“लक्ष्मी”स प्रसन्न करा!
“लक्ष्मी”स प्रसन्न करा!
वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करु
इच्छिणाऱ्या व्यक्तिने चांगल्या संस्थेतून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे,
त्याचबरोबर
सराव आणि अनुभव सुध्दा महत्वाचा ठरतो. वेल्थ मॅनेजमेंटच्या दृष्टिने विविध
प्रॉडक्ट्स (विमा योजना / म्युच्यूअल फंड्स /बँकातील गुंतवणूक / सोने-चांदी आणि
इतर मौल्यवान धातुतील गुंतवणूक / कलाक्षेत्रातील गुंतवणूक/ परदेशी मार्केटमधील
गुंतवणूक आदी) यांचा अचुक अभ्यास असणे आवश्यक ठरते. ग्राहकांच्या गरजा ओळखून या
सर्व प्रॉडक्ट्सची उपयुक्तता निश्चित करण्याचे ज्ञान अशा अभ्यासातूनच मिळू शकते.
करिअर
संधी
या
क्षेत्रातील प्रशिक्षित उमेदवारांना मोठया बँका, ब्रोकेरेज हाऊसेस, वेल्थ
मॅनेजमेंट कंपन्या, विमा कंपन्या, सनदी लेखापालांच्या कंपन्या इथे संधी
मिळू शकते. शिवाय ग्राहकांना व्यक्तिगत सल्ला - सेवा दिला जाऊ शकतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये
वृध्दीच्या अनेक शक्यता आणि संधी दडलेल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही वेल्थ
मॅनेजर्सना करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
२) मास्टर ऑफ
फायनांस- या अभ्यासक्रमात कॅपिटल मार्केट्स,
कॉर्पोरेट फायनांस, रिस्क मॅनेजमेंट आणि फायनांशिअल अकाउंटिंग ॲण्ड ॲडव्हायजरी हे
विषय शिकवले जातात. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन
वर्षे.
३) मास्टर ऑफ ॲप्लाइड फायनांस / एमबीए- या अभ्यासक्रमामध्ये वित्त, बँकिंग, निधी व्यवस्थापन, कॉर्पोरेट्सचे
कोषागार आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर या
क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात. अर्हता-
कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वर्षे.
४) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन बिझिनेस जर्न्यालिझम,
२) सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट- या अभ्यासक्रमामध्ये संपत्तीवृध्दीसाठी आवश्यक
असणारे वित्तीय व्यवस्थापन आणि सुरक्षितता, गुंतवणुकदारांच्या
गरजा लक्षात घेऊन वित्तीय संसाधनाचे सुयोग्य नियोजन, विविध गुंतवणूक प्रकारांचे
नियोजन, त्यातील संभाव्य धोके आणि परतावा आदी विषय शिकवले
जातात.
३) बेसिक प्रोग्रॅम ऑन फायनांशिअल प्लॅनिंग ॲण्ड वेल्थ मॅनेजमेंट- या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश हा संपत्तीचे
स्मार्ट नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, विमा नियोजन, गुंतवणूक नियोजन, कर नियोजन, निवृत्ती
नियोजन आदी विषयांची मूलभूत माहिती करुन देणे हा आहे. अर्हता- कोणत्याही
विषयातील १२वी उत्तीर्ण
आयसीआयसीआय डायरेक्ट सेंटर फॉर
फायनांशिअल लर्निंग -
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत - (१) फाउंडेशन
प्रोग्रॅम फॉर स्टॉक इन्व्हेस्टिंग, (२ ) बिगिनर्स प्रोग्रॅम ऑन फ्युचर ॲण्ड
ऑप्शन्स, (३) टेक्निकल
ॲनॉलिसीस, (४) ॲडव्हान्स्ड
डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंग स्ट्रेटेजी, (५) टेक्नो डेरिवेटिव्ज, (६) टेक्निकल
ॲनिलीसीस फॉर ट्रेडिंग प्रोफेशनल्स, (७) फंडामेंटल्स ऑफ इन्व्हेस्टिंग. हे अभ्यासक्रम स्टॉक मार्केट मध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी
उपयुक्त ठरु शकतात.
सर्टिफिकेट इन स्टॉक मार्केट.
हा अभ्यासक्रम पोदार कॉलेज ,मुंबई या संस्थेत करता येतो.या
संस्थेने सर्टिफिकेत कोर्स इन मायक्रो फायनान्स हा अभ्यासक्रमही सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
संपर्क- इंस्टिट्यूट
ऑफ कॉमर्स, पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, एल.एन.रोड, माटुंगा-मध्य
रेल्वे, मुंबई- ४०००१९, दूरध्वनी- ०२२ – २४१४३१७८, फॅक्स-२४१४१९६४ संकेतस्थळ- www.rpodar.ac.in
०००
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स-
संस्थेचे
अभ्यासक्रम- सर्टिफिकेट इन (१)टॅक्स
लॉ, (२)फायनांस ॲण्ड बँकिंग, (३)लॉजिस्टिक
ॲण्ड सप्लाय चैन. संकेतस्थळ- www.mccmulund.ac.in
००
गॅलगोटिॲस युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम- एमबीए इन बँकिंग ॲण्ड वेल्थ मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
संपर्क- प्लॉट
नंबर २,सेक्टर, १७-ए, यमुना एक्सप्रेस वे, ग्रेटर नॉयडा, गौतम बुध्द नगर,
उत्तरपद्रेश, संकेतस्थळ-www.galgotiasuniversity.edu.in,
ईमेल- admissions@ galgotiasuniversity.edu.in,
दूरध्वनी- ०१२०-४३७००००
०००
वाणिज्य आणि बँकिंग
पेपस्किो कंपनीच्या माजी प्रमुख इंदिरा
नूयी, स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल, कायनेटिक मोटर्सच्या व्यवस्थापकीय संचालक
सुलजा फिरोदिआ मोटवानी या सर्वांमधील साम्य म्हणजे त्या सर्व वाणीज्यशाखेच्या
पदवीधर आहेत. त्यांनी आपआपल्या क्षेत्रात
मोठे यश मिळवले आहे. या यशामध्ये वाणिज्य शाखेच्या विषय घटकांचा मोठा वाटा
राहिला आहे.
महाराष्ट्र शासनाने यंदाची कलचाचणी
नुकतीच जाहीर केली. यामध्ये वाणिज्य शाखेकडे सर्वात अधिक मुलांचा कल असल्याचे
दिसून आले आहे. पूर्वीपासूनच याशाखेला महत्व होतेच. व्यापार-उदिम क्षेत्राचा मुख्य
कणा हा वाणीज्य असतो. या शाखेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व्यवसाय - व्यापार,
बँकिंग, अकाउंटिंग, लेखापरीक्षण, वित्तविषयक कायदेशीर बाबी, वित्तीय व्यवस्थापन,
ई-कॉमर्स अशा क्षेत्रात करिअर करु शकतात.
काही अभ्यासक्रम
बी.कॉम- १२ वी नंतर बॅचलर ऑफ कॉमर्स हा
सर्वाधिक विद्यार्थीप्रिय अभ्यासक्रम आहे. व्यापार-व्यवसायाशी संबंधित लेखा,
अर्थशास्त्र, खरेदी-विक्री, विपणन, व्यवस्थापन, बाजारातील चढ-उतार आणि धोरणे अशा
मूलभूत बाबींचे शिक्षण या अभ्यासक्रमांतर्गत घेता येते.
उद्योग-व्यवसाय-कंपन्यांच्या नफ्याची बाजू अधिक सक्षम आणि समर्थ करण्याची क्षमता
या शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. देशाच्या अर्थकारणात वाणिज्य
शाखेचे विद्यार्थी अशाप्रकारे महत्वाची भूमिका बजावू शकतात.
प्रमुख महाविद्यालये
या शाखेचे शिक्षण देणारे देशातील काही प्रमुख
महाविद्यालये पुढील प्रमाणे आहेत- (१) श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स-दिल्ली, (२) लेडी श्रीराम कॉलेज फॉर वूमेन-दिल्ली,
(३) लोयोला कॉलेज-चेन्नई, (४) डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स-ख्रिस्ट
युनिव्हर्सिटी, बेंगळुरु, (५)
हिंदू कॉलेज-दिल्ली, (६)
हंसराज कॉलेज-दिल्ली,(७)
सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स-पुणे, (८) स्टेला मॅरिस कॉलेज-चेन्नई, (९) सेंट जोसेफ कॉलेज कॉमर्स-बेंगळुरु, (१०), मिठीबाई कॉलेज-मुंबई. (११) के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड
कॉमर्स-मुंबई, (१२) बी.एम कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे (१३) सेंट झेवियर्स कॉलेज- मुंबई, (१४) नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड
इकॉनॉमिक्स- मुंबई, (१५) एच.आर
कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स- मुंबई, (१६) एलफिन्स्टन कॉलेज- मुंबई (१८) आर.ए.पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड
इकॉनॉमिक्स- मुंबई (१९) हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स- मुंबई (२०) बी.एम
कॉलेज ऑफ कॉमर्स- पुणे (२१) नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स-पुणे, (२२) सर
परशुरामभाऊ कॉलेज ऑफ आर्ट्स , कॉमर्स ॲण्ड सायन्स, पुणे
संपर्क- श्री सावन नॉलेज पार्क, प्लाट नंबर डी-५०७, टीटीसी इन्डस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, तुर्भे, नवी मुंबई- ४००७०५, दूरध्वनी-०२२-४०७०१०००, फॅक्स - ४०७०१०२२, संकेतस्थळ- content.icicidirect.com, ईमेल-learning@icicisecurities.com
.jpg)
Comments
Post a Comment