खनिज तेलाचा शोध


 वेगळया वाटा,अनोखी संधी

() खनिज तेलाचा शोध

     पेट्रोलियम पदार्थांचे जागतिक अर्थकारण आणि  राजकारणातले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता या क्षेत्रात नव्या साठयांचा शोध, जुन्या साठयांची देखभाल, दुरुस्ती, या क्षेत्रातील   संशोधन आदी विविध बाबींसाठी सातत्याने तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासत आहे. ही गरज २०२२ पर्यंत ३० हजार तज्ज्ञांची सुध्दा राहू शकते.

गेल्या काही वर्षात या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक विद्यार्थी न वळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. त्यामुळे या क्षेत्रात फार मोठया करिअरच्या संधी मिळू शकतात.

     या क्षेत्रात प्रारंभीचा प्रवेश हा एम.एस्सी भूगर्भशास्त्र किंवा भूभौतिकीशास्त्र किंवा केमिकल / मेकॅनिकल / बायोकेमिकल या विषयातील बी.ई केलेल्या उमेदवारांना शक्य होतो. पेट्रोलियम पदार्थांचे शोध, उत्खनन, निर्मिती यास पेट्रोलिमय क्षेत्रात अपस्ट्रिम या नावाने संबोधले जाते.

     भूपृष्ठावरील पेट्रोलियम पदार्थांवर केल्या जाणाऱ्या क्रिया-प्रक्रियांना डाऊनस्ट्रीम असे संबोधले जाते. या डाऊनस्ट्रिम क्षेत्रासाठी पेट्रोकेमिकल्स अभियंते आणि तज्ज्ञांची अधिक गरज भासते. अपस्ट्रिम क्षेत्रामध्ये जगातील विविध भूप्रदेशात पट्रोलियम पदार्थांच्या शोध प्रक्रियेचा समावेश होतो. या क्षेत्रातील तज्ज्ञांना हे साठे कुठे आढळतील याचे अचूक निदान करावे लागते. या साठयांच्या शोध प्रक्रियांच्या आधुनिकीकरणाचे तंत्र विकसित करावे लागते. त्यात सतत सुधारणा करावी लागते. नव्या उपकरणांचा शोध लावावा लागतो. या सततच्या शोध - संशोधन प्रक्रियेमुळे कच्च्या तेलामधून १५० च्या आसपास विविध पेट्रोलियम पदार्थांची निर्मिती शक्य झाली आहे.

     पेट्रोकेमिकल्स अभियंते  आणि तज्ज्ञांना  अपस्ट्रिम आणि डाऊनस्ट्रिम या दोन्ही क्षेत्रात कार्य करण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे या अनुषंगाने अभ्यासक्रमाची संरचना केली असते. यामुळे प्रत्यक्ष कार्यरत असताना कोणत्याही प्रकारचे आव्हान स्वीकारणे शक्य होऊ  शकते.

या क्षेत्रातील तज्ज्ञांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील भारतीय आणि परदेशातील तेल कंपन्या, तांत्रिक सेवा पुरवठदार, पेंट आणि डाय उत्पादन करणाऱ्या पेट्रोकेमिकल्स कंपन्या, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व  आशिया, रशिया, चीन या सारख्या देशातील तेल कंपन्यांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होवू शकतात.

अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था

 () दिब्रुगढ युनिव्हर्सिटी-  अभ्यासक्रम (१) एमटेक इन पेट्रोलियम एक्सप्लोरेशन ॲण्ड प्रॉडक्शन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- चार सत्रांमध्ये विभाजित दोन वर्षे, अर्हता - बी.ई इन मेकॅनिकल किंवा केमिकल किंवा पेट्रोलियम इंजिनिअरिंग किंवा एम.एस्सी इन जिओफिजिक्स किंवा जिऑलॉजी) आणि (२) पीएचडी इन पेट्रोलियम इंजिनिअरिंग.

   संपर्क- रजिस्ट्रार, दिब्रुगढ युनिव्हर्सिटी, नॅशनल हायवे, बेहिया चेटिया गाव, दिब्रुगढ- ७८६०००४, दूरध्वनी - ०३७३-2370336, फॅक्स-२३७०७६८,संकेतस्थळ - www.dibru.ac.in, ई-मेल-registrar@ dibru.ac.in

() इंडियन स्कूल ऑफ माइन्स युनिव्हर्सिटी धनबाद-

     या संस्थेने एम.टेक इन पेट्रोलियम एक्सप्लोरेशन हा दोन वर्षे कालवधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

    संपर्क- इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद- ८२६००४, झारखंड, दूरध्वनी-०२३६-२२३५००१, , फॅक्स-२२९६५६३, संकेतस्थळ- www.iitism.ac.in, ई-मेल - query@ ismu.ac.in

() युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज -

या संस्थेच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ऑइल आणि गॅस सेक्टर या क्षेत्राशी निगडित  पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत-   ) बीटेक इन ॲप्लाइड पेट्रोलियम इंजिनिअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन अपस्ट्रिम,   ) बी.टेक इन    जिओइर्न्फमेटिक्स,

इतर अभ्यासक्रम- एम.टेक इन पेट्रोलियम इंजिनिअरिंग, एम.एस्सी इन पेट्रोलियम जिओसायन्स, पीएचडी इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग

संपर्क - यूपीइएस कॅम्पस, पोस्ट ऑफिस बिधोली व्हाया,  प्रेमनगर डेहरादून- २४८००७, दूरध्वनी - ०१३५-२७७०१३७, फॅक्स- २७७६०९१, संकेतस्थळ -www.upes.ac.in, ईमेल-enrollments@upes.ac.in.

000

Comments

Popular posts from this blog

उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

महिला किसान सशक्तीकरण

वेगळे पर्याय