क्रीडा उद्योगाचे स्मार्टव्यवस्थापक


 क्रीडा उद्योगाचे स्मार्टव्यवस्थापक

जागतिक क्रीडा उद्योगाची वार्षिक उलाढाल ही ६०० बिलियन डॉलर्सच्या आसपास असून ही वाढ विस्मयचकित करणारी अशीच!. या वर्षी ही उलाढाल ७०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहचू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे सांगणे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडू क्रिकेटशिवाय इतर अनेक खेळप्रकारात जागतिक स्तरावर पदकांवर पदके मिळवित आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा विश्व आणि क्रीडा उद्योगाला नवे चैतन्य मिळाले आहे. भारतात क्रिकेटशी संबंधित इंडियन प्रिमियर लिग, फुटबॉलशी निगडित इंडियन सुपर लिग, हॉकी इंडिया लिग,       प्रो कबड्डी लिग असे सामने भव्य प्रमाणात आयोजित केले जात  आहे. आयपीएल ब्रँड हे सुपरहिट ठरले आहे. यंदासुध्दा आयपीएलने चांगलीच कमाई केली. आयपीएलमुळे जवळपास १५ हजार व्यक्तिंना वेगवेगळया प्रकारातील रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.  देशातील स्पोर्ट्स ब्रँडमध्येही मोठी वाढ झाली आहे .क्रीडा क्षेत्राशी निगडीत विविध प्रकाराचे साहित्य, क्रीडापटूंचे पोषाख याबाबींच्या निर्मिती उद्योगाने ५० हजाराहून अधिक व्यक्तींना रोजगार संधी मिळवून दिली आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केल्या जातात. यामुळे भारतात क्रीडा व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज कधी नव्हे ती वाढली आहे. याबाबी लक्षात‍  घेऊन पुढील काही  संस्थांनी क्रीडा व्यवस्थापनाशी निगडीत अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

इंटरनॅशनल  इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अॅण्ड मॅनेजमेंट

या  संस्थेचे अभ्यासक्रम

(१) बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने सुरु केला आहे.अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा असून तो कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. १२ वीमध्ये खुल्या संवर्गातील उमेदवारास ५० टक्के आणि अनुसूचित जाती जमाती संवर्गातील उमेदवारांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमात  कोचिंग या विषयात स्पेशलायझेशनची सुविधा आहे. इंटर्नशीपची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळावे यासाठी साहाय्य केले जाते.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात फायनांशिअल अकाउंटिंग, बिझिनेस स्टॅटिस्टिक्स, प्रॉडक्ट इनोव्हेशन मॅनेजमेंट,स्पोर्ट्स कोचिंग, स्पोर्ट्स मार्केटिंग, स्पोर्ट्स

 ब्रॉडकास्टिंग ॲण्ड जर्न्या‍लिझम या सारख्या विषय घटकांचा समावेश आहे.

प्रवेश प्रकिया

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्मॅट म्हणजेच र्स्पोट्स मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रासाठी संबंधित उमेदवाराचा कल आणि पात्रता तपासण्यासाठी या चाळणी परीक्षेचा उपयोग केला जातो.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना, मुंबई क्रिकेट असोशिएशन, बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया, आयएमजी रिलायन्स, स्टार स्पोर्ट्स, आदित्य बिर्ला  स्पोर्ट्स, टाटा ट्रस्ट्स, टोटल स्पोर्ट्स ॲण्ड ‍‍फिटनेस, तामीळ थलायवाज, स्पोर्ट्स इंटरॲक्टिव्ह, राजस्थान रॉयल्स आदी संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. वर्ल्ड कप, टी २०, आयपीएल, पीएकेएल, फ्युचर इंडोअर स्पोर्ट्स, नॅशनल स्विम मीट, एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब आदी क्रीडा आयोजनात विद्यार्थ्यांना इंटर्नशीपची संधी मिळाली आहे.

(२) बॅचलर ऑफ स्पोर्ट्स सायंस-या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे आहे. यामध्ये सैध्दांतिक ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. अर्हता- १२ वीमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा. या अभ्यासक्रमाला ‍विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलमेंट या संस्थेच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम चालवण्यात येतो.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमामध्ये बेसिक्स ऑफ बायोकेमिस्ट्री, इंट्रोडक्शन टू टीम सायकॉलॉजी, ॲनाटॉमिकल सायंस, एक्झरसाइज सायकॉलॉजी, ‍फिजिऑलॉजी ऑफ एक्झरसाईज, मस्क्युलर स्केलेटल बायोमेकॅनिक्स, स्ट्रेंग्थ ॲण्ड  कंडिशनिंग या सारख्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

करिअर संधी-

हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना पुढील संधी मिळू शकतात- (१) स्पोर्ट्स थेरपिस्ट, (२) स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ऑफिसर, (३) स्पोर्ट्स कोच, (४) पर्सनल ट्रेनर, (५) परफॉर्मन्स ॲनॅलिस्ट, (६) फिटनेस सेंटर मॅनेजमेंट, (९) न्युट्रिशनिस्ट, (१०) इव्हेंट मॅनेजमेंट, (११) आऊटडोअर ॲक्टिव्हिटीज मॅनेजर

प्रवेश प्रकिया

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्सॅट म्हणजेच र्स्पोट्स सायंस ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. क्रीडा विज्ञान क्षेत्रासाठी संबंधित उमेदवाराचा कल आणि पात्रता तपासण्यासाठी या चाळणी परीक्षेचा उपयोग केला जातो.

इतर अभ्यासक्रम-

या संस्थेत पुढील अभ्यासक्रम सुध्दा करता येतात- (१) मास्टर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, (२) मास्टर ऑफ स्पोर्ट्स सायंस, (३) पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट (४) सर्टि‍फिकेट कोर्स इन पर्सनल ट्रेनर, (५) सर्टि‍फिकेट कोर्स इन ॲडव्हान्स्ड स्पोर्ट्स मार्केटिंग,

संपर्क- इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सोर्ट्स मॅनेजमेंट, फ्लीट हाऊस, मरोळ मेट्रो स्टेशनच्या बाजूला, अंधेरी-कुर्ला रोड, गामदेवी, मरोळ नाका, मुंबई- ४०००५९, ईमेल- info@iismworld.in, संकेतस्थळ- iismworld.in

०००

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी