कृषी क्षेत्रातील संधी (1)
कृषी क्षेत्रातील संधी (1)
भारत हा जगातील कृषीक्षेत्रातील
आघाडीचा देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत अजूनही कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सकल
घरेलु उत्पादकामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा १४ ते १६ टक्के आहे. १९५१ साली देशातील
अन्नधान्याचे उत्पादन ५१ दशलक्ष टन होते. ते सध्या २७५ दशलक्ष टनांच्या आसपास आहे.
देशातील हरीत, श्वेत आणि नील क्रांतीमुळे ही बाब साध्य होऊ शकली. यामुळे
शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. ५२ टक्क्यांच्या आसपास ग्रामीण
लोकसंख्या रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. फळे, भाजीपाला, फुले , दूध,
नारळ आणि मसाले निर्मितीत भारताचा क्रमांक एक आहे. साखर उत्पादनात दुसरा क्रमांक
लागतो. मसाले, फुले, मशरुम्स, तेलबिया, दूध, तांदूळ, अन्नधान्य, भाजीपाला यांच्या
निर्यातीत भारताने आघाडी घेतली आहे. सध्या भारताला बहुतेक सर्व अन्नधान्यांमध्ये
कुणावरही विसंबून राहावे लागत नाही. अन्नपदार्थांची गरज कधीच कमी होणारी नाही,
त्यामुळे कृषीक्षेत्राशी निगडित विविध घटकांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या
प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतात.
भारतातील कृषी शिक्षण व्यवस्थेचाही
शेतीक्षेत्राच्या या वाढी आणि भरभराटीसाठी हातभार लागला आहे. या शिक्षणात आता
कौशल्य विकासावर अधिकाधिक भर दिला जात आहे. सध्या आपल्या देशात ७३ कृषी विद्यापीठे
आहेत. २५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी पदवी स्तरीय आणि १५ हजार पदव्युत्तर पदवी आणि
पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. उच्चप्रशिक्षित २३ हजार वैज्ञानिक आणि अध्यापक विविध
विद्यापीठांमध्ये आहेत.
भारत सरकार कृषी क्षेत्रासाठी
अर्थसंकल्पात मोठी तरतूद करत असते. कृषी विपणन म्हणजेच मार्केटिंगवर भर दिला जात
आहे. कृषी विमा आणि जलसिंचन योजनांसाठी दरवर्षी वाढीव तरदूत केली जाते. कृषी
पतवुरठ्याने १० लाख कोटीचा आकडा कधीचाच पार केला आहे. शासनाशिवाय खाजगी संस्था,
परकीय कंपन्यासुध्दा कृषीक्षेत्रातील गुंतवणुकीवर भर देताना दिसत आहे.त्यामुळे
कृषी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी पुढील
काळात निर्माण होण्याची शक्यता आहे.
0000
.jpg)
Comments
Post a Comment