स्टेट बँकेतले बॉस!
स्टेट बँकेतले बॉस!
स्टेट बँकेत सर्वोच्च पदावर जाण्यासाठीचा मार्ग या
प्रोबेशनरी ऑफिसरच्या नियुक्तीमध्ये दडलेला असतो, ही बाब लक्षात घेता,या परीक्षेचे
अन्यन्नसाधारण महत्व लक्षात यावे. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना भविष्यात
प्रगती आणि विकासाच्या विविध संधी उपलब्ध होतात. या बँकेच्या सेंट्रल
रिक्य्रुटमेंट आणि प्रमोशन बोर्डा मंडळामार्फत दरवर्षी किमान २००० च्या आसपास
प्रोबेशनरी ऑफिसरच्या जागा भरल्या जातात. या परीक्षेला देशातील पाच ते सहा लाखाहून
अधिक उमेदवार बसतात,त्यामुळे ही परीक्षा प्राथमिक आणि मुख्य अशा दोन टप्प्यात
घेतली जाते.
२०२३-२४
सालासाठी प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवड प्रक्रियेची घोषणा नुकतीच केली आहे. प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पासून सुरु झाली
असून ती २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरु राहील. परीक्षा नोव्हेबर २०२३ मध्ये घेतली
जाईल. मुख्य
परीक्षा डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ मध्ये घेतली जाईल.
प्राथमिक परीक्षेत बँकेने, निर्धारित
केलेले किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांना मुलाखत/समूह चर्चा/व्यक्तिमत्व
चाचणीसाठी बोलावले जाते. त्यानंतर मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण यावर
आधारित संवर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. प्राथमिक परीक्षा-मुख्य
परीक्षा -मुलाखत या तीन टप्प्यांच्या प्रक्रियेस साधारणत: एक वर्षाचा कालावधी
लागतो.
यंदा या परीक्षेव्दारे २००० जागा भरल्या जातील. (अनुसूचित
जाती संवर्ग- ३००, अनुसूचित जमाती संवर्ग- १५०, इतर मागास संवर्ग- ५४०,आर्थिकदृष्ट्या
कमकुवत संवर्ग- २००,खुला संवर्ग- ८१० ,सर्व संवर्गातील दिव्यांग- ११२)
अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर या
परीक्षेसाठी अर्ज करु शकतो. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाची वा
अंतिम सत्राची परीक्षा देणारे विद्यार्थीसुध्दा यासाठी अर्ज करु शकतात. मात्र
त्यांना निर्धारित वेळेत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
चार्टर्ड अकांउंटसीची परीक्षा उत्तर्णी उमेदवारही ही परीक्षा देऊ शकतात.
वयोमर्यादा- २ एप्रिल २०२२३ रोजी खुल्या वर्गातील
उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे असावे आणि कमाल ३० वर्षे असावे. अनुसूचित जाती आणि
जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना ५ वर्षाची सूट देण्यात येते. नॉनक्रिमिलेयर
विद्यार्थ्यांना वयामध्ये ३ वर्षाची सूट दिली जाते. अनुसुचित जाती/जमाती दिव्यांग
संवर्ग- १५ वर्षे, नॉनक्रिमिलेयर दिव्यांग विद्यार्थ्यांना वयामध्ये १३ वर्षे,खुला
संवर्ग दिव्यांगाना १० वर्षाची सूट दिली जाते.
एकूण संधी- ही परीक्षा खुल्या संवर्गातील
उमेदवारांना ४ वेळा व दिव्यांग आणि नॉन क्रिमीलेअर उमेदवारांना ७ वेळा देता येते.
अनुसूचित जाती आणि जमातीमधील सर्व उमेदवारांना कितीही वेळ परीक्षा देता येते.
प्राथमिक परीक्षेची संधी किंवा चान्स यामध्ये समावेश नाही.
परीक्षा पध्दती
(१)
प्राथमिक परीक्षा- १०० गुणांचा एक पेपर असून त्यात वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी
प्रश्न विचारले जातात. हा पेपर संपूर्णरीत्या संगणावर सोडवावयाचा असतो.
या पेपरमध्ये तीन सेक्शन/विभाग असतात. (१) इंग्रजी
भाषेवर आधारित ३० गुणांचे ३० प्रश्न,(२) संख्यात्मक कौशल्य कल (क्वांटिटेटिव्ह
ॲप्टिट्यूड टेस्ट) मध्ये ३५ गुणांचे ३५ प्रश्न, (३)
कार्यकारणभाव क्षमता (रिझनिंग
ॲबिलिटी) मध्ये ३५ गुणांचे ३५ प्रश्न विचारले
जातात.प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी २० मिनिटांचा कालावधी दिला जातो. प्रत्येक सेक्शन
म्हणजेच विभागासाठी कटऑफ किंवा किमान गुणांची अट काढून टाकण्यात आली आहे.तीनही
विभागात मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित पुढील टप्प्यासाठी गुणवत्ता यादी तयार
केली जाते. हे किमान गुण चाळणी परीक्षेची काठीण्य पातळी लक्षात घेऊन बँक निर्धारित
करेल. साधारणत: एकूण जागांच्या २० पट उमेदवारांची निवड मुख्य
परीक्षेसाठी केली जाते.
(२) मुख्य परीक्षा- यामध्ये २०० गुणांचा
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा एक पेपर आणि वर्णनात्मक उत्तर अपेक्षित असलेला
५० गुणांचा एक असे दोन पेपर्स असतात. दोन्ही पेपर ऑनलाईन असतात. पहिला पेपर सोडवून
झाल्याबरोबर दुसरा पेपर सोडवावा लागतो.
पहिल्या पेपरचा कालावधी तीन तास असून यामध्ये चार विभाग/सेक्शन असतात.
एकूण प्रश्नांची संख्या-१५५.प्रत्येक सेक्शनसाठी स्वतंत्र वेळ दिला जातो. प्रत्येक
सेक्शनमध्ये बँकेने निर्धारित केलेले गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. एखाद्या
सेक्शनमध्ये किमान गुण मिळाले नाही तर उमदेवार पुढच्या टप्प्यासाठी निवडला जात
नाही.
या पेपरमध्ये पुढील भाग/सेक्शन असतात- (१) कार्यकारण आणि संगणकीय कौशल्य कल (रिझनिंग आणि कॅम्पुटर ॲप्टिट्यूड)- ४० प्रश्न आणि ६० गुण/कालावधी- ६० मिनिटे,
(२) विदा विश्लेषण आणि अर्थनिरुपण किंवा
स्पष्टीकरण (डेटा ॲनॅलिसीस आणि इंटरप्रिटेशन) ३० प्रश्न आणि ५० गुण/कालावधी- ४५ मिनिटे,
(३)अर्थशास्त्र/किंवा बँकिंग विषयी
सर्वसाधारण माहिती/जाणीव (जनरल अवेअरनेस अबाऊट इकॉनॉमी/ बँकिंग) ५० प्रश्न आणि ४५ गुण/कालावधी- ४५ मिनिटे,
(४) इंग्रजी भाषा(इंग्लिश लँग्वेज) ३५ प्रश्न आणि ४० गुण/कालावधी- ४०
मिनिटे
वर्णनात्मक चाचणी - या पेपरचा कालावधी ३० मिनिटे आणि गुण ५०. यामध्ये
पत्रलेखन आणि निंबधाचा समावेश असतो. यापेपरमध्येही उमेदवारांना बँकेने ठरवलेले
किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.हा पेपरसुध्दा संगणकावरच लिहायचा असतो. त्यामुळे
संगणकावर लिहिण्याचा सराव असणे गरजेचे ठरते. वस्तुनिष्ठ पेपरमधील सर्व विभागात
किमान गुण मिळालेल्या उमेदवारांचाच हा वर्णनात्मक पेपर तपासला जातो.
प्राथमिक आणि मुख्य परीक्षेमध्ये निगेटिव्ह गुण आहेत. प्रत्येक
चुकलेल्या प्रश्नासाठी एक चतुर्थांश गुणांची कपात केली जाते.एखाद्या उमेदवाराने
प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर गुणाची कपात केली जात नाही.
(३) मुलाखत आणि समूह चर्चा- मुख्य परीक्षेत उत्तीर्ण उमदेवारांना मुलाखत
आणि समूहचर्चेसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी २० गुण आणि समूहचर्चेसाठी ३० गुण असे
एकूण ५० गुण या टप्प्यासाठी ठेवण्यात आले आहेत.
अंतिम निवड-
अंतिम निवडीसाठी प्राथमिक परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जात नाहीत. फक्त मुख्य
परीक्षा आणि मुलाखत व समूह चर्चेतील गुणच अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जातात.लेखी
परीक्षेतील एकूण २५० गुण हे ७५ गुणांमध्ये आणि मुलाखत व समूह चर्चेतील ५० गुणाचे २५
गुणांमध्ये रुपांतरीत केले जातात. अंतिम निवडीसाठी या १०० गुणांचा विचार केला
जातात. प्रत्येक संवर्गातील सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाते.
कट-ऑफ
उमेदवारांना मिळणारे गुण दरवर्षी बदलत असतात. तथापि एकूण परीक्षेचा आवाका आणि
काठीण्यपातळी लक्षात येण्यासाठी २०२२ मधील प्राथमिक परीक्षेतील कटऑफ चा अभ्यास करणे उपयुक्त ठरु शकते.
प्राथमिक परीक्षा कटऑफ- .खुला संवर्ग- ५९.५०,आर्थिक
दृष्ट्या
कमकुवत
संवर्ग-
५९.५०,इतर मागास संवर्ग- ५८.२५,अनुसूचित
जाती
संवर्ग-५२.५०,अनुसूचित जमाती संवर्ग- ४७.७५
प्राथमिक
परीक्षेची केंद्रे -महाराष्ट्रात रत्नागिरी,सोलापूर,चंद्रपूर,धुळे
,जळगाव,कोल्हापूर,ठाणे,नवी मुंबई,नांदेड,अमरावती,नागपूर,पुणे,मुंबई,अकोला,औरंगाबाद,सांगली
आणि सातारा
प्रशिक्षण सुविधा
स्टेट बॅंक ऑफ
इंडियामार्फत अनुसूचित जाती/जमाती आणि धार्मिक अल्पसंख्याक समुदाय संवर्गातील
उमेदवारांसाठी या परीक्षेच्या तयारीसाठी
साहाय्य केले जाते. त्यासाठी ६ दिवसांचे खास सशुल्क प्रशिक्षण दिले जाते.
यामध्ये परीक्षेसाठी असलेल्या विषय घटकांचा अभ्यास कसा करायचा,उत्तरे कशी
द्यायची,या विषयी सांगितले जाते. हे प्रशिक्षण ऑक्टोबर २०२३ मध्ये आयोजित केलं
जाईल.मात्र यासाठी इच्छूक उमेदवारांना अर्जामध्ये नमूद करावं लागेल.
अकोला,औरंगाबाद,पुणे,मुंबई
नागपूर या ठिकाणी ही केंद्रे चालवली जातात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्जामध्ये
तसे नमूद करावे लागते.या ठिकाणी उमेदवारांना स्वत:च्या खर्चाने उपस्थित राहावे
लागते.
ऑनलाइन
मुख्य परीक्षा केंद्रे- औरंगाबाद,नवी मुंबई,मुंबई,ठाणे,पुणे
वेतन आणि
इतर लाभ
उमेदवारांची
निवड ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल वन मध्ये केली जाते.त्यांना त्यांच्या
नियुक्तीचे ठिकाण/शहरानुसार किमान वार्षिक
८ लाख २० हजार रुपये आणि कमाल १३ लाख ८ हजार रुपये वेतन दिले जाते. यामध्ये महागाई भत्ता,घरभाडे, शहर भत्ता,वैद्यकीय व इतर
भत्त्यांचा समावेश असतो.यामध्ये वेळोवळी बदल होत जातो.
प्रोबेशनरी
ऑफिसर्सना दोन वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी त्यांना ऑनलाइन कोर्स करावा
लागेल.त्यानंतर अंतर्गत निवड प्रकियेव्दारे अपेक्षित गुण/दर्जा साध्य केलेल्या
उमेदवारांना नियमित केले जाते आणि त्यांना वरच्या श्रेणित म्हणजेच, ऑफिसर मिडल
मॅनेजमेंट ग्रेड स्केल टू मध्ये सामावून घेतले जाते. इतरांना, ऑफिसर ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल
वनमध्ये नियमित केले जाते.या उमेदवारांनी पुढे अपेक्षित दर्जा प्राप्त केला नाहीतर
त्यांची सेवा खंडित केली जाते.
पदोन्नती
बँकेमार्फत पदोन्नतीची विविध संधी दिली
जाते. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना अल्पकालावधीत वरिष्ठ व्यवस्थापन
श्रेणिमध्ये पदोन्नती दिली जाते. परदेशातील शाखांमध्येही काम करण्याची संधी दिली
जाते. कामगिरी आधारित वेतन/लाभ सुध्दा दिला जातो.
अनुसुचित जाती जमाती संवर्गासाठी व दिव्यांगांसाठी परीक्षा शुल्क नाही.इतर
संवर्गासाठी ७५० रुपये.
संपर्क- https://sbi.co.in/documents,ईमेल-
दूरध्वनी-०२२-२२८२०४२७,
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment