विविध अभियांत्रिकीची दिशा ठरवताना...
विविध अभियांत्रिकीची दिशा
ठरवताना...
आपल्या पाल्याचा बौध्दिक आवाका लक्षात
घेऊन पालकांनी अभियांत्रिकी शिक्षण पर्यायाचा विचार करायला हवा. तांत्रिक
स्वरुपाची कौशल्य निर्मिती याद्वारे होत असल्याने हे अभ्यासक्रम रोजगार आणि
स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरतात. महाराष्ट्रातील आणि देशातील नामवंत आणि दर्जेदार
अशा खाजगी संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करायला हवा. या प्रवेशासाठी
आयआयटीच्या वतिने घेण्यात येणाऱ्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन(मेन) मधील गुण ग्राह्य धरले जातात. महाराष्ट्रातील खाजगी संस्थांमधील
देशस्तरीय 15 टक्के जागा भरण्यासाठी या गुणांचा आधार घेतला
जातो. 15 टक्क्यांतील प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांचे
जितके अर्ज संबंधित संस्थेकडे येतात, त्यानुसार
गुणवत्ता यादी तयार केली जाते. व क्रमाने प्रवेश दिला जातो. देशातील काही
नामवंत खाजगी संस्थांमधील सर्व प्रवेश केवळ जेइइ (मेन)च्या गुणांवर आधारित केला जातो. सर्व नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ,
सर्व इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी-(आयआयआयटी) या जेइइ(मेन) परीक्षेचेच गुण
ग्राह्य धरतात. महाराष्ट्रातील इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही शासकीय संस्था
देशस्तरीय 15 टक्के जागा याच गुणांवर आधारित करते. याचा अर्थ असा की
देशातील इतर राज्यातील विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातील विद्यार्थीसुध्दा या 15
टक्के प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
प्रवेशाची संधी
महाराष्ट्रीय मुलांना सीइटीमधून प्रवेश
मिळाला नाही तर या 15 टक्केमधून प्रवेश मिळण्याची एक अतिरिक्त संधी अशाप्रकारे मिळते.
महाराष्ट्रातील सर्व शासकीय अभियांत्रिकी शिक्षण संस्था या गुणांचा विचार करत नाहीत.
त्यांचे प्रवेश हे एमएच-सीइटीच्या गुणांवर केले जातात.
गेल्या दहा-पंधरा वर्षात
महाराष्ट्रातील काही खाजगी महाविद्यालयांनी सातत्याने चांगली कामगिरी बजावली आहे.
शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा वाढावी यासाठी या संस्थांमार्फत मोठी गुंतवणूक केली
जाते. उत्तम प्राध्यापक नेमले जातात. प्रयोगशाळा अद्ययावत करण्यावर भर दिला जातो.
औद्योगिक जगताच्या गरजा भागवता येतील अशा विषय घटकांचा समावेश अभ्यासक्रमात
करण्यात येतो. विद्यार्थ्यांना इंटर्नशीप मिळावी यासाठी बऱ्याच उद्योगांशी संपर्क
स्थापित करण्यात येतो. उद्योग जगतातील प्रत्यक्ष कार्यरत मनुष्यबळास
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते. अभियांत्रिकी प्रवेश घेताना
अशा संस्थांचा विचार करायला हवा.
काही संस्था
अशा काही संस्थांची यादी नमुन्यादाखल
पुढे दिली आहे. वेगवेगळया सर्वेक्षणात या संस्थांची नावे सातत्याने देशस्तरावर
पहिल्या शंभरमध्ये येतात. संदर्भासाठी व
विचार करण्यासाठी ही यादी आहे. मात्र प्रवेशासाठी अर्ज भरताना प्रत्यक्ष खातरजमा
करायला हवी. या संस्थाचे संकेतस्थळ किंवा प्रत्यक्ष संस्थेला भेट देणे, अशा
संस्थांमधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे अशा बाबींचा यात
समावेश करावा.
काही संस्था- (1) डी.जे संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-मुंबई, (2) मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट
इंजिनीअरिंग - मुंबई, (3) विश्वकर्मा
इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी -पुणे, (4)
भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग - पुणे, (5) पुणे इंस्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, (6) के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-मुंबई, (7) विश्वकर्मा इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे, (8) विवेकानंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मुंबई, (9)थडोमल सहानी इंजिनीअरिंग कॉलेज-मुंबई, (10) इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन
टेक्नॉलॉजी-पुणे, (11) सिम्बॉयसीस
इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-पुणे, (12)
क्युमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन-पुणे, (14) श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-नागपूर, (15) एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय - पुणे, (16) इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट-
पुणे, (17) विद्यालंकार इंस्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजी-मुंबई, (18) आर.सी.पटेल
इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-शिरपूर, (19)आयएसबी ॲण्ड एम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी-पुणे, (20)
आर्मी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- पुणे, (21)
फादर सी रॉर्डिग्ज कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी-नवी मुंबई, (22) फादर कॉन्सैकॅवो रॉर्डिग्ज कॉलेज ऑफ
इंजिनीअरिंग-मुंबई, (23) सरदार पटेल इंस्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजी-मुंबई, (24) वालचंद कॉलेज
ऑफ इंजिनीअरिंग - पुणे, (25) डॉ.डी.वाय
पाटील युनिव्हर्सिटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-नवी मुंबई, (26) के.जे.सोमय्या इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी -
मुंबई, (27) एमआयटी ॲकेडमी ऑफ इंजिनीअरिंग-पुणे, (28) यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-नागपूर, (29)
राजारामबापू इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-सांगली, (30) कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-कोल्हापूर, (31) प्रवरा रुरल इंजिनीअरिंग
कॉलेज-लोणी, (32) रामराव आदिक इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-नवी
मुंबई, (33) ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी-मुंबई, (34) ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-पुणे, (35) एसएनडीटी विद्यापीठाचे उषा मित्तल इंस्टिट्यूट
ऑफ टेक्नॉलॉजी-मुंबई, (36) राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मुंबई,(37) झेवियर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- मुंबई, (38) वाटुमल
इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ॲण्ड कॅाम्प्युटर टेक्नॉलॉजी-मुंबई, (39) अथर्व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग
-मुंबई, (40) डॉ.डी.वाय.पाटील इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी-पुणे, (41) पुणे विद्यार्थीगृहाचे
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- पुणे,
वर नमूद यादीतील क्रमांक हे नमुन्यादाखल आहेत. ही या संस्थांची मेरिट लिस्ट नाही हे लक्षात घ्यावे. याशिवाय काही ऐकिव माहिती किवा मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या अनुभवाचाही उपयोग अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करताना करण्यास हरकत नाही.
प्रवेश कसा मिळणार ?
या पर्यांयाचा विचार करताना
विद्यार्थ्याला सीइटीमध्ये किती गुण मिळणार हे लक्षात घ्यावे लागेल. गेल्या काही
वर्षात विद्यार्थ्यांचा ओढा या महाविद्यालयांकडे असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे सीइटीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या
महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे सुलभ जाऊ शकते. या महाविद्यालयांमधे सर्वसाधारणत:
कॉम्प्युटर सायन्स किंवा टेक्नॉलाजी, इन्फर्मेशन टेक्नॉलाजी, सिव्हिल इंजिनीअरिंग,
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग,
मेकॅनिकल इंजिनीअरिंग अशा शाखांमध्ये प्रवेश दिला जातो. सध्या विद्यार्थ्यांचा ओढा
हा कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी या शाखेकडे असल्याने सीइटीमध्ये अधिक गुण
मिळणा-या विद्यार्थ्यांना या शाखेला प्रवेश मिळतो. मर्यादित जागांमुळे मर्यादित
विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार हे ओघाने आलेच. पण त्यामुळे निराश न होता इतर
शाखांमध्ये प्रवेश मिळत असल्यास तो घेण्यासाठी विचार करायला हवा. कारण इतर
कोणत्याही संस्थांमधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला
प्रवेश घेण्याऐवजी या संस्थांमधील इतर शाखांची निवड करणे संयुक्तिक ठरु शकते.(उदा- पुण्यातील
विश्वकर्मा इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग,
प्रॉडक्शन इंजिनीअरिंग,इंस्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल इंजिनीअरिंग,केमिकल
इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इन्फर्मेशन टेक्नॉलाजी, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड
टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, या शाखांमध्ये प्रवेश मिळू शकतो. कॉम्प्युटर
इंजिनीअरिंग याशाखेत प्रवेश समजा मिळाला नाही तर इतर शाखांचा प्रवेशासाठी विचार
करायला हवा. या संस्थेची औद्योगिक जगतातील ब्रँड व्हॅल्यू लक्षात घेता, इतर शाखांमधील
विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाच्या संधी मिळणे सुलभ जाऊ शकते. के.जे
सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या संस्थेत मेकॅनिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर
इंजिनीअरिंग,इन्फर्मेशन टेक्नॉलाजी, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन
इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग या शाखांमध्ये प्रवेश मिळू शकतो. या
संस्थेकडे चांगल्या संस्था प्लेसमेंटसाठी येत असल्याने कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
याशाखेच्या विद्यार्थ्यांसोबत इतर शाखांमधील विद्यार्थ्यांचाही प्लेसमेंटसाठी
विचार केला जातो.)
सध्या प्लेसमेंटसाठी येणाऱ्या इंफोसीस,
टीसीएस, टेक महिंद्रा, केपजेमिनी ,ॲक्सेंचुअर, एल ॲण्ड टी यासारख्या सॉफ्टेवअर कंपन्या सर्वच शाखांमधील
विद्यार्थ्यांना निवड असतात. त्यामुळे नामवंत संस्थांमधील प्लेसमेंटचा गेल्या दोन
तीन वर्षाचा अहवाल अथवा माहिती प्रत्यक्ष जाणून घेणे उपयुक्त ठरेल. ही माहिती काही
संस्था त्यांच्या संकेतस्थळावर ठेवतात. काही संस्थांच्या माहितीपत्रकात या विषयी
नमूद केले असते. पालक व विद्यार्थ्यांनीसुध्दा प्रवेश प्रकिया सुरु होण्याच्या आधी
पूर्वतयारी म्हणून त्यांनी ठरविलेल्या ड्रीम संस्थांमधील प्लेसमेंट अहवाल मिळवून
त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ खर्ची करण्यास काहीच हरकत नाही.
काही दर्जेदार खाजगी संस्थांचे शुल्क
हे मोठे वाटू शकते. शुल्काची माहितीसुध्दा संकेतस्थळ आणि माहितीपुस्तकात दिलेली
असते. या शुल्कासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, संस्थेचा दर्जा व मार्केटमधील
स्थान लक्षात घेउुन शैक्षणिक कर्ज देतात. त्याचाही विचार करायला हवा.
०००
.jpg)
Comments
Post a Comment