वैद्यकीय शिक्षण दिशा आणि दृष्टिकोन
वैद्यकीय शिक्षण
दिशा आणि दृष्टिकोन
दिशा
भारतातील ॲलोपथीचे
शिक्षण हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण समजले जाते. असे शिक्षण देणाऱ्या जगातील प्रमुख
देशांमध्ये भारताचा समावेश होतो. शिवाय भारतीय डॉक्टरांचे कौशल्यसुध्दा इतर अनेक देशातील
डॉक्टरांपेक्षा अधिक असल्याचे समजले जाते. त्यामुळे भारतात वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्या
परदेशातील रुग्णांची संख्या वाढतेय. हे मेडिकल टुरिझम भारताच्या परकीय गंगाजळीत चांगली
भर घालत आहे. भविष्यात यात अधिकाधिक वाढ होण्याची शक्यता दिसून येते.
सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार
ऑल इंडिया इंस्टिट्यूट
ऑफ मेडिकल सायंस-नवी दिल्ली, ही संस्था पदवी, पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी
आपल्या देशात सर्वोत्कृष्ट समजली जाते. गेली किमान ५० वर्षे या संस्थेने आपला दर्जा
आणि गुणवत्ता कायम राखला आहे. या संस्थेचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे, इथे दिले जाणारे
संशोधन कार्यास महत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण आणि प्रभावी वापर ! कोविडच्या
काळात, ई-इंटेंसिव्ह केअर युनिटच्या मार्फत या संस्थेने देशातील ५०० रुग्णालयांचे,
रुग्ण परीक्षण- देखभाल- उपाययोजना याबाबत संनियंत्रण केले. गेल्या वर्षिच्या मध्यापर्यंत
या संस्थेने माहिती विश्लेषण आणि तांत्रिक सहकार्य पुरवून देशात दररोज २० लाख कोविड
चाचण्या (आर टी-पीसीआर) पार पाडल्या. संशोधन, प्रशिक्षण, नावीन्यपूर्णता, पायाभूत सुविधा
याबाबत या संस्थेशी देशातील कोणतीच संस्था बरोबरी करु शकत नाही. त्यामुळेच देशात असलेल्या
जवळपास ६०० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही संस्था असते.
यामध्ये गेल्या ५० वर्षात फरक पडलेला नाही.
इतर संस्था
या संस्थेशिवाय
पुढील संस्थांनी आपला दर्जा आणि गुणवत्ता सातत्याने कायम राखली आहे.(१) ख्रिचियन मेडिकल
कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल- वेल्लोर, (२) आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज-पुणे, (३) जवाहरलाल इंस्टिट्यूट
पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्यु केशन
ॲण्ड रिसर्च - पुडीचेरी, (४) मौलाना आझाद मेडिकल कॉलेज – नवी दिल्ली, (५) इंस्टिट्यूट
ऑफ मेडिकल सांयसेस, बनारस हिंदू विद्यापीठ – वाराणसी, (६) किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी
–लखनौ, (७) वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज – नवी दिल्ली, (८) लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज–नवी
दिल्ली, (९) युनिव्हसिटी कॉलेल ऑफ मेडिकल सायंसेस –नवी दिल्ली.
शैक्षणिक शुल्क
भारतातील वैद्यकीय
महाविद्यालयातील शिक्षणाचा खर्च हा अव्वाच्या सव्वा असला तरी शासकीय संस्थांमध्ये मात्र बराच कमी आहे. पुणे येथील
आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण शुल्क घेतले जात नाही. याचा अर्थ येथील अभ्यासक्रम
जवळपास नि:शुल्क आहे.
अत्यंत कमी
शिक्षण शुल्क असलेल्या काही शिक्षण संस्था पुढील प्रमाणे आहेत - (१) ऑल इंडिया इंस्टिट्यूट
ऑफ मेडिकल सायंस, नवी दिल्ली- १,६२८ रुपये, (२) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस,
जोधपूर-३,१०६ रुपये, (३) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, भुवनेश्वर- ५,८५६ रुपये, (४) ऑल इंडिया इंस्टिट्यूट
ऑफ मेडिकल सायंस, रायपूर- ५८५६ रुपये, (५) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस,
ऋषिकेश-१६,९५० रुपये, (६) लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली,-९,०४० रुपये (७)
युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायंसेस, नवी दिल्ली- ३६,०३० रुपये, (८) जवाहरलाल इंस्टिट्यूट
ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, पुडीचेरी-४२,००० रुपये, (९) मौलाना
आझाद मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली- १७,३०० रुपये.
खाजगी महाविद्यालये
काही खाजगी
महाविलयातील शैक्षणिक शुल्क पुढील प्रमाणे आहेत- (१) ख्रिचियन मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल,
वेल्लोर-१,५७,८८० रुपये, (२) एसडीएम कॉलेज
ऑफ मेडिकल सायंसेस, धारवाड- १,९३,७४६ रुपये, (३) महात्मा गांधी इंस्टिट्यूट
ऑफ मेडिकल सायंसेस, वर्धा-७,२१,३५० रुपये,
(४) त्रिची एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ॲण्ड
रिसर्च सेंटर, तिरुचिरापल्ली -१६,८४,००० रुपये,
(५) आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल
सायंसेस, नवी दिल्ली-१९,४४,५४० रुपये, (६) दयानंद मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, सायंसेस,
लुधियाना - २४,२५,२९७ रुपये, (७) सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बेंगळुरु -२८,७३,०००रुपये, (८) पीएसजी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल
सायंस ॲण्ड रिसर्च , करिमनगर -३९,६३,०००रुपये, (८) ख्रिचियन मेडिकल कॉलेज, लुधियाना-४०,५९.३६५
रुपये.
००००
आपल्या देशात गेल्या काही वर्षात सातत्याने
नवी वैद्कीय महाविद्यालये उघडली जात आहेत. २००० नंतर उघडल्या गेलेल्या पुढील वैद्कीय
महाविद्यालयांनी गुणवत्ता आणि दर्जा राखण्यात सातत्य दाखवले आहे. (१) वर्धमान महावीर
मेडिकल कॉलेज – नवी दिल्ली, (२) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, जोधपूर, (३)
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, भुवनेश्वर, (४) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल
सायंस, रायपूर, (५) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, ऋषिकेश, (६) आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायंसेस, नवी दिल्ली, (७) इरा- लखनौ मेडिकल
कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, लखनौ, (८) डॉ.राजेंद्र
प्रसाद गर्व्हनमेंट मेडिकल कॉलेज ,कांग्रा
- हरयाणा , (९) श्री राममूर्ती स्मारक इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, बरेली, (१०)
सिक्किम मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, गंगटोक
महाराष्ट्रातील पुढील काही
वैद्यकीय
महाविद्यालयांनी आपला दर्जा आणि गुणवत्ता कायम राखला आहे- (१)
ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई, (२) जी.एस मेडिकल कॉलेज, मुंबई, (३) बी.जे.गव्हर्नमेंट
मेडिकल कॉलेज, पुणे, (४) भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, पुणे, (५) गव्हर्नमेंट मेडिकल
कॉलेज, नागपूर, (६) इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर
००००
दृष्टिकोन
परदेशातील वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याने व
प्रवेश सुलभतेने मिळत असल्याने लाखावर विद्यार्थी तिकडे जात असल्याचे गेल्या वर्षी
युक्रेन प्रकरणानंतर प्रकर्षाने लक्षात आले. एखाद्याने कुठे आणि काय
शिकायला जावे हा संपूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न असला तरी असा निर्णय घेताना साधकबाधक विचार
होणे गरजेचे आहे.
भारतापेक्षा
अनेक बाबतीत मागे असलेल्या आणि युध्द वा इतर समर प्रसंगांशी सतत तोंड द्यावे लागणाऱ्या
देशांमध्ये भारतीय मुले वैद्यकीय शिक्षणासाठी जात असतात. भारताचे
परराष्ट्र खाते याविषयी वेळोवेळी सावधगिरीचा इशारा देत असते. त्याकडे कानाडोळा केला
जातो. गेल्या वर्षी इतके रामायण अथवा महाभारत घडूनही यंदाही परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी
विद्यार्थ्यांचा ओढा काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही हमखास प्रवेश मिळवून
देतो, अशा धाटणीच्या जाहिरातीही झळकू लागल्या आहेत.
सावधगिरी
बाळगा
एका मोठ्या वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये अमेरिकेतील संस्थांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला सुलभतेने प्रवेश मिळवून देण्याचा दावा करण्यात आला आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या खर्चापेक्षा कमी खर्चात, असे आकडेवारीनीशी या जाहिरातीत नमूद करण्यात आले. शिवाय कोणतीही प्रवेश चाळणी परीक्षा नाही. थेट प्रवेश! हे जरा चमत्कारिकच! एकिकडे तीव्र स्पर्धा आणि दुसरीकडे-आजाव घर तुम्हारा, अशी स्थिती.कदाचित ते खरेही असेल. अशा जाहिरातींनी आकर्षून पालकांनी मुलांना वैद्कीय शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेताना, संबंधितांना विविध प्रश्न विचारुन भांडावून सोडले पाहिजे. उदा-कोणत्याही चाळणीशिवाय प्रवेश कां दिला जातो? शिक्षण संस्था खरोखरच अस्तित्वात आहे का? रँकिग आहे का? त्याचा पुरावा काय? दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देणार म्हणजे नेमके काय करणार? अभ्यासक्रमाचे विषय घटक कोणते? इंटरर्नशीपची काय सुविधा? हे शिक्षण संपल्यावर पदव्युत्तर पदवीसाठी पात्र होता येते काय? भारतात आल्यावर काय? युक्रेनसारखी समस्या निर्माण झाली, त्यातून मार्ग काढण्याचे काही संभाव्य नियोजन? हे सर्वसाधरण प्रश्न झाले.असले उलटसुलट प्रश्न विचारुन आपली खात्री करुन घ्यायला हवी. या प्रश्नांच्या मिळालेल्या उत्तरातून समाधान झाल्यास मुलांना परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घ्यावा
आणि भविष्यातील उद्भवू शकणाऱ्या समस्यांची जबाबादारी स्वीकारण्याची मानसिक तयारी करावी. नंतर ,उगाच भारत सरकारला किंवा नशिबास दोष देत बसू नये.
०००
नवं
शिका
जयहिंद
कॉलेज मुंबई येथे बॅचलर ऑफ व्होकेशन हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम हे दोन स्पेशलयाझेशन आहेत. नव्या शैक्षणिक
धोरणानुसार पहिल्या वर्षानंतर पदविका , दुसऱ्या वर्षांनतर प्रगत (ॲडव्हान्स्ड) पदविका
आणि तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रदान केली जाते. संपर्क-http://jaihindcollege.com/bvoc/software-development.html
ाा

Comments
Post a Comment