जैवतंत्रज्ञानाचे महत्व


 

जैवतंत्रज्ञानाचे महत्व

शास्वत विकास आणि पृथ्वीवरील जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी जैवतंत्रज्ञान विषयाचा अभ्यास महत्वाचा ठरत आलाय. कृत्रिम जीवांची निर्मिती, स्टेमसेल (स्कंध कोशिका) संशोधन , जनुकांचे नकाशे या सर्व क्षेत्रात जैवतंत्रज्ञान आणि जैव-माहितीशास्त्र -(बायोइन्फॉर्मेटिक्स) या ज्ञानशाखा महत्वाची भूमिका बजावत आहेत. आरोग्य, कृषी आणि पर्यावरणाशी संबधित विविध उत्पादनांची निर्मिती या दोन शाखांमधील प्रगती आणि संशोधनामुळे होउु शकली. या अभ्यासक्रमामध्ये अन्न, औषधी आणि आरोग्य विषयक बाबींसाठी कार्यरत उद्योगांच्या तंत्रज्ञानाशी जैवशास्त्राचे सुयोग्य समन्वय व संगती घडवून आणण्याचे ज्ञान प्रदान केले जाते.

 

पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंस्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स ॲण्ड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतिने पाच वर्षे कालावधीचा एम.एस्सी इन बायोटेक्नॉलॉजी आणि सहा वर्षे कालावधीचा एम.टेक इन बायोटेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम जैवतंत्रज्ञान उद्योगातील तज्ज्ञांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमात त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाते.

जैवंतत्रज्ञान हा आंतरज्ञानशाखीय विषय असल्याने या अभ्यासक्रमात मूलभूत विज्ञानासोबत ॲप्लाइड किंवा उपयोजित विज्ञान घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या बहुआयामी क्षेत्रातील आव्हाने स्वीकारण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त होते.

पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमात विविध संशोधन प्रकल्प, संशोधन निंबध/अहवाल आणि औद्योगिक घटक अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण यावर भर देण्यात येतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहाव्या वर्षात शिक्षण पुढे चालू ठेवण्याची संधी दिली जाते. यामुळे या विद्यार्थ्यांना एम.टेकची पदवी मिळू शकते. सहाव्या वर्षात विद्यार्थ्यांना औद्योगिक संशोधन प्रकल्पावर अधिक काम करावे लागते.

प्रवेश प्रकिया

प्रत्येक बॅचला दरवर्षी प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन चाळणी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पुणे विद्यापीठाच्या परिसरात घेतली जाते. या चाळणी परीक्षेचा पेपर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. या पेपरमध्ये दोन भाग असतात. सेक्शन एक मध्ये इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि कलचाचणी यावर २० गुणांचे प्रश्न विचारले जातात. सेक्शन दोनमध्ये एकूण प्रश्नांची संख्या ८० असते. त्याची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात येते - गणित - १० टक्के, भौतिकशास्त्र - २५ टक्के, रसायनशास्त्र - २५ टक्के, जीव शास्त्र - ४० टक्के, असे प्रश्न विचारले जातात.

एम.एस्सी इन व्हायरॉलॉजी

याच संस्थेत विषाणूशास्त्राशी संबधित एम.एस्सी इन व्हायरॉलॉजी हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या विषाणूंचा अभ्यास आणि संशोधनाला प्राधान्य मिळू शकते.त्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. पुण्यातील पाषाण येथे असणाऱ्या संस्थेच्या संस्थेच्या कॅम्पसमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

संपर्क- इंस्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स ॲण्ड बायोटेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, गणेशखिंड रोड, पुणे- ४११००७, दूरध्वनी- ०२०-२५६९१३३३, ईमेल-directoribb@unipune.ac.in,संकेतस्थळ- http://www.unipune.ac.in/snc/institute_of_bioinformatics_and_biotechnology

000

इंस्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ॲण्ड बायोइन्फॉर्मेटिक्स

या संस्थेमार्फत, एम.टेक इन  बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मेटिक्स हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम चालविण्यात येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी - दोन वर्षे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटेशनल बॉयलॉजी/ बायोइन्फॉर्मेटिक्स या विषयांमध्ये तज्ज्ञता प्राप्त होते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येते. संपर्क- बायोटेक पार्क, इलेक्ट्रॉनिक्स सिटी फेज वन, बेंगळुरु - ५६०१००, दूरध्वनी-०८०-२८५२८९००, फॅक्स-२८५३८९०४,ईमेल-hosahalli_s@ibab.ac.in, संकेतस्थळ- https://www.ibab.ac.in/

०००

डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी-

अभ्यासक्रम.

() बी.टेक इन बायोटेक्नॉलॉजी-

या अभ्यासक्रमात जैवतंत्रज्ञान उद्योगाशी निगडित विविध कायदेशीर पैलूंची ओळख करुन दिली जाते. याक्षेत्रातील तंत्र आणि साहित्य यांची गुणवत्ता व दर्जा वाढवण्यासाठीचे कौशल्य शिकवले जाते. लेखन आणि मौखिक संवाद कौशल्याचे तंत्र शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा चतुरस्त्र विकास होतो. कालावधी-चार वर्षे.

() बी.टेक इन बायोइन्फॉर्मेटिक्स-

संगणकीय तंत्राचा वापर करुन जैविक माहितीचे विश्लेषण, प्रकिया, व्यस्थापन, साठवणूक आणि पुन्हा उपलब्ध करुन देण्यासाठी जैवमाहितीशास्त्र ही ज्ञानशाखा कार्यरत असते. वैविध्यपूर्ण व मोठ्या प्रमाणावरील जैविक माहितीच्या साठ्याचे अचुक महत्व समजून घेण्यासाठी या ज्ञानशाखेत गणित, जीवशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान या शाखांचा एकत्रितरीत्या वापर केला जातो.,

औषधीनिर्माण शास्त्र आणि विविध जैवतंत्रज्ञान क्षेत्रात बायोइन्फॉर्मेटिक्स तंत्रज्ञान वापरले जाते. नव्या औषधांचा शोध आणि विकासासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.

जागतिक पातळीवर या तंत्रज्ञानामधील उद्योजकीय उलाढाल १० ते १२ बिलियन डालर्स असल्याचे, या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे. शासनाचे सहकार्य, विविध औषधांचा शोध, संशोधन आणि विकासामध्ये बायोइन्फॉर्मेटिक्सचा वाढलेला वापर यामुळे या क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे.

या अभ्यासक्रमात संगणकीय शास्त्र आणि जैविकशास्त्र या आंतरज्ञानशाखांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. औद्योगिक जगाताच्या समस्या गतिने सोडवण्यासाठीचे तंत्र आणि कौशल्य विकसित करण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते.

वैद्यकीय माहितीच्या साठ्याचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या निर्मितीसाठी केला जातो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे माहितीच्या साठ्याचे (डेटा सायन्स ॲनॅलिसीस) विश्लेषण करण्यात तज्ज्ञता प्राप्त करतात. कालावधी- चार वर्षे

() इंटिग्रेटेड एमटेक इन बायोटेक्नॉलॉजी - या अभ्यासक्रमामध्ये सैध्दांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा सुयोग्य समन्वय साधण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि संवाद कौशल्य हस्तगत करणे सोपे जाते. याचा फायदा त्यांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी मिळतो. जैवतंत्रज्ञान घटकातील गरजा लक्षात घेऊन संशोधन आणि प्रकल्पकार्यास महत्व दिले जाते. नावीन्यपूर्ण विचारांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. या क्षेत्रातील नवे संशोधन आणि तंत्रज्ञानाचे विश्लेषण करण्याची वैचारिक क्षमता विकसित केली जाते. वाणिज्यिक वापरासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य शिकवले जाते. जैवतंत्रज्ञानाशी संबधित संवेदनशील नैतिक बाबींची ओळख करुन दिली जाते. कालावधी - पाच वर्षे.

() बी.टेक इन फूड सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी

उपरोक्त नमूद चारही अभ्यासक्रमाची अर्हता - विद्यार्थ्यांना १२ वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी या विषयात सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत. या विद्यार्थ्याने १२ वीमध्ये गणित अथवा जीवशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्येही त्याला किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय चाळणी प्रवेश परीक्षेतील गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. मात्र ज्या विद्यार्थ्यांना हे शक्य नसेल त्यांना संस्थेची चाळणी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

संपर्क - डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी ॲण्ड बायोइन्फॉर्मेटिक्स, ५, सेक्टर १५, प्लॉट नंबर ५०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४, दूरध्वनी - ०२२-२७५६७९४९, ईमेल- biosciences@dypatil.edu, संकेतस्थळ- dypatil.edu.

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी