विमाक्षेत्र-


 

  विमाक्षेत्र-

  भारतात हे क्षेत्र गतिने वाढत आहे. या क्षेत्रात प्रवेश केल्यावर विशिष्ट कालावधीच्या अनूभवानंतर उमेदवारांना उत्तमोत्तम करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. ॲक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडियामार्फत घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

इंस्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स ॲण्ड मॅनेजमेंट- या संस्थेंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ अक्चुरिअल सायन्स या संस्थेने, द पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन () ॲक्चुरिअल सायन्स, () इंव्हेस्टमेंट प्लॅनिंग ॲण्ड रिस्क मॅनेजमेंट, () ॲनालिटिक्स ॲण्ड ॲक्चुरिअल सायन्स हे प्रत्येकी  एक वर्षं कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. विमा गुंतवणूक आणि निवृत्त वेतन नियोजनाशी हे विषय निगडित आहेत. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन बिझिनेस ॲनालिटिक्स ॲण्ड रिस्क मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. या अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षी ()फायनांस,()फायनांशिअल सर्व्हिस,()बिझिनेस ॲनालिटिक्स,()रिस्क मॅनेजमेंट,()हेल्थ इंशुरन्स,()इंशुरन्स,() ॲक्चुरिअल सायन्स यापैकी कोणताही एक विषय स्पेशलायझेशनसाठी निवडता येतो.

संपर्क - प्लॉट नंबर ३८/३९, एपीएसएफसी बिल्डिंग, ग्राऊंड फ्लोअर, फायनांशिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा व्हिलेज, गाचीबाऊली ,हैदराबाद- ५०००३२, दूरध्वनी-०४०-२३०००००५, फॅक्स- २३०००२५४, संकेतस्थळ - www.iirmworld.org.in, ईमेल- adminissions@iirmworld.org.in () डी.एस.ॲक्चुरिअल एज्युकेशन सर्व्हिसेस-  या संस्थेने बी.एस्सी इन ॲक्चुरिअल सायन्स (अर्हता-कोणत्याही विषयातील १२ वी /कालावधी - ३ वर्षे) आणि एम. एस्सी इन ॲक्चुरिअल सायन्स  (अर्हता- बी.एस्सी इन ॲक्चुरिअल सायन्स /कालावधी -२ वर्षे) हे दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

या अभ्यासक्रमांमध्ये जीवन विमा, आरोग्य विमा, सर्वसाधारण विमा, संपत्तीचे मूल्यांकन,  धोक्यांचे विश्लेषण, रिस्क मॅनेजमेंट, प्रायसिंग ऑफ सेक्युरिटीज आणि डेरिव्हेटिव्हज अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. 

संपर्क- डी.एस.ॲक्चुरिअल एज्युकेशन सर्व्हिसेस, मनिबेन नानावटी कॉलेज वल्लभभाई रोड, ग्रास हूपर्स रेस्टॉरेंटच्या विरुध्द दिशेला, विले पार्ले , पश्चिम , मुंबई- ४०००५६, दूरध्वनी- ०२२-२६१५६२६४

संकेतस्थळ- www.dsacted.com, ईमेल- info@ dsacted.com

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी