एका धाग्याचे (कथा)कथन...
एका धाग्याचे (कथा)कथन...
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सर्जनशील मन असतं. या मनाची मशागत करुन
विविध संकल्पनांना जन्मास घालणं आणि
त्यातून उत्तम कलाकृतीच्या निर्मितीसाठीचं तंत्र आणि कौशल्य, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रम इन क्रॅफ्टिंग
क्रिएटिव्ह कम्युनिकेशन, या अभ्याक्रमामध्ये शिकवलं जातं. हा
अभ्यासक्रम मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनने या संस्थेमार्फत चालवला जातो.या अभ्यासक्रमाची टॅग लाइन (आशय रेषा) ही ,प्रत्येक धाग्याला एक कथा, कथन करायची
असते, (एव्हरी थ्रेड हॅज अ स्टोरी टू टेल) अशी आहे.
हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी
रणनीतिकारर (स्ट्रॅटेजिस्ट), कला दिग्दर्शक (आर्ट डायरेक्टर), अभिकल्पकार (डिझायनर),
ॲनिमेटर्स, चित्रपट निर्माते या क्षेत्रात नाव कमावलं आहे.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे- (१) संकल्पना निर्मितीचे तंत्र
( आयडिया जनरेशन टेक्निक), (२) कथाकथन (स्टोरी टेलिंग), (३) प्रतिमा निर्मिती (ब्रँडिंग), (४) संहिता लेखन (कॉपी रायटिंग),
(५) कला दिग्दर्शन (आर्ट
डायरेक्शन), (६) सजर्नशील नोंद लेखन (रायटिंग क्रियेटिव्ह ब्रिफ्स), (७) दूरचित्रवाणी वाणिज्यिक/ जाहिरात निर्मिती नियोजन (टेलिव्हिजन
कर्मशिअल प्लॅनिंग), (८)
प्रचार/प्रसिध्दी मोहीम (कॅम्पेन प्लॅनिंग), (९) चिन्हविज्ञान- (सेमिऑटिक्स),
(१०) डिजिटल संवादसंप्रेषन (डिजिटल कम्युनिकेशन), (११)
छायाचित्रण (फोटोग्रॅफी), (१२) दृष्टीक्षेप (वेज ऑफ सीईंग)
-आपल्या अवतीभवती असणारे विविध घटक/ पात्रे/ घटना अशा बाबींपासून सर्जनशील प्रेरणा
कशी घ्यावी? याविषयीचं प्रशिक्षण, (१३) जाहिरात व्यवस्थापन (ॲडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट), (१४) नवी माध्यमे आणि
अनुभवात्मक विपणन (न्यू मीडिया ॲण्ड एक्सपिरेंशिअल मार्केटिंग) - नव्या माध्यमांचा वापर करुन पारंपरिक जाहिरातीपेक्षा नावीन्यपूर्ण
पध्दतीने जाहिरात करण्याचं तंत्र/कौशल्य या विषय घटकात शिकवलं जातं. (१५) ग्राहक केंद्रित संवाद संप्रेषन (कस्टमर सेंट्रिक कम्युनिकेशन), (१६) डिजिटल जाहिराती, (१७)
रेडियो, (१८) ब्रँडिंग, (१९) साधनांचे शिक्षण (टूल
लर्निंग) उदा- अडॉब फोटोशॉप, इल्युस्ट्रेटर, इन डिझाइन, प्रिमिअर प्रो, आफ्टर इफेक्ट्स, (२०) अनिमेशन ॲण्ड स्टॉप मोशन- वाळू, प्रकाश, माती, कठपुतळे, चित्रे, पेपरचे
तुकडे अशा सारख्या साहित्याच्या मदतीने चित्रपटांची निर्मिती. (२१) चित्रपट आस्वाद/ समीक्षा (फिल्म
ॲप्रिशिएशन), (२२) चित्रपट निर्मिती,
कोणत्याही विषयातील पदवीधरास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.अभ्यासक्रमाचा
कालावधी- दहा महिने.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात-
(१) मॅनेजमेंट ट्रेनी, (२) क्रिएटिव्ह ट्रेनी, (३) मॅनेजर- ब्रँड स्ट्रॅटेजी, (४) सिनीयर मॅनेजर-ब्रँड स्ट्रॅटेजी, (५) कंटेट क्रिएटर , कॉपी रायटर, सिनियर कॉपी रायटर, (६) सिनिअर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, (७) आर्ट डायरेक्टर, (८)
व्हिज्युएलायजर, (९) सोशल मीडिया
स्ट्रॅटिजिस्ट, (१०) असोशिएट
क्रिएटिव्ह पार्टनर, (११) आर्ट
डायरेक्टर, (१२) ग्रॅफिक डिझायनर,
(१३) क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्टर
जाहिरात, ब्रँडिग, कॉर्पोरेट
कम्युनिकेशन, व्युहनीती, डिजिटल मार्केटिंग या सारख्या क्षेत्रात करिअर करु
इच्छिणाऱ्या व्यक्तीस आपली प्रतिभा आणि
सृजनशीलता प्रभावीरीत्या व आधुनिक पध्दतीने वापरता यावी यासाठी हा अभ्यासक्रम
उपयुक्त ठरु शकतो.
एखाद्या नामवंत जाहिरात संस्थेत एक महिन्याची इंटर्नशीपची सुविधा
उपलब्ध करुन दिली जाते.
०००
ऑनलाइन अभ्यासक्रम
या संस्थेमार्फत पुढील ऑनलाइन अभ्यासक्रम करण्याची सुविधा उपलब्ध करुन
दिली आहे. हे अभ्यासक्रम ब्रँडिंग, जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन,
व्यवसायवृध्दीसाठी ठरविण्यात येणाऱ्या सृजनशील व्युहनीती, जाहिराती, डिजिटल
मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात करिअर
करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
(१)
ॲडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन, (२) ब्रँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट, (३) बिझिनेस मॅनेजमेंट, (४) डिजिटल मार्केटिंग, (५) डिजिटल मार्केटिंग
ॲण्ड कम्युनिकेशन (६) मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट मॅनेजमेंट, (७) स्ट्रॅटेजिक ब्रँड मॅनेजमेंट ॲण्ड कम्युनिकेशन, (८) सेल्स ॲण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन, (९) मॅनेजिंग ब्रॅड ॲण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन, (१०) ई-कॉमर्स बिझिनेस मॅनेजमेंट, (११) रिटेल ॲण्ड शॉपर मार्केटिंग, (१२) मार्केट रिसर्च ॲण्ड ब्रॅण्ड कम्युनिकेशन, (१३) ॲडव्हान्स्ड डिजिटल ट्रॉन्सफॉर्मेशन प्रोग्रॅम,
या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी पुढील संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
(१) टॅलेन्ट एज- ईमेल- enquiry.dtd@talentedge.in, संकेतस्थळ-admissions.assistance@talentedge.com, दूरध्वनी-८३७ ६०००६००, (२) अपग्रेड - ईमेल-admissions@upgrad.com (३) आयव्होरी
एज्युकेशन- ईमेल- admission@ivoryeducation.in, दूरध्वनी- ८८६०४३८९९० (४)एमिरिटस- ईमेल- mica.execed@emeritus.org,दूरध्वनी - ७४१२०८१०८१
०००
समाजमाध्यमातील संधी
मार्केटिंग आणि क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातील पदवी
असल्यास उत्तम. समाजमाध्यम मार्केटिंगच्या क्षेत्रातील अनेक लघु आणि दीर्घ मुदतीचे
प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते केल्यास करिअरच्या संधी सुलभतेने
मिळू शकतात. डिजिटल मार्केटिंगच्या अभ्यासक्रमात व्युहनीती, ब्रँडची जाणीवजागृती,
ग्राहकांना आकर्षित करणे,
समाजमाध्यमांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून अधिकाधिक परतावा मिळवणे अशा सारख्या विषय
घटकांचा समावेश असतो.
(१) आयआयटी मद्रासच्या सेंटर फॉर कंट्युनिईंग
एज्युकेशनने सुरु
केलेल्या ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेशन इन
डिजिटल मार्केटिंग अँड ॲनॅलिटिक्स, या अभ्यासक्रमात या बाबींचा समावेश आहे. डेटा
सायंसचा उपयोग करुन विपणनातील आकडेवारीचे विश्लेषण सक्षमतेने होऊ शकते, हे या
अभ्यासक्रमाव्दारे शिकवले जाते. (२) मुद्रा इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, अहमदाबादचा, क्रॉफ्टिंग क्रिएटिव्ह कम्युनिकेशन या
अभ्यासक्रमात जाहिरात, मीडिया आणि संवादसंप्रेषण या घटकांवर भर देण्यात येते.
चित्रपट, छायाचित्रे, ग्रॅफिक डिझाइन आणि कला या घटकांचे ज्ञान प्रदान करुन
विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना आणि कथनास प्रभावीरीत्या ग्राहकांपर्यंत
पोहचवण्याचे तंत्र शिकवले जाते.
(३) सोशल मीडिया मार्केटिंगच्या क्षेत्रात नव्याने येऊ शकणाऱ्या
व्यक्तिंसाठी गुगलने सुरु केलेला, डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन, हा अभ्यासक्रम
उपयुक्त ठरु शकतो. या अभ्यासक्रमात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, कंटेट मार्केटिंग,
वेब ऑप्टिमायझेशन या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. तुम्ही निवडलेल्या
समाजमाध्यमांव्दारे किती आणि कोणत्या ग्राहकापर्यंत पोहचू इच्छिता याचे उद्दिष्ट्य
ठरवण्याचे तंत्रही शिकवले जाते.
(४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ
मॅनेजमेंट-कोझिकोड, या संस्थेने इरुडायटस या शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने,
प्रोफेशनल सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग ॲण्ड ॲनॅलिसीस हा १० महिने कालावधीचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु
केला आहे. एक वर्षाचा अनुभव असणाऱ्या कोणत्याही विद्यशाखेतील पदवीधरास हा
अभ्यासक्रम करता येतो. संपर्क
https://iimk.eruditus.com/digital-marketing-and-analytics/
काय शिकाल?
सोशल मीडियाच्या प्रगत अभ्यासक्रमांमध्ये पुढील
बाबींचा समावेश केला जातो. (१) व्टीटर आणि लिंक्डइनवर जाहिराती देणे, (२) फेसबूक आणि इन्स्टाग्रॅमवर जाहिरातीचे विविध प्रकार, (३) समाजमाध्यमे म्हणजे काय? ते इतके लोकप्रिय कां आहेत? (४) आघाडीचh समाज
माध्यमे ॲप्स,
(५) समाजमाध्यमासंदर्भात नियम आणि नियामके, (६) समाजमाध्यमांवरील कामगिरी मोजण्याची साधने, (७) मूल्य देऊन केलेली मार्केटिंग आणि आपोआप होणारी मार्केटिंग यातील फरक, (८) फेसबूक, स्पनचॅट, लिंक्डइन, यूट्यूब, व्टीटर, इन्स्टाग्रॅम, प्रिंटरेस्ट या माध्यमांची तोंड ओळख, (९) फेसबूक जाहिराती आणि इन्स्टाग्रॅम मार्केटिंगची तोंड ओळख, (१०) शून्यातून ऑनलाइन ग्राहकांचा पाया तयार करणे, (११) प्रदेश, भाषा, आवडनिवड, वर्तणूक यानुसार ग्राहकांचा पाया तयार करणे.
यापैकी कोणता अभ्यासक्रम करावयाचा हे प्रत्येकाने
आपली आवड, कल गती
ओळखून ठरवले पाहिजे.काही अभ्यासक्रम १० वी आणि १२ वीनंतर तर काही अभ्यासक्रम पदवी नंतर करता येतात.
ऑनलाइन अभ्यासक्रम
पुढील काही संस्थांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु
केले आहेत
(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कोलकता, (२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- बेंगळुरु, (३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ डिजिटल एज्युकेशन - मुंबई, (४) मद्रास ख्रिश्चन कॉलेज- चेन्नई, (५) डून बिझिनेस स्कूल डेहरादून, (६) डी.वाय पाटील विद्यापीठ पुणे, (७) जी.डी गोयंका युनिव्हर्सिटी गुरुग्राम, (८) नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज - मुंबई, (९) इंडियन इंस्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन,दिल्ली.
ऑनलाईन प्लॅटफार्म्स- उदेमी, डिजिटल विद्या, अपग्रॅड, फ्युचर लर्न,
कोर्सेरा, एडेक्स, लिंक्डइन लर्निंग. समाममाध्यमांमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या
ज्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयाची पदवी असल्यास ऑनलाइन प्लॅटफार्मवरील
अभ्यासक्रम करुन त्याला, आवश्यक ती कौशल्य प्राप्त करता येऊ शकतात. काही महत्वाचे
ऑनलाईन पुढीलप्रमाणे आहेत - (१) शॉपिंग ॲड सर्टिफिकेशन, (२) गुगल डिस्प्ले ॲड सर्टिफिकेशन, (३) गुगल ॲड वर्ड्स सर्टिफिकेशन, (४) हबस्पॉट सर्टिफिकेशन, (५) गुगल ॲनॅलिटिक्स सर्टिफिकेशन, (६) सर्च ॲड सर्टिफिकेशन, (६) व्हिडियो ॲड सर्टिफिकेशन, (७) बिंज ॲड सर्टिफिकेशन, (७) सेम्रुश सर्टिफिकेशन,

Comments
Post a Comment