनरी ऑफिसरच्या जागा भरल्या जातात. स्टेट बँकेत
सर्वोच्च पदावर जाण्यासाठीचा मार्ग या प्रोबेशनरी ऑफिसरच्या नियुक्तीमध्ये दडलेला
असतो, ही बाब लक्षात घेता,या परीक्षेचे अन्यन्नसाधारण महत्व लक्षात यावे. ही
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना भविष्यात प्रगती आणि विकासाच्या विविध संधी
उपलब्ध होतात. परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही सेवा
आहे.
स्टेट
बँक ऑफ इंडियाने २०२२-२३ सालासाठी
प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवड प्रक्रियेची घोषणा नुकतीच केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पासून सुरु
झाली असून ती १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरु राहील. परीक्षा नोव्हेबर/डिसेंबरमध्ये
घेतली जाईल.
या
परीक्षेला देशभरातील सात ते आठ किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार बसत असल्याने गेल्या
काही वर्षांपासून ही परीक्षा तीन टप्यांमध्ये घेतली जाते. प्राथमिक परीक्षा हा
पहिला टप्पा.याव्दारे विशिष्ट संख्येत मुख्य परीक्षेसाठी उमेदवार निवडले जातात. हा
दुसरा टप्पा. या टप्प्यात बँकेने ठरवलेले किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांना
मुलाखत/समूह चर्चा/व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलावले जाते.हा तिसरा टप्पा. साधारणत:
हा कालावधी एक वर्षाचा आहे.
यंदा या
परीक्षेव्दारे १६७३ जागा भरल्या जातील. (अनुसूचित जाती संवर्ग- २४०, अनुसूचित जमाती संवर्ग- १२०, इतर मागास
संवर्ग- ४३२,आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग-१६०,खुला संवर्ग- ६४८,सर्व संवर्गातील
दिव्यांग- ११४)
अर्हता-
कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करु शकतो. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाची वा अंतिम सत्राची परीक्षा
देणारे विद्यार्थीसुध्दा यासाठी अर्ज करु शकतात. मात्र त्यांना निर्धारित वेळेत
परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. चार्टर्ड अकांउंटसीची
परीक्षा उत्तर्णी उमेदवारही ही परीक्षा देऊ शकतात.
वयोमर्यादा-
१ एप्रिल २०२२ रोजी खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे असावे आणि कमाल
३० वर्षे असावे. अनुसूचित जात आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना ५ वर्षाची सूट
देण्यात येते. नॉनक्रिमिलेयर विद्यार्थ्यांना वयामध्ये ३ वर्षाची सूट दिली जाते.
अनुसुचित जाती/जमाती दिव्यांग संवर्ग- १५ वर्षे, नॉनक्रिमिलेयर दिव्यांग विद्यार्थ्यांना
वयामध्ये १३ वर्षे,खुला संवर्ग दिव्यांगाना १० वर्षाची सूट दिली जाते.
एकूण
संधी- ही परीक्षा खुल्या संवर्गातील उमेदवारांना ४ वेळा व दिव्यांग आणि नॉन
क्रिमीलेअर उमेदवारांना ७ वेळा देता येते. अनुसूचित जाती आणि जमातीमधील सर्व
उमेदवारांना कितीही वेळ परीक्षा देता येते. प्राथमिक परीक्षेची संधी किंवा चान्स
यामध्ये समावेश नाही. ही संधी/चान्स १८ एप्रिल २०१० पासून गणली जाते.
परीक्षा
पध्दती
(१)
प्राथमिक परीक्षा- १०० गुणांचा एक पेपर असून त्यात वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी
प्रश्न विचारले जातात. हा पेपर संपूर्णरीत्या संगणावर सोडवावयाचा असतो.कालावधी एक
तास.ही परीक्षा १७,१८,१९,२० डिसेंबर २०२२ रोजी घेतली जाईल.
या
पेपरमध्ये तीन सेक्शन/विभाग असतात. (१) इंग्रजी भाषेवर आधारित ३० गुणांचे ३० प्रश्न, (२)
संख्यात्मक कौशल्य कल (क्वांटिटेटिव्ह
ॲप्टिट्यूड टेस्ट) मध्ये
३५ गुणांचे ३५ प्रश्न, (३) कार्यकारणभाव
क्षमता (रिझनिंग
ॲबिलिटी) मध्ये
३५ गुणांचे ३५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक सेक्शन म्हणजेच विभागासाठी कटऑफ
किंवा किमान गुण अपेक्षित नाही.एकूण जागांच्या २० पट उमेदवारांची निवड मुख्य
परीक्षेसाठी केली जाते.
(२) मुख्य परीक्षा- यामध्ये २०० गुणांचा
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा एक पेपर आणि वर्णनात्मक उत्तर अपेक्षित असलेला
५० गुणांचा एक असे दोन पेपर्स असतात. दोन्ही पेपर ऑनलाईन असतात. पहिला पेपर सोडवून
झाल्याबरोबर दुसरा पेपर सोडवावा लागतो.
पहिल्या पेपरचा कालावधी तीन तास असून यामध्ये चार विभाग/सेक्शन असतात.
एकूण प्रश्नांची संख्या-१५५.प्रत्येक सेक्शनसाठी स्वतंत्र वेळ दिला जातो. प्रत्येक
सेक्शनमध्ये बँकेने निर्धारित केलेले गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. एखाद्या
सेक्शनमध्ये किमान गुण मिळाले नाही तर उमदेवार पुढच्या टप्प्यासाठी निवडला जात
नाही.
या पेपरमध्ये पुढील भाग/सेक्शन असतात- (१) कार्यकारण आणि संगणकीय कौशल्य कल (रिझनिंग आणि कॅम्पुटर ॲप्टिट्यूड)- ४० प्रश्न आणि ६० गुण/कालावधी- ६० मिनिटे,
(२) विदा विश्लेषण आणि अर्थनिरुपण किंवा
स्पष्टीकरण (डेटा ॲनॅलिसीस आणि इंटरप्रिटेशन) ३० प्रश्न आणि ५० गुण/कालावधी- ४५ मिनिटे,
(३)अर्थशास्त्र/किंवा बँकिंग विषयी
सर्वसाधारण माहिती/जाणीव (जनरल अवेअरनेस अबाऊट इकॉनॉमी/ बँकिंग) ५० प्रश्न आणि ४५ गुण/कालावधी- ४५ मिनिटे,
(४) इंग्रजी भाषा(इंग्लिश लँग्वेज) ३५ प्रश्न आणि ४० गुण/कालावधी- ४०
मिनिटे
वर्णनात्मक चाचणी - या पेपरचा कालावधी ३० मिनिटे आणि गुण ५०. यामध्ये
पत्रलेखन आणि निंबधाचा समावेश असतो. यापेपरमध्येही उमेदवारांना बँकेने ठरवलेले
किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.हा पेपरसुध्दा संगणकावरच लिहायचा असतो. त्यामुळे
संगणकावर लिहिण्याचा सराव असणे गरजेचे ठरते. वस्तुनिष्ठ पेपरमधील सर्व विभागात
किमान गुण मिळालेल्या उमेदवारांचाच हा वर्णनात्मक पेपर तपासला जातो.
प्राथमिक आणि मुख्य परीक्षेमध्ये निगेटिव्ह गुण आहेत. प्रत्येक
चुकलेल्या प्रश्नासाठी एक चतुर्थांश गुणांची कपात केली जाते.एखाद्या उमेदवाराने
प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर गुणाची कपात केली जात नाही.
(३) मुलाखत आणि समूह चर्चा- मुख्य परीक्षेत
उत्तीर्ण उमदेवारांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी २० गुण
आणि समूहचर्चेसाठी ३० गुण असे एकूण ५० गुण या टप्प्यासाठी ठेवण्यात आले आहेत.
अंतिम निवड-
अंतिम निवडीसाठी प्राथमिक परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जात नाहीत. फक्त मुख्य
परीक्षा आणि मुलाखत व समूह चर्चेतील गुणच अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जातात.लेखी
परीक्षेतील एकूण २५० गुण हे ७५ गुणांमध्ये आणि मुलाखत व समूह चर्चेतील ५० गुणाचे २५
गुणांमध्ये रुपांतरीत केले जातात. अंतिम निवडीसाठी या १०० गुणांचा विचार केला
जातात. प्रत्येक संवर्गातील सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाते.
कट-ऑफ
उमेदवारांना मिळणारे गुण दरवर्षी बदलत असतात. तथापि एकूण परीक्षेचा आवाका आणि
काठीण्यपातळी लक्षात येण्यासाठी २०२० मधील
प्राथमिक
आणि मुख्य परीक्षेतील कटऑफ चा अभ्यास करणे उपयुक्त ठरु शकते.
प्राथमिक परीक्षा कटऑफ-.खुला संवर्ग- ५८.५०,आर्थिक दृष्ट्या कमकुवत संवर्ग- ५६.७५,इतर मागास संवर्ग- ५६,अनुसूचित जाती संवर्ग-५०,अनुसूचित जमाती संवर्ग- ४३.७५
अंतिम कटऑफ. खुला संवर्ग- ५१.२३, आर्थिक दृष्ट्या
कमकुवत संवर्ग- ४५.३५,इतर मागास संवर्ग- ४५.०९,अनुसूचित जाती
संवर्ग-४४.०९,अनुसूचित जमाती संवर्ग- ४१.८७
प्रशिक्षण सुविधा
स्टेट बॅंक ऑफ इंडियामार्फत अनुसूचित जाती/जमाती
आणि अल्पसंख्याक समुदाय संवर्गातील उमेदवारांसाठी या परीक्षेच्या तयारीसाठी साहाय्य केले जाते. त्यासाठी ६ दिवसांचे खास सशुल्क
प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये परीक्षेसाठी असलेल्या विषय घटकांचा अभ्यास कसा
करायचा,उत्तरे कशी द्यायची,या विषयी सांगितले जाते. हे प्रशिक्षण नोव्हेबर/डिसेंबर
मध्ये आयोजित केलं जाईल.मात्र यासाठी इच्छूक उमेदवारांना अर्जामध्ये नमूद करावं
लागेल.
महाराष्ट्रात रत्नागिरी,सोलापूर,चंद्रपूर,धुळे
,जळगाव,कोल्हापूर,ठाणे,नवी मुंबई,नांदेड,अमरावती,नागपूर,पुणे,मुंबई,अकोला,औरंगाबाद
या ठिकाणी ही केंद्रे चालवली जातात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्जामध्ये तसे
नमूद करावे लागते.या ठिकाणी उमेदवारांना स्वत:च्या खर्चाने उपस्थित राहावे लागते.
ऑनलाइन
मुख्य परीक्षा केंद्रे- औरंगाबाद,नवी मुंबई,मुंबई,ठाणे,पुणे
पूर्वपरीक्षेचा
निकाल डिसेंबर २०२२ किंवा जानेवार २०२३मध्ये घोषित केला जाईल.मुख्य परीक्षेचा
निकाला २०२३मध्ये घोषित केला जाईल.अंतिम निकाल मार्च २०२३मध्ये घोषित केला जाईल.
वेतन आणि
इतर लाभ
उमेदवारांची
निवड ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल वन मध्ये केली जाते.त्यांना त्यांच्या
नियुक्तीचे ठिकाण/शहरानुसार किमान वार्षिक
७ लाख ५५ हजार रुपये आणि कमाल १२ लाख ९३ हजार रुपये वेतन दिले जाते. यामध्ये महागाई भत्ता,घरभाडे, शहर भत्ता,वैद्यकीय व इतर
भत्त्यांचा समावेश असतो.यामध्ये वेळोवळी बदल होत जातो.
प्रोबेशनरी
ऑफिसर्सना दोन वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी त्यांना ऑनलाइन कोर्स करावा
लागेल.त्यानंतर अंतर्गत निवड प्रकियेव्दारे अपेक्षित गुण/दर्जा साध्य केलेल्या
उमेदवारांना नियमित केले जाते आणि त्यांना वरच्या श्रेणित म्हणजेच, ऑफिसर मिडल
मॅनेजमेंट ग्रेड स्केल टू मध्ये सामावून घेतले जाते. इतरांना, ऑफिसर ज्युनिअर मॅनेजमेंट
ग्रेड स्केल वनमध्ये नियमित केले जाते.या उमेदवारांनी पुढे अपेक्षित दर्जा प्राप्त
केला नाहीतर त्यांची सेवा खंडित केली जाते.
पदोन्नती
बँकेमार्फत पदोन्नतीची विविध संधी दिली
जाते. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना अल्पकालावधीत वरिष्ठ व्यवस्थापन
श्रेणिमध्ये पदोन्नती दिली जाते. परदेशातील शाखांमध्येही काम करण्याची संधी दिली
जाते. कामगिरी आधारित वेतन/लाभ सुध्दा दिला जातो.
परीक्षा केंद्रे-अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर,
मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नासिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा.
अनुसुचित जाती जमाती संवर्गासाठी व दिव्यांगांसाठी परीक्षा शुल्क नाही.इतर
संवर्गासाठी ७५० रुपये.
संपर्क- https://sbi.co.in/
careers,ईमेल-
दूरध्वनी-०२२-२२८२०४२७,ईमेल-cgrs.ibps.in
सुरेश वांदिले
९३२४९७३९४७
.jpg)
Comments
Post a Comment