सागराचे आव्हान पेलताना
सागराचे आव्हान पेलताना
नौदलातील करिअर हे
आव्हानात्मक आहे. हे आव्हान स्वीकारण्याची संधी महिलांना दरवर्षी दिली जाते. ही
संधी स्वीकारल्यास उत्तम आणि दर्जेदार आयुष्याचा अनुभव घेता येतो.
आजच्या
महत्वाकांक्षी तरुणींना सामान्य करिअरपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक करिअर करण्याची
तीव्र इच्छा असते. ही इच्छा भारतीय नौदलातील त्यांच्या प्रवेशाने पूर्ण होऊ शकते. अभियांत्रिकी,
तंत्रज्ञान पदवी आणि विज्ञानशाखेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या
तरुणींना अशा संधी दरवर्षी मिळू शकतात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश
मिळाल्यावर कॅम्पस भरतीद्वारे आयटी कंपन्यांमध्येच जास्तित जास्त तरुणींना निवडले
जाते. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अशा कोअर शाखांमधील कंपन्या अल्पप्रमाणात
येतात. त्यामुळे वेगळयाच विषयामध्ये करिअरची सुरुवात करावी लागते.
भारतीय नौदलात दरवर्षी
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इंस्ट्रुमेंटेशन, इन्फर्मेशन
टेक्नॉलॉजी, केमिकल, मेटॅलर्जी, एरोस्पेस इंजिनीअरिंग या शाखांमधील महिला अभियंत्यांची
निवड केली जाते.
ही
भरती नॅवल आर्किटेक्चर (नौदल वास्तुकला), निरीक्षक,
अध्यापन, विधि, वैमानिक, अस्त्र आणि शस्त्रांची पाहणी/निरिक्षण/तपासणी, विमान
वाहतुक नियंत्रण या शाखांसाठी केली जाते. सध्या ही पदे लघु सेवा कमिशन म्हणजेच
शॉर्ट सर्व्हिस कमिशन या संवर्गातील आहेत. वैमानिक, निरीक्षक या पदांच्या
नियुक्तीसाठी दरवर्षी दोनदा भरती प्रक्रिया राबवली जाते. त्याची जाहीर सूचना
फेब्रुवारी आणि सप्टेबरमध्ये काढली जाते. अस्त्र आणि शस्त्रांची
पाहणी/निरिक्षण/तपासणी पदाच्या नियुक्तीची जाहिरात जानेवारी आणि ऑगस्ट महिन्यात
काढली जाते. विमान वाहतूक नियंत्रण पदाची जाहिरात फेब्रुवारी,अध्यापन पदाची
जाहिरात मार्च, लॉजिस्टिक पदाची जाहिरात सप्टेबर, नौदल वास्तुकला पदाची जाहिरात
ऑगस्ट आणि विधि शाखेतील पदांची जाहिरात जागांच्या उपलब्धतेनुसार काढली जाते.
काटेकार
अंमलबजावणी
ही
प्रकिया दरवर्षी ठरलेल्या काळातच राबवली जात असल्याने त्याच्या तारखा ठरलेल्या
असतात. या पदांची जाहिरात येण्याचे वेळापत्रकही ठरले असते. याबाबी ध्यानात ठेऊन
ज्या तरुणी यंदा पदवीची अंतिम परीक्षा देत असतील त्या या भरती प्रकियेत सहभागी होऊ
शकतात.
या
पदांसाठीच आपली निवड झालीच पाहिजे, हे उदिष्ट्य ठेऊन तशी तयारी केली तर यशाला
गवसणी घालणेही शक्य होऊ शकते. तथापि या पदांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे
स्पर्धाही तीव्र असते. यामध्ये यश मिळवण्यासाठी पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या
परीक्षेपेक्षा अधिक सखोल असा अभ्यास आवश्यक ठरतो. ज्या तरुणींनी अशा प्रकारे
आतापावेता अभ्यास केला असल्यास त्यांना फारशी अडचण जाणार नाही. यंदा १२ वीनंतर
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या
ज्या तरुणींना नौदलात करिअर करायचे आहे त्यांनी पहिल्या सत्रापासूनच समजून उमजून
ज्ञानग्रहण करण्याची मनोभूमिका तयार करायला हवी.
शारीरिक
क्षमतेची चाचणी
भरती
प्रक्रियेत शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी महत्वाची ठरते. मौखिक चाचणीमध्ये उत्तीर्ण
उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते. शारीरिक चाळणीत उत्तीर्ण झालेल्या
महिला उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते. त्यामुळे या घटकांसाठीची
तयारी यंदा १२ वीनंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीशाखेला विद्यार्थींनींनी
पहिल्यावर्षापासूनच करावी. शारीरिक क्षमतेसाठी ठरलेल्या निकषात बसण्यासाठी ज्या
बाबी आवश्यक आहे, त्याकडे आतापासूनच लक्ष दिल्यास तशी सक्षमता पुढीच चार वर्षात
उत्तमरीत्या प्राप्त होईल. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थींना
मात्र शारीरिक क्षमतेचे निकष पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागेल. त्यासाठी
त्यांना सुव्यवस्थित नियोजन करुन त्याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. शारीरिक चाचणी
उत्तीर्ण होणे ही सर्वात आवश्यक अर्हता असल्याने, त्यावर लक्ष केंद्रित करायला
हवे.
लघु.सेवा
कमिशनमध्ये प्रारंभी १० वर्षासाठी नियुक्ती दिली जाते. त्यानंतर दोन टप्प्यात
प्रत्येकी दोन वर्षासाठी म्हणजे चार वर्षे वाढ मिळू शकते. यासाठी उमेदवाराचा
आतापर्यंतची कामगिरी, सुदृढता आदी बाबींचा विचार केला जातो. या संवर्गात निवड झालेल्या
उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती केली जात नाही.
निवड प्रक्रिया- विविध
पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार यादी तयार केली
जाते. या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीचे दोन टप्पे असतात. पहिला
टप्पा एक दिवसाचा आणि दुसरा टप्पा पाच
दिवसांचा असतो. पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्र संकल्पना/भ्रम, समूह
चर्चा या बाबींचा समावेश असतो. या टप्प्यात यशस्वी उमेदवारांनाच दुसऱ्या
टप्प्यामध्ये सहभागी होता येते. दुस-या टप्प्यामध्ये मानसशास्त्रीय चाचणी, समूह
कार्य चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असतो.
इतर शाखातील महिलांना संधी
केवळ
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अणि विज्ञान विषयातील नव्हेत विधि, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन, मानव्यशाखा
या विषयातील पदव्युत्तर पदवीधर महिलांना नौदलात करिअर करण्याची संधी आहे. नौदलातील
विधि, अध्यापन, लॉजिस्टिक्स, वर्क्स या संवर्गात ही संधी मिळू शकते. त्यामुळे कला
आणि वाणिज्य शाखेतील तरुणींनी सुध्दा आपल्या करिअर नियोजनात नौदलातील प्रवेशाचा
समावेश करावा. त्यापध्दतीने पदवीला प्रवेश घेतल्यापासून तयारी करायला हवी.
विविध पदांसाठी
अर्हता
(१) नॅव्हल आर्किटेक्चर-
वयोमर्यादा साडेएकोणीस ते २५, बीई/बीटेक (मेकॅनिकल किंवा
सिव्हिल किंवा एरोनॉटिकल किंवा मेटलर्जी किंवा नॅव्हल आर्किटेक्चर यापैकी
कोणत्याही एका विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी), (२) निरीक्षक-ऑब्झर्व्हर- कोणत्याही विषयातील
बीई/बीटेक पदवी. १२वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा.
वयोमर्यादा १९ ते २४ वर्षे.
(३) अध्यापन- अर्हता- द्वितीय श्रेणीतील भौतिकशास्त्र
किंवा गणितातील पदव्युत्तर पदवी. भौतिकशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
केलेल्या उमदेवाराने पदवीस्तरावर गणिताचा आणि या गणित विषयातील पदव्युत्तर पदवी
अभ्यासक्रम केलेल्या उमदेवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास
केलेला असावा. किंवा द्वितीय श्रेणीतील रसायनशास्त्र किवा इंग्रजी विषयातील पदवी.
रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमदेवाराने पदवी
स्तरावर भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या
उमदेवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयाचा अभ्यास केलेला असावा.
किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स किंवा टेक्नॉलॉजी या विषयातील
पदवी.किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स याविषयातील पदव्युत्तर
पदवी. उमदेवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयाचा अभ्यास केलेला
असावा. किंवा अर्थशास्त्र/ इतिहास/राज्यशास्त्र याविषयातील पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा २१ ते २५ वर्षे.
(४)लॉजिस्टिक्स/वर्क्स- (अ) लॉजिस्टिक्स सवंर्ग- अर्हता-प्रथम श्रेणीसह कोणत्याही विषयातील बीई/बीटेक
किंवा प्रथम श्रेणीसह एमबीए किंवा प्रथम श्रेणीसह बीएस्सी /बीकॉम/बीएस्सी इन आयटी
आणि पोस्ट गॅज्युएशन डिप्लोमा इन फायनांस/लॉजिस्टिक्स/सप्लाय चैन
मॅनैजमेंट/मटेरिअल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणीसह मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
/एमएस्सी इन आयटी (ब) वर्क सवंर्ग - अर्हता- सिव्हिल शाखेतील बीई/बीटेक/बी आर्किटेक्चर.
(क)कॅटरिंग संवर्ग- हॉटेल मॅनेजमेंट विषयातील
एमएस्सी/एमबीए/ प्रथम श्रेणीसह बीएएस्सी किंवा आणि हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर
पदविका. वयोमर्यादा साडे एकोणवीस ते २५ वर्षे
(५) विधि
संवर्ग- वकील म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्र ठरणारी विधि विषयातील पदवी आणि
वयोमर्यादा २२ ते २७ वर्षे. (६) एअर
ट्रॅफिक कंट्रोल-अर्हता- कोणत्याही विषयातील बीई/ बीटेक. १२वीमध्ये भौतिकशास्त्र
आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. वयोमर्यादा साडेएकोणवीस ते २५ वर्षे. (७) पायलट (वैमानिक)- (अ) सामान्य (जनरल)-अर्हता- कोणत्याही विषयातील बीई/बीटेक आणि १२ वीमध्ये
भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. वयोमर्यादा १९ ते २४ वर्षे.
(ब) कमर्शिअल- अर्हता- डायरोक्टोरेट जनरल ऑफ
सिव्हिल एविशनचा मान्यताप्राप्त व सध्या कार्यरत असलेला कर्मशिअल वैमाननिक परवाना.
वयोमर्यादा १९ ते २५ वर्षे. (८) नॅव्हल
आर्मामेंट इंस्पेक्शन – अर्हता- इलेक्ट्रिकल/ इलेक्टॉनिक्स/ मेकॅनिकल/प्रॉडक्शन/
इंस्ट्रुमेंटेशन/आयटी/ केमिकल/ मेटलर्जी/ एरोस्पेस इंजिनीअरिंग या विषयातील पदवी. वयोमर्यादा
साडे एकोणवीस ते २५ वर्षे.
००००
शिष्यवृत्ती
टाटा
हाऊसिंग स्कॉलरशीप-
बीटेक/बीई /बी आर्क, या
अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थींनींना ही शिष्यवृत्ती भेटू
शकते. याअंतर्गत ६० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. संपर्क- जनरल
मॅनेजर-कॉर्पोरेट सस्टेनिबिलिटी, टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट
कपंनी, १२वा मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ-पश्चिम,मुं बई-४०००१३, संकेतस्थळ- /www.tatahousing.in/csr/, ईमेल- sustainability@tatahousing.com
.jpg)
Comments
Post a Comment