स्मार्ट लग्नाचा सुंदर इव्हेंट


 

स्मार्ट लग्नाचा सुंदर इव्हेंट

लग्न सोहळा आता प्रतिष्ठेची बाब ठरु पाहतेय. क्रयशक्ती वाढल्याने, वधुपक्ष  आणि वरपक्ष प्रत्यक्ष लग्न जुळायच्या आधी वेडिंग प्लॅनरकडे जायला लागले आहेत.

प्रत्येक तरुण - तरुणींसाठी लग्नाचे महत्व आणि त्यांच्या आई-बाबांसाठी लग्नसोहळ्याचे महत्व खूप मोठे असते. पूर्वी लग्नसोहळे धुमधडाक्यात होतच असत. सध्या याधुमधडाक्याला स्मार्टनेसचा पेहराव चढवण्यात येतो. लग्नसोहळा,  स्मार्ट-सुंदर-संस्मरणीय-देखणा-प्रतिष्ठा वाढवणारा-चर्चा घडवून आणणारा-हम भी कुछ नही हे सिध्द करणारा, असा व्हावा , असं केवळ उच्चभ्रूंनाच वाटत नाही तर उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय यांना वाटू लागले आहे.

समाजातील हा बदल इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात असलेल्या तज्ज्ञांनी बरोबर हेरला. त्यातूनच वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट ,ही स्पेशलाइज्ड शाखा उदयास आली. आता याशाखेची पाळेमुळे खोलवर रुजू लागली आहेत. एकदा लग्न जुळले की वेडिंग प्लॅनरला कळवायचे, मग तो किंवा ती आणि त्यांची कंपनी ग्राहकाच्या म्हणजेच वधु किंवा वरपक्षाच्या आर्थिक स्थितीनुसार संपूर्ण लग्न सोहळ्याची आखणा-मांडणी आणि अंमलबजावणी करतात. वऱ्हाड्यांनी फक्त आनंद मनवायाचा असतो.

लग्न सोहळयाच्या सर्व, अडचणी-त्रास-अडथळे-समस्या दूर करण्याचे तंत्र आणि कौशल्य या विषयाचे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना शिकवले जाते. सध्या वेडिंग प्लँनिग हे मोठ्या शहरांपुरते मयादित असले तरी येणाऱ्या काळात हे लोण  दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये पोहचण्याची चिन्हे आहेत. रोजगार आणि स्वयंरोजगारास चालना देणारे हे क्षेत्र आहे. विविध घटकांची जुळवाजुळव करण्याची क्षमता आणि कौशल्य असलेली व्यक्ती या व्यवसायात यशस्वी होऊ शकते. कोणत्याही विषयातील १२ वी पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना परिश्रम करण्याची आणि नवे आव्हान स्वीकारण्याची मानसिकता असेल तर या व्यवसायत जम बसवता येऊ शकतो.

डिप्लोमा इन वेडिंग मॅनेजमेंट

या अभ्यासक्रमाच्या कालावधीत अधिकाधिक लग्न सोहळयांच्या इव्हेंट्सच्या भेटी आयोजित केल्या जातात. पुष्पसजावट करणाऱ्या कलावंतांसोबत कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विवाह सोहळयाशी संबंधित सर्व पैलुंचा अनुभव मिळावा यासाठी जास्तितजास्त संधी दिली जाते. या प्रात्यक्षिकांमुळे उमेदवारांना नेटवर्किंग करणे सुलभ होते. शिवाय त्याला या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची प्रत्यक्ष माहिती होते.

अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं?

या अभ्यासक्रमात  () इव्हेंट मॅनेजमेंट आणि विवाह सोहळा नियोजन या विषय घटकाची तोंड ओळख, () विवाह सोहळ्यातील नियोजनाचे टप्पे, () विवाह सोहळा संस्कृती आणि परंपरा, () लग्नसोहळ्यातील सर्जनशीलता,  () विवाह सोहळयासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तुंची खरेदी, () लग्नसोहळा निमंत्रण, () लग्नसोहळ्यातील भेट वस्तू, () छायाचित्रण आणि व्हिडिओग्रॅफी, () लग्नसोहळयातील भोजन व्यवस्था, (१०) ध्वनी आणि प्रकाश योजना, (११) कार्यक्रम स्थळाची रेकी, (१२) खर्चाचा आराखडा, (१३) ग्राहकांसोबतच्या बैठका, (१३) सादरीकरण आणि विक्रीची मूलभूत तत्वे, (१४) लाइव्ह इव्हेंट, (१५) डेस्टिनेशन वेडिंग

या सहा महिन्याच्या कालावधीत उमेदवाराने केलेली कामगिरी आणि त्याचा कल , दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्वाचे पैलू बघून त्यांची नावे वेगवेगळया लग्नसोहळा – इव्हेंट व्यवस्थापन कंपन्यांकडे प्लेसमेंटसाठी पाठवली जातात. स्थानिक आणि जागतिक पातळीवरील विवाह सोहळा इव्हेंट व्यवस्थापनाविषयी सध्यस्थितीबद्दल या अभ्यासक्रमाच्या कालावधीत माहिती करुन दिली जाते.

विवाह सोहळा देखणा आणि आखिव- रेखीव होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे कौशल्य प्राप्त होते. विवाह सोहळ्यासंदर्भात परंपरा  आणि त्यांचा विवाह सोहळयावर होणारा परिणाम याविषयी माहिती मिळते. विवाहसोहळयाचे संपूर्ण नियोजन, संकल्पना, तयार करणे  आणि वधु-वरांपुढे प्रभावीरीत्या सादर करण्याचे कौशल्य प्राप्त होते. आंतराराष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणाऱ्या विविध पध्दतींचा सर्जनशीलरीत्या उपयोग करता येतो आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळल्याचे समाधान प्राप्त करुन देता येते.  उपलब्ध निधीमध्ये प्रभावी काम करण्यासाठीचे तंत्र अवगत करता येते. विवाह सोहळयासाठी ग्राहकांची इच्छा आणि आकांक्षा यानुसार बजेटिंग करण्याचे कौशल्य उमेदवारास प्राप्त होतो. प्रात्यक्षिकाचा अधिकाधिक अनुभव मिळाल्याने विवाह सोहळयात येणाऱ्या अनपेक्षित समस्यांना सकारात्मकरीत्या हाताळण्याचे कौशल्य प्राप्त होते. हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार काही वर्षाच्या अनुभवानंतर स्वत:ची वेडिंग इव्हेंट प्लॅनिंग कंपनी सुरु करु शकतात.

संपर्क- संकेतस्थळ- http://emdiworld.com

०००

सर्टिफिकेट इन प्रोफेशनल वेडिंग प्लॅनिंग

रॉयल इंस्टिट्यूटन या संस्थेने हा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन महिने. लग्न सोहळा व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करु इच्छिणारी कोणतीही व्यक्ती हा अभ्यसक्रम करु शकतो. हा अभ्यासक्रम केल्यावर, सर्टिफिकेट इन प्रोफेशनल वेडिंग प्लॅनिंग, हे प्रमाणपत्र दिले जाते. या अभ्यासक्रमात विवाह सोहळ्याच्या स्थान निश्चितीचे किंवा डेस्टिनेशनच्या निवडीचे तंत्र शिकवले जाते. संसाधनाचा सुयोग्य उपयोग, बजेटिंग, वेळेचे व्यवस्थापन, इतर व्यावसायिक (उदा. कॅटरर्स, पुष्प सजावटकार, मंडप बांधणीकार, मंडप डेकोरटेर, डीजे इत्यादी) घटकांसोबतचा समन्वय आणि विवाह सोहळयाच्या दिवशीचे सूक्ष्म नियोजन

करिअर संधी-  वेडिंग प्लॅनिंग व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम केल्यावर (1) वेडिंग व्हेन्यू कुऑर्डिनेटर, (2) वेडिंग कंसलटंट, (3) वेडिंग प्लॅनर, (4) असिस्टंट टू वेडिंग प्लॅनर अशा सारख्या रोजगार संधी मिळू शकतात.  (5) स्वत:ची वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट स्टार्ट अप  किंवा कंपनी सुध्दा सुरु करता येऊ शकते.

संपर्क संकेतस्थळ- http://www.royaleinstitution.com

 ईमेल-  admin@royaleinstitution.com

०००

 

ईएमडीआय- या संस्थेचे अभ्यासक्रम-

() डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट -  अर्हता-  कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. () पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट- अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण.  

संपर्क- ११/१२, फर्स्ट फ्लोअर, फोरम बिल्डिंग रघुवंशी मिल्स कंपाउंड,  सेनापती बापट मार्ग, लोअर परळ-पश्चिम, मुंबई-४०००१३, दूरध्वनी-०२२-६१४७९९०७, संकेतस्थळ- http://emdiworld.com, ईमेल- admission@emdiworld आणि  mumbai@emdiworld.com

०००

पर्ल अकॅडेमी

पोस्ट ग्रॅज्यूएट प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेंट ॲण्ड एक्सपिरियंशल मार्केटिंग. अभ्यासक्रमाचा कालावधी - ११ महिने. हा अभ्यासक्रम कोणत्याही विषयातील १२वी उतीर्ण उमेदवाराला करता येतो. या अभ्यासक्रमाला इव्हेंट्स आणि एक्सपिरियंशल मार्केटिंग अशोशिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. या अभ्यासक्रमात रोड शोज, ब्रँडेड इव्हेंट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, सामाजिक राजकीय इव्हेंट्स, धार्मिक इव्हेंट्स, आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स, दूरचित्रवाहिन्यांवरुन प्रक्षेपित होणारे इव्हेंट्स ,विवाह सोहळयांचे व्यवस्थापन , इतर कौटुंबिक सोहळ्यांचे आयोजन अशा सारख्या इव्हेंट्सच्या व्यवस्थपानाचे प्रशिक्षण दिले जाते. इव्हेंट नियोजन, ग्राहक सेवा, प्रायोजकत्व मिळवणे, विक्री, इव्हेंट डिझायनिंग, बजेटिंग, कार्यान्वयन व्युहनीती, इव्हेंट सादरीकरण्यासाठी आवश्यक असणारे कायदे, शासकीय परवानग्या, पांरपरिक आणि समाजमाध्यमांचा इव्हेंट प्रसिध्दीसाठी उपयोग, इव्हेंटचे डाक्युमेंटेशन आदी बाबींवर भर दिला जातो.

या अभ्यासक्रमात इव्हेंट्स अर्थ समजण्याची प्रकिया, विपणन, ब्रँड कम्युनिकेशन, संकल्पना-समन्वयन-नियंत्रण, एकात्मिकरण आणि अंतिम सादरीकरणाच्या तत्वाची माहिती दिली जाते. इव्हेंट सादर करणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, इव्हेंटचे अर्थकारण ,इव्हेंटच्या दिवशीचे व्यवस्थापन, भविष्यातील इव्हेंट व्यवस्थापनाचे प्रवाह, शास्वतता, तंत्रज्ञानाचा उपयोग, इव्हेटंचे लेखा परीक्षण, इव्हेंट स्थळाचे डिझाइनसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या थ्रीडी, फोटो शॉप कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअरचा उपयोग या बाबी शिकवल्या जातात.   संकेतस्थळ -pearlacademy.com

प्लेसमेंट - चांगल्या व दर्जेदार इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना पुढील कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या संधी मिळाल्या आहेत - गुजरात टुरिझम, फ्रिमँटल मीडिआ ,फिकी, फाउंटेन हेड, पर्सेप्ट डी मार्क, क्लॉक वर्क, विज क्रॉफट, सीआयआय, ग्रीन लिव्हज मॅनेजमेंट, एलजेएस, टाइम्स बॉक्स, ग्रीन चिलिज,  विवा इव्हेंट्स ,ट्रु इव्हेंट्स , फ्युजन इव्हेंट्स , शामक दावर, एबीइसी, पिको इंटरनॅशनल, गांधी कॉर्पोरेशन, प्रसंग इव्हेंट्स, कँडिड कम्युनिकेशन, रेड चेरिज, आयडियाज अनलिमिटेड, रिलायन्स जिओ,लेफ्ट कॅम्प आऊट,सेवन बाय सेव्हन एंटरटेनमेंट,टाइम्स रेड सेल ॲबसोल्युट इव्हेंट्स, कोकोनट मीडिआ, फूड लिंक, ग्लोबल फार्मा, मोझॲक इव्हेंट्स, दिव्य भास्कर, राजस्थापन पत्रिका, रजमटाज इव्हेंट्स,  इव्हेंट्स तडका, कोठारी ज्वेलर्स, आर वन, स्टर्लिंग हॉस्पिटल, अदानी ग्रुप या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.

०००

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी