उत्कृष्ट संधीसाठीचे "गेट"
उत्कृष्ट
संधीसाठीचे "गेट"
अभियांत्रिकी
आणि तंत्रज्ञान विषयातील पदवी अभ्यासक्रमानंतर काही विद्यार्थ्यांची ज्ञानतृष्णा
तशीच कायम राहते. आयआयटी, आयआयआयटी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस, इंडियन
इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स
एज्युकेशन ॲण्ड रिसर्च किंवा इतर शासकीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्यासाठी
प्रवेशाचे व्दार उघडणारी परीक्षा म्हणजे "गेट!" (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअरिंग)
ही
परीक्षा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वास्तुकला या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि
थेट डॉक्टरोल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक समजली जाते. केंद्रिय शिक्षण
मंत्रालयाचे साहाय्य प्राप्त आणि शासकीय संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या कला, वाणिज्य
आणि विज्ञान शाखेतील डॉक्टोरल अभ्यासक्रमांसाठी गेटचे गुण ग्राह्य धरले जातात. इतर काही खाजगी संस्था "गेट"
गुणांवर प्रवेश देतात. मात्र अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. पदवी
स्तरावरील विषयांच्या आकलनाच्या अनुषंगाने या परीक्षेत प्रश्न विचारले जातात.
परीक्षेची
वैषिष्ट्ये
(१) ही परीक्षा आयआयटी खरगपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई,
कानपूर, गौहाटी, रुरकी आणि इंडियन इंस्टिट्यूट सायन्स बेंगळुरु, यांच्यामार्फत
आळीपाळीने घेतली जाते. (२) ही परीक्षा
संपूर्णरीत्या संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड आहे. (३) गेल्या वर्षीपासून, जिओमॅटिक्स इंजिनीअरिंग आणि नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड
मरीन इंजिनीअरिंग अशा दोन पेपरचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. (४) बीडीएस, बीएस्सी (कृषी/
वानिकी-फॉरेस्ट्री, उद्यानकला/ फलोत्पादनशास्त्र) आणि बॅचलर
ऑफ व्हेरनरी सायंस ॲण्ड ॲनिमल हसंब्ड्री या विषयाचे पदवीधरसुध्दा आता ही परीक्षा
देऊ शकतात.
(५) प्रत्येक पेपरमध्ये १०० गुणांचे ६५ प्रश्न विचारले जातात. यापैकी १०
प्रश्न हे सामान्य कलचालणी- जनरल ॲप्टिट्यूड पध्दतीचे असतील. हे प्रश्न विद्यार्थ्यांची भाषा आणि विश्लेषण कौशल्याची चाचणी करणारे असतील. ८५ टक्के गुण हे विषयावर आधारित असतील. निगेटिव्ह मार्किंग आहे.
(६) या पेपरमध्ये तीन प्रकारचे प्रश्न विचारले
जातात. (अ) मल्टीपल चॉइस - बहुपर्यायी. (एमसीक्यू) - १ किंवा २ गुण. हे प्रश्न वस्तुनिष्ठ
पध्दतीचे असतात. दिलेल्या चार पर्यांमधून एक पर्याय बरोबर उत्तराचा
असतो. १ गुण असलेल्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास एक तृतीयांश
गुण कपात केले जातात. २ गुण असलेल्या प्रश्नाचे
उत्तर चुकीचे लिहिल्यास २ तृतीयांश गुण कपात केले जातात. (ब) मल्टीपल सिलेक्ट प्रश्न, (एमएसक्यू) -
सर्व पेपरमध्ये १ किंवा २ गुणाचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. उत्तरांमध्ये
चार पर्याय असतात. यापैकी एक किंवा त्यापेक्षा अधिक उत्तर बरोबर
राहू शकतात. या सेक्शनमधील प्रश्नांसाठी निगेटिव्ह गुण नाहीत. मात्र, एकापेक्षा अधिक अचूक उत्तरे असताना एकच नमूद
केल्यास गुण दिले जात नाही. एक चूक आणि एक अचूक नमूद केल्यासही
गुण दिले जात नाही.आणि किंवा (क) संख्यात्मक उत्तर पध्दतीचे म्हणजे (न्युमरिकल ॲन्सर्स टाईप- नॅट) प्रश्न - या सेक्शनमधील
प्रश्नांना १ किंवा २ गुण असतात. हे उत्तर संख्यात्मक असेल. यामध्ये कोणतेही पर्याय
दिले जात नाहीत. उत्तर अपूर्णांकात सुध्दा राहू शकते. (७) विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांच्या पेपरला बसण्याची संधी
दिली जाते. दुसऱ्या पेपरचा पर्याय दिलेल्या यादीप्रमाणे स्वीकारावा लागतो. मात्र परीक्षा
केंद्रांमधील सुविधा आणि उपलब्ध तारखा लक्षात घेऊनच दोन पेपर्सना बसण्याची संधी
दिली जाऊ शकते.
(८) ही परीक्षा कितिही वेळ देता येते.(९)"गेट"चे गुण पुढील तीन वर्षातील प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात.
परीक्षेचे
विषय
ही
परीक्षा पुढील एकूण २९ विषयांमध्ये ही परीक्षा देता येते. (१) एरोस्पेस
इंजिनीअरिंग, (२) इंस्ट्रुमेंटेशन
इंजिनीअरिंग, (३) ॲग्रिकल्चरल
इंजिनीअरिंग, (४) मॅथेमॅटिकस, (५) आर्किटेक्चर ॲण्ड
प्लॅनिंग, (६) बायोमेडिकल
इंजिनीअरिंग, (७) मायनिंग
इंजिनीअरिंग, (८) मेटॅलर्जिकल
इंजिनीअरिंग (९) सिव्हिल
इंजिनीअरिंग, (१०) नॅव्हल आर्किटेक्चर
ॲण्ड मरिन इंजिनीअरिंग (११) केमिकल
इंजिनीअरिंग, (१२) पेट्रोलियम
इंजिनीअरिंग, (१३) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड
कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (१५) प्रॉडक्शन ॲण्ड
इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग
(१६) इलेक्ट्रिकल
इंजिनीअरिंग (१७) टेक्सटाइल
इंजिनीअरिंग ॲण्ड फायबर सायंस, (१८) एनव्हिरॉन्मेंटल सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग (१९) इंजिनीअरिंग
सायन्स, (२०) इकॉलॉजी ॲण्ड
इव्होल्युशन, (२१) ह्युमॅनीटिज ॲण्ड
सोशल सायन्स, (२२) जिओमॅटिक्स, (२३) कॉम्प्युटर सायन्स
ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, (२४) फिजिक्स, (२५) केमिस्ट्री, (२६) स्टॅटिस्टिक्स, (२७) जिओमॅटिक्स इंजिनीअरिंग, (२८) लाइफ सायंस, (२९) जिऑलॉजी ॲण्ड
जिओफिजिक्स
थेट
नियुक्ती
या परीक्षेतील गुणांचा आधार पुढील
सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या नियुक्ती देण्यासाठी करु करतात.
भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड - भेल, गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया -
गेल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड- हाल, इंडियन ऑईल कॉर्पोरशन लिमिटेड- आयओसीएल,
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन-एनटीपीसी, न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
लिमिटेड, आइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन- ओएनजीसी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ
इंडिया- पीजीसीएल.
केंद्र सरकारातील सिनिअर फिल्ड ऑफिसर-टेलिकम्युनिकेशन, सिनिअर
रिसर्च ऑफिसर- क्रिप्टो सिनिअर रिसर्च ऑफिसर-सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, अशी गट अ
श्रेणितील पदे थेट भरण्यासाठी या परीक्षेच्या गुणांचा आधार घेतला जातो.
गेट अर्हता-
(१) अभियांत्रिकी पदवी
अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला असलेल विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात किंवा
ज्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ वास्तुकला/ विज्ञान/ वाणिज्य/ कला
शाखेतील पदवी प्राप्त केली असेल, ते सुध्दा या परीक्षेला बसू शकतात. या
परीक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
(२) कला/ वाणिज्य/ विज्ञान
शाखा-पदव्युत्तर पदवी किंवा या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विदयार्थी.
अर्ज
फक्त ऑनलाइन पध्दतीनेच स्वीकारला जातो. दोन पेपर्ससाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा
लागता.
महाराष्ट्रातील
परीक्षा केंद्रे-
ही परीक्षा देशातील २०० पेक्षा अधिक शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये
महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला, अमरावती
, औरंगाबाद, बारामती, धुळे, जळगाव, कोल्हापूर,
मुंबई-नवी मुंबई, पुणे,
ठाणे, नांदेड, पनवेल-रायगड, रत्नागिरी, संगमनेर-लोनी-शिर्डी, नाशिक सांगली, सातारा, सोलापूर, वसई-पालघर,या
शहरांचा समावेश आहे.
वित्तीय साहाय्य-
गेटमधील सुयोग्य अशा गुणांचा उपयोग पुढील
अभ्यासक्रमांसाठी वित्तीय साहाय्यता मिळवण्यासाठी होऊ शकतो- (१) भारत सरकारच्या साहाय्याने सुरु असलेल्या आणि इतर
शासकीय संस्थांमधील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टोरल अभ्यासक्रम, (२) पदव्युत्तर पदवी
शिष्यवृती (गेट आणि जीपॅट- ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड
टेस्ट) यासाठी संपर्क साखळी-
https://www.aicte-india.org/schemes/students-development-schemes/PG-Scholarship-Scheme)
(२) एम टेक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा
१२,४०० रुपयांचे विद्यावेतन २२ महिन्यांसाठी दिले जाते. बीई/ बीटेक/एमएस्सीनंतर
थेट पीएचडीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षासाठी दरमहा ३१
हजार रुपये आणि पुढील दोन वर्षासाठी दरमहा ३४ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.
महाराष्ट्रासठी
संपर्क- चेअरपर्सन, गेट, आयआयटी बॉम्बे, पवई मुंबई- ४०००७६, दूरध्वनी- ०२२-२५७६७०६८, ईमेल-gateoffice@iitb.ac.in
०००
२
पदव्युत्तर प्रगत संधी
सीडॅक (सेंटर फॉर डेव्हलपमेंट फॉर ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग)ने सुरु केलेल्या, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना, नॅशनल स्किल
क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये आठव्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ
हे सर्व अभ्यासक्रम हे कौशल्य निर्मितीसाठी उच्च श्रेणीचे आणि रोजगार व
स्वयंरोजगार क्षम आहेत. त्यामुळेच हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना
संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्लेसमेंट प्रक्रियेत उत्तमोत्त संधी मिळत
असतात.
प्लेसमेंट- सीडॅकमध्ये
३०० हून अधिक कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. प्लेसमेंटसाठी सर्व विद्यार्थ्यांना
नॅशनल लेव्हल कॉमन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅम (राष्ट्रीय सामायिक
कॅम्पस निवड कार्यक्रम) व्दारे साहाय्य केलं जातं.
ही प्रक्रिया
महिनाभर सुरु राहते. यामध्ये देशभरातील सर्व कॅम्पसमधील सर्व अभ्यासक्रमांचे
विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सीडॅकतर्फे अधिकाधिक कंपन्यांना आकर्षित केलं जातं. प्लेसमेंट
प्रक्रिया दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात राबवली जाते. सरासरी वार्षिक
वेतन हे ४.५ ते ८ लाख रुपये या श्रेणित असतं. १० टक्के कंपन्या १० ते १३ लाख
वार्षिक वेतन देतात. इतर १० टक्के कंपन्या ८ ते १० लाख रुपये वार्षिक वेतन देतात.
ओरॅकल, जावा, युनिक्स,
आयफोन, ॲनड्रॉइड, क्लाऊड कॉम्प्युटिंग, लिनक्स, बोर्ड डिझाइन, इन्फॉर्मेशन
सेक्युरिटी, एम्बेडेड टेक्नॉलॉजी, बिग डाटा इत्यादी तंत्र कुशलतेला प्राधान्य दिलं
जातं. प्लेसमेंट मध्ये निवडीसाठी विविध घटकांचा विचार केला जातो. यामध्ये
सीडॅकच्या परीक्षेतील गुण आणि दहावी-बारावी पदवीमधील गुणांचा विशेषत्वाने विचार
केला जातो.
प्लेसमेंट प्रकियेमध्ये
पुढील कंपन्या सहभागी होतात. एबीबी, ए फोर टेक्नॉलॉजी, ॲक्सेस, ॲकलट्री, अदिती
टेक्नॉलॉजी, ॲडव्हेंट सॉफ्टवेअर, ॲफ्लेक, एआयजी, एअरबस, अल्गोरिथम, अलोहा
टेक्नॉलॉजी, ॲमडॉस, ॲमिगा डेव्हलपमेंट, ॲन्टारिक्स, अपेक्स व्हेंडिंग इंफो, ॲनुरा,
ॲपमिक्स टेक्नॉलॉजी, ॲपतारा, आर्किटेक्ट एसएपी सोल्युशन, ॲटॉस ओरिजिन, ऑगस्टोल, ऑटो
टेक, ॲक्सिस बँक, अजिंगो, ॲजटेक पॅसिफिक, बालाजी इंटर इंफो, बार्कले, बेंच मार्क, बायोइनॅबल,
बिटवाइज ग्लोबल, ब्ल्यू लेन, बीएमसी, बॉश, ब्रियॅनव्हीसा, कॅनन, केपजेमिनी, कॅपसिलॉन,
सीडॅक, कॉरिडस, सिस्को, कॉमॅस्साइट्स, क्रेडेंटेक, सीआरएल, सीएसएसए इंफो मीडिया
,कसपिऑन, कुम्युलस सिस्टिम, सायबेस, डाटाफिक्स, डेकॉस, डेलॉप्ट, डिझायर सॉफ्टवेअर,
डिजिटल ग्रुप, डायरेक्टी, डीव्हायटिस, डायव्हम, डीएनएस, दुसाने इंफोटेक
अभ्यासक्रम-
हे अभ्यासक्रम
पुढील विषयांमध्ये करता येतात- या अभ्यासक्रमांचा कालावधी सहा महिन्यांचा आहे.
अर्हता- बीई/बीटेक (इन्फॉर्मेशन
टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर
सायंस/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रिकल किंवा एमएस्सी-
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायंस/इलेक्ट्रॉनिक्स)
पोस्ट
ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन (१) बिग डाटा ॲनालिटिक्स, (२)
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (३) बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन, (४) मोबाइल कॉम्प्युटिंग, (५) हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग ॲप्लिकेशन
प्रोग्रॅमिंग, (६) व्हीएलएसआय
डिझाइन , (७) इंटरनेट ऑफ
थिंग्ज, (८) ॲडव्हान्सड सेक्युअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, (९) फिनटेक
ॲण्ड ब्लॉकचेन डेव्हलपमेंट, (१०) सायबर सेक्युरिटी ॲण्ड फॉरेंसिक्स,, (११) एम्बेडेड सिस्टिम डिझाइन, (१२) ॲडव्हान्स्ड
कॉम्प्युटिंग, (१३) हाय
परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सिस्टिम्स ॲडमिनिस्ट्रेशन, (१४) रोबोटिक्स ॲण्ड अलाइड टेक्नॉलॉजी, (१५) आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टिम्स ॲण्ड
सेक्युरिटी, (१६) जिओइन्फॉर्मेटिक्स
या
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर सीडॅक-कॉमन ॲडमिशन टेस्ट घेतली
जाते.
प्रशिक्षण
केंद्रे-
हे अभ्यासक्रम
बेंगळुरु, भूवनेश्वर, चेन्नई, गौहाटी, हैदराबाद, इंदोर, कराड, चेन्नई, कोची,
कोलकता, मोहाली, मुंबई (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ कॉम्प्युटिंग, गुलमोहर
क्रॉस रोड क्रमांक ९ जुहू ,मुंबई ४०००४९, दूरध्वनी-०२२-२६२०१६०४), नाशिक, पुणे(पंचवटी,पाषाण,पुणे-४११००८,दूरध्वनी-
०२०-२५५०३१००), सिलचर आणि थिरुवनंतपूरम येथे आहेत. संपर्क-ईमेल-actssupport@cdac.in
०००
.jpg)
Comments
Post a Comment