संधी असल्या तरी भाग दोन विमानतळ व्यवस्थापन
संधी असल्या तरी
भाग
दोन
विमानतळ
व्यवस्थापन
पालक
किंवा विद्यार्थ्यांनापैकी काही जणांना मुंबई येथील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर
जाण्याची संधी मिळाली असेल. सध्या विमातळावर एसटी स्टँड किंवा गर्दीच्या वेळी दादर
लोकल स्टेशनवर असते अशी गर्दी असते. अनेक विमाने उडतात अनेक विमानतळावर उतरतात. शेकडो
किलोग्रॅमचे सामान चढवले जाते, उतरवले जाते विमानतळावर प्रचंड ॲक्टिव्हटी (काम/कार्ये)
सुरु असते. या सगळयांचे सुरळीत व्यवस्थापन करण्याची गरज असते. त्यासाठी प्रशिक्षित
अशा मनुष्यबळाची गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने, राजीव गांधी नॅशनल एव्हिऐशन
युनिव्हर्सीटी ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन
एअरपोर्ट ऑपरेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. मुंबईतील बॉम्बे फ्लाईंग क्लब या संस्थेने
मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने एक वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन हा
अभ्यासक्रम सुरु केला आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम विमानतळ व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. मात्र या विषयीसुध्दा
मराठी पालक आणि विद्यार्थी यांना अजिबातच माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे करिअरच्या
या पर्यायापासून ही मुले वंचित राहतात.
सुपरस्टारांचे
"सुपरस्टार"!
सब्यासाची
मुखर्जी, रोहीत बाल, रितू बेरी, मनीष अरोरा, श्वेता त्रिपाठी, गौरव चोप्रा यापैकी किती
जणांची नावे तुम्हाला ठाऊक आहेत? ही सगळी मंडळी सुपरस्टार आहेत. सुपरस्टार म्हंटले
की आपल्याला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, ह्रतीक रोषन अशी नावे माहीत असतात.
पण मी उल्लेख केलेली सर्व नावे फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील सुपरस्टार आहेत. या
मंडळींनी शाहरुख खान, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन,रणवीर सिंघ यांना उठ म्हंटले की
ते उठतात. बस म्हंटले की बसतात, इतका त्यांचा दबदबा आहे. हा झाला एक भाग.
या
सर्व मंडळींचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन
टेक्नॉलॉजी या संस्थेतून, बॅचलर ऑफ फॅशन डिझायइन या विषयातील पदवी घेतली आहे. ही मंडळी
आज त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी आहेत. स्टार अभिनेत्यांच्या पोषाखांच्या डिझाइन
सोबतच ते मोठ मोठ्या ब्रँडेड कंपन्यांचे कपडे सुध्दा डिझाइन करतात.
नॅशनल
इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी ही संस्था जगातील पहिल्या दहा क्रमांकात येणारी संस्था
आहे. या संस्थेचे देशात १६ ठिकाणी कॅम्पस आहे. त्यापैकी एक नवी मुंबईतील खारघर येथे
आहे. या संस्थेचा, बॅचलर इन फॅशन डिझाइनचा अभ्यासक्रम चार वर्षाचा असून तो कोणत्याही
शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. मात्र या उच्च गुणवत्ताप्राप्त आणि
उत्तम करिअर घडवण्याची क्षमता असणाऱ्या अभ्यासक्रमाकडे अल्प संख्येत मराठी मुलं जातात.
फॅशन
डिझायनरने तयार केलेल्या डिझाइननुसार मग तशा कपड्याची निर्मिती मोठमोठ्या कारखान्यात
(डेड फॅक्ट्री) होते. या ठिकाणी हायटेक यंत्रसामग्री बसवली असते. ती चालवण्यासाठी वेगळया
प्रकारच्या तंत्रज्ञांची गरज भासते. ही गरज ,याच संस्थेचा बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी,
हा अभ्यासक्रम भागवत असतो. या अभ्यासक्रमाला १२ वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स
हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
पर्यटन
आणि आतिथ्यशीलता
दोन
वर्षापासून पर्यटन व्यवसायाला मंदी आली होती. मात्र गेल्या वर्षीपासून या व्यवसायाला
नवी झळाळी मिळाली .गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात काश्मिरमध्ये ८० लाख पर्यटक गेले.
गेल्या ५० वर्षात इतके पर्यटक गेले नव्हते. यंदाही तशीच स्थिती आहे. वाढलेल्या पर्यटकांची
ही संख्या या क्षेत्रात अधिकाधिक मनुष्यबळ लागणार असल्याचे स्पष्ट करते. यंदासुध्दा
अनेक मोठ्या पर्यटन कंपन्यांनी मोठी भरती केली. यापुढील काळात याक्षेत्रासाठी मोठ्या
प्रमाणावर मनुष्यबळ लागणार असल्याचे लक्षात घेऊन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम या संस्थेने,
बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम या अभ्यासक्रम सुरु केला
आहे. हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून तो कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण
विद्यार्थ्याला करता येतो.
पर्यटन
व्यवसाय वाढला की आतिथ्यशीलता म्हणजेच हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल व्यवसायातही वाढ होते.
आपल्या राज्यात या विषयाचे शिक्षण देणाऱ्या ब-याच खाजगी संस्था आहेत. त्यांचा दर्जा
आणि गुणवत्तेबाबात प्रश्नचिन्हच आहेत. मात्र भारत सरकारने देशात २२ ठिकाणी इंस्टिट्यूट
ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाईड न्युट्र्रिशन, या संस्थेची स्थापना
केली आहे. त्यापैकी एक संस्था दादरला चैत्यभूमिच्या जवळ आहे. ही संस्था देशाती सर्वोच्च
पाच मध्ये येते. या संस्थेत बी.एस्सी इन हॉस्पिटॅलीटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन हा
अभ्यासक्रम करता येतो. हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याची
इच्छा असल्यास आणखी एक वर्ष शिकून अधिक प्रगत
ज्ञान मिळवू शकतो. या अभ्यासक्रमाच्या नावात बी.एसस्सी असले तरी तो कोणत्याही शाखेतून १२ वी झालेल्या विद्यार्थ्याला
करता येतो. त्यासाठी जाईंट एंट्रन्स टेस्ट (जेइइ) घेतली जाते. देशातील २२ संस्थामध्ये
१० हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आतपार्यंत १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना
उत्तम अशा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
स्मार्ट व्यवस्थापक
इंडियन
इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएमच्या, इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रमाबद्दलही
मराठी आणि पालक फार जागरुक नाहीत असे दिसून
येते. असा काही अभ्यासक्रम आहे, हेच बऱ्याच जणांना ठाऊक नाही.
आयआयएम
ही आपल्या देशातील व्यवस्थापन विषयाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था
आहे. या संस्थेच्या इंदौर, रांची, रोहतक, बोधगया आणि जम्मू या कॅम्पसमध्ये १२ वी नंतरचा
हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आ आहे. समजा १२ वीनंतर विद्यार्थी
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेईल, तेव्हा त्याचे वय १७ किंवा १८ वर्षाचे असेल,आणि जेव्हा
तो हा अभ्यासक्रम पूर्ण करेल तेव्हा त्याचे वय २३ वर्षाचे असेल. याचा अर्थ असा की वयाच्या
२३ व्या वर्षी एक उत्तम पदवी आणि १२ लाख ते
१५ (किंवा यापेक्षा अधिक) लाखापर्यंतच्या वार्षिक वेतन (पॅकेज) असलेली, चांगली नोकरी
हातात असेल. अशी ही लाखांची नोकरी कुणाला नको असते? मग त्यासाठी हा अभ्यासक्रम करायला
हवा ना! हा अभ्यासक्रम कोणत्याही १२ वी शाखेतील विद्यार्थ्याला करता येतो. दुर्देव्याने
या अभ्यासक्रमाला सुध्दा अल्पसंख्येने मराठी मुल निवडले जात असल्याचे दिसून आले आहे.
कुणालाही
आयआयटीत प्रवेश
आयआयटी
म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेशासाठी जॉईंट एन्ट्रस एक्झामिनेशन,
मेन आणि ॲडव्हान्स्ड परीक्षा द्यावी लागते. या जेइइ परीक्षेला १० लाखाच्या आसपास विद्यार्थी
बसतात. त्यातून १६ हजार विद्यार्थ्यांची निवड होते. मात्र आयआयटी मुंबई आणि आयआयटी
मद्रास या दोन आयआयटीमध्ये जेइइ परीक्षेशिवाय प्रवेश मिळू शकतो. तोसुध्दा कोणत्याही
१२वी शाखेतील विद्यार्थ्याला.
आयआयटी
मुंबईच्या अंतर्गत इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर-स्कूल ऑफ डिझाइन नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेने, बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमला कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेपैकी कोणत्याही एका शाखेत अभ्यास केलेल्या १२ वीच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी या संस्थेमार्फत वेगळी परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षीपासून या परीक्षेचे गुण आयआयटी दिल्ली आणि आयआयटी हैदराबाद येथील डिझाइन पदवी अभ्यासक्रमासाठी स्वीकारले जातात.

Comments
Post a Comment