वैद्यकशास्त्राला तंत्रकौशल्याची जोड



 

वैद्यकशास्त्राला तंत्रकौशल्याची जोड

आधुनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आाणि प्रभावी करण्यासाठी बायोमेडिकल अभियांत्रिकीचा मोठा हातभार लागत आहे. आजाराचे निदान, उपचाराचे विश्लेषण, शरीरात रोपण करण्यासाठीची साधने/ उपकरणे (उदा- पेसमेकर, कृत्रिम ओठ, कृत्रिम पाय/ हात इत्यादी, ह्रदयात बसवण्यात येणारे कोरोनरी स्टेन, कृत्रिम दंतरचना, रुग्ण्वाहिकेमधील अत्याधुनिक उपकरणे), स्टेम सेल अभियांत्रिकी, जैविक भागांचे त्रिमिती मुद्रण (थ्रीडी प्रिटिंग) आदिंचा या अभियांत्रिकीमध्ये समावेश होतो. या अभियांत्रिकमुळे आरोग्य व्यवस्थेत गुणात्मक परिणाम घडवण्याची क्षमता असल्याचे सिध्द झाले आहे. जैवशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील तंत्रविषयक समस्यांच्या सोडवणुकीसाठीचे ज्ञान प्रदान केले जाते.

या ज्ञानशाखेत मेकॅनिकल, मटेरिअल सायन्स, ‍विद्यूत रासायनिक, गणित, संगणकशास्त्र यातील अनेक घटकांचे एकत्रिकरण केले जाते. विविध वैद्यकीय उपकरणांच्या अभिकल्पांचा (डिझाइन) विकास, शरीरतील प्रत्यारोपण, मेडिकल इमेजिंग, जैववैद्यकीय संकेत प्रक्रिया, क्लिनिकल इंजिनीअरिंग, टिश्यू ॲण्ड स्टेम सेल इंजिनीअरिंग, आदी बाबीही शिकवल्या जातात.

जैववैद्यकीय उपकरणांच्या विकासासोबतच हे अभियंते वैद्यकीय उपचारांचा दर्जा आणि प्रभाव अधिक वाढावा यासाठी संशोधन करु शकतात. वैद्यकीय उपकरणांचे परीक्षण, चाचणी, अंमलबजावणी, नव्या यांत्रिकी उपकरणांचा शोध, या उपकरणाच्या सुरक्षिततेचे मानके निर्धारित करणे, इत्यादी कार्ये या अभियंत्यांना करावी लागतात. टिश्श्यू आणि स्टेम सेल इंजिनीअर हे कृत्रिम मानवी अवयवांच्या निर्मितीध्ये साहाय्य करतात. कृत्रिम अवयवांच्या प्रत्यारोणामुळे जगातील हजारो लोकांना दरवर्षी नवे जीवन प्राप्त होत असते. क्लिनिकल अभियंत्यांमार्फत वैद्यकी उपकरणे/साहित्य यांच्या सुरक्षिततेची खात्री केली जाते.

तंत्रज्ञानात सातत्याने होणारी प्रगती आणि नव्या स्मार्ट उपकरणांमुळे या क्षेत्रात पुढील काळात आणखी संधी निर्माण होऊ शकतात. या क्षेत्रात सातत्याने नव्या शोधांची गरज असून ही गरज हे अभियंते जैविकशास्त्राचे ज्ञान आणि भियांत्रिकी कौशल्य वापरुन भागवण्याची क्षमता प्राप्त करु शकतात. त्यामुळे या अभियंत्यांमार्फत दरवर्षी क्रांतीकारक स्वरुपाचे शोध लावले जातात. अत्याधुनिक उपकरणाची निर्मिती केली जाते.

सर्वसाधारणपणे अभियांत्रिकीच्या घटकांशिवाय पुढील स्पेशलाइज्ड विषय घटकांना या ज्ञानशाखेत शिकवले जातात- ह्युमन अॅनॉटॉमी ॲण्ड फिजीऑलॉजी फॉर इंजिनीअर्स, मेडिकल सेनर्स, मेडिकल इमेजिंग, बायोमटेरिअल्स ॲण्ड आर्टिफिशिअल ऑर्गन्स, बायोमेडिकल डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, डायग्नोस्टिक ॲण्ड थेरॅपटिक इंस्ट्रुमेंट्स, लाइफ सेव्हिंग ॲण्ड सर्जिकल इंस्ट्रुमेंट्स, मेडिकल इमेजिंग, औषधीशास्त्रात रोबोटिक्सचा वापर, नॅनोटेक्नॉलॉजी, मायक्रोसिस्टिम्स, पुनर्वसन अभियांत्रिकी, जैविक प्रतिकृती, आरोग्य व्यवस्थेत संपर्कसाखळी आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर आदी घटकांचा समावेश आहे.

ही ज्ञानशाखा सध्याच्या काळात किती महत्वाची भूमिका बजावू शकते ही बाब या विषयघटकांच्या नावावरुन नजर टाकल्यास लक्षात येते.

काही शैक्षणिक संस्था

() मुंबईतील विद्यालंकार इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेत बी. इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम २००६ साली सुरु करण्यात आला. अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्युपिटर हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, कोकिला बेन हॉस्पिटल आदी संस्थांमध्ये इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते. या कंपन्यामंध्ये वैद्यकीय उपकरणांची निर्मिती, विक्री, विपणन अशासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. कार्पोरेट रुग्णालये, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्येही विद्यार्थ्यांनी संधी मिळाली आहे. संपर्क- विद्यालंकार इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विद्यालंकार कॉलेज मार्ग, वडाळा पूर्व, मुंबई-४०००३७, दूरध्वनी- ०२२-२४१६११२६, संकेतस्थळ https://vit.edu.in/academic.html

() थडोमल साहनी इंजिनीअरिंग कॉलेज - मुंबईस्थित या अभियांत्रिकी महाविद्यालयात १९८३ साली बॅचलर ऑफ बायोमेडिकल इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. संस्थेच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत या अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट विषय घटकांच्या प्रात्यक्षिकांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट रुग्णालये, संबंधित क्षेत्रातील उद्योग, संशोधन संस्था, इत्यादी ठिकाणी करिअर संधी मिळाली आहे. संपर्क-ॲडव्होकेट नरी गुरुसहानी मार्ग, लिंक रोडच्या विरुध्द दिशेला, टीपीएस - ३, बांद्रा-पश्चिम, मुंबई- ४०००५०, दूरध्वनी- ०२२-२६४९ ५८०८, संकेतस्थळ- https://tsec.edu

() एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनीअरिंग सायंसेस- या संस्थेत पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.टेक (बायो इंजिनीअरिंग) हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे - बायोस्टॅटिक्स, मायक्रोबायॉलाजी, जेनेटिक्स, सेल बॉयलॉजी, मेडिकल बायोकेमिस्ट्री, मॉलेक्युलर बॉयलॉजी, मॅमॅलिअन फिजिऑलॉजी, बायोइर्न्फमेटिक्स, एंझिमॉलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, इम्युनॉलॉजी, ड्रग डिझाइन, जेनेटिक इंजिनीअरिंग, जिनॉमिक्स, बायोफिजिक्स, बायोसेंसर्स ॲण्ड इंटरनेट ऑफ थिंग्ज, बायोकेमिकल इंजिनिअरिंग, फॉर्माकॉलॉजी, मॉलेक्युलर इंजिनीअरिंग, बायोइलेक्ट्रॉनिक्स, बायोमटेरिअल्स, प्रोटिन मॉडेलिंग, टिश्श्यू इंजिनीअरिंग, फार्मास्युटिकल इंजिनीअरिंग, मेडिकल इमेजिंग, बायोट्रांस्पोर्ट, कॉम्प्युटेशनल मॉलेक्युलर ॲण्ड सेल बॉयलॉजी, नॅनो-बायोटेक्नॉलॉजी, प्रोटिऑमिक्स, बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन, बायोइंजिनीअरिंग सिस्टिम्स ॲण्ड कंट्रोल, सिंथेटिक बॉयलॉजी, डिव्हाइस डेव्हलपमेंट, किटस बायोमार्कर आणि इंजिनीअरिंगचे विषय घटक.

या संस्थेत चार वर्षे कालावधीचा बी.टेक इन बायोइंजिनीअरिंग हा अभ्यासक्रमही करता येतो. अर्हता- गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांस १२ वी विज्ञान शाखेत ५० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र त्यांना पहिल्या सत्रात जो विषय बारावीमध्ये शिकला नसेल तो काही प्रमाणात शिकावा लागतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा द्यावी लागते. इंटर्नशीप आणि प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते. संपर्क- राजबाग, हडपसरच्या बाजूला, लोनी काळभोर, पुणे- ४१२२०१, ईमेल-admissions.mitbio@mituniversity.edu.in, संकेतस्थळ- mituniversity.edu.in

() अंजिक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगने बी.टेक इन बायोइंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर अभियांत्रिकी, जैविक विज्ञान आणि आरोग्यव्यस्था अशा तीन क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात. यामध्ये मेडिकल इमॅजिन, मेडिकल संयत्रे/उपकरणे, बायोइंस्ट्रुमेंटशन, औषधीनिर्माण, जैव माहितीशास्त्र, जैव सॉफ्टवेअर, पेशी अभियांत्रिकी, जेनॉमिक्स, ड्रग डिस्कव्हरी आदी क्षेत्रातील कंपन्या/उद्योगांचा समावेश आहे. संपर्क - चारोळी बुद्रुक, व्दारा लोहगाव, पुणे- ४१२१०५, दूरध्वनी- ७७५६८६९०४६

संकेतस्थळ-https://adypu.edu.in

() एसआरएम इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी- अभ्यासक्रम - बी.टेक इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग. संस्थेच्या वतिने घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. एमटेक (बायोमेडिकल इंजिनीअरिंग आणि याच विषयात पीएचीडीही करण्याची सुविधा आहे.) संपर्क- एसआरएम नगर, कट्टंककुलाथूर - ६०३२०३, चेंगलपट्टू, तामिळनाडू, दूरध्वनी-०४४ - २७४१७००, ईमेल- infodesk@srmist.edu.in, संकेतस्थळ- srmist.edu.in

() आयआयटी कानपूर येथे, एम.टेक इन बायोलॉजिक सायन्स ॲण्ड बायोइंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमास भारत सरकारच्या जैवतंत्र विभागाचे साहाय्य लाभले आहे. चार सत्राच्या या अभ्यासक्रमामध्ये शेवटची दोन सत्रे संशोधन प्रकल्पासाठी राखून ठेवली जातात. हा अभ्यासक्रम करत असतानाच विद्यार्थी पीएचडी अभ्यासक्रमाचा पर्याय स्वीकारु शकतो. जीवशास्त्र शिकलेल्या उमेदवारांनाही हा अभ्यासक्रम करता यावा या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.

अर्हता- गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जैविक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी. किंवा ६० टक्के गुणांसह कोणत्याही अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान शाखेतील पदवी (बीई/बीटेक) . प्रवेशासाठी गेट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी गेट परीक्षेतील गुणांची अट लागू नाही. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या प्रकियेव्दारे निवडलेल्या उमेदवारांची संस्थेमार्फत लेखी आणि मौखिक परीक्षा घेतली जाते. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित  या विषयाती मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आणि उमेदवारांची विश्लेषणात्मक कौशल्य समजून घेण्यासाठी या चाळणी परीक्षेची रचना केलेली असते.

() व्दारकादास जे संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- बीटेक इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग. संपर्क - यू-१५, जेव्हीपीडी स्किम, भक्तिवेदांत स्वामी मार्ग, कूपर हॉस्पिटलच्या विरुध्द दिशेला, विलेपार्ले-पश्चिम, मुंबई-४०००५६, ईमेल- info@djsce.ac.in, संकेतस्थळ- djsce.ac.in

() आयआयटी मुंबई येथे एमटेक - बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम करता येतो. संपर्क - bio.iitb.ac.in

() कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे येथे एमटेक - बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन हा अभ्यासक्रम करता येतो. संपर्क - coep.org.in

(१०) रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नागपूर - बीटेक इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग. संपर्क-rknec.edu

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी