केवळ महिलांसाठी- कौशल्य प्राप्ती, उच्चशिक्षण


 केवळ महिलांसाठी-

कौशल्य प्राप्ती, उच्चशिक्षण

आपल्या देशात आणि राज्यात केवळ महिलांसाठीच म्हणून विविध ज्ञानशाखेतील अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था आहे. या संस्थांनी गेल्या अनेक वर्षात दर्जा आणि गुणवत्तेसंदर्भात उत्तम कामगिरी केली आहे.

अशा काही संस्था आणि अभ्यासक्रम

() उषा मित्तल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महिलांना प्रवेश घेता येतो. तथापि महिलांसाठीच म्हणून खास अभियांत्रिकी महाविद्यालय, एसएनडीटी (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे) महिला विद्यापीठात कार्यरत आहे.

या विद्यापीठांतर्गत उषा मित्तल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत बीटेक इन (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, डेटा सायंस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड  कम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग) हे अभ्यासक्रम करता येतोत. १२ वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह ४५ टक्के गुण मिळालेल्या खुल्या संवर्गातील विद्यार्थींनी प्रवेशासाठी पात्र ठरतात. राखीव संवर्ग- ४० टक्के गुण. प्रवेश एमएचटी-सीईटी या परीक्षेतील गुणांवर आधारित दिला जातो.

या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थींनींना संवर्गनिहाय शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्क सूट (फ्रीशिप) ची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

प्लेसमेंट

बहुतेक सर्व विद्यार्थींनींना चांगले प्लेसमेंट मिळत असते. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १५९ विद्यार्थींना वेगवेगळया कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले.

संपर्क- उषा मित्तल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसएनडीटी विद्यापीठ परिसर, जुहू-तारा रोड, सर विठ्ठलदास विद्याविहार सांताक्रुझ - पश्चिम, मुंबई ४०००४९, दूरध्वनी- ०२२-२६६०६०४०, संकेतस्थळ- www.umit.ac.in office@umit.sndt.ac.in

इतर अभ्यासक्रम

एसएनडीटी विद्यापीठात, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी असे अभ्यासक्रम विविध ज्ञान शाखेत करता येतात. पदवीस्तरीय अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत.

बीएड-स्पेशल एज्युकेशन इन () इंटलेक्युचअल डिसॅबिलिटी, () लर्निंग डिसॅबिलिटी, () व्हिज्युएल इम्पेअरमेंट.

बॅचलर ऑफ व्होकेशन इन () ज्वेलरी डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चर, () ऑप्टेमेट्री, () इंटेरिअर डिझाइन, () फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, () फॅशन डिझाइन,

इतर- () बी.फॉर्म, () बीबीए-एलएलबी, () बी.नर्सिंग,

संपर्क- https://sndt.ac.in/academics/list-of-departments-juhu-campus

 महिला तंत्रनिकेतन

या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेमलिला विठ्ठलदास तंत्रनिकेतनमध्ये पुढील पदविका अभ्यासक्रम करता येतात- डिप्लोमा इन () ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, () ॲपरेल मॅन्युफॅक्चर ॲण्ड डिझाइन, () इलेक्ट्रॉनिक्स, () फूड टेक्नॉलॉजी, () इंटेरिअर डिझाइन, () मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, () ऑप्थॅलमिक टेक्नॉलॉजी, () फार्मसी, () ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, (१०) ज्वेलरी डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चर.

संपर्क- http://pvpsndt.org/

एसएनडीटी विद्यापीठाचे पुणे येथे कॅम्पस असून, त्या ठिकाणी विविध विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी सारखे अभ्यासक्रम करता येतात.

संपर्क- https://sndt.ac.in/academics/list-of-departments-pune-campus

व्यवस्थापन अभ्यासक्रम

() जानकीदेवी बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

- एसएनडीटी विद्याठांतर्गत केवळ महिलांसाठी असलेली ही व्यवस्थापन विषयक शिक्षण - प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेत एमबीए आणि एमएमएस अशा दोन अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायंस) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी-एमएमएस/एमबीए, सीमॅट-कॉमन मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, कॅट-कॉमन ॲडमिशन टेस्ट या पैकी कोणत्याही एका परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत स्वतंत्र ॲप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) घेतली जाते.

स्पेशलायझेशन

एमबीए अभ्यासक्रम () ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, () फायनांस, () मार्केटिंग () सिस्टिम मॅनेजमेंट, () ऑपरेशन्स () रिटेल मार्केटिंग या विषयांमध्ये करता येतो.

एमएमएस अभ्यासक्रम-() ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, () फायनांस, () सिस्टिम मॅनेजमेंट, () मार्केटिंग () ऑपरेशन्स या विषयांमध्ये करता येतो.

प्लेसमेंट -गेल्या काही वर्षात या संस्थेतील विद्यार्थींनींना एअर इंडिया लिमिटेड, अम्बुजा सिमेंट, बजाज, बँक ऑफ इंडिया, भारत पेट्रोलियम कॉर्पोशन, भारती एअरटेल, बीएनपी पॅरीबस, बॉम्बे स्टॉक एक्स्जेंट, सिप्ला, सिॲट ,सिटी बँक, कोलगेट-पामोलिव्ह, क्रिसिल्, कॉम्प्टन ग्रिव्हज, देना बँक, ग्रँड हयात, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, एचएसबीसी बँक, एचसीएल, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, आयसीआयसीआय प्रुडेंशिअल, इंडियन ऑईल, जिंदाल स्टील, केनस्टार, आयटीसी ग्रँड सेंट्रल टॉवर्स, कोटक सिक्युरिटीज, ओएनजीसी, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, माझगाव डॉक, मॅरिको, एलॲण्डटी इन्फोटेक, ल्युपिन, इन्फोसीस , निकोलस पिरॅमील, स्टॅटंर्ड चार्टर्ड बँक, पेप्सिको, फिफजर, रॅनबॅक्सी, रिलायन्स लाइफ इंशुरंस, सिमेन्स, टीसीएस, टाटा पॉवर, टाटा म्युच्युअल फंड, टाइम्स ग्रुप, युनियन बँक ऑफ इंडिया आदी कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.

संपर्क- जानकीदेवी बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटी एसनडीटी विद्यापीठ परिसर, जुहू-तारा रोड,सर विठ्ठलदास विद्याविहार सांताक्रुझ-पश्चिम, मुंबई ४०००४९, दूरध्वनी-०२२-२६६०६६२६, संकेतस्थळ- www.umit.ac.in jdbims@sndt.ac.in

() जानकीदेवी बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च,पुणे- येथे दोन वर्षे कालावधीचा एमबीए अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

संपर्क- महर्षी कर्व विद्याविहार,कर्वे रोड, पुणे - ४११०३८, संकेतस्थळ- https://sndt.ac.in/jdbimsrpune

०००

Comments

Popular posts from this blog

उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

महिला किसान सशक्तीकरण

वेगळे पर्याय