मशिन लर्निंग


 

 मशिन लर्निंग

दिवसागणिक रोबो म्हणजेच यंत्रमानवाच्या संदर्भातील एकाहून एक सुरस व चमत्कार सदृष्य वास्तव समोर येत आहे. रोबो तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेल्या प्रगती व संशोधनामुळे हे सारे शक्य झालेय. कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे यंत्रमानवांना मानवापेक्षा कित्येक पटिने अधिक काम करण्याची शक्ती मिळालीय.

रोबोची उपयुक्तता

() सामाजिक पूनर्वसन कार्यात रोबोंची अधिकाधिक  मदत  घेतली  जात आहे.() ग्राहकांच्या गरजा आणि आवशक्यता लक्षात घेऊन त्यांच्याशी समन्वय आणि संपर्क साधण्याचे कौशल्य काही रोबोंना प्राप्त करुन देण्यात आले आहे. () हैदराबादस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  या संस्थेने दोन वर्षापूर्वी स्नेक रोबोटची निर्मिती केली. विविध प्रकारच्या संकटसमयी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी हा स्नेक रोबो उपयुक्त ठरु शकतो. विशेषत: गडद मलब्याखाली सापडलेल्या आपदग्रस्तांची अचुक स्थान निश्चिती करण्याची क्षमता या रोबोमध्ये आहे. () अंतराळातील संशोधन मोहिमाना मिळालेल्या यशात विविध प्रकारच्या रोबोंचा मोठा हातभार लागत आहे. हे रोबो अंतराळात लिलया संचारत असून अंतराळातील नव्या विश्वाचा शोध ते नव्या विश्वातील वसाहतीच्या निर्मितीमध्ये या  रोबोंची  कामगिरी अनन्यसाधारण राहील. () आण्विक संशोधन, () सागरतळाचा सूक्ष्म शोध, () विविध खाणींच्या खालच्या भागाचा शोध आणि ज्या ठिकाणी मानवी जीवन धोक्यात येऊ शकते अशा ठिकाणी सहज वावर करण्यासाठी रोबोचा उपयोग केला जातो. () काही पाश्चिमात्य देशा कृषी क्षेत्रात रोबोतंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामग्रीच्या वापरात सतत वाढ होत आहे. हजारो एकर कृषीक्षेत्राचे संपूर्ण नियंत्रण रोबोंकडेच सोपल्याचेही दिसून येते

रोबो तंत्रज्ञानाची ही उपयुक्तता लक्षात घेता रोबोटिक्स अभियांत्रिकी या ज्ञानशाखेस मोठे महत्व मिळायला सुरुवात झाली आहे. रोबोटिक्स अभियंते हे या क्षेत्रातील ()संशोधन, ()नवे डिझाइन, ()रोबोंची निर्मिती, देखभाल, दुरुस्ती, ()रोबोसाठी आवश्यक अशा कृत्रिम बुध्दीमत्तेचा विकास, ()कृत्रिम बुध्दिमत्ता नियंत्रण, ()डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स,)मायक्रोप्रोसेसिंग अशा क्षेत्रात कार्यरत राहू शकतात.

आंतरज्ञान शाखा   

रोबोटिक इंजिनीअरिंग ही आंतरज्ञानशाखा आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्दूत, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीचा यामध्ये समावेश होतो.

करिअर संधी - या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर धाकरांना पुढील संधी मिळू शकतात- () रोबोट डिझाइन इंजिनिअर, () फ्लेक्झिबल मॅन्युफॅक्चुरिंग इंजिनिअर, ()ऑटोमेटेड प्रॉडक्ट डिझाइन इंजिनिअर, () एन्व्हिरॉन्मेन्टल नॅलिसीस इंजिनिअर, ()आर्टिफिशिअल इंटेलिजन्स -  थिकिंग मशिन ण्ड सिस्टिम्स इंजिनिअर, () मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर, () ओशन डायव्हिंग इंजिनिअर, () मिनलर एक्स्ट्रॅक्शन इंजिनिअर, () सिस्टिम डिझाइन ण्ड लिसीस इंजिनिअर, (११) स्पेस सर्व्हे ण्ड लिसीस इंजिनीअर, (११)मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअर.

अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, औषधी निर्मिती, अंतराळ संशोधन ,नॅनो तंत्रज्ञान अशा काही क्षेत्रांमध्येसुध्दा रोबोटिक्स इंजिनीअर्सना संधी मिळू शकते. पदवी नंतर करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्या तरी या क्षेत्रात स्पेशलायझेशन केल्यास आणखी उत्तम दर्जाच्या संधी मिळू शकतात. स्पेशलायझेशनमध्ये मशिन ऑटोमेशन, मेडिकल रोबोटिक्स, सायबरमेटिक्स, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट या क्षेत्रांचा ठळकरीत्या उल्लेख करता येईल.

काही अभ्यासक्रम

()सोमय्या विद्याविहार विद्यापीठांतर्गत कार्यरत, के.जे सोमय्या इंजिनीअरिंग कॉलेज- बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स वुइथ स्पेशालयझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर व्हिजन ॲण्ड रोबोटिक्स. कालावधी - चार वर्षे

संपर्क- सोमय्या विद्याविहार, विद्यानगर, विद्याविहार पूर्व , मुंबई- ४०००७७, संकेतस्थळ- kjsce.somaiya.edu/en/academic-programme/

()मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ॲण्ड इंनिअरिंग - ()बी.टेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ()बीटेक इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग. कालावधी- चार वर्षे.

संपर्क - भक्ती वेदांत स्वामी मार्ग, कूपर हॉस्पिटलजवळ, जेव्हीपीडी स्किम, विलपार्ले पश्चिम मुंबई- ४०००५६, दूरध्वनी - ०२२- ४२३३४०००, ईमेल-engineering.nmims.edu/mechatronics-engineering/programs/

)व्हेलोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- या संस्थेत () बी.टेक इन कॉम्प्युटर सायंस वुइथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड रोबोटिक्स हा अभ्यासक्रम चेन्नई कॅम्पसमध्ये करता येतो. तर () बी.टेक इन कॉम्प्युटर सायंस वुइथ स्पेशलायझेशन इन रोबोटिक्स हा अभ्यासक्रम अमरावती (आंध्रप्रदेश) या कॅम्पसमध्ये,() बीटेक मेकॅनिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड रोबोटिक्स हा अभ्यासक्रम भोपाळ कॅम्पसमध्ये करता येतो. या अभ्यासक्रमात, रोबोटिक प्रोग्रॅमिंग, रोबो कायनेमॅटिक्स ॲण्ड डायनामिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, डिजिटल लॉजिक डिझाइन, ऑपेरिटिंग सिस्टिम, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, मशिन डिझाइन रोबोटिक्स, प्लँट लेआऊट ॲण्ड मटेरिअल हँडलिंग आदी विषय घटकांचा समावेश आहे.

हा अभ्यासक्रम केल्यावर रोबोटिक्स इंजिनीअर, रोबोटिक्स ॲनॅलिस्ट ॲण्ड डिझायनर, रोबोटिक्स सेल्स इंजिनीअर, रोबिटिक्स ॲकाउंट मॅनेजर, रोबोटिक्स सायंटिस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजंस स्पेशॅलिस्ट, रिसर्च सायंटिस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजंस ॲण्ड मशिन लर्निंग इंजिनीअर, आर्टिफिशियल इंटेलिजंस ॲण्ड मशिन लर्निंग सायंटिस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर इंजिनीअर अशा संधी मिळू शकतात. आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणारे उद्योग-(हेल्थ केअर इंडस्ट्री), शिक्षण, कृषी, संरक्षण आणि सैन्यदल, खाजगी निर्मिती व डिझाइन संस्था/कंपन्या, शासकीय संस्था यामध्ये संधी मिळू शकतात. संपर्क - व्हीआयटी, वेल्लोर-६३२०१४, टेलेफॅक्स- ०४१६-२२४३०९१, संकेतस्थळ- vit.ac.in, ईमेल-info@vit.ac.in

() एसआरएम इन्स्टिट्यूट-अभ्यासक्रम - () बीटेक इन कॉम्पुटर सायन्स  इंजिनिअरिंग,  (स्पेशलयाझेशन इन आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, () बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग वुइथ स्पेशलयाझेशन इन रोबोटिक्स, कालावधी- चार वर्षे.

संपर्क- डायरेक्टर डमिशन, एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी,कट्टनकुलांथूर-६०३२०३, दूरध्वनी- ०४४- २७४५४४१०, फॅक्स- २७४५३६२२ जिल्हा-कांचिपुरम,संकेतस्थळ-srmuniv.ac.in, ईमेल- admissions.india@srmuniv.ac.in

()भारती विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये, बीटेक इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन हा अभ्यासक्रम करता येतो. संपर्क-bvuinversity.edu.in/coepune

()विवेकांनद इंस्टिट्यूट ऑफ  टेक्नॉलॉजी- बीई ऑटोमेशन ॲण्ड रोबोटिक्स इंजिनीअरिंग. संपर्क-vesit.ac.in(या संस्थेत बीई आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस हा ही अभ्यासक्रम करता येतो.)

पुढील काही अभ्यासक्रम केल्यास या क्षेत्राकडे वळता येऊ शकते.

()डीजे संघवी कॉलेज ऑफ इंजीनअरिंग - बीटेक इन आर्टिफिशिअल इंजिनीअरिंग ॲण्ड मशिन लर्निंग. संपर्क-dijsec.ac.in

()सरदार पटेल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी मुंबई - बीटेक इन आर्टिफिशिअल इंजिनीअरिंग ॲण्ड मशिन लर्निंग, संपर्क-spit.ac.in

()केजे सोमय्या इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- बीटेक इन आर्टिफिशिअल इंजिनीअरिंग ॲण्ड डाटा सायंस, संपर्क-kjsit.somaiya.edu.in

() हिन्दुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ण्ड सायन्स-  अभ्यासक्रम ()बी.टेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग

() बीटेक मेकॅट्रॉनिक्स

संपर्क - संकेतस्थळ- http://hindustanuniv.ac.in, ईमेल-info@hindustanuni.ac.in

()विश्वकर्मा इंसिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे - बीटेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग. संपर्क-vit.edu

()युपीईएस(युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज) ()बीटेक इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्प्युटर इंजिनीअिंग वुइथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, ()बीटेक इंजिनीअिंग वुइथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग ॲप्लिकेशन, ()

बीटेक कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअिंग वुइथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग. संपर्क-https://admission.upes.ac.in

()एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी- ()मेकॅनिल इंजिनीअरिंग(स्पेशलायझेशन इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन, () इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग)

 संपर्क admissions.mitwpu.edu.in

०००

नवं शिका

एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर कानपूर मार्फत १० वीनंतरचे पुढील दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. (१) डिप्लोमा इन टूल अॅण्ड डाय, (२) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड इंडस्ट्रिअल ऑटोमेशन . प्रवेश चाळणी परीक्षा ६ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. संपर्क-msmetckanpur.org, ईमेल-info@ msmetckanpur.org,

०००

टूल रुम ॲण्ड ट्रेनिंग सेंटर पाटणा - या संस्थेत १० वीनंतरचे पुढील तीन अभ्यासक्रम करता येतात - (१) डिप्लोमा इन टूल अॅण्ड डाय, (२) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, (२) डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनीअरिंग. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा दिं.३० जुलै २०२३ रोजी घेण्यात येईल. संपर्क-संकेतस्थळ-www.patna.idtr.gov.in trtcpatna14@gmail.com

दोन्ही संस्थातील अभ्यासक्रमांसाठी अर्हता - १० वीमध्ये खुला संवर्ग ५० टक्के, अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग- ४० टक्के गुण. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना शैक्षणिक शुल्कातून सूट देण्यात येते.

सुरेश वांदिले

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी