रुग्णालय प्रशासन आणि व्यवस्थापन


रुग्णालय प्रशासन आणि व्यवस्थापन

भारतातील आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य सुविधेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या क्षेत्राचे रुपांतर आता मोठ्या उद्योगात होताना दिसते. कॉर्पोरेट रुग्णालये आता केवळ महानगरापुरती मर्यादित राहिली नसून दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरापर्यंत पोहचली आहेत. या रुग्णालयांमध्ये बहुवीध प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सर्व रुग्णालयांचा प्रशासकीय व्याप वाढत चालल्याने, दैनंदिन बाबींचे संनियंत्रण, प्रशासन आणि व्यवस्थापन यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. आरोग्य व्यवस्था सक्षम असणे याचा अर्थ केवळ वैद्यकीय मनुष्यबळात वाढ करणे हा नसून यापुढे रुग्णालयाचे व्यवस्थापक, समन्वयक, प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुध्दा तितकेच महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे पुढील काळात रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासन या ज्ञानशाखेत शिक्षण-प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना चांगल्या करिअर संधी मिळू शकतात.

काही संस्था आणि अभ्यासक्रम

 () मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने एक वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही विषयातील पदवीधरास हा अभ्यासक्रम करता येत असला तरी, बी.एस्सी, एमबीबीएस, बीएएमएस, बी.फार्म, एमबीए या पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

करिअर संधी - रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासनाचा अभ्यासक्रम केल्यावर रुग्णालयाचे फ्रंट ऑफिस, बिलिंग, अकाऊंट, वित्त, माहिती व्यवस्थापन सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन, साहित्य/ वस्तू व्यवस्थापन, विपणन, पुरवठा व्यवस्थापन, डाक्युमेंटशन आदी विभागांमध्ये संधी मिळू शकतात.

संपर्क- विद्यानगरी, सांताक्रुज पूर्व, मुंबई-४०००९८, दूरध्वनी-८१०४४१२०७१, फॅक्स-०२२-६९१८५६००, ईमेल-garware@giced.mu.ac.in, संकेतस्थळ- gicededu.co.in

() टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेच्या अंतर्गत कार्यरत, स्कूल ऑफ हेल्थ सिस्टिम स्टडीज मार्फत, दोन वर्षे कालावधीचा, मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश हा, सर्वत्र वेगाने विकसित होत असलेल्या कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळाच्या निर्मिती व्हावी हा आहे. अशा रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस व्यामिश्र स्वरुपाच्या आणि तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या कौशल्ययुक्त शेकडो व्यक्तींचा वावर वाढला आहे. या सर्व मनुष्यबळास कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आणि रुग्णांच्या विविध स्वरुपाचे प्रश्न आणि समस्यांना सोडवण्यासाठी या मनुष्यबळाचा उपयोग होतो.

काय शिकाल?

सर्वसाधारणत: पुढील क्षेत्राचे ज्ञान, हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते. आरोग्याशी संबंधित अर्थकारण किंवा अर्थशास्त्र, वित्तीय व्यवस्थापन, संस्थात्मक वर्तणूक, रुग्णालय व्यवस्थापनाची तत्वे, रुग्णालयांसाठी संशोधन पध्दती, संस्था आणि सहाय्यकारी कर्मचारी/ कामगार सेवा, संस्था आणि वैद्यकीय व सुपर स्पेशॅलिटी (अतिविशेषज्ञ) सेवांचे प्रशासन, वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान व्यवस्थापन, जैवसांख्यिकीची तोंडओळख, रुग्णालय माहिती सेवा, रुग्णालय नियोजन आणि कार्यक्रम व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि कामगार कायदे, रुग्णालयांशी संबंधित नैतिक बाबी, रुग्णालय किंवा आरोग्य व्यवस्थेचे गुणवत्ता व्यवस्थापन, व्यवस्थापकीय विश्लेषण आणि कार्यपध्दतीचे विश्लेषण, रुग्णालयाच्या व्यावसायिक बाबींच्या कायदेशीर चौकटी, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास वाढीच्या व्युहनीती, आरोग्यविमा आणि धोके व्यवस्थापन, नागरी आरोग्य, व्युहात्मक व्यवस्थापन आणि संस्थात्मक विकास, आरोग्य व्यवस्थेतील उद्योजकता, सेवा व्यवस्थापन.

करिअर संधी   

() कॉर्पोरेट क्षेत्रातील वा सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये वेगवेगळया विभांगाचे संनियंत्रण (), रुग्णालयातील नव्या सेवा किंवा नव्या रुग्णालयांचे डिझाइन आणि नियोजन, रुग्णालये सल्लागार कंपन्या (हॉस्पिटल कंसलटन्सी फर्म्स), () आरोग्य विमा क्षेत्र, () आरोग्य सुविधा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (हेल्थकेअर आयटी इंडस्ट्री)

अर्हता- कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, औषधीनिर्माण शास्त्र, विधि अशा कोणत्याही शाखेतील पदवी. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करु शकतात. मात्र त्यांचा निकाल ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लागणे आवश्यक. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असलेली ऑनलाइन टेस्ट द्यावी लागते.

  • संपर्क - टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, व्ही. एन. पुरव मार्ग देवनार, मुंबई- ४०००८८, दूरध्वनी- ०२२-२५५२५००० आणि २५५२५२५२, संकेतस्थळ- https://admissions.tiss.edu,ईमेल - admissionsinfo@tiss.edu

() सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ्‍ सायन्स या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा, एमबीए इन हॉस्पिटल ॲण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- सिम्बॉयसी इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, सिम्बॉयसीस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) युनिव्हर्सिटी कॅम्पस, हिल बेस, लव्हाळे. पुणे-४१२११५, ईमेल- admissions_nd@sihspune.org, संकेतस्थळ- www.sihspune.org, दूरध्वनी- ०२०-६६९७५०४०

०००

() इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- कोझिकोड या संस्थेने प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन हेल्थकेअर मॅनेजमेंट ॲण्ड ॲनॅलिटिक्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. सांख्यिकी विश्लेषणाचे तंत्र आणि कौशल्य वापरुन आरोग्य सुविधा उद्योगातील विविधांगी समस्यांचे निराकरण करण्याचे ज्ञान या अभ्यासक्रमाव्दारे प्रदान केले जाते. या अभ्यासक्रमात आरोग्य सुविधा, त्यासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापकीय कौशल्य, आरोग्य व्यव्यस्थेचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन, आरोग्य सुविधा विश्लेषण, व्युहनीती आणि नेत्वृत्व कौशल्य अशा सारख्या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर व तीन वर्षे प्रत्यक्ष कार्यानुभ.

संपर्क- संकेतस्थळ - https://iimk.eruditus.com/healthcare-management-and-analytics

() इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकता - येथे पोस्ट ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह कोर्स इन हेल्थ केअर मॅनेजमेंहा  अभ्यासक्रम करता येतो. आरोग्य व्यवस्था/सुविधा पुरवणाऱ्या क्षेत्राची वाढ विस्मयकारक आहे. या वाढत्या क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरजही वाढत आहे. ही बाब ध्यानात घेऊन आयआयएम कोलकता २०१५ सालापासून  हेल्थकेअर मॅनेजमेंट या विषयाचा अभ्यासक्रम चालवत आहे. या अभ्यासक्रमात या क्षेत्रासाठी आवश्यक सैध्दांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. एखादे मोठे रुग्णालय, हेल्थकेअर संस्था येथे प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करुन दिली जाते. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व्यावसायिकांना बोलावले जाते. देशातील दर्जेदार आरोग्य सुविधा/सेवा पुरवणा-या संस्थांचे सहकार्य अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने घेतले जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात जागतिक आरोग्य व्यवस्थेतील प्रवाह आणि भारतातील स्थिती, आरोग्यव्यवस्थेचे अर्थशास्त्र, आरोग्यव्यवस्थेचे व्यवस्थापन आणि कार्यान्वयन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि आरोग्य व्यवस्था, नेतृत्व आणि व्यवस्थापन,
संस्थात्मक संरचना आणि त्यातील बदल, मनुष्य बळ व्यवस्था, आरोग्य व्यवस्थेतील संख्यात्मक विश्लेष, सार्वजिनक आरोग्य, नेतृत्वाच्या शैली, व्यवस्थापकीय संवाद संप्रेषण, आरोग्य व्यवस्थेतील विपणन, वित्त नियोजन, व्युहात्मक व्यवस्थापन. संघर्ष आणि वाटाघाटी, मानवीमूल्य आणि नैतिकता, सामाजिक न्याय, आपत्ती निवारण व्यवस्थापन, विकसित देशातील कामकाजासंदर्भात आरोग्यविषय प्रश्न/समस्या, आरोग्यविषयक कायदे, आरोग्य सुविधा/सेवा क्षेत्रातील उद्योजकता.

अर्हता- हा अभ्यासक्रम, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, जैवतंत्रज्ञान किंवा जैन वैद्यकीय विषयातील पदवी प्राप्त उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. तथापि आरोग्य व्यवस्था/सेवा क्षेत्रात किमान पाच वर्षाचा अनुभव असणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर सुध्दा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षेतील गुण, शैक्षणिक अर्हता, अनुभव, मुलाखत या घटकांना अवलंबण्यात येते. संपर्क- https://www.iimcal.ac.in/ldp/PGEHM

०००

इतर काही शैक्षणिक संस्था- चित्कारा युनिव्हर्सिटी-चंदिगढ, ॲमिटी युनिव्हर्सिटी-नॉयडा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी-फगवारा, आचार्य बिझिनेस स्कूल बेंगळुरु, मानव रचना इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲण्ड स्टडीज - दिल्ली, प्रेस्टिज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्डरिसर्च ॲण्ड -इंदोर, एम.पी.बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ मनेजमेंट-बेंगरुळू, नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- मुंबई

सर्वसाधारण करिअर संधी- हॉस्पिटल सीईओ, हॉस्पिटल चिफ फायनांस ऑफिसर, असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर, हेल्थकेअर इन्फॉर्मेशन मॅनेजर, ऑनकॉलॉजी कू-आर्डिनेटर, मेडिकल प्रॅक्टिस मॅनेजर, हॉस्पिटल कू-ऑर्डिनेटर, क्लेम्स मॅनेजर, फिजिशिएन रिलेशन लायझन इत्यादी.

प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या- स्टार हेल्थ, सिमेन्स, फोर्टिस, अपोलो, युनिसेफ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, फिपजर, सिप्ला, ॲबॉट, ग्लेनमार्क, पोर्टिया, प्रॅक्टो, विप्रो जीई हेल्थकेअर, कॅडिला हेल्थकेअर, मॅक्स हेल्थकेअर, कोलंबिया एशिया इत्यादी.

 


Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी