फॅशन सांगण्याची कला (२)
फॅशन
सांगण्याची कला (२)
गेल्या काही वर्षात
सर्वस्तरातील भारतीयांची क्रयशक्ती बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे जीवनशैलितही फरक झाला आहे. जीवनशैलीतला हा फरक प्रामुख्याने डिझायनर्स परिधानांमधून दिसून येतो. ब्रँडेड परिधानांकडे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा कल वाढला आहे. भारतीय मानसिकतेचा ब्रँडेड कपड्यांकडे असलेला ओढा बघून विविध कंपन्या नाविन्यूपर्णरीत्या त्यांच्या ब्रँडचे मार्केटिंग करताहेत. यासाठी फॅशन कम्युनिकेटरचे मोठ साहाय्य होताना दिसते. फॅशन कम्युनिकेशच्या
अभ्यासक्रमांमध्ये साधारणत: टायपोग्रॅफी, फॅशन जर्न्यालिझम, पॅकेजिंग डिझायनिंग,
फॅशन स्टायलिंग, फॅशन कंझुमर बिहेविअर, रिटेल ॲण्ड ब्रँड मॅनेजमेंट, डिझाइन
थिेंकिंग, फॅशन हिस्ट्री, फॅशन सायकॉलॉजी, ग्रॅफिक डिझाइन, फोटोग्रॅफी, व्हिज्युअल
मर्कंडायजिंग,फॅशन फोरकास्टिंग, ग्रॅफिक डिझाइन, फॅशन स्टायलिंग, मेकअप ॲण्ड हेअर
स्टायलिंग, अशासारख्या विषयांचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना
वेगवेगळया पध्दतीने फॅशन सांगण्याची कला, चांगल्याप्रकारे अवगत करता येते.
फॅशन कम्युनिकेशन हा
स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम चालवणाऱ्या आणखी काही शैक्षणिक संस्था-
(१) पर्ल ऍ़कॅडेमी- या संस्थेने प्रोफेशनल
डिप्लोमा इन फॅशन मीडिआ कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- चार वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम संस्थेच्या दिल्ली आणि मुंबई कॅम्पसमध्ये चालविला जातो.
या अभ्यासक्रमामध्ये प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि नवीन सामाजिक माध्यमे (सोशल मीडिया) यामधील फॅशन पत्रकारिता, विविध प्रसंग आणि प्रचार (इव्हेन्ट्स आणि ऍ़डर्व्हटायजिंग) यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येतो. फॅशन व्हॅल्यू चेन, प्रिंसिपल्स ऑफ फॅशन डिझायनिंग, प्रॉडक्ट कॅटलॉग, फॅशन विक्स, ई-फॅशन रिटेल, फॅशन ट्रेन्ड फोरकॉस्ट या विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम केल्यावर फॅशन एडिटर, फॅशन पब्लिक रिलेशन्स प्रोफेशनल्स, फॅशन जर्न्यालिस्ट, फॅशन इव्हेन्ट डिझायनर्स या सारख्या संधी फेमिना, वोग, वुमेन्स इरा, फॅशन ऍ़ण्ड यू, इले, जेनेसिस, मायंत्रा डॉट कॉम, कॉस्मोपोलिटन आदी मुद्रित माध्यमे आणि इतरत्र करियरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
हा अभ्यासक्रम केल्यावर फॅशन जर्न्यालिस्ट, फॅशन
पब्लिक रिलेशन प्रोफेशनल्स,फॅशन एडिटर्स, फॅशन इव्हेंट डिझायनर्स, टीव्ही
प्रोड्युसर, सोशल मीडिआ स्ट्रॅटेजिस्ट, फॅशन फोटोग्रॅफर अशा करीअर संधी मिळू
शकतात. पत्ता- (१)ए 21/13, नारायणा इंडस्ट्रिअल एरिआ फेज टू, निअर शहिदपूर मेट्रो रेल्वे स्टेशन, नवी दिल्ली - 110028, दूरध्वनी- 011- 49807100, संकेतस्थळ- www.pearlacademy.com, ईमेल-counsellor@ pearlacademy.com
(२)एस.एम सेंटर,अंधेरी कुर्ला
रोड,मरोळ मेट्रोस्टेशनच्या बाजूला,अंधेरी पूर्व,मुंबई-४०००५९,दूरध्वनी-
०२२-४०५८५४००,ईमेल- registrar.mumbai@pearlacademy.com
पद्यव्युत्तर
पदवी
या
संथेने पद्यव्युत्तर पदवी स्तरावरील फॅशन कम्युनिकेशन हा दोन वर्षे कालावधीचा
अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याह विषयातील पदवीधराला प्रवेश
मिळू शकतो. हा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना कंटेट रायटिंग फॉर
फॅशन ॲण्ड लाइफस्टाइल, ब्लॉग्ज ऑन सोशल मीडिया, फिल्म प्रॉडक्शन हाउुस, न्यूजपेपर
,मॅगेझिन, टेलिव्हिजन, फॅशन इव्हेंट डिझाइन हाउुस, फॅशन
बँड्स ॲण्ड डिझाइन हाऊस, पब्लिक रिलेशन एजन्सिज ॲण्ड फॅशन डिव्हिजन्स येथे संधी
मिळू शकतात.
·
0000
(२) सिम्बॉयसीस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन- या संस्थेने बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला सिम्बॉयसीस एन्ट्रस टेस्ट या चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. अर्हता-कोणत्याही विषयातील 12वी/ कालावधी - चार वर्षे.
प्लेसमेंट-
पुढील कंपन्यांमध्ये सिम्बॉयसीस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे
अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
मिळाले आहे- ॲक्सेंचर इंडिया, ॲपना इंडिया, ॲबिल पुणे फॅशन वीक, ॲसेलेरे
सॉफ्टवेअर, एम्स डिजिटल सर्विस, एकेजी मीडिया, ॲलिअस डिझाइन, आर्ट कंपनी डेकॉर,
आर्टिफेक्स मीडिया, ॲटलास कोप्को, बूक माय शो, बियू मॅच डिझाइन, ब्रॉडकास्ट टू
वर्ल्ड, बझ फॅक्ट्री, कूपन दुनिया, सिनामन डिझाइन,सीकेएस कंसलटिंग, क्लिक लॅब्स,
क्लिक मीडिया, क्रॉफ्ट डिझाइन, क्रॉफ्ट यूएक्स, क्रिओ लॅब्स, डेलॉइट, डेकॉरबिज
इंडिया, देस्तो क्रिएटिव्ह सोल्युशन्स, डायरेक्टी, डूडल, दृष्टी सॉफ्ट सोल्युशन्स,
एक्सटेंशिआ इंर्फमेशन टेक्नॉलॉजी, इत्यादी.
हा
अभ्यासक्रम केल्यावर ट्रेंड फोकास्ट्स, फॅशन जर्न्यालिझम, पब्लिक रिलेशन्स, फॅशन
ॲडव्हर्टायजिंग, स्टाइल कंसलटंसी, स्टोअर इव्हेंट्स मॅनेजमेंट, कॅटवाक शोज,
एक्झिबिटिंग फॅशन प्रॉडक्ट इन गॅलरिज अशा ठिकाणी हा अभ्यासक्रम केलेल्या
विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
पत्ता- सिम्बॉयसीस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, 231/4ए,
विमान नगर पुणे- 411014, दूरध्वनी- 020-2663 4546, संकेतस्थळ- www. sid.edu.in , ईमेल-admissions@sid.edu.in, चाळणीपरीक्षेसाठी www.set-sid.com संकेतस्थळावर नोंदणी करता येते.
(३) रॅफ्लेस डिझाईन इंटरनॅशनल या संस्थेने (1) बॅचलर
ऑफ आर्ट्स इन इंटरनॅशनल फॅशन बिझिनेस हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी-
तीन वर्षे.हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना फॅशन जगातील मार्केटिंग विश्वात
चांगल्या तऱ्हेने संचार करता येऊ शकताते. विद्यार्थ्यांना पब्लिक रिलेशन मॅनेजर,
फॅशन इव्हेंट मॅनेजर, फॅशन ब्रँड मॅनेजर, फॅशन एडिटर, फॅशन जर्न्यालिस्ट, फॅशन
फोटोग्रॅफर, फॅशन स्टायलिस्ट, फॅशन क्युरेटर आदी करीअर संधी मिळू शकतात.
पत्ता- रॅफ्लेस डिझाईन इंटरनॅशनल,
द मास्ट पिस, मरोळ मेट्रो स्टेशन, मरोळ अंधेरी पूर्व मुंबई- ४०००५९ संकेतस्थळ - raffles-design-institute.com/india
.jpg)
Comments
Post a Comment