मटन करायला शिकायचय?


 

मटन करायला शिकायचय?

कुकरी म्हणजे विविध पदार्थ बनवण्याची कला, आई-आजी-काकू-दिदी-वहिनी एकमेकींचं आवडीनं बघत आणि प्रत्यक्ष हात चालवून शिकतात.मात्र ज्यांना ही कला शिकता आली नाही त्यांचं काय?किंवा एखाद्यास किंवा एखादीस जर काही स्पेशलाईज्ड डिशेश तयार करण्याची कला शास्त्रशुध्द पध्दतीने शिकायची असेल तर काय करायचं?त्यातही मटनाच्या विविध प्रकारात पारंगतता मिळवायची असेल तर?

तर अशी व्यवस्था आणि‍िसु‍विधा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजेंट या संस्थेनं उपलब्ध करुन दिलीय.भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेचं मुंबईतलं कॅम्पस दादर येथे आहे. या संस्थेन कुकरी या विषयाशी निगडित १२ आठवड्यांचा
अभ्यासक्रम सुरु केलाय.कोणत्याही विद्याशाखेतील १२वी उत्तीर्ण तरुण-तरुणीला हा अभ्यासक्रम करता येतो.या अभ्यासक्रमात  विविध पदार्थांच्या निर्मितीचे प्रशिक्षण दिलं जातं.यामध्ये मटनाच्या पुढील विविध प्रकारांचा समावेश आहे.(१) मुर्ग मुस्सलम, (२)मुर्ग मखणी,(३) मुर्ग डुंगरी,(४) मुर्ग रोगिनी,(५) मुर्ग मेथी,(६)मटन धनसक,(७) मटन मुल्लीगटवनी,(८) मटन कोल्हापुरी,(९) मटन सागवाला,(१०) आचारी गोस्त, (११)‍िगोवन फिशकरी‍ि,(१२) चिकन छेत्तीनाद, (१३) धानीवल खोर्मा, (१४) मालवणी कोंबडी वडा, (१५) मच्छी अमृतसरी,(१६) पत्राणी मच्छी.

हे प्रशिक्षण जुलै ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते एप्रिल या कालावधीत १२ आठवडे, सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते दुपारी ५ या वेळेत घेतलं जातं.संपर्क- इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन,वीर सावरकर मार्ग,दादर पश्चिम,मुंबई-४०००२८,दूरध्वनी-०२२-२४४९५७४१, ईमेल- info@ihmctan.edu, संकेतस्थळ ihmctan.edu

000

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी