उद्योजक व्हा...उद्योग चालवा
उद्योजक व्हा...उद्योग चालवा
आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग
चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा
अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, पोस्ट
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशीप मॅनेजमेंट (पीजीडीएम आंत्रप्रिन्युरशीप)
हा अभ्यासक्रम केवळ उद्योजक निर्मितीला चालना मिळावी ,या ठोस उद्देशाने सुरु
करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम आंत्रप्रिन्युरशीप डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट ऑफ
इंडिया, या संस्थेने सुरु केला आहे. १९९८ साली या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात
आली. याचा अर्थ या अभ्यासक्रमाचे यंदाचे ४५वे वर्ष आहे. दोन वर्षे कालावधीच्या या
अभ्यासक्रमाल अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे बीज रोवणे, त्यादृष्टिने
त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यासाठी सैध्दांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान पक्के करण्याचे कार्य या
अभ्यासक्रमाव्दारे केले जाते. उद्याजेकतेच्या नाविण्यपूर्ण कल्पना विकसित
करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो.
संस्थेच्या परिसरात स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची स्थापना
करण्यात आली आहे. या केंद्राव्दारे स्टार्टअप म्हणजेज नव्या नव्या उद्योगांच्या
सर्जनशील संकल्पनांची निर्मिती, त्यांचा विकास, प्रत्यक्ष कार्यान्वयनासाठी
प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले जाते.
आंत्रप्रिन्युरशीप डेव्हलपमेंट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना
१९८३ साली करण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय,
आएएफसीआय लिमिटेड, आयसीआयसीआय बँक या
संस्थानी आणि गुजरात सरकारने सहकार्य केले.
स्पेशलायझेशन
या अभ्यासक्रमात पुढीन ३ स्पेशलायझेशनची सुविधा आहे.
(१) न्यू
एंटरप्राइज क्रिएशन- या स्पेशलायझेशनचा मुळ उद्देश विद्यार्थ्यांना नव्या
कल्पनांचा आराखडा विकसित करण्यासाठी साहाय्य करणे हा आहे. या आराखड्यानुसार
उद्योग/व्यवसायाची स्थापना, त्याचे संनियंत्रण, विकास आणि व्यवस्थापन यामध्ये
समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
(२) फॅमिली
बिझिनेस मॅनेजमेंट- कौटुंबिक उद्योगाचा शास्वत विकास करण्यासाठीचे तंत्र आणि
कौशल्य या स्पेशलायझेशनमध्ये शिकवले जाते. सध्याच्या अत्यंत स्पर्धेच्या काळात
कुटुंबाचा उद्योग हा सतत वर्धिष्णू व्हावा, यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर
करुन ज्ञान प्रदान केले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकडे त्याच्या व्यवसाय विकासाचा
किंवा नव्या व्यवसायाचा पाचा वर्षाचा नियोजन आराखडा तयार असतो.
(३) सोशल
आंत्रप्रिन्युरशीप- शास्वत विकासासाठी नव्या संकल्पनांचा विकास आणि विस्तार
करण्याचे तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते. सामाजिक उद्योजकतेला नवी दिशा
देण्यासाठी हे स्पेशलायझेशन उपयुक्त ठरते.
या संस्थेने, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन इनोव्हेशन, आंत्रप्रिन्युरशीप
ॲण्ड व्हेंच्युर डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, हा दुसरा अभ्यासकमही सुरु केला आहे. या
अभ्यासक्रमात तंत्रज्ञान आधारित नावीनपूर्ण संकल्पनांच्या विकासाला प्राधान्य दिले
जाते. नेतृत्व कौशल्य, वित्तीय कौशल्य आणि स्पर्धात्मक युगातील स्मार्ट व्युहनीती
आखण्याचे कौशल्य अशा बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. उद्योजक आणि जागतिक
तज्ज्ञांसोबत सातत्यपूर्ण चर्चेची संधी उपलब्ध करुन दिली जाते.
प्रवेश
प्रक्रिया
दोन्ही अभ्यासक्रमांना कोणत्याही विद्याशाखेतील
विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट), कॉमन
मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (सी-मॅट), झेवियर ॲडमिशन टेस्ट (झॅट), मॅनेजमेंट
ॲप्टिट्यूड टेस्ट (मॅट) यापैकी कोणत्याही एका परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. पदवी
परीक्षेत संबधित विद्यार्थ्याला किमान ५० टक गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गातील
विद्यार्थ्याला ४५ टक्क्के गुण मिळायला हवेत.
ऑनलाइन
पीजीडीएम आंत्रप्रिन्युरशीप
या संस्थेने हा अभ्यासक्रम ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध
करुन दिली आहे. अर्हता- पदवी परीक्षेत संबधित विद्यार्थ्याला किमान ५० टक गुण
मिळायला हवेत. राखीव संवर्गातील विद्यार्थ्याला ४५ टक्क्के गुण मिळायला हवेत.
या
अभ्यास्रमकाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. सोबत,हा
अभ्यासक्रम कां करावयाचा आहे, याविषयी थोडक्यात माहिती (स्टटमेंट ऑफ परपोज) जोडवा
लागतो. अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते आणि त्यानंतर प्रवेश दिला
जातो.
संपर्क- आंत्रप्रिन्युरशीप
डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस भाट- BHAT,-३८२४२८, गांधीनगर, गुजरात, दूरध्वनी-०७९-६९१०४९००,
ईमेल- info@ediindia.org, संकेतस्थळ-www.ediindia.org
०००
फॅमिली बिझिनेस ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, या संस्थेने ,पोस्ट
ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन फॅंमिली बिझिनेस ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप, हा
अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा
असून तो ऑनलाइन पध्दतीने करता येतो. ऑनलाइन १२४ सेशन घेतले जातील. प्रत्येकी १२
याप्रमाणे ३६ सेशन किंवा वर्ग हे ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्ष संस्थेत जाऊन करावे
लागतील. हे १२ वर्ग साधारणत: ३ दिवसांमध्ये पूर्ण केले जातील. ते अभ्यासक्रमाकच्या
प्रारंभी, मध्यात आणि शेवटी घेतले जातील. कोणत्याही ज्ञानशाखेतील ५० टक्के गुणांसह
पदवी प्राप्त विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आंत्रप्रिन्युरशीप
इन न्यू एज, मॅनेजरिअल अकाउंटिंग ॲण्ड फायनांस, व्हेंच्युर फायनांसिंग, टॅक्सेशन,
प्रॉडक्ट मॅनजेमेंट फॉर आंत्रप्रिन्युर, बिझिनेस स्ट्रेटेजी, पिपल मॅनेजमेंट ॲण्ड
लिडरशीप, ड्रायव्हिंग एक्सलंस इन ऑपरेशन
ॲण्ड एक्झिक्युशन,ॲडव्हान्स्ड एक्सेल ॲण्ड ॲनॅलिटिकल टूल फॉर डिसिजन मेकिंग ॲण्ड
ग्रोथ हॅकिंग, बिझिनेस मॉडेल, बिझिनेस ॲण्ड कंपनी लॉ, डिझायनिंग ॲण्ड युझिंग आयटी
सिस्टिम्स, बिझिनेस ॲण्ड लिडरशीप कम्युनिकेशन.
अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयआयएम
इंदोरचे, प्रमाणपत्र एका समारंभात प्रदान केले जातील.
संपर्क https://www.iimidr.ac.in/executive-programmes/long-duration-online-programmes/post-graduate-certificate-programme-in-family-business-management- cp-fbme-batch-01/entrepreneurship-pg
०००
ग्लोबल फॅमिली मॅनेज्ड बिझिनेस प्रोग्रॅम
एस.पी.जैन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही आपल्या देशातील व्यवस्थापन विषयक
शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याारी महत्वाची संस्था आहे. या संस्थेमार्फत ग्लोबल फॅमिली
मॅनेज्ड बिझिनेस प्रोग्रॅम, हा एक वर्ष कालावधीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम
सुरु करण्यात आला आहे. कौटुंबिक व्यवसाय किंवा व्यापार किंवा उद्योगाच्या कार्यान्वयन
आणि व्यवस्थापनात येणाऱ्या विशेष स्वरुपाच्या अडचणी आणि समस्यांच्या सोडवणुकीचे तंत्र
या अभ्यासक्रमात शिकवले जाते. या अभ्यासक्रमात विविध कौटुंबिक व्यवसायातील प्रकरणाचा
अभ्यास (केस स्टडीज),चर्चा, वादसंवाद, आणि प्रत्यक्ष जगातील साधने यांचा समन्वय साधून
निर्णय प्रक्रियेची नवी दिशा दाखवली जाते. याव्दारे संसाधनाचे सुयोग्य व्यवस्थापन,
संघर्षाचे नियंत्रण, नव्या व्यावसायिक कल्पनांचा पुढाकार, मालकीहक्काचे नियंत्रण, दीर्घ
कालावधीसाठी ग्राहकांना बांधून ठेवणे, कौटुंबिक नातेसंबंध दृढ करणे, व्यवसाय वृध्दी
करण्यासाठीच्या नव्या आणि प्रभावी संकल्पना कळतात व त्यांच्या वापराचे तंत्र आणि कौशल्य
प्राप्त करता येते. हा अभ्यासक्रम मुंबई,दुबई आणि सिंगापूर या तीन ठिकाणी शिकवला जातो.
या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तिचे अध्यापक व तज्ज्ञ अभ्यासक्रम शिकवायला येतात.
कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन विषयीचा हा अभ्यासक्रम विशेषत्वाने तयार करण्यात आला असला
तरी त्यास कोणत्याही संस्थेने मान्यता प्रदान केलेली नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले
आहे.
संपर्क
https://www.spjain.org/programs/professional/gfmb
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment