गुंतवणुकीचे सूत्रधार
गुंतवणुकीचे
सूत्रधार
वाणिज्य
शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना व्यापार, व्यवसाय, बाजारातील चढउतार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्वे, सरकारची वित्तीय धोरणे, औद्योगिक धोरण, शेअर मार्केट आदी बाबींचे ज्ञान
प्राप्त होते. १२ वीनंतर इच्छूक उमेदवार बी.कॉम आणि त्यानंतर एम.कॉम करु शकतो. या
दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचा वित्त, व्यवसाय
प्रशासन, लेखा, ई-कॉमर्स, विक्री, विपणन आदी विषयांचा अभ्यास होतो.
१२ वी नंतर फायनांस, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, इन्शुरन्स, फॉरेन ट्रेड, स्टॉक ब्रोकिंग ॲण्ड इव्हेन्स्टमेंट ॲनालिस्ट
अशा सारखे अभ्यासक्रम करता येतात.
गेल्या काही वर्षात बॅचलर इन
अकाउंटन्सी ॲण्ड फायनान्स,
बॅचलर इन बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स, बॅचलर ऑफ फायनांशियल मार्केट्स असे
स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम काही संस्थांनी सुरु केले आहेत. बिझिनेस इकॉनॉमिक्स, फायनांस ॲण्ड कन्ट्रोल या विषयातही
पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येऊ शकते.
वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना अध्यापन, नागरी सेवा, उच्च शिक्षण, बँकिंग क्षेत्र, ब्रोकिंग, संशोधन, विमा क्षेत्र,
वित्तीय संस्था, कॉस्ट अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटन्ट अशा काही संधी मिळू
शकतात. बी.कॉम आणि एमबीए अशा पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक
आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, कार्पोरेट
या ठिकाणी उत्तम संधी मिळू शकते. जो उमेदवार संख्याशास्त्रावर प्रभुत्व मिळवतो
त्यास वित्तीय अभियांत्रिकी (फायनांशिअल इंजिनिअरिंग) या उच्चश्रेणीच्या व
आव्हानात्मक कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.
भारतीय अर्थव्यस्थेला चालना देणाऱ्या घटकांमध्ये बँक डिपॉझिट्स, म्युच्यूअल
फंड, स्टॉक मार्केट्स, व्हेंच्यूर कॅपिटल, इन्शुरन्स ,पोर्टफोलिओ मॅनेजमेंट यामध्ये
सातत्याने नव्या बाबी घडत आहेत. त्याचाही फायदा वाणिज्य शाखेतील प्रशिक्षित
उमेदवार घेऊ शकतात.
जागतिकीकरणानंतर जगभरातील बँका आणि विमा कंपन्यांनी आपले जाळे सर्वत्र
पसरवण्यास सुरुवात केल्याने या कंपन्यांना तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासत आहे.
वाणिज्य शाखेची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यामुळे करिअर घडवण्याचे नवे
पर्याय उपलब्ध झाले आहेत. एमबीए (फायनांस) हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना
अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिक आणि व्यापारिक उलाढालीचे उत्तम
ज्ञान वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले असल्याने त्यांना ई-कॉमर्स
क्षेत्रात चांगली कामगिरी करता येते.
करिअर संधी-
वाणिज्य शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम व या विषयाशी संबंधित
स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम केल्यास पुढील करिअर संधी उपलब्धक होऊ शकतात.(१) अकाउंटन्ट, (२) फायनांस कन्ट्रोलर, (३) अकाउंटन्ट
एक्झिक्युटिव्ह, (४) चार्टर्ड
अकाउंटन्ट (५) कंपनी सेक्रेटरी (६) फायनांस ॲनालिस्ट (७) फायनांस कंट्रोलर (८) फायनांस मॅनेजर (९) फायनांस कंसलटन्ट (१०) इनव्हेस्टमेंट ॲनालिस्ट (११) स्टॉक ब्रोकर (१२) पोर्टफोलिओ मॅनेजर (१३) टॅक्स ऑडिटर (१४) टॅक्स कन्सलटंट (१५) ऑडिटर (१६) स्टॅटिस्टियन (१७) इकॉनॉमिस्ट (१८) क्रेडिट मॅनेजर (२०) ज्युनिअर अकाउंटंट (२१) बूक कीपर (२२) इंटरनेट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह - ई-कॉमर्स
(२२) कार्पोरेट लॉयर
महत्वाची
महाविद्यालये
पदवी
आणि पदव्युत्तर स्तरावर वाणिज्य विषयाचा अभ्यासक्रम बहुतेक सर्वच विद्यापीठांमध्ये
करता येतो. काही महत्वाच्या नामवंत संस्था पुढील प्रमाणे आहेत. (१) सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉलेज
पुणे, (२) झेवियर कॉलेज मुंबई, (३) नर्सी
मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, मुंबई, (४) एच.आर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स
मुंबई, (५) एलफिन्स्टन
कॉलेज मुंबई (६) के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड
कॉमर्स मुंबई, (७) आर.ए.पोद्दार
कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मुंबई (८) हिंदुजा
कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई (९)
बी.एम कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे (१०) नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, (११) सर
परशुरामभाऊ कॉलेज ऑफ आर्ट्स ,कॉमर्स
ॲण्ड सायन्स ,पुणे (१२) श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स दिल्ली, (१३) लोयोला
कॉलेज ऑफ कॉमर्स चेन्नई,
(१४) झेवियर
कॉलेज कोलकता, (१५) सेंट
जोसेफ कॉलेज बेंगळुरु, (१६) प्रेसिडेन्सी
कॉलेज चेन्नई
यातील काही महाविद्यालयांमध्ये वाणिज्य
पदवीधरांसाठी प्लेसमेंट सेल असून अनेक विद्यार्थ्यांना महत्वाच्या कंपन्या आणि
कॉर्पोरेट हाऊसेस चांगल्या संधी देत असतात.

Comments
Post a Comment