वास्तुरचनाकारांचे कौशल्य

 


वास्तुरचनाकारांचे कौशल्य

भारत आणि जगामध्ये गृहनिर्माण आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांना गती आले आहे. या कामांमध्ये पुढील काळात सतत वाढ होत राहील. याक्षेत्रात इतर मनुष्यबळासोबतच वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) यांना महत्वाचे स्थान असते. किंबहुना सध्या आधी वास्तुरचनाकारच बऱ्याच बांधकामाचे नियाजन करन देत असतो. उत्तम वास्तुरचनाकार आपले कौशल्य आणि ज्ञान याबळावर उंच झेप घेऊ शकतो.

 वास्तुकला किवा रचनाशास्त्रात चांगले करिअर करता येणे शक्य असले तरी त्यासाठी दर्जेदार संस्थेतून शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे आवश्य आहे. देशातील उत्कृष्ट संस्थांमधील या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (एनएटीए-नाटा) ही परीक्षा काउंसिल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेमार्फत घेतली जाते.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. आर्किटेक्ट म्हणून कार्य करु इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तिस या संस्थेत नोंदणी करावी लागले. मात्र त्यासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता म्हणजेच वास्तुरचनाकलेतील किमान पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. या शैक्षणिक अर्हतेची माणके या संस्थेने निधारित केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, नॅशनल ॲप्टिट्यूट टेस्ट!

कल निश्चित करणारी परीक्षा-

या कल चाचणीव्दारे वास्तुकला (बॅचलर ऑफ आर्किटेक्चर) पदवी अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची पात्रता ठरवली जाते. त्याअनुषंगाने या चाचणीत विविध प्रकाराचे प्रश्न विचारले जातात. दरवर्षी ही चाचणी परीक्षा तीन वेळा घेतली जाते. अधिकाधिक इच्छूक विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी हा त्यामागचा हेतू आहे. ही संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) परीक्षा आहे. प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ (मल्टिपल चॉईस), बहुपर्यायी निवड प्रकार (मल्टिपल सिलेक्ट टाईप), प्राधान्य निवड प्रकार (प्रिफंरशिएल सिलेक्ट टाईप), संख्यात्मक उत्तर प्रकार (न्युमरेकिल ॲन्सर टाईप), आणि आणि जोड्या जुळवा पध्दतीचे असतात. पेपरची भाषा इंग्रजी असली तरी काही प्रश्न स्थानिक भाषेत राहू शकतात.

इच्छूक विद्यार्थी तीनही वेळा ही परीक्षा देऊ शकतो. या तीनपैकी ज्या दोन परीक्षेत सर्वोत्कृष्ट गुण असतील, त्याची सरासरी काढून, ते गुण प्रवेशासाठी स्वीकारले जातात. एखाद्या विद्यार्थ्याने दोन वेळेस ही परीक्षा दिल्यास, ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण असतील ते गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात.

या परीक्षेत २०० गुणांचे १२५ प्रश्न विचारले जातात. कालावधी तीन तास. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी २०० गुणांपैकी किमान ७३ गुण मिळणे आवश्यक आहे.

 

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे -

अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, चिंचवड/आकुर्डी, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, नेरुळ, पनवेल, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर.

अर्हता-

 भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह १२वी उत्तीर्ण झालेले विद्याथी ही परीक्षा देऊ शकतात.(यंदा १२वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी सुध्दा ही चाळणी परीक्षा देऊ शकतात.) या विद्यार्थ्यांना १२वीमध्ये आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत. १० वीनंतर ३ वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीही ही परीक्षा देउ शकतात. मात्र अशा विद्यार्थ्यांनी गणिताचा अभ्यास केलेला असावा. किमान गुण ५०  टक्के. आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षाला किंवा सत्राला थेट प्रवेश दिला जात नाही.

शुल्क-

 एका परीक्षेचे शुल्क खुल्या संवर्गासाठी २००० रुपये तर महिला आणि राखीव संवर्गासाठी १५०० रुपये आहे. दोन परीक्षा द्यायच्या असतील तर शुल्क खुल्या संवर्गासाठी ४००० रुपये तर महिला आणि राखीव संवर्गासाठी ३००० रुपये आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वास्तुकलेचे शिक्षण घेण्यासाठी अंगभूत कौशल्य आहे किंवा नाही, याचा शोध घेण्यासाठी विविध प्रकारे ही चाळणी घेतली जाते. त्यामुळे इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ज्याप्रमाणे शिकवणी वर्ग असतात, तसे या परीक्षेसाठी असू शकत नाही. ही बाब नाटाने स्पष्ट केली आहे. (त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा काही संस्था जर दावा करत असतील तर तिकडे दुर्लक्ष करायला हवे.)

संपर्क- संकेतस्थळ - www.nata.in, ईमेल-nata.helpdesk2022@gmail.com, हेल्पडेस्क क्रमांक - 7406692922

 

सुरेश वांदिले

००००


Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी