फॅशन उद्योग व्यवस्थापन
फॅशन उद्योग व्यवस्थापन
फॅशन उद्योग/ व्यवसाय व्यवसायाच्या यशाचे मुख्य
गमक म्हणजे, सर्जनशील आणि सतत नावीन्याच्या शोधात असणारे डिझायनर्स आणि या उद्योग/
व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे व्यवस्थापन कौशल्य आणि व्युहनीती. या
अनुषंगाने फॅशन बिझिनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. या
अभ्यासक्रमामध्ये मनुष्यबळ विकास, फॅशन विपणन (मार्केटिंग), व्युहात्मक व्यवस्थापन, व्यापार, ई कॉमर्स,
मार्केट/व्यापार संशोधन या बाबिंचा समावेश असल्याने, हा अभ्यासक्रम करणाऱ्या
उमदेवारांना हे सैध्दांतिक ज्ञान मिळते. त्यामुळे या व्यवसायाशी निगडित तांत्रिक
आणि व्यावसायिक घटकांची माहिती मिळून हा व्यवसाय प्रभावीपणे चालवण्याचा
आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतो. या अभ्यासक्रमातच रिटेल ऑपरेशन, सप्लाय चेन-पुरवठा
साखळी, ग्राहकांचे मानसशास्त्र, सध्याचे प्रवाह (ट्रेंड्स), निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्व कौशल्य,
उत्पादनाचे सखोल ज्ञान, ब्रँड प्रमोशनसाठी आवश्यक घटक या बाबींचेही
शिक्षण-प्रशिक्षण प्रदान केले जाते.
कौशल्य निर्मिती
सैध्दांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिके यामुळे सध्या
या क्षेत्रातील उद्योजकांना कोणत्या प्रकारची कौशल्ये हवी, याची कल्पना येते.
ग्लोबल ब्रँड्स, भारतीय डिझायनर्स, विविध स्टार्टअप यामुळे या क्षेत्रात अपरिमित
संधी निर्माण झाल्या आहेत. आहेत.
ई - कॉमर्सचा सतत वाढता प्रभावामुळे आणि
मायंत्रा, ॲमाझॉन, फ्लिपकार्ट या सारख्या डिजिटल दुकानांमुळे फॅशन उद्योगाने मोठी
उडी घेतली आहे. त्यामुळे या क्षेत्राचे सुव्यवस्थित व्यवस्थापन व संनियंत्रणासाठी
कौशल्ययुक्त मनुष्यबळाचीही गरज वाढली आहे.
संधी
फॅशन बिझिनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केल्यावर
पुढील करिअर संधी मिळू शकतात.
१)
प्रॉडक्ट डेव्हलपमेंट-या
क्षेत्रातील मनुष्यबळास व्यापार/ व्यवसायाच्या संधीचा शोध घेणे, त्यासाठी सतत
संशोधन करणे, वस्तुंच्या किंमती निर्धारण करणे अशा बाबींमध्ये लक्ष पुरवावे लागते.
२) फॅशन
मार्केटिंग- ग्राहकांच्या गरजा,
मागणी, सध्याचे प्रवाह लक्षात घेऊन, कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रिची व्युहनीती
ठरवणे, कंपनीचा ब्रँड ग्राहकांच्या नजरेसमोर राहील यासाठी प्रभावी उपाययोजना करणे,
अशा बाबींकडे या मनुष्यबळास लक्ष पुरवावे लागते.
३)
आंत्रप्रिन्युर- नावीन्यपूर्ण
पध्दतीचा वापर करुन वेगवेगळया ग्लोबल ब्रँडची विक्री करण्याचे कौशल्य प्राप्त
केल्यास स्वत:चा चांगला व्यवसाय उभा करता येणे शक्य होऊ शकते. किंवा स्वत:चा एखादा
ब्रँड निर्माण करुन त्याची विक्री आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करता येणे
शक्य होऊ शकते.
४) डिजिटल
ॲण्ड सोशल मीडिया मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह- कंपनीच्या ब्रँडचा ग्राहक लक्षात घेऊन डिजिटल आणि
सोशल मीडियाव्दारे सर्जनशीलरीत्या माहिती व प्रसिध्दी देण्याची क्षमता आणि कौशल्य
प्राप्त करावे लागते. यामुळे कंपनीच्या विकासासाठी व्युहनीती आखून विक्रीत वाढ
करता येणे शक्य होऊ शकते.
५) रिटेल- रिटेल व्यवस्थापकास दुकान/मॉल किंवा
डिपार्टमेंटचे प्रभावी व्यवस्थापन करावे लागते. यामध्ये माल किंवा साठ्याचा
दररोजचा आढावा, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, विक्री, प्रसिध्दी, ग्राहकांचे समाधान आदी
बाबींचा समावेश आहे. याव्दारे व्यवसायवृध्दी आणि नफा मिळवणे या बाबी साध्य
करावयाच्या असतात.
६) फॅशन
कंसलटंट-फॅशन आणि रिटेल
उद्योगाचे ज्ञान आणि कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्तींना या क्षेत्रात उत्तमोत्तम
संधी मिळू शकतात. आपल्या ग्राहकाच्या प्रतिमा संवर्धनासाठी सहाय्य करावे लागते.
यासाठी त्यांच्या शरीराचा आकार, व्यक्तिमत्व, त्यांची आवड, संबंधितांचे
कार्यक्षेत्र अशा सारख्या बाबींचा सखोल विचार करावा लागतो.
७) फॅशन
बायर - सध्याचा फॅशन प्रवाह
आणि कलांकडे तज्ज्ञास लक्ष पुरवावे लागते. डिपार्टमेंटल स्टोर्स/फॅशन मॉल साठी
ग्राहकांच्या आवडीप्रमाणे कपडयांचा साठा करुन ठेवणे, डिझायनर्सच्या सहाय्याने अशा
कपडयांच्या निर्मितीस चालना देणे,या बाबिंकडे लक्ष पुरवावे लागते.
८)
व्हेंडर ॲनॅलिस्ट - किमान किंमतीमध्ये
उच्च दर्जाच्या कच्चा मालाचा शोध घेण्यासाठी या तज्ज्ञास प्रयत्न करावे लागतात.
त्यासाठी त्याला विविध दुकानांना भेटी देऊन साहित्य आणि मूल्याचे सतत विश्लेषण
करावे लागते. फॅशन व्यवसाय व्यवस्थापनात हा महत्वाचा भाग समजला जातो.
९) चिफ
मर्कंडायजर- व्यापार वृध्दी हे
या मनुष्यबळाचे मुख्य काम आहे. त्यासाठी अधिकाधिक दुकाने उघडणे, ग्राहक केंद्रित
साहित्याची निर्मिती, व्यवसाय वृध्दीसाठी विक्रिचे सतत विश्लेषण करुन त्यानुसार
व्युहनीती अंमलात आणने या बाबींकडे या मुनष्यबळास लक्ष पुरवावे लागते.
ई-कौशल्य
करोनोत्तर काळात ई-प्लॅटफॉर्मला प्रचंड गती
मिळाली आहे. प्रत्यक्ष दुकांनाकडे वळणारी पावले आता आभासी जगतातील व्यवहाराकडे
अधिक रस घेऊ लागली आहेत. त्यामुळे अधिकाधिक कंपन्या आता आपला व्यवसाय ऑनलाईन
पध्दतीने करण्यावर भर देताहेत. या डिजिटल क्रांतीमुळे नव्या प्रकारचे व्यवस्थापकीय
कौशल्य प्राप्त केलेल्या मनुष्यबळाची गरज वाढली आहे. ग्राहकांच्या आवडी निवडी,
सध्याचे प्रवाह आणि कल तसेच ग्राहकांना परवडणाऱ्या किंमती यांचा योग्य असा समन्वय
साधणे त्यासाठी सतत संशोधन करणे आणि विश्लेषन करणे गरजेचे झाले आहे. या बाबीसुध्दा
आवश्यक ठरतात. अशा कौशल्याची निर्मिती
फॅशन बिझिनेस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाव्दारे होऊ शकते. अशा कौशल्य प्राप्त
व्यक्तिंना सध्या मोठी मागणी आहे.
मास्टर
ऑफ फॅशन मॅनेजमेंट
हा
अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरु
केला आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालवधीचा असून तो कोणत्याही शाखेतील पदवीधरास करता येतो. या
अभ्यासक्रमासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या
अभ्यासक्रमासाठी २७ टक्के जागा नॉन क्रिमी लेअर इतर मागासवर्ग संवर्ग, १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग आणि ७.५
टक्के जागा अनुसूचित जमाती सवंर्ग आणि ३ टक्के
दिव्यांगासांठी राखीव ठेवण्यात येतात.
जनरल
ॲबिलिटी टेस्ट
प्रवेश
परीक्षा जनरल ॲबिलिटी टेस्ट या नावाने ओळखली जाते. या टेस्टमध्ये संख्यात्मक क्षमता, संवाद
कौशल्य, इंग्रजी
उताऱ्यावरील प्रश्न, तार्किक
क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता, सामान्य
ज्ञान आणि चालू घडामोडी आणि केसस्टडी यावर प्रश्न विचारले जातात. परीक्षेचा
कालावधी - तीन तास. एकूण
दीडशे प्रश्न विचारले जातात. यामध्ये
४० प्रश्न केस स्टडीवर, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर २५ प्रश्न, तार्किक
क्षमता आणि विश्लेषनात्मक क्षमता कौशल्यावर २५ प्रश्न, संख्यात्मक
क्षमता १० प्रश्न, संवाद
कौशल्य, इंग्रजी उताऱा ४० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नास एक गुण याप्रमाणे १५० गुणांचा हा पेपर असतो. निगेटिव्ह
गुण नाहीत. या
परीक्षेत विशिष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत व समूह
चर्चेसाठी बोलावले जाते.
अंतिम निवड यादी तयार करताना लेखी चाळणीतील गुणांना ७० टक्के वेटेज आणि मुलाखत व समूहचर्चेतील गुणांसाठी ३० टक्के वेटेज दिले जाते.
मुलाखती मध्ये विद्यार्थ्यांचा फॅशन मॅनेजमेंट या विषयाच्या अनुषंगाने कल, विद्यार्थ्याचे
व्यक्तिमत्व, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील प्रगती, संवाद
कौशल्य, सामान्य
घडामोंडीबद्दलचे आकलन आणि सर्जनशील विचारकौशल्य याची चाचपणी केली जाते.
समूह चर्चेमध्ये विद्यार्थ्यांना एक केस स्टडी दिली जाते. त्यावर
आधारित प्रश्न तज्ज्ञांकडून विचारले जातात. याद्वारे
विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक स्पष्टता, दिलेल्या
विषयाचे ज्ञान, चर्चेत
उपस्थित केलेले नवे मुद्दे, आंतरसंवादीय
कौशल्य, समस्या
सोडवणुकीच्या दृष्टिने दिसून आलेली वृत्ती या बाबींची तपासणी केली जाते.
हा अभ्यासक्रम बेंगळुरु, भोपाळ, चैन्नई, , गांधीनगर, हैदराबाद, कानपूर, कोलकता, मुंबई, नवी
दिल्ली, पाटणा, रायबरेली, शिलाँग, जोधपूर
आणि भूवनेश्वर येथील कॅम्पस मध्ये शिकवला जातो. या
प्रत्येक कॅम्पससाठी प्रत्येकी ३० याप्रमाणे ४२० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
काय
शिकाल?
या अभ्यासक्रमात फॅशन मार्केटिंग, फॅशन मर्कंडायजिंग,रिटेल ॲण्ड मॉल मॅनेजमेंट, ब्रँड
मॅनेजमेंट, रिटेल
बायिंग, ग्लोबल
सोर्सिंग, प्रॉडक्ट
डेव्हलपमेंट, व्हिज्युअल मर्कंडायजिंग, एक्सपोर्ट मर्कंडायजिंग, मॅनेजमेंट कन्सलटिंग, फॅशन
एज्युकेशन, रिटेल
टेक्नॉलॉजी, सप्लाय चेन, कस्टमर रिलेशनशीप , फोरकास्टिंग, इंटरनॅशनल ट्रेड प्रॅक्टिस, इंटरनॅशनल
मार्केटिंग, इनोव्हेटिव्ह फॅशन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, फॅशन ट्रेंड्स, बिग डेटा ॲनॅलिटिक्स, कंझ्युमर
बिहेव्हियर ॲण्ड न्युरो मार्केटिंग आदी
विषयांचा समावेश करण्यात येतो.
स्पेशलायझेशन
या
अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना (१) मार्केटिंग ॲण्ड रिटेलिंग, (२) आंत्र्यप्रिन्युरशीप आणि (३)
इंटरनॅशनल बिझिनेस यापैकी कोणत्याही एका विषयात स्पेशलायझेशन करता येते.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी,
प्लॉट नंबर १५, सेक्टर ४, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०, दूरध्वनी-०२२-२७७४७१००
संकेतस्थळ-
https://www.nift.ac.in/mumbai/
०००

Comments
Post a Comment