कृषी शिक्षण आणि करिअर संधी (भाग एक)
कृषी शिक्षण आणि करिअर संधी (भाग एक)
महाराष्ट्रातील कृषी शिक्षण -
प्रशिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचा दर्जा
आणि गुणवत्ता उत्तम असा आहे. या सर्व संस्थांना गेल्या काही दशकांचा चांगला
अनुभव आहे. अनुभवी उच्चशिक्षित प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, विस्तीर्ण असे
कॅम्पस, ग्रंथालये, वसतिगृहे, व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम, संशोधनाची आवड
निर्माण व्हावी अशी अभ्यासक्रमांची संरचना आणि परवडणारे शैक्षणिक शुल्क आणि इतर
सुविधा ही या संस्थांची वैशिष्ट्ये.
अभ्यासक्रम
या विद्यापीठांमार्फत पुढील
अभ्यासक्रम चालविले जातात.
(१) डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी/ ॲग्रिकल्चरल पॉलिटेक्निक.
अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे. (२)
कृषी तंत्रकिनेतन पदविका. कालावधी- दोन वर्षे. (३) कृषी विज्ञान पदविका/ डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल सायन्स. कालावधी- दोन
वर्षे. (उपरोक्त तिनही अभ्यासक्रमांना व्यावसायिक
अभ्यासक्रमांचा दर्जा नाही.)
व्यावसायिक (प्रोफेशनल) अभ्यासक्रमांचा दर्जा असलेले अभ्यासक्रम- (१) बी.एस्सी (ऑनर्स) (ॲग्रिकल्चर), कालावधी- चार वर्षे. (२) बी.एस्सी (हॉर्टिकल्चर)/ बी.एस्सी (ऑनर्स) (हॉर्टिकल्चर), कालावधी- चार वर्षे. (३) बी.एस्सी (फॉरेस्ट्री)/ बी.एस्सी (ऑनर्स) फॉरेस्ट्री,
कालावधी-चार वर्षे. (४)
बी.एस्सी (होमसायन्स)/ बी.एस्सी (ऑनर्स) (कम्युनिटी सायन्स),
कालावधी- चार वर्षे. (५)
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) (फूड टेक्नॉलॉजी), कालावधी- चार वर्षे. (६) बी.एस्सी (ॲग्रिकल्चर
बायोटेक्नॉलॉजी)/ बी.टेक (बायोटेक्नॉलॉजी),
कालावधी-चार वर्षे. (७)
बी.टेक (ॲग्रिकल्चरल इंजिनीअरिंग), कालावधी-
चार वर्षे. (८) बी.एस्सी (ऑनर्स)-कृषी व्यवसाय व्यवस्थापन
प्रवेश प्रक्रिया
(१) बी.एस्सी (ऑनर्स)-कृषी आणि
बी.एस्सी (ऑनर्स)-उद्यानविद्या, या
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या
विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट (यूजी) किंवा जेईई, (२) बी.एस्सी (ऑनर्स) - वनविद्या आणि बी.एफएस्सी (मत्स्यशास्त्र)- या अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा
नीट, (३) बी.टेक (अन्न तंत्रज्ञान) आणि बी.टेक (कृषी
अभियांत्रिकी) - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी -
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित आणि
जीवनशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा किंवा जेईई. विद्यार्थ्याने
जीवशास्त्र विषय घेतला नसल्यास, त्याला संबंधित विद्यापीठाने विहित केलेले
अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. (४) बी.टेक
(जैवतंत्रज्ञान) आणि बी.एस्सी (ऑनर्स) - सामुदायिक विज्ञान - या अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किंवा
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि
जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट किंवा जेईई. ज्या विद्यार्थ्याने
गणित विषय घेतला नसेल त्यांना त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित विद्यापीठाने
निर्धारित केलेला गणित अभ्यासक्रम पूर्ण
करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषय घेतला नसेल त्यांना त्याची
पूर्तता करण्यासाठी जीवशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. (५) बी.एस्सी (ऑनर्स) -कृषी
व्यवस्थापन(ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट) -
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी -भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह
किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि
जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट किंवा जेईई. ज्या विद्यार्थ्यांनी
गणित विषय घेतला नसेल त्यांना त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित विद्यापीठाने
निर्धारित केलेला गणित अभ्यासक्रम पूर्ण
करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषय घेतला नसेल त्यांना त्याची
पूर्तता करण्यासाठी जीवशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.
संबंधित उमेदवाराने एकापेक्षा अधिक
सामाईक परीक्षा दिल्या असल्यास, ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असेल,
त्यासाठी लागू असलेल्या विषयगटात, ज्या सामाईक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेले
असतील ते प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. (उदा.-एखाद्या उमेदवाराने नीट, जेईई आणि एमएचटी-सीईटी
या तिनही परीक्षा दिल्या असतील व त्यास भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र
या गटात, समजा नीट परीक्षेत अधिक गुण मिळाले असतील तर ते गुण ग्राह्य धरले जातात.
एखाद्या विद्यार्थ्यास जेईई मध्ये सर्वाधिक गुण मिळाले असतील तर ते गुण ग्राह्य
धरले जातात.)
प्रवेश अर्हता-
(अ) भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि
रसायनशास्त्र यापैकी कोणताही गट घेऊन १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीएस्सी (ऑनर्स) (१) कृषी, (२) उद्यान विद्या, (३) सामाजिक विज्ञान, (४) जैवतंत्रज्ञान, (५) कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
(ब) भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हा गट घेतलेल्या
विद्यार्थ्यांना, बीएस्सी (ऑनर्स)
(१) मत्स्यविज्ञान, (२) वनविद्या या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
(क) भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना,
बीएस्सी (ऑनर्स) (१) कृषी अभियांत्रिकी, (२) अन्नतंत्रज्ञान, या
अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
शासकीय/अनुदानित महाविद्यालये
(१) बीएस्सी ऑनर्स (कृषी)-ही महाविद्यालये पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार,
कराड, जळगाव, जामखेड (अहमदनगर), अकोला,
नागपूर, सोनपूर (गडचिरोली), मूल (चंद्रपूर), वरोरा (चंद्रपूर), अमरावती, परभणी, लातूर, बदनापूर (जालना), किनी (उस्मानाबाद), गोळेगाव (औंढा नागनाथ), दापोली(रत्नागिरी) येथे आहेत.
एकूण जागा-२०७२
(२) बीएस्सी ऑनर्स (उद्यायनविद्या)- ही महाविद्यालये पुणे, अकोला,
परभणी, दापोली (रत्नागिरी), कुडाळ (सिंधूदुर्ग) येथे आहेत. एकूण जागा-२००
(३) बीएस्सी ऑनर्स (वनविद्या)-ही महाविद्यालये अकोला, दापोली (रत्नागिरी) येथे आहेत. एकूण जागा - ६४
(४) बी.एफ.एस्सी (फिशरी सायंस/मत्स्य विज्ञान) - शिरगाव (रत्नागिरी). एकूण जागा-४०
(५) बी.टेक (अन्न तंत्रज्ञान/फूड टेक्नॉलॉजी)- ही महाविद्यालये
परभणी, काष्टी (मालेगाव/नाशिक), शिरगाव
(रत्नागिरी) येथे आहेत. एकूण जागा-१४४
(६) बी.टेक (जैव तंत्रज्ञान/बायो टेक्नॉलॉजी)- ही महाविद्यालये
यवतमाळ, लातूर येथे आहेत. एकूण जागा-८०
(७) बीएस्सी ऑनर्स (सामुदायिक विज्ञान)- परभणी, एकूण जागा-४०.
(८) बीएस्सी ऑनर्स (कृषी व्यवसाय व्यवस्थापन)- काष्टा (मालेगाव/नाशिक), एकूण जागा-४०.
अपूर्ण
.jpg)
Comments
Post a Comment