गणितज्ज्ञ व्हा

 


गणितज्ज्ञ व्हा

आपल्या देशाची लोकसंख्या एक १३० कोटी झाली आहे. याबाबतीत आपण चीनला मागे टाकले आहे. पण या १३० कोटीच्या देशात दर्जेदार अणि गुणवत्तापूर्ण गणितज्ज्ञ मिळत नाहीत. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठीच कमतरता दिसून येते. त्यामुळे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी १२वी नंतर गणिताचा पर्याय अवश्य स्वीकारला पाहिजे. या विषयाचे पदवी अभ्यासक्रम आयआयटी, एनआयटी आणि इतर राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांमध्ये करता येतात.

मानवी मेंदूचा विश्लेषणात्मक विकास करण्यात आणि त्याला अधिक सक्षम करण्यात गणिताची मदत होत असल्याचे, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. तान्या इव्हान्स यांनी त्यांच्या संशोधनाव्दारे दाखवून दिले आहे. गणितावर प्रभुत्व मिळवल्यास कोणतीही समस्या सोडवण्याचे कौशल्य हे अधिकाधिक प्रगत होत असल्याचे अभ्यासकांना दिसून आले आहे. गणितज्ज्ञ जेव्हा समस्या सोडवतात तेव्हा त्यात स्पष्टता असते. अधिक चांगल्या तऱ्हेच्या कार्यपध्दतीसुध्दा यातून विकसित होतात.

गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची रहस्ये शोधून काढण्यासाठी गणितीय सूत्रे आणि सिध्दांताचा सर्वाधिक उपयोग झाला आहे. गणित ही एकमेकव वैश्विक भाषा असल्याचे समजले जाते. कोणतही देश- भाषा- प्रांत-संस्कृती यामध्ये गणितीय सूत्रे आणि सिध्दांत आणि व्याख्या बदलत नाहीत, त्यामुळे गणितज्ज्ञ कोणत्याही देशात आणि प्रांतात सहजतेने कार्यरत राहू शकतो.

करिअर संधी

गणितावर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तला करिअरच्या विविध संधी मिळतात. वित्त (फायनांस), निर्मिती ( मॅन्युफॅक्चुरिंग), विमा प्रंबधन (क्चुरिज), अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग), दळणवळण (कम्युनिकेशन), व्यवसाय (बिझिनेस), विज्ञान (सायन्स) या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी गणितातील प्रभुत्व किंवा उत्तम आकलन महत्वाचे ठरते. ही क्षेत्रे परस्पर विरोधी दिसत असली तरी त्यांचा पाया गणितीय कशल्य असतो, हे लक्षात ठेवायला हवे.

काही महत्वाच्या संस्था                          

() मुंबई आयआयटीमध्ये बीएस इन मॅथेमॅटिक्स चार वर्षे कालावधीचा अभ्याक्रम करता येतो. दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो- () जेईई ॲडव्हान्सड गुण. () या शिवाय यंदा १२ वी (गणित विषयासह विज्ञान) ची परीक्षा दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी इंडियन नॅशनल मॅथेमॅटिकल ऑल्मपियाडची कनिष्ठ किंवा वरिष्ठ अर्हता प्राप्त केली असेल ते, "बीएस एन्ट्रन्स एक्झामिनेशन"व्दारे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकतात.

संपर्क - math.iitb.ac.in

() आयआयटी इंदौरने २०२३ च्या शैक्षणिक वर्षापासून, बीटेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग सायंस हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. संपर्क-iiti.ac.in

() आयआयटी दिल्ली-

बीटेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग

संपर्क- maths.iitd.ac.in

() आयआयटी गोहाटी- बी.टेक इन मॅथेमॅटिक्स अॅण्ड कॉम्पुटिंग.

संपर्क-iitg.ac.in/math

() आयआयटी रोपर बी.टेक इन मॅथेमॅटिक्स अॅण्ड कॉम्पुटिंग.

संपर्क-iitpr.ac.in/math

() आयआयटी कानपूर येथे बीएस - एमएस इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड सायंटिफिक कॉम्प्युटिंग हा इंटिग्रेटेड आणि बीएस इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड सायंटिफिक कॉम्प्युटिंग, हे अभ्यासक्रम करता येतात.

संपर्क- iitk.ac.in/maths

() एनआयटी सुरत- या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स ॲण्ड ह्युमॅनिटिज मार्फत पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम चालवला जातो. प्रवेशासाठी जेईई- मेनचे गुण ग्राह्य धरले जातात.

संपर्क- https://www.svnit.ac.in

() एनआयटी रुरकेला- या संस्थेत इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो.

संपर्क-

() एनआयटी अगरताळा

या संस्थेमध्ये, बी.एस-एम.एस ड्युएल डिग्री इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. कालावधी पाच वर्षे.

संपर्क- https://www.nita.ac.in.

() एनआयटी पाटना- या संस्थेने इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स या विषयामध्ये अभ्यासक्रम सुरु केल आहे. संपर्क- http://www.nitp.ac.in/

(१०) बेंगळुरु स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथे बी.एस  (बॅचलर ऑफ सायन्स-रिसर्च) इन मॅथेमॅटिक्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमास जेईई मेन/ ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांवर प्रवेश दिला जातो. २०२३ च्या शैक्षणिक वर्षानुसार आयसर (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च ) ॲडमिशन टेस्टचे गुणही प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

संपर्क- ug.iisc.ac.in/math.

(११) कोलकता स्थित इंडियन स्टॅस्टिकल इंस्टिट्यूट या संस्थेचा, बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम बेंगळुरु कॅम्पस यथे करता येतो. तीन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. निवड- संस्थेच्या चाळणी परीक्षेव्दारे. संपर्क- isical.ac.in/admission, (१२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकशेन ॲण्ड रिसर्च या संस्थेतील बीएस-एमएस या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांतर्गत स्पेशलायझेशनसाठी गणित हा विषय निवडता येतो.

संपर्क- iiser.ac.in,

(१३) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकशेन ॲण्ड रिसर्च भूवनेश्वर या संस्थेतील इंटिग्रेटेड एमएस्सी या अभ्यासक्रमांतर्गत गणित विषयात स्पेषलायझेशन करता येते.

संपर्क- niser.ac.in,

(१४) मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायंस या अभ्यासक्रमांतर्गत गणित विषयात स्पेशलायझेशन करता येते.

संपर्क-cbs.ac.in

(१५) चेन्नई मॅथेमॅटिकल इंस्टिट्यूट येथे बीएस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स, बी.एस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स आणि बी.एस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड फिजिक्स हे प्रत्येकी तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम करता येतात. निवड चाळणी परीक्षेव्दारे.

संपर्क-cmi.ac.in

गणितातील संशोधन

टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही डिम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त संस्था आहे. या संस्थेने गणित विषयात पी.एचडी आणि इंटिग्रेटेड एम.एस्सी- पीएचडी हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम, टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबईच्या स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स (math.tifr.res.in), बेंगळुरु स्थित सेंटर फॉर ॲप्लिकेबल मॅथेमॅटिक्स (math.tifrbng.res.in) येथे करता येतात. बेंगळुरु स्थित इंटरनॅशलनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्स (math.icts.tifr.res.in) येथ पीएचडी अभ्यासक्रम करता येतो.

अर्हता- पीएचडी- एम.स्टॅट, एम.मॅथ, एम.एस्सी, एम.टेक, एम.ई, एम.ए (गणित), इंटिग्रेटेड पीएचडी- बी.एस्सी, बी.टेक, बी.मॅथ, बी.स्टॅट, बी.ए (गणित), या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन टेस्ट घेतली जाते. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- नागपूर, पुणे आणि मुंबई. या परीक्षेनंतर अंतिम निवडीसाठी मुलाखती घेतल्या जातात. गेट परीक्षेत उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या उमेदवारांना थेट प्रवेश दिला जातो. तथापि या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या असल्यास, ज्या परीक्षेत अधिक गुण असतील, ते गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. संपर्क- नॅशनल सेंटर ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर न्युक्लिअर सायंस ॲण्ड मॅथेमॅटिक्स, होमी भाभा रोड, कुलाबा, मुंबई-४००००५, दूरध्वनी-०२२-२२७८२०००, संकेतस्थळ-univ.tifr.res.in,

शिष्यवृत्ती

नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स या संस्थेमार्फत गणित विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.यंदा गणित विषयात बी.ए किंवा बी.एस्सी अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा देणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. याआधी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थीसुध्‍दा या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.  या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते. पाच वर्षे कालावधीच्या (गणित) इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाचे तिसरे किंवा चौथे वर्षं पूर्ण करणारे विद्यार्थीही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. मात्र त्यांना ६० टक्के गुण मिळायला हवे.जुलै २०२३ पर्यंत गणित विषयातील एम.एस्सी किंवा एम.एच्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण  होण्याची शक्यता असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरु शकतात.मात्र त्यांनाही किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा हजार रुपये शिष्यवृत्ती, पदव्युत्तर पदवीच्या दोन वर्षासाठी आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दोन वर्षांसाठी दिली जाते. एम.ए किंवा एम.एस्सी (गणित) या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षासाठी निवड झाल्यास ही शिष्यवृत्ती एका वर्षासाठी दिली जाते.

निवड प्रकिया

या शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येते. परीक्षेचा कालावधी दीड तास. पेपरमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि लघु उत्तरे अपेक्षित असलेल्या प्रश्नांचा समावेश असतो. मागील वर्षाचे नमुना पेपर www.imsc.res.in/nbhm_model_qusestion/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.ही परीक्षा मुंबई आणि पुणे येथे घेतली जाते.

संपर्क-नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स डिपार्टमेंट,डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी,अनुशक्ती भवन,सीएसएम मार्ग,मुंबई-४००००१,संकेतस्थळ-www.nbhm.dae.gov.in,ईमेल-query@nbhmscholarships.in

ईमेल-gsch@tifr.res.in

सुरेश वांदिले

Comments