कृषी क्षेत्रातील संधी (2)


कृषी क्षेत्रातील संधी (2)

 

महाराष्ट्रातील कृषी विषयक ‍शिक्षण - प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचा  दर्जा  आणि गुणवत्ता उत्तम असा आहे. या सर्व संस्थांना गेल्या काही दशकांचा चांगला अनुभव आहेत. अनुभवी उच्चशिक्षित प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, विस्तीर्ण असे कॅम्पस, ग्रंथालये, वसतिगृहे, व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम, संशोधनात्मक आवड निर्माण व्हावी अशी अभ्यासक्रमांची संरचना आणि परवडणारे शैक्षणिक शुल्क आणि इतर सुविधा ही या संस्थांची वैशिष्ट्ये आहेत.

प्रवेश कसा मिळतो

या अभ्यासक्रमांना दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो - (1) राज्यशासनामार्फत घेण्यात येणारी एमएचसीईटी - या सामायिक परिक्षेद्वारे अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी विषयक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. (2) जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन-मेन/ नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट- नीट / ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झामिनेशन टेस्ट फॉर ॲडमिमशन- एआयआयइइए-युजी- या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांचा आधार प्रवेशासाठी घेतला जातो. प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेच्या गुणांना ७० टक्के आणि १२ वी विज्ञानशाखेतील गुणांना ३०  टक्के वेटेज दिले जाते.

प्रवेश अर्हता-

() भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यापैकी कोणताही गट घेऊन १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीएस्सी (ऑनर्स) इन- () कृषी, () उद्यान विद्या, () सामाजिक विज्ञान, () जैवतंत्रज्ञान, () कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

() भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना, बीएस्सी (ऑनर्स) इन- () मत्स्यविज्ञान, () वनविद्या, () पशुसंवर्धन पदवी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

() भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना, बीएस्सी (ऑनर्स) इन- () कृषी अभियांत्रिकी, () अन्नतंत्रज्ञान, या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता

इंडियन काउंसिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेने कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, वनविद्या,अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान  या विषयातील पदवींना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता प्रदान केली आहे. आता व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. यामुळे हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यास साहाय्य होऊ शकते. या अभ्यासक्रमांचा दर्जा वाढवण्यासाठी सर्वसमावेश असा दृष्टिकोन स्वीकारण्यात येत आहे. कौशल्यवाढ होऊन विद्यार्थ्यांनी स्वंयरोजगाराकडे वळावे, ग्रामीण भागातील जीवनमान उंचवावे आणि अन्न सुरक्षिततेस  हातभार लावावा, कृषी क्षेत्राची शास्वतता वाढवावी याअनुषंगाने अभ्यासक्रमांची संरचना करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा मिळाल्याने विद्यार्थ्यांना वाढीव शिष्यवृत्ती आणि फेलोशीप मिळू शकते.

 

कृषी क्षेत्रातील करिअर

करिअर संधी- () विविध पिकांचे उत्पादन, प्रक्रिया आणि अन्नपदार्थ यामध्ये संशोधन () शेतीची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवणे, () मजुरांचा खर्च कमी करणे, () मृद व जल संधारण आणि किटक नियंत्रण, () शासनातील कृषी अधिकारी/ कृषी सहाय्यक, () बँकामधील कृषी अधिकारी/ कृषी पतपुरवठा अधिकारी () कृषी उत्पादन आधारित उद्योग / व्यवसाय, () अन्न प्रक्रिया उद्योग, () रिटेलिंग- कृषीमाल किरकोळ/ किराणा विपणन, (१०) ग्रामीण विपनण- मार्केटिंग (११) ग्रामीण कर्ज पुरवठा आणि विमा, (१२) शेतमाल साठवणूक (१३) स्वयंसेवी संस्था, (१३) ॲग्री बिझिनेस मध्ये एमबीए केल्यावर कृषी विपणन/ कृषी मूल्य निर्धारण/ कृषी कायदे/ व्यापार /कृषी अर्थशास्त्र/ कृषी माहिती विश्लेषण/ शेत व्यवस्थापन या सारख्या क्षेत्रात सध्या करिअर संधी उपलब्ध होत आहेत.

रोजगार देणाऱ्या काही कंपन्या- पुढील काही कंपन्या सातत्याने रोजगार संधी देत असतात- () ड्यू पॉईंट, () रॅलिज इंडिया, () न्युझिवीदू सीड्स, () लेमकर्न इंडिया ॲग्रो इक्विपमेंट, () ॲदवंता लिमिटेड, () मोनसॅन्टो इंडिया, () पॉॲब्स ऑर्ग्यनिक इस्टेट्स, () नॅशनल ॲग्रो इंडस्ट्री, () गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड, (१०) रासी सीडस (११) पार्ले, (१२) डाबर, (१३) पातंजली, (१४) हिंदुस्थान लिव्हर इत्यादी.

गेल्या काही वर्षात कृषी तंत्रावर आधारित स्टार्टअप सुरु झाले आहेत. यामध्ये रोग आणि किटक नियंत्रण, अचूक वेळेवर जलसिंचन आणि मृदा आरोग्य, पॅकेजिंग आणि वाहतूक, शेताची हवाई पाहणी करुन पिकासंदर्भात वा जमिनीसंदर्भात समस्यांचा शोध घेणे यासारख्या क्षेत्रांमध्ये हे स्टार्टअप सुरु झाले आहेत. त्यामध्ये रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

(1)            महात्मा फुले कृषी विद्यापीठ-राहुरी, संकेतस्थळ- mpkv.ac.in  (2) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला, संकेतस्थळ-
http://www.pdkv.ac.in/
(3) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ- परभणी, संकेतस्थळ- www.mkvmah.nic.in , (4) डॉ बाळासाहेब्सावंत कोंकण कृषी विद्यापीठ- दापोली , संकेतस्थळ- www.dbskkv.org )

०००

कृषी व्यवसाय व्यवस्थापन (बीबीए)

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमधील विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम सुरु करुण्यात आला आहे. कालावधी- चार वर्षे /अर्हता- भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/इंग्रजी या विषयांसह 12 वी उत्तीर्ण जीवशास्त्र किंवा गणित विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना या विषयाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येतो मात्र अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरविलेला जीवशास्त्र किंवा गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

    काही महाविद्यालये- (1) डी वाय पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,आकुर्डी पुणे-411044, (2) राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विलिंगडन कॉलेज परिसर, सांगली 416415, (3) कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी,ता-संगमनेर,जिल्हा-अहमदनगर, (4) कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,लोणी,ता-राहता,जि-अहदनगर (5) कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सरस्वती नगर मुंबई आग्रा रोड,पंचवटी नाशिक-422003, (6) कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,शारदानगर,बारामती-411015, (7) कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,प्लॉट क्रमांक,पी-7,अतिरिक्त एमआयडीसी, हरंगूळ,बार्शी रोड,लातूर-413512, संकेतस्थळ- maha-agriadmission.in/www.macer.org

  0000

 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍ़ग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट-

   या संस्थेमार्फत दोन वर्षे कालावधीचा पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ऍ़ग्रिबिझिनेस मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्हता- कृषी आणि तत्सम विषयातील पदवीधर किंवा कृषी व्यवसाय, एनजीओ, सहकारी संस्था,कृषी संस्थामध्ये कार्यरत असणारे कोणत्याही विषयातील पदवीधर आणि कृषी उद्योजक.

   पत्ता- डायरेक्टर जनरल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍ़ग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद- 500030,तेलंगाणा,दूरध्वनी-040-24014509,ईमेल-dgmanage@manage.gov.in, संकेतस्थळ -www.manage.gov.in

                      0000                 

  


Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी