फूड टेक्नॉलॉजी - उगवते क्षेत्र


फूड टेक्नॉलॉजी - उगवते क्षेत्र

भारतातील अन्न प्रकिया उद्योगाचा समावेश हा जगातील  काही महत्वाच्या उद्योगांमध्ये होतो. २०२५-२६ पर्यंत या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल ५३५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय शेतकऱ्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी थेट संपर्क साधण्यात या क्षेत्राने महत्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रिय अन्न प्रकिया मंत्रालय या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूकीला प्रोत्साहन देत आहे. भारतातील रोजगार निर्मितीत या क्षेत्रात प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या व्यवसाय घटकांचा १२.३८ टक्केच्या आसपास वाटा आहे. जवळपास १.९३ मिलियन व्यक्तींना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे.  नोंदणी न केलेल्या व्यवसाय घटकांमध्ये ५.१ मिलीयन व्यक्तिंना रोजगार मिळाला आहे. साखर, खाद्य तेल, शितपेये, दुग्धजन्यपदार्थ, अन्नधान्य या क्षेत्राचा यात प्रामुख्याने समावेश होतो.

सरकारचे प्राधान्य

प्रधानमंत्री किसान संचयनी योजनेंतर्ग ४१ मेगा फूड पार्क्स, ३७६ शित शाखळी प्रकल्प, ७९ कृषी प्रकिया क्षेत्र, ४८९ अन्न प्रक्रिया  उद्योग आणि जतन घटकांच्या क्षमतांचा विस्तार, ५२ हरीत प्रकल्प, १८३ अन्न परीक्षण प्रयोगशाळांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे.

भारतातील अन्न पक्रिया उद्योगाच्या मुख्य घटकांमध्ये फळे आणि‍ भाजिपाला, फूड रिटेल, दुग्धजन्य पदार्थ उद्योग, मत्स्य पालन, मांस प्रकिया, कुक्कूटपालन यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी देशात ३४३ मिलियन टन फलोत्पादन झाले. मागील वर्षीपेक्षा ही वाढ अडीच पट अधिक आहे. दुध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. गेल्या वर्षी २२२ मिलियन टन दुधाचे उत्पादन झाले. अंड्याचे उत्पादन १३० मिलियन टन झाले. मासोळीचे उत्पादन १७ मिलियन टन झाले. मागील तीन वर्षात सागरी अन्नाची निर्यात ६६७९ मिलियन डॉलर्स इतकी विक्रमी झाली. तृणधान्याच्या निर्यातीत १४ टक्क्यांनी वाढत झाली. मांसाचे उत्पादन ९.२९ मिलियन टन झाले. गव्हाचे उत्पादन १०७ मिलिनटन तर तांदळाचे उत्पादन १३० मिलियन टन झाले. भारताने ११० लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करुन ४० हजार कोटी रुपये परकीय गंगाजळीत टाकले. ही सगळी आकडेवारी भारतातील अन्न प्रकिया उद्योगाचे महत्व स्पष्ट करणारी आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी

या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतात. प्रशिक्षित मनुष्यबळाला उच्च श्रेणीच्या संधी मिळू शकतात. २०२५ सालापर्यंत ४० ते ४५ लाखांच्यावर तज्ज्ञ व्यक्तींची गरज भासू शकते. ही बाब लक्षात घेऊनच भारत सरकारन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्र्यप्रिन्युरशीपण्ड मॅनेजमेन्ट या संस्थेची स्थापना केली. ही संस्था अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे.या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे.या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड  टेक्नॉलॉजी  ॲण्ड मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड टेक्नॉलॉजी  ॲण्ड मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय संस्थेमार्फत पीएचडी करण्याचीही संधी उपलब्ध करुन देण्यात येते.

या संस्थेचे अभ्यासक्रम जागतिक तोडीचे असावेत याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. या संस्थेमध्ये अन्न उद्योग निर्मिती आणि प्रकिया उद्योगातील वरिष्ठ व्यवस्थापक,तंत्रज्ञ यांची व्याख्यान सातत्यान आयोजित केली जातात.

   विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक इनोव्हेटिव्ह फंड निर्माण केला असून नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केलेल्या विद्यार्थ्यांना 15 लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य केल जात. अधिक गुणवत्तापूर्ण प्रकल्पासाठी यापेक्षा अधिक निधी सुध्दा मंजूर केला जातो.

   

  बी.टेक(फूड टेक्नॉलॉजी ण्ड मॅनेजमेंट)

    या अभ्यासक्रमाचा कालावधी हा चार र्षे आहे.या अभ्यासक्रमाला १८०  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या शिवाय सर्व संवर्गांसाठी मिळून ९ अतिरिक्त जागा फी माफ (ट्यूशन फी वेव्हर)योजेनंतर्गत भरल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

अर्हता - या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि गणित या दोन विषयांसह पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात 12 वी विज्ञान परीक्षेत 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.हे विषय आहेत - बायलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्यूटर सायन्स किंवा केमिस्ट्री.या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE- MAIN (JOINT ENTRANCE EXAMINATION-MAIN) या परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जातात.

रिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यानंतर करिरच्या पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात-(1) प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट सायन्टिस्ट, (2) सेन्सरी सायन्टिस्ट,(3) फूड मायक्रोबॉयलॉजिस्ट,(4)फूड ॲनॅलिस्ट,(5) क्वालिटी कन्ट्रोल सुपरवायझर, (6) फूड प्रोसेस इंजिनीअर, (7) फूड इन्टेलिजन्ट मॅनेजर, (8) फूड रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशॅलिस्ट, (9) न्युट्रिशन स्पेशॅलिस्ट,(10) फूड फर्मेन्टेशन स्पेशॅलिस्ट, (11) फूड सर्व्हिस सेक्टर -सप्लाय चैन, पोस्ट हार्वेस्ट, फूड रिटेलिंग, फूड रेग्यूलेशन, हेल्थ ण्ड वेल्थ वेलनेस सर्व्हिस प्रोव्हायडर, (12) फूड प्रोसेसिंग सेक्टर- स्नॅक फूड, बिव्हरजेस, मिट, वायनेरी, डेअरी.

 

या शिवाय अन्न तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, अन्न प्रकिया अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन , अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता व्यवस्थापन, अन्न पुरवठा साखळी व्यवस्थापन, अन्न प्रकिया पदार्थ कार्यान्वयन व्यवस्थापन या या स्पेशलाईज्ड क्षेत्रातही करिअरच्या संधी मिळू शकतात.

प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या-

 पातंजली, पेपर बोट, व्हेज गुरु, सनराईज, पंजाब नॅशनल बँक, टाटा मोटर्स, ताज सॅट्स, सरस, स्नोमॅन, द ब्य्रु मास्टर, युनायटेड फूड्स इंडिया, श्रीजन, मोरारका ऑर्ग्यानिक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ज्ञानधारा, लिसियस, एचडीएफसी बँक, इनर बिईंग, फूड क्लॉऊड, कोकाकोला, बॉश, बिसलेरी, सेंच्युरी प्लाय, क्रिम बेल, बजाज शुगर, ब्रिटानिका, अवंती फीड लिमिटेड, टेट्र्या पॅक, अदानी विल्मार

   संपर्क- ॲडमिशन सेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी  आंत्रप्रिन्युरशीप ण्ड मॅनेजमेन्ट, प्लॉट नंबर 97,सेक्टर 56, एचएसआयआडीसी ,इन्डस्ट्रिअल इस्टेट, कुन्डली -131028,जिल्हा- सोनपत,हरयाणा,

दूरध्वनी - 0130-2281000, फॅक्स-2219772

०००

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रिन्युरशीप ण्ड मॅनेजमेन्ट (तंजावूर)

 ही संस्था पूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, या नावाने ओळखली जायची. अन्न प्रक्रिया क्षेत्रात जागतिक दर्जाची शिक्षण आणि संशोधन देणाऱ्या या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने स्थापन केली आहे.

    या संस्थेने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्हता- गणित ,भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह 12 वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाचा कालावधी -4 वर्षं. जेईई मेन मधील गुणांच्या आधारावर ९० विद्यार्थ्यांना प्रवेश जातो.   

प्लेसमेट- या संस्थेत प्लेसमेंटसाठी पुढील कंपन्या/उद्योग येतात- नेसले, टॉटा कॉफी, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, माँडलेज इंटरनॅशनल, अदानी विल्मर, आयटीसी, काँटिनेंटल कॉफी, रिलायन्स इंडस्टीज, ब्रिटानीया, नागा, केविन केअर, सुहाना, कॅप्रिकॉर्न, पेप्सिको, न्युट्री प्लॅनेट, पारले अग्रो, पेपर बोट, मदर्स डेअरी, मिलेट इंडिया इत्यादी. 

    संपर्क- इंडियन इन्स्टिट्यूट इन ऑफ क्रॉप प्रोसेसिंग इंजिनीअरिंग ,पुदूकोट्टल रोड, तंजावूर- 613005, तामीळनाडू, दूरध्वनी- 04362-228155, संकेतस्थळ www.niftem-t.ac.in आणि www.iicpt.edu.in, -मेल-admissions academic@iift.edu.in,

000

इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी.

अभ्यासक्रम- बी.टेक इन फूड इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी. कालावधी - चार वर्षे. अर्हता-१२ वी विज्ञानशाखेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये ५० टक्के गुण.या संस्थेतील ७० टक्के जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. यासाठी एमएच-सीईटी मधील गुणांचा आधार घेतला जातो. उर्वरित ३० टक्के जागा या जेईई-मने परीक्षेतील आधारित भरल्या जातात. यामध्ये महाराष्ट्रासही देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या संस्थेने आता भूवनेश्वर आणि जालना येथे कॅम्पस सुरु केली आहेत.

संपर्क- नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा मुंबई- ४०००१९ दूरध्वनी- ०२२- ३३६१११११, फॅक्स- ३३६११०२०, http://www.ictmumbai.edu.in/, ईमेल- admission@ictmumbai.edu.in,

() लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-

अभ्यासक्रम- बी.टेक इन फूड टेक्नॉलॉजी

संपर्क- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, अमरावती, भारतनगरच्या विरुध्द दिशेला नागपूर, दूरध्वनी-०७१२-२५६११०७,टेलेफॅक्स-२५३१६५९, ईमेल- rajumankar@gmail.com ,संकेतस्थळ- https://litnagpur.in/ http://litnagpur.in/department-of-food-technology/

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी