१०वी नंतरची "तंत्रविद्या"
१०वी नंतरची "तंत्रविद्या"
सूक्ष्म, लघु आणि
मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन
टूल रुम येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे
पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग.
या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे. कालावधी- चार
वर्षे.
(२) सर्टिफिकेट कोर्स इन मशिनिस्ट- कालावधी दोन वर्षे. (३) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स-कालावधी तीन
वर्षे. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना
प्लेसमेंट साठी साहाय्य केले जाते.
या तिनही अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील
विद्यार्थ्यांना दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसुचित जाती आाणि
जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये १० टक्क्यांची सूट देण्यात येते. वयोमर्यादा
खुला संवर्ग-१५ ते १९ वर्षे. अनुसुचित जाती आाणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना ३ वर्षाची
सूट देण्यात येते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना शैक्षणिक शुल्कातून सूट
देण्यात येते.
दहावी मध्ये पास श्रेणीत उत्तीर्ण
झालेला विद्यार्थी या संस्थेतील सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटनंस ॲण्ड वेल्डिंग ऑपरेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन मशिन टूल
ॲण्ड वेल्डिंग ऑपरेशन या अभ्यासक्रमाला प्रवेश
मिळवू शकतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
(अ) छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने
(सारथी) इंडो जर्मन टूल रुम या संस्थेशी सहकार्याचा करार केला असून, त्यानुसार मराठा,
कुणबी,कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या संवर्गातील नॉन क्रिमिलेअर गटात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
१० वीनंतरचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहे.
सर्व अभ्यासक्रम नि:शुल्क आहेत.
(१) सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग ॲण्ड मिलिंग, कालावधी-
१२ महिने. (२) सर्टिफिकेट कोर्स इन टूल ॲण्ड डायमेकिंग, कालावधी- १२ महिने. (३) सर्टिफिकेट
कोर्स इन सीएनसी (कॉम्प्युटर न्युमरिकल कंट्रोल) टर्निंग, कालावधी-६ महिने, (४) सर्टिफिकेट
कोर्स इन मिलिंग, कालावधी- ६ महिने. या सर्व
अभ्यासक्रमांना पास श्रेणीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.हे अभ्यासक्रम पूर्णवेळ
आणि अनिवासी स्वरुपाचे आहेत.
(ब) महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था(महाज्योती)
आणि इंडो जर्मन टूल संस्थेने इतर मागास वर्ग,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त व भटक्या
जमाती संवर्गातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपरोक्त चारही अभ्यासक्रम नि:शुल्क
सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्णवेळ आणि निवासी स्वरुपाचे आहेत.
आयटीआय (टर्नर/ फिटर/ मशिनिस्ट/
ग्राईंडर/ टूल अँड डाय मेकर/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ वेल्डर) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-(१) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी मशिनिंग,
कालावधी-१ वर्षे, (२)ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटनन्स, कालावधी-१ वर्षे,
(३) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन वेल्डिंग टेक्नॉलॉजी, अर्हता-,कालावधी-१ वर्षे,
(४) सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी मशिनिंग, ,कालावधी-६ महिने.
संपर्क-इंडो जर्मन टूल रुम
,पी ३१, एमआयडीसी, चिखलठाणा इंडस्ट्रिअल एरिआ, औरंगाबाद- ४३१००६, संकेतस्थळ-www.igtr-aur.org,
ईमेल-info@igtr-aur.org
००००
(क) या संस्थेने पीएम दक्ष,
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि इतर मागास
वर्ग संवर्गासाठी पुढील अभ्यासक्रम नि:शुल्क सुरु केले आहेत- सर्टिफिकेट कोर्स इन मिलिंग -या अभ्यासक्रमाचा
कालावधी पाच महिने, सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग-या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच
महिने . पास श्रेणीतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रशिक्षणाच्या
कालावधीत विद्यावेतन दिले जाते. हा अनिवासी अभ्यासक्रम आहे.
(ड)नॅशनल एसस्सी आणि एसटी हब या संस्थेच्या सहकार्याने या
संस्थेने पुढील रोजा्गाभिमुख अभ्यासक्रम सुरु केले आहेत- (१) हँड हेल्ड प्रॉडक्टस-मोबाईल
रिपेरिंग, अर्हता-१२वी/ आयटीआय/ डिप्लोमा उत्तीर्ण, कालावधी-४६० तास, (२) ऑडिओ व्हिडिओ
प्रॉडक्टस-टिव्ही रिपेरिंग, अर्हता-१२वी/आयटीआय/डिप्लोमा उत्तीर्ण, कालावधी-४६० तास,
(३) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स,अर्हता-इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन,
मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पास श्रेणितील पदविका किंवा पदवी, कालावधी-
७८० तास, (३) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन ॲण्ड प्रोसेस कंट्रोल, अर्हता-इलेक्ट्रिकल,
इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पास श्रेणितील पदविका
किंवा पदवी कालावधी- ७८० तास
(३) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाइन ॲण्ड ॲनॅलिसीस,
अर्हता-सिव्हिल इंजिनीअरिंग विषयातील पास श्रेणितील
पदविका किंवा पदवी कालावधी- ७८० तास. हा निवासी अभ्यासक्रम असून राहण्याची आणि भोजनाची
नि:शुल्क सोय केली जाते. प्लेमेंटसाठी साहाय्य केले जाते.
000
(५) सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत
येणाऱ्या इंस्टिट्यूट फॉर डिझाइन इलेक्ट्रिकल मेझरेमेंट्स इंस्ट्रुमेंटेशन या संस्थेने
पुढील कौशल्य निर्मिती आणि रोजगार स्वयंरोजगास प्राधान्य देणारे अभ्यासक्रम सुरु केले
आहेत.
(१)ॲनिमेशन ॲण्ड
मल्टिमीडिया टेक्नॉलॉजी- या अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने आहे. दहावी उत्तीर्ण
विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. (२) ॲडव्हान्सड वेब डिझायन ॲण्ड ॲनिमेटर- दहावी
उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने.
(३) थ्री डी-ॲनिमेशन ॲण्ड स्पेशल इफेक्टस, - या अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने
. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो.

Comments
Post a Comment