फॅशन डिझायनिंग ते तंत्रज्ञान भाग एक
फॅशन डिझायनिंग ते तंत्रज्ञान भाग एक
जगात सर्वाधिक कायमस्वरुपी ज्या व्यवसाय कौशल्यास गेल्या अनेक दशकांपासून मागणी राहिलीय, ते म्हणजे फॅशन तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानात नावीन्यपूर्ण वस्त्रप्रावरणांच्या संकल्पनांचे सर्जन आणि त्यानंतर
त्याची
प्रत्यक्ष निर्मिती केली जाते.
जगाच्या लोकसंख्येला लागणारी सर्वप्रकारची वस्त्रप्रावरणे लक्षात घेता या व्यवसायात असणाऱ्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या
असंख्य संधींची कल्पना यावी. या बाबींचा विचार करुन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने १९८६ साली केली. आज ३५ वर्षानंतर या संस्थेने फॅशन तंत्रज्ञान, फॅशन डिझाइन (अभिकल्प), व्यवस्थापन आणि निर्मिती या क्षेत्रात आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट
संस्थांमध्ये समावेश होण्याइतपत स्वत:ची गुणवत्ता आणि दर्जा वृध्दिंगत केला आहे.
मात्र या संस्थेत अल्पप्रमाणात महाराष्ट्रीय मुले
दरवर्षी निवडली जातात.
फॅशन उद्योगासाठी उच्च दर्जाचे नेतृत्व आणि मनुष्यबळाची निर्मिती व्हावी या अनुषंगाने या संस्थेमध्ये स्पर्धात्मक असे वातावरण
आहे. सर्व कॅम्पसमध्ये उच्च प्रशिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक शिकवतात. आंतरराष्ट्रीय दर्जाशी सुसंगत अशा अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
सध्याच्या मार्केटमधील नवे प्रवाह विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे यासाठी फॅशन उद्योग
जगताशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवला जातो. या संस्थेमधून सब्यासाची, रोहीत बाल, संदीप खोसला, रितू बेरी अशा सारखे अनेक जागतिक कीर्तिचे डिझायनर्स शिकले आहेत. त्या सर्वांसोबत घट्ट स्वरुपाचे नेटवर्किंग प्रस्थापित करण्यात आले आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संधी मिळणे सुकर झाले आहे.
या संस्थेचे वर्णन, फॅशन शिक्षणक्षेत्र आणि संशोधन या क्षेत्रातील सर्वोच्च गुणवत्ता, असे सार्थपणे केले जाते. अभिकल्प, संवादसंप्रेषण, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या चार घटकांचे प्रभावी एकत्रिकरण या संस्थेला करणे शक्य झाल्याने या संस्थेची उपयुक्तता आणि स्थान उंचावले आहे.
या संस्थेने आधुनिक फॅशन शिक्षणासोबत पांरपरिक कला,
समकालीन विचारसरणी, शैक्षणिक स्वायत्तता, अभिकल्प आणि तंत्रज्ञानाशी संबंधित सर्जनशील विचार यास प्राधान्य दिल्याने सर्व अभ्यासक्रम सातत्याने उन्नत झाले आहेत. संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणतीही दुय्यम भूमिका अद्यापपावेतो स्वीकारलेली नाही आणि कोणतीही तडजोड केलेली नाही. या संस्थेचा विस्तार देशातील १६ कॅम्पसमधून झाला आहे. या सर्व कॅम्पसमध्ये उत्कृष्ट पायाभूत आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या कॅम्पसमध्ये देशाच्या विविध भागातील शेकडो प्रज्ञावंत विद्यार्थी फॅशन तंत्रज्ञानाचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेत आहेत.
फॅशन क्षेत्रातील सर्व प्रश्न, समस्या आणि आव्हानांचा सामना प्रभावीपणे करता यावा यासाठी विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी या संथेत केली जाते. सर्जनशीलता आणि उद्योगासाठी लागणारे तंत्र याचा सुयोग्य संगम साधण्यात संस्थेला यश आले आहे. त्यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांना जगभरात करिअरच्या विविधांगी संधी उपलब्ध होणे सुलभ झाले आहे.
या संस्थेच्या अभ्यासक्रमाचे महत्व लक्षात घेऊन संस्थेचे कॅम्पस बेंगळुरु,
जोधपूर, नवी दिल्ली, भोपाळ ,कांग्रा, पाटणा, भूवनेश्वर, कानपूर, रायबरेली, चेन्नई, कोलकता, शिलाँग, गांधीनगर, श्रीनगर, नवी मुंबई आणि हैदराबाद ठिकाणी स्थापन
करण्यात आले आहेत.
अभ्यासक्रम
(१) बॅचलर ऑफ डिझाइन- त्याअंतर्गत (१) ॲक्सेसरी डिझाइन (२) लेदर डिझाइन (३) प्रॉडक्ट डिझाइन (४) फॅशन डिझाइन (५) निटवेअर डिझाइन , (६) टेक्सटाइल डिझाइन, (७) फॅशन कम्युनिकेशन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.सर्व अभ्यासक्रमांचा
कालावधवी प्रत्येकी चार वर्षे.
अर्हता-कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण.
(२) बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी,कालावधी- चार वर्षे,अर्हता- अभ्यासक्रमास १२ वी विज्ञान शाखेत गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
.jpg)
Comments
Post a Comment