वेगळया वाटा, उत्तम संधी


 


वेगळया वाटा, उत्तम संधी

१२ वीनंतर पारंपरिक किंवा नेहमीच्या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त वेगळया अभ्यासक्रमांचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा. अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास भविष्यात चांगल्या करिअर संधी मिळू शकतात. अशा काही संस्था आणि अभ्यासक्रमांची माहिती पुढे दिली आहे.

() पेट्रोलियम इंजिनीअरिंग

पेट्रोलियम पदार्थांचे जागतिक अर्थकारण आणि  राजकारणातले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता या क्षेत्रात नव्या साठयांचा शोध, जुन्या साठयांची देखभाल, दुरुस्ती, या क्षेत्रातील   संशोधन आदी विविध बाबींसाठी सातत्याने तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासत आहे. ही गरज २०२३ पर्यंत ३० हजार तज्ज्ञांची सुध्दा राहू शकते. गेल्या काही वर्षात या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक विद्यार्थी न वळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. त्यामुळे या क्षेत्रात फार मोठया करिअरच्या संधी मिळू शकतात.

या क्षेत्रातील तज्ज्ञांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील भारतीय आणि परदेशातील तेल कंपन्या, तांत्रिक सेवा पुरवठदार, पेंट आणि डाय उत्पादन करणाऱ्या पेट्रोकेमिकल्स कंपन्या, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व  आशिया, रशिया, चीन या सारख्या देशातील तेल कंपन्यांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होवू शकतात.

अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था

 () दिब्रुगढ युनिव्हर्सिटी -  अभ्यासक्रम - बीटेक इन पेट्रालियम इंजिनीअरिंग.

संपर्क- रजिस्ट्रार, दिब्रुगढ युनिव्हर्सिटी, नॅशनल हायवे, बेहिया चेटिया गाव, दिब्रुगढ- ७८६०००४, दूरध्वनी - ०३७३-२३७०३३६, संकेतस्थळ - www.dibru.ac.in, ई-मेल-registrar@ dibru.ac.in

 () इंडियन स्कूल ऑफ माइन्स युनिव्हर्सिटी धनबाद- या संस्थेने बीटेक इन पेट्रोलियम इंजीनीअरिंग हा अभ्यासकक्रम सुरु केला आहे. प्रवेश जेईई ॲडव्हान्स्डच्या गुणांवर दिला जातो.

संपर्क- इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद- ८२६००४, झारखंड, दूरध्वनी-०२३६-२२३५००१, , फॅक्स-२२९६५६३, संकेतस्थळ- www.iitism.ac.in

() युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज - या संस्थेच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ऑइल आणि गॅस सेक्टर या क्षेत्राशी निगडित  पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. बीटेक इन ॲप्लाइड पेट्रोलियम इंजिनिअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन  () गॅस इंजिनीअरिंग इन्फॉर्मेटिक्स () एनर्जी सिस्टिम्स ॲण्ड स्टोअरेज, () इंटेलिजेंट पेट्रोलियम सिस्टिम्स. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईइ मेन, सीयुईटी-यूजी (कॉमन युनिव्हर्सिटी इन्ट्रन्स एक्झामिनेश-अंडर ग्रॅज्युएट) या परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी हया परीक्षा दिल्या नसतील त्यांना यूपीईएस-सीईटी (युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज-कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) ही परीक्षा द्यावी  लागते.

संपर्क - डेहरादून- २४८००७, दूरध्वनी - ०१३५-२७७०१३७, संकेतस्थळ -www.upes.ac.in, ईमेल-enrollments@upes.ac.in.

() राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी -या संस्थेला भारत सरकारने इंस्टिट्यूशन ऑफ नॅशनल इंर्म्पाटन्सचा दर्जा दिला आहे. या संस्थेत पुढील दोन अभ्यासक्रम करता येतात- () बीटेक इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग, () बीटेक इन पेट्रोकेमिकल्स इन ॲण्ड पॉलिमर इंजिनीअरिंग. या अभ्यासक्रमाला जेईई ॲडव्हान्स्डच्यागुणांवर आधारित  प्रवेश दिला जातो. संपर्क संकेतस्थळ- rgipt.ac.in

() पंडित दीनदयाळ एनजी युनिव्हर्सिटी - या संस्थेत बीटेक इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग  हा अभ्यासक्रम करता येतो. प्रवेशासाठी जेईई मेनचे गुण ग्राह्य धरले जातात. संपर्क संकेतस्थळ-pdup.ac.in

000

()सागरी मासेमारी

भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. या सागरी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक पध्दतीने मासेमारी केली जाते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा यंत्रकुशल मनुष्यबळास करिअरच्या विविध संधी मिळू शकतात.त्या अनुषंगाने बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (नॉटिकल सायन्स)हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. हा अभ्यासक्रम सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशर नॉटिकल ॅण्ड इंजिनीअरिंग या संस्थेमार्फत चालवला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्ष.

या अभ्यासक्रमामध्ये समुद्रातील फिशिंग व्हेसल्स बाबत जहाजावर प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला डायरेक्टारेट जनरल ऑफ शिपिंग यांची मान्यता मिळाली आहे.

अर्हता- () या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला १२ वीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या इतर विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारासाठी ही अट नाही. () वयोमर्यादा - ऑक्टोबर रोजी १७ ते २० वर्षे.

या संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा जून महिन्यात रोजी कोची,चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे घेण्यात येते. अंतिम निवड या परीक्षेतील गुण, मुलाखत आणि शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित केली जाते.

संपर्क - सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशर नॉटिकल ॅण्ड इंजिनिअरिंग ट्रेनिंग,फा आर्ट अव्हेन्यू, कोची- ६८२०१६, दूरध्वनी-०४८४-२३५१४९३, फॅक्स-२३७०८७९,मेल-cifnet@nic.in, संकेतस्थळ- www.cifnet.gov.in

०००

() अग्निशमन अधिकारी

अग्निशमन हा अतिशय महत्वाचा विषय आहे. वाढत्या शहरीकरणामुळ या क्षेत्राचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललय. मात्र त्या तुलनेत या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्ती कमी प्रमाणात उपलब्ध आहेत . ही उणीव दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालनालयाअंतर्गत कार्यरत, राज्य अग्निशमन अकादमीने उपस्थानक अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उतीर्ण झालेल्या पुरुष विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी -५२ आठवडे.

 संपर्क- महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालनालय, विद्यानगरी, हंस भुग्रा मार्ग, सांताक्रुझ, पूर्व मुंबई- ४०००९८, दूरध्वनी -०२२-२६६७७५५५,  फॅक्स-२६६७७६६६ संकेतस्थळ- http://www.mahafireservice.gov.in,ईमेल-info@ mahafireservice.gov.in

000

()आयआयएम मधून एलएलबी

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (रोहतक) या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन लॉ (आयपीएल-लॉ). हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना हा अभ्यासक्रम करता येतो. हा आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम असून यामध्ये व्यवसाय व्यवस्थापन (बिझिनेस मॅनेजमेंट) विधि आणि सुशासन यांचे सखोल ज्ञान प्रज्ञान केले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, बीबीए -एलएलबी ही पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमात १५ विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक घटक ३ महिने शिकवला जातो. शिवाय विद्यार्थ्यांना वेगवेगळया प्रकारच्या इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

अर्हता- खुला संवर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट, आाणि एनसीएल ओबीसी ६० टक्के आणि अनुसू‍चित जाती आाणि जमाती संवर्गासाठी ५५ टक्के गुण. उमेदवारांची निवड कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट या परीक्षेतील गुणांच्या आधारावर निवडक उमेदवारांची जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात संस्थेमार्फत ऑनलाईन मुलाखत घेतली जाईल. गुणवत्ता यादी तयार करताना १० वी आणि १२ वीतील गुणांना ४० टक्के, क्लॅटमधील गुणांना ४५ टक्के वेटेज मुलाखतीला १५ टक्के दिले जाते.

संपर्क- आयआयएम, मॅनेजमेंट सिटी, सदर्न बायपास, एनएच १०, रोहतक- १२४०१०, दूरध्वनी- ०१२६२-२२८५०५, ईमेल-ipladmission@iimrohtak.ac.in, संकेतस्थळ- iimrohtak.ac.in

०००

() वाहतूक व्यवस्थापन

भारत सरकारने गतिशक्ती युनिव्हर्सिटीची स्थापना केली आहे. या संस्थेचे संनियंत्रणे रेल्वे मंत्रालयामार्फत केले जाते. या केंद्रिय विद्यापीठात रेल्वे आणि इतर वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये बीबीए इन ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी - तीन वर्षे असून अर्हता- कोणत्याही विषयातील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. या अभ्यासक्रमाला कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स एक्झामिनेश-यूजी, या परीक्षेव्दो प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील उमेदवारास 12 वीमध्ये किमान 55 टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये 5 टक्क्यांची सूट. संपर्क- नॅशनल रेल ॲण्ड ट्रान्सपोर्टेशन इंस्टिट्यूट कॅम्पस, लालबाग, वडोदरा- 390004, गुजरात, दूरध्वनी- 0265-2648305, ईमेल-info@gsv.ac.in, संकेतस्थळ- gsv.ac.in

०००

() बीए इन चायनिज

हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने सुरु केला आहे. कालावधी-तीन वर्षे, अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. संधी- चायनीज भाषेत (मँड्रिन) उच्चशिक्षण, संशोधन आणि चीन देशातील दुभाषे, भाषांतरकार, पर्यटन मार्गदर्शक, माध्यमातील करिअर, संपर्क- डिपार्टमेंट ऑफ जर्मन,पहिला मजला, रुम नंबर-१११, रानडे भवन, कलिना कॅम्पस, सांताक्रुज पूर्व-मुंबई-४०००९८, दूरध्वनी- ०२२-०२२-२६५२८३५९, संकेतस्थळ-german-mu.com/ba-in-chinese-studies ईमेल-deptofgerman@mu.ac.in

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी