फूड टेक्नॉलॉजी मधील करिअर


 

फूड टेक्नॉलॉजी मधील करिअर संधी भारत हा जगातील खाद्यउत्पादक देशांमध्ये आघाडीचा देश आहे. खाद्यनिर्मिती आणि कृषीक्षेत्राला समर्थरीत्या जोडणारा महत्वाचा दुवा अन्नप्रक्रिया उद्योग ठरत आहे. सिंचनाखाली असलेल्या जमिनीमध्ये आपल्या देशाचा जगात पाचवा क्रमांक लागतो. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरात वाढ होत असल्याने कृषी उत्पादनातही  वाढ होत आहे. दूध, केळी, पेरु, आंबा, दाळी या कृषीउत्पादनात देशाचा जगात पहिला क्रमांक आहे.

देशात विपुल प्रमाणात कृषीस्त्रोत असून प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढती आहे. याबाबी लक्षात घेता खाद्यप्रक्रिया निर्मितीमध्ये आघाडीचा देश होण्याची भारताची क्षमता आहे.

मोठी परंपरा

अन्न व खाद्यपदार्थ विक्री- व्यवहारामध्ये देशाचा जगात सहावा क्रमांक लागतो. अन्नप्रक्रिया उद्योगाची देशाला मोठी परंपरा आहे. साध्या घरगुती पध्दती व प्रकियांनी तयार केलेले मसाल्याचे पदार्थ, विविध लोणची, पापड, चटण्या यांनी प्राचिन काळापासून जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या काही वर्षात प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची मागणी हळूहळू पण सातत्य राखून वाढत आहे. वाढते उत्पन्न, बदलती जीवनशैली, गतिने होत असलेले नागरिकरण, एकत्र कुटंब पध्दतीचे विघटन होऊन याव्यवस्थेत झालेले बदल, तरुण पिढिंच्या खाण्याच्या आवडीनिवडीत झालेले बदल यामुळे अन्नप्रक्रिया उद्योग वाढीस चालना मिळाली आहे.

अर्थव्यवस्थेत भर

सध्यस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेत अन्नप्रक्रिया उद्द्योग ११ टक्क्याने भर घालत आहे. मेक इन इंडिया या उपक्रमामुळेसुध्दा या क्षेत्रातच्या विकासाला नवी उर्जा मिळाली आहे. गेल्या काही वर्षात अन्नप्रकिया उत्पादक/निर्मिती घटकांमध्ये ३७ हजार ४५० वरुन ३९ हजार घटकांपर्यंत वाढ झाली आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकही वाढत आहे. त्यामुळे याक्षेत्रातील देशातील निर्यातीपैकी १३ टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. देशातील प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन परदेशी कंपन्या व उद्योगसमूहांचा अन्न प्रकिया उद्योगांमध्ये गुंतवणूक व व्यावसायिक सहकार्य वाढीस लागले आहे. करारपध्दतीची शेती, कच्चा मालाचा पुरवठा इत्यादीबाबींमध्ये ही गुंतवणूक वाढली आहे. न्याहरीसाठी लागणारी विविध प्रकारीची खाद्यपदार्थे, विविध उर्जा पेये(एनर्जी ड्रिंक्स),स्नॅक्स, केक्स, आईसक्रीम आणि पाळीवप्राण्यांचे अन्नपदार्थ यांची निर्मिती वाढली आहे. या उद्योगवाढीसाठी डिजिटल क्रांतीही उपुयक्त ठरत आहे.

मोठ्या किराणा दुकानांच्या साखळी(रिटेल)मुळे अन्नप्रक्रिया उद्योगाच्या वाढीस हातभार लागला आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी नोंदणी झालेल्या या उद्योग-घटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. नोंदणी न झालेल्या उद्योग-घटकांमध्येही रोजगार आणि स्वयंरोजागाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

याक्षेत्रासाठी आवश्यक असणारे शिक्षण-प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या करिअर संधी मिळू शकतात.अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान अभ्यासक्रम चालवणारे अभ्यासक्रम आणि संस्था पुढील प्रमाणे आहेत.

इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी.

अभ्यासक्रम- बी.टेक इन फूड इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी. कालावधी- चार वर्षे. अर्हता-१२ वी विज्ञानशाखेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये ५० टक्के गुण. निवड- जेईई मेन परीक्षा आणि एमएचसीईटी मधील गुण. या संस्थेतील ७० टक्के जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. या संस्थेने आता भूवनेश्वर आणि जालना येथे कॅम्पसेस सुरु केली आहेत.

संपर्क- नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा मुंबई- ४०००१९ दूरध्वनी- ०२२- ३३६१११११, फॅक्स- ३३६११०२०, संकेतस्थळ- http://www.ictmumbai.edu.in/, ईमेल- admission@ictmumbai.edu.in

ॲमिटी इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी

   अभ्यासक्रम- बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी. कालावधी- चार वर्षे. १२वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये ६० टक्के गुण मिळायला हवे.

संपर्क- ॲमिटी इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, आय-१ ब्लॉक- फोर फ्लोअर, ॲमिटी युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश, सेक्टर १२५, नॉयडा-२०१३०३, दूरध्वनी-०१२०-२४४५२५२, टेलेफॅक्स- ४७१३६००, संकेतस्थळ- http://www.amity.edu,ईमेल-admissions@ amity.edu

फूड टेक्नॉलॉजी

अभ्यासक्रम आणि संस्था

लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-

अभ्यासक्रम- बी.टेक इन फूड टेक्नॉलॉजी

संपर्क- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, अमरावती, भारतनगरच्या विरुध्द दिशेला नागपूर, दूरध्वनी-०७१२-२५६११०७,टेलेफॅक्स-२५३१६५९,संकेतस्थळ- https://litnagpur.in/ http://litnagpur.in/department-of-food-technology/ईमेल- rajumankar@gmail.com

एमआयटी पुणे-

अभ्यासक्रम- बी.टेक इन फूड टेक्नॉलॉजी

संपर्क- गेट क्रमांक १४०,लोणी-काळभोर, राजबाग, पुणे-सोलापूर मार्ग, पुणे-४१२२०१, दूरध्वनी- ०२०-२६९१२९०७ , संकेतस्थळ- http://www.mituniversity.edu.in आणि www.mitcft.ac.in, ईमेल- contact@mitcft.com

०००

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी

अभ्यासक्रम- बॅचरल ऑफ सायंस (ऑनर्स) इन फूड टेक्नॉलॉजी. कालावधी-तीन वर्षे. अर्हता- १२वी विज्ञान शाखेत इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आाणि गणित किंवा जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान या विषयांसह सरासरीने ६० टक्के गुण.प्रवेश-चाळणी परीक्षेद्वारे

संपर्क- लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालंधर-जी.टी.रोड, फगवारा,पंजाब-१४४४११, दूरध्वनी- ०१२८४-४०४४०४, फॅक्स- ५०६१००, संकेतस्थळ- http://www.lpu.in/programmes/bsc-hons-food-technology, ईमेल- admissions@lpu.co.in

 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग इंजिनीअरिंग

अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीअरिंग

   अर्हता- १२वीविज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र आणि गणित विषयातील खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ही अट लागू नाही. या अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी - ४ वर्षे.

निवड- जॉईंट एन्ट्रन्स टेस्ट (मेन) या परीक्षेतील गुणांवर आधारीत निवड केली जाते.

संपर्क- इंडियन इन्स्टिट्यूट इन ऑफ क्रॉप प्रोसेसिंग इंजिनीअरिंग ,पुदूकोट्टल रोड, तंजावूर- ६१३००५, तमीळनाडू, दूरध्वनी- ०४३६२-२२८१५५, फॅक्स-२२७९७१, संकेतस्थळ -www.iicpt.edu.in ईमेल- academic@iicpt.edu.in

 

डिपार्टमेंट ऑफ ज्यूट ण्ड फायबर टेक्नॉलॉजी

   युनिव्हर्सिटी ऑफ कोलकताच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ ज्यूट ण्ड फायबर टेक्नॉलॉजी या संस्थेचे रोजगाराभिमूख अभ्यासक्रम-

()बीटेक इन ज्यूट ॲण्ड फायबर टेक्नॉलॉजी, अर्हता- १२वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.

()पोस्ट ग्रज्यूएट डिप्लोमा इन ज्यूट टेक्नॉलॉजी ण्ड मॅनेजमेंट. कालावधी एक वर्षं. या अभ्यासक्रमास ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्हता- भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित/ सांख्यिकी/ संगणक शास्त्र/ माहिती तंत्रज्ञान/ जीवशास्त्र/ पर्यावरण शास्त्र/ जैव सांख्यिकी या पैकी कोणत्याही एका विषयासह बी.एस्सी. या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा संस्थेच्या कॅम्पसमध्ये जुलै महिन्यात घेतली जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना ज्यूट उद्योगात प्लेसमेंट मिळते. संपर्क- डिपार्टमेंट ऑफ ज्यूट ऍ़ण्ड फायबर टेक्नॉलॉजी ३५, बॅलीगंज, सर्क्यलर रोड कोलकता-७०००१९,दूरध्वनी- ०३३-२४६१५४४४, फॅक्स- २४६१५६३२ संकेतस्थळ-www.caluniv.ac.in आणि www.ijtindia.org, ईमेल-ijt@cal2.vsnl.net.in

000

 

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी