विमानातील केबीन क्रु


 

विमानातील केबीन क्रु

भारतातील मोठ्या शहरातील विमानतळांवरील सध्याचे दृष्य हे गर्दीच्या एसटी आगार किंवा रेल्वे फलाटवरील गर्दीसारखेच दिसते. कोणत्याही वेळेस थोड्याफार फरकाने ही गर्दी कायम असते. बदलेली जीवनशैली, वाढलेले उत्पन्न, कमी दरातल्या विमानसेवा यामुळे प्रवाशांचा ओढा हवाई वाहतुकीकडे वाढला आहे. त्यामुळे भारतातील प्रवासी हवाईवाहतूक क्षेत्र अतिशय वाढत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार २०२४ पर्यंत हवाईवाहतूक क्षेत्रात भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनेल. २०३० पर्यंत हा क्रमांक पहिला होऊ शकतो. या क्षेत्राची ही गती लक्षात घेता प्रशिक्षत मनुष्यबळाची गरज वाढत आहे. या क्षेत्राला वैमानिक, एरोनॉटिकल अभियंते, केबिन क्र्यु म्हणजेच एअर होस्टेस/स्टिवार्ड अशा कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज भासते.

केबिन क्र्यु

विमानाच्या आतील प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या मनुष्यबळाला केबिन क्र्यु संबोधतात. यात एअर होस्ट किंवा एअर होस्टेस आणि स्टिवार्ड किंवा स्टिवार्डेसेस आणि उड्डाण अटेंडन्ट यांचा समावेश आहे. प्रवाशांची सुरक्षितता, आराम आणि देखभालीकडे लक्ष पुरवण्याचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागते.

सध्या या प्रकारच्या नोकरीस आकर्षक स्वरुप प्राप्त झाले आहे. हे अतिशय जबाबदारीचे काम आहे. वेगवेगळ्या वेळेत उडणाऱ्या विमानांमध्ये सर्व प्रकारातील प्रवाशांचे समाधान करण्याचे कौशल्य त्यांना प्राप्त करावे लागते. यासाठी त्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम असणे आवश्यक असते. प्रवाशी आरामात बसलेले असताना या कर्मचाऱ्यांना विविध कारणांसाठी बराच काळ उभे राहावे लागते. कोणत्याही सिस्थित संतुलन कायम ठेवावे लागते. कामांच्या वेळा नियमित नसतात. अतिशय लांब अवधीचा प्रवास करावा लागतो. सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशीही काम करावे लागू शकते.

अर्हता- () या पदांसाठी साधारणत: कोणत्याही विषयातील पदवी तसेच हॉटेल मॅनेजमेंट या विषयातील पदवी किंवा पदविका असल्यास नियुक्तीच्या वेळेस प्राधान्य मिळू शकते. (काही कंपन्या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसुध्दा संधी देतात.)

() इंग्रजी संभाषण कौशल्य असणे आवश्यक ठरते. () शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. () व्यक्तिमत्व आकर्षक असावे. () वयोमर्यादा- २५ वर्षाखाली. () उंची- पादत्राणाशिवाय किमान १७० ते १८० सेंमी असावी. () विमान कंपनीने निर्धारित केल्यानुसार उंचीच्या प्रमाणात वजन असावे. () उमेदवार अविवाहित असावा. () दृष्टी स्वच्छ आणि सामान्य स्वरुपाची असावी. चष्मा नसल्यास उत्तम. (१०) टॅटू आणि शरीरावर छेदन (पिअर्सिंग) नसावे.

करीअर संधी

() या उमेदवारांना एअर इंडियासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील विमान सेवा विस्तारा,एअर इंडिया,स्पाइस जेट, इंडिगो सारख्या खाजगी राष्ट्रीय आणि इतर आंतरराष्ट्रीय विमान सेवांमध्ये करीअरचा प्रारंभ करता येतो.

() विशिष्ट कालावधीचा अनुभव प्राप्त झाल्यावर सुरपवायझर म्हणून पदोन्नती दिली जाते. कनिष्ठ स्तरीय केबिन क्र्युवर देखरेख आणि कामाची जबाबदारी सोपवली जाते.

 () अनुभवी केबिन क्र्यु यांना विविध प्रशासकीय पदेही दिली जातात. त्यांना विमानतळावरील संबंधित कंपन्यांच्या कार्यालयात व्यवस्थापन आणि समन्वयन अशी कामे करावी लागतात.

प्रशिक्षण

केबिन क्र्युचे प्रशिक्षण देणाऱ्या काही महत्वाच्या संस्था-

() बॉम्बे फ्लाईंग क्लब मार्फत चालविण्यात येणारे कॉलेज ऑफ एव्हिएशन

या संस्थेने डिप्लोमा इन एव्हिएशन सेफ्टी ॲण्ड हॉस्पिटॅलिटी, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण उमेदवारास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. संपर्क- द बॉम्बे फ्लाईंग क्लब, जुहू एरोड्रम, नानावटी रुग्णालयाच्या विरुध्द दिशेला, एस.व्ही रोड, विले पार्ले- पश्चिम, मुंबई-४०००५६,दूरध्वनी-०२२-२६६०६४९९/ फॅक्स- २६६११६७२, संकेतस्थळ- http://www.thebombayflyingclub.com, ईमेल- cabincrew@bfcaviation.com

०००

() फ्रँकफिन

संस्थेचे अभ्यासक्रम- () डिप्लोमा इन एव्हिशन, हॉस्पिटॅलिटी ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट/ अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण/ वय- १७ ते २४ वर्षे./ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- एक वर्षं

() डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल ॲण्ड कस्टमर सर्व्हिस /अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण/ वय- १७ ते २४ वर्षे./ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- एक वर्षं

() पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन एव्हिशन ॲण्ड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस/ अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण/ वय- १९ ते २४ वर्षे./ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- एक वर्षं

() पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल ॲण्ड कस्टमर सर्व्हिस /अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण/ वय- १९ ते २४ वर्षे./ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- तीन महिने.

संपर्क- बेस्ट बिल्डिंग, ए विंग, पाचवा माळा, एस.व्ही.रोड, अंधेरी रेल्वेस्टेशन –पश्चिम, मुंबई-४०००५८, दूरध्वनी-०२२-२६७०६०३९,फॅक्स- २६२५६६७०,संकेतस्थळ- http://www.frankfinn.com, ईमेल- corporate@frankfinn.com

०००

 () सेंट्रल ट्रेनिंग इंस्टिट्यूट

ही, एअर इंडियाने स्थापन केलेली प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेत केबिन क्रुसाठी प्रशिक्षण दिले जाते.

संपर्क- सेंट्रल ट्रेनिंग इंस्टिट्यूट इस्टॅब्लिशमेंट, एअर इंडिआ लिमिटेड, फिरोजगुडा, हैदराबाद- ५०००११, दूरध्वनी- ०४०-२७७५०७२३, संकेतस्थळ-http://cte.airindia.in ईमेल- hydcte.atb@airindia.in

इतर अभ्यासक्रम

हे अभ्यासक्रम १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. () फेअर्स ॲण्ड टिकेटिंग प्रोग्रॅम, () एअरपोर्ट हँडलिंग प्रोगॅम , ()फ्लाइट डिसपॅचर इंडक्शन कोर्स, () बेसिक कार्गो कोर्स

०००

() इंस्पायर अकॅडेमी

या संस्थेत १० महिने कालावधीचा केबिन क्रु हा अभ्यासक्रम चालवला जातो. अर्हता- १२वी उत्तीर्ण.

 

इतर अभ्यासक्रम-

(१)   डिप्लोमा इन एअरपोर्ट ग्रॉउंड हँडलिंग ॲण्ड ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंट/ कालावधी- ९ महिने/ अर्हता- १२वी अथवा पदवी/ वयोमयर्यादा- १८ ते २८ वर्षे

(२)   डिप्लोमा इन एअरपोर्ट ग्रॉउंड हँडलिंग /कालावधी- ९ महिने/ अर्हता- १२वी अथवा पदवी/ वयोमयर्यादा- १८ ते २८ वर्षे

(३)           डिप्लोमा इन एअर कार्गो ॲण्ड एव्हिएशन लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट /कालावधी- २महिने/ अर्हता- १२वी/

संपर्क- इंस्पायर अकॅडेमी, ६१०, पर्ल प्लाझा, न्यू मॅकडोनाल्ड्स, अंधेरी रेल्वे स्टेशन, अंधेरी-पश्चिम, मुंबई-४०००५८, ईमेल-  info@theinspireacademy.com

,संकेतस्थळ- http://www.theinspireacademy.com/air-hostess-training

००

() जेटस्किलिंग

संस्थेचे अभ्यासक्रम-

() केबिन क्रु ट्रेनिंग- कालावधी चार महिने, () एअरलाइन ग्राउंड सपोर्ट ट्रेनिंग/ कालावधी-तीन महिने/ अर्हता- १२वी किंवा पदवी

संपर्क- १४३,सागर पॅल्लॅझिओ,साकिनाका जंक्शन,साकिनाका मेट्रो, अंधेरी पूर्व-मुंबई- ४०००७२, संकेतस्थळ- www.jetskilltraining.com, ईमेल- jetskilltraining@gmail.com

०००

Comments

Popular posts from this blog

उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

महिला किसान सशक्तीकरण

वेगळे पर्याय