नेस्ट ॲकॅडेमी फार स्पोर्ट्स मॅनेजमेंट
नेस्ट ॲकॅडेमी फार स्पोर्ट्स मॅनेजमेंट
क्रीडा
व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची अत्यंत कमतरता असल्याचे नॅशनल
स्किल डेव्हलपमेंट (राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ) कॉर्पोरेशनच्या लक्षात आहे. ही
कौशल्य दरी बुजवण्यासाठी या संस्थेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. या क्षेत्रात
कौशल्ययुक्त मनुष्यबळाची निर्मिती झाल्यास त्यांना अनेक करिअर संधी मिळू शकतात. ही
बाब लक्षात घेऊन या संस्थेने बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन स्पोर्ट्स
मॅनेजमेंट हा ३ वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेतील १२
वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो.
करिअर संधी (१) स्पोर्ट्स
फेडरेशन , (२) स्पोर्ट्स मार्केटिंग ॲण्ड ब्रँडिंग, (३) स्पोर्ट्स मर्कंडायजिंग,
(३) स्पोर्ट्स जर्न्यालिझम, (४) स्पोर्ट्स
सेलिब्रिटी मॅनेजमेंट, (५) स्पोर्ट्स फॅसिलिटी मॅनेजमेंट, (६) स्पोर्ट्स इव्हेंट
मॅनेजमेंन्ट, (७) स्पोर्ट्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चुरिंग, (८) रिक्रेएशन ॲण्ड
स्पोर्ट्स क्लब मॅनेजमेंट, (९) स्पोर्ट्स मीडिया ॲण्ड ब्रॉडकास्टिंग, (१०) स्पोर्ट्स
रिटेल, (११) स्पोर्ट्स लिॅग अॅण्ड टिम मॅनेजमेंट, (१२) स्पोर्ट्स एजंसिज, (१३
)स्पोर्ट्स टुरिझम, (१४) स्पोर्ट्स मार्केटिंग रिसर्च.
काय
शिकाल?
या
अभ्यासक्रमात पुढील घटकांचा समावेश करण्यात आला आहे- (१) व्यवस्थापनाची मुलभूत
तत्वे, (२) क्रीडा क्षेत्रातील नेतृत्व गुण, (३) व्यवसाय अर्थशास्त्र, (४) व्यवसाय
संवादकौशल्य, (५) कार्यात्मक इंग्रजी, (६) व्यक्तीमत्व विकास, (७) विपणन
व्यवस्थापन, (८) मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, (९) क्रीडा साहित्य आणि तंत्रज्ञान
व्यवस्थापन, (१०) क्रीडा सुविधा नियोजन आणि व्यवस्थापन, (११) क्रीडा संस्था आणि
संघांचे व्यवस्थापन, (१२) क्रीडा अर्थकारण आणि वित्तीय व्यवस्थापन, (१३) क्रीडा
माध्यमे, प्रसारण आणि पत्रकारिता, (१४) क्रीडा आयोजन, (१५) क्रीडा क्षेत्रासाठी
आवश्यक जनसंपर्क, प्रायोजक आणि जाहिराती, (१६) विक्री कौशल्य, (१७) ब्रँड
व्यवस्थापन, (१८) पर्यावरणाचा अभ्यास, (१९) क्रीडा मानसशास्त्र, (२०) क्रीडापटूंचे
आरोग्य आणि पोषण आहार, (२१) जागतिक क्रीडा पर्यटन, (२२) क्रीडाविषयक कायदे आणि
व्यवस्थापन, (२३) माध्यम व्यवस्थापन (२४) योग आणि नैतिक मूल्ये, (२५) नैतिकता आणि
सुशासन, (२६) उद्योजकता आणि प्रकल्प व्यवस्थापन, (२७) आंतरराष्ट्रीय क्रीडा
व्यवस्थापन, (२८) क्रीडा प्रशिक्षण आणि पध्दती, (२९) सादरीकरण कौशल्य, (३०) मानवी
हक्क आणि भारतीय घटना
याच
संस्थेत मार्स्टस ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. अर्हता-
कोणत्याह शाखेतील पदवी, कालावधी-२ वर्षे.
संपर्क- नॅशनल अकॅडेमी ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट
कॅम्पस, नगिनदास
खंडवाला कॉलेज, एस.व्ही.रोड, मलाड(पश्चिम), मुंबई-४०००६४, भ्रमणध्वनी-८७५९९ ४११११, संकेतस्थळ- http://www.nasm.edu.in/,
ईमेल- mumbai@nasm.edu.in
०००
के.सी.कॉलेज
मुंबई येथील के.सी.
कॉलजने बॅचलर इन व्होकेशन -इन स्पोर्ट्स ॲण्ड एंटरटेनमेंट मॅनेजमेंट, हा कौशल्य
विकासाचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा आहे.
काय शिकाल?
(१) बिझिनेस कम्युनिकेशन
, (२)न्युट्रिशन, (३) मास मीडिया फंडामेंटल्स आणि प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट, (४)
इंट्रोड्युसिंग स्पोर्ट्स मॅनेजमेंट, (५) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इन स्पोर्ट्स
ॲण्ड एन्टरटेनमेंट, (६) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन बिझिनेस मॅनेजमेंट, (७)
इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन, (८) कंटेट मॅनेजमेंट, (९) ॲडव्हर्टायजिंग
ॲण्ड ब्रँड मॅनेजमेंट, (१०) इव्हेंट मॅनेजमेंट इन स्पोर्ट्स ॲण्ड एन्टरटेनमेंट,
(११) एन्टरटेनमेंट मार्केटिंग, (१२) इथिक्स ॲण्ड गव्हर्नन्स.
अर्हता- या
अभ्यासक्रमात १२वी उत्तीर्ण कोणत्याही
शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात
संपर्क -के.
सी. कॉलेज १२४, दिनशा वाच्छा रोड चर्चगेट, मुंबई ४०००२०, ईमेल :
office@kccollege.edu.in आणि
askmeanything@kccollege.edu.in, दूरध्वनी- ०२२-२२८५५७२६,संकेतस्थळ https://kccollege.edu.in/courses/under-graduate-degree/
००००
के.जे.सोमय्या
कॉलेज ऑफ मॅनेजमेंट
या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा, एमबीए इन
स्पोर्ट्स मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेतील पदवी
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.प्रवेशासाठी
संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
हा
अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात. (१) स्पोर्ट्स मार्केटिंग-ब्रँड मॅनेजमेंट, पीआर(पब्लिक
रिलेशन) मॅनेजमेंट (२) स्पोर्ट्स ऑपरेशन - व्हेन्यू मॅनेजमेंट, गेम डे ऑपरेशन्स,
हॉस्पिटॅलिटी, (३) स्पोर्ट्स ॲनॅलिस्ट,
(४) स्पोर्ट्स ब्रॉडकास्टर, (५)
स्पोर्ट्स डिजिटल मीडिया मार्केटिंग, (६)
स्पोर्ट्स मर्कंडायझर मॅनेजर
संपर्क- https://kjsim.somaiya.edu/en/admission/mba-sm
०००
सिम्बॉयसीस
स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायंस
या संस्थेने, एमबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, हा
अभ्यासक्रम सुरु केला आहे. यामध्ये पुढील तीन स्पेशलायझेशनची सोय आहे-(१)
स्पोर्ट्स मार्केटिंग, (२) स्पोर्ट्स
-इव्हेंट मॅनेजमेंट, (३) टेक्नॉलॉजी इन स्पोर्ट्स
काय
शिकाल?
(१)
स्पोर्ट्स इकॉनॉमिक्स, (२) स्पोर्ट्स सायंस, (३) बिझिनेस कम्युनिकेशन, (४)
स्पोर्ट्स मॅनेजमेंट, (५) स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ॲण्ड गर्व्हनन्स, (६)
स्पोर्ट्स मार्केटिंग, (७) स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, (८) इंट्रॉडक्शन टू ऑलिंपिक्स, (९)
फायनांशिअल मॅनेजमेंट इन स्पोर्ट्स
इंडस्ट्री, (१०) स्पोर्ट्स
ॲनॅलिटिक्स, (११) स्पोर्ट्स
इक्विपमेंट ॲण्ड फॅसिलेशन मॅनेजमेंट, (१२) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर
स्पोर्ट्स , (१३) लिगल ॲस्पेक्ट्स फॉर स्पोर्ट्स
(१४) मीडिया मॅनेजमेंट इन स्पोर्ट्स
(१५) स्पोर्ट्स ॲण्ड फिटनेस
मॅनेजमेंट, (१६) ब्रँड मॅनेजमेंट ॲण्ड स्पॉन्सरशीप इन स्पोर्ट्स, (१७) फॅन मॅनेजमेंट.
संपर्क-
सिम्बॉयसीस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायंसेस, लव्हाळे,ता-मुळशी,पुणे-४१२११५,दूरध्वनी-०२०-२८११६२९४,ईमेल- info@ssss.edu.in आणि
admission@ssss.edu.in,संकेतस्थळ- ssss.edu.in
०००
एमआयटी पुणे
या संस्थेने एमबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- दोन वर्षे/ अर्हता- कोणत्याही विषयातील
पदवी. या
अभ्यासक्रमात क्रीडा क्षेत्राशी संबंधित नियोजन, आयोजन
,नियंत्रण, ग्राहकसेवा,आतिथ्य, विक्री
आणि विपणन, दिशा निर्देशन, वाटाघाटी, ग्राहक
संबंध व्यवस्थापन, विश्लेषण, माहितीचे संकलन आदी बाबींचा समावेश करण्यात
येतो.
संपर्क- एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, एस.एन
-१२४, पौड
रोड, कोथरुड,पुणे-411038,दूरध्वनी - 020-71177104,टेलेफॅक्स-71177105, संकेतस्थळ- https://staging-management.mitwpu.edu.in/programs/mba-sports-management,ईमेल- admissions@mitwpu.edu.in
सुरेश वांदिले
९३२४९७३९४७

Comments
Post a Comment