पुढे काय? हा प्रश्न मिटवणारे स्मार्ट अभ्यासक्रम
पुढे काय? हा प्रश्न
मिटवणारे स्मार्ट अभ्यासक्रम
आपण जे काही शीकतो,त्यानंतर
पुढे काय? हा प्रश्न बहुतेक सर्वांना पडतो. आपल्या देशातील शासनाच्या काही शैक्षणीक
संस्थांमध्ये प्रवेश मिळाला तर १०० टक्के उत्तम
व स्मार्ट करीअर घडू शकतं. तथापि अपवाद वगळला तर अल्प प्रमाणात मराठी मुले या संस्थांमध्ये
जात असतात.
स्मार्ट करिअर घडवणाऱ्या संस्था
१) इंडियन
इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएम. या संस्थेच्या इंदौर,रांची,रोहतक,बोधगया
आणी जम्मू या पाच कॅम्पसमध्ये १२वी नंतरचा पाच वर्षे कालावधीचा इंटीग्रेटेड एमबीए अभ्यासक्रम
करता येतो. विद्यार्थी जेव्हा १२वी होतो,तेव्हा त्याचं वय १७ -१८ वर्षे असतं. या अभ्यासक्रमाला
प्रवेश मिळाला तर २३ व्या वर्षी किमान १० ते १५ लाखाचं पॅकेजसह उत्तम नोकरी त्याला
मिळू शकते. आपल्यापैकी काही जणांना याची माहीत असेल. बऱ्याच जणांना नसण्याची शक्यता
आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतून १२वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू
शकतो.
२)आपण
जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा बाटा पादत्राणांचे मोठे जाहीरात फलक आपलं लक्षं वेधून
घेतात.त्यावर सध्या दीशा पाटणी ही अभीनेत्री हसत हसत आणी कार्तिक आर्यन हा अभीनेता
उड्या मारत आकर्षीत करतात. दर सहा महीन्याला नव्या डिझाइनचे पादत्राणे(बूट-चप्पल) बाटा
कंपनी मार्केटमध्ये आणते. तुमच्या मनात प्रश्न
निर्माण व्हायला हवा की दर सहा महिन्याला नवे डिझाइन कोण करतं. या संदर्भातील चार वर्षे कालावधीचा
अभ्यासक्रम भारत सरकारच्या फूट वेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने सुरु
केला आहे. हा अभ्यासक्रम सुध्दा कोणत्याही शाखेतून १२वी झालेल्या विद्यार्थ्यास करता
येतो. यासंस्थेचे १४ शहरांमध्ये कॅम्पस आहेत. शंभर टक्के प्लेसमेंट देणाऱ्या या अभ्यासक्रमाला
अभावानेच मराठी मुलं जात असतात.
३) नुकतीच वन डे क्रिकेट इंटरनॅशनल स्पर्धा पार पडली. त्याच्याआधी आयपीएल स्पर्धा पार
पडली. या स्पर्धा आता केवळ खेळाडूंच्या राहीलेल्या नाहीत. त्या एका मोठ्या व्यवसाय
उद्योगाच्या भाग बनल्या आहेत.या स्पर्धांच्या आयोजनाच्या असंख्य बाबी सांभाळण्यासाठी
प्रशीक्षीत उमेदवारांची गरज भासते. पुढील काही वर्षात या क्षेत्रासाठी मागणी जास्त
आणी पुरवठा कमी अशी परीस्थीती असेल, अशा निष्कर्ष
नॅशनल स्कील डेव्हलपमेंट काउंसीलने काढला आहे.क्रीडा व्यवस्थापकाचे प्रशीक्षण
देणारा पदवी आणी पदव्युतर पदवी अभ्यासक्रम मुंबईतील इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्पोर्ट्स
मॅनेजमेंटने सुरु केला आहे.कोणत्याही शाखेतील १२वी किंवा पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याना
प्रवेश मिळू शकतो.मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इंस्टीट्यूटने सुध्दा असा अभ्यासक्रम
सुरु केला आहे.
४) मुंबई अथवा कोणत्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानताळावर
शेकडो विमाने उतरतात नि उडतात. एकाच वेळी किमान
आठ ते दहा कामे एक विमान उतरले की सुरु होतात.ही कामे करण्यासाठी प्रशीक्षीत मनुष्यबळाची
गरज मोठ्या प्रमाणावर भासते.ही बाब लक्षात घेऊन भारत सरकराच्या राजीव गांधी नॅशनल
एवीएशन युनिर्व्हसीटीने ,पोस्ट ग्रॅज्युएट
डीप्लोमा इन एअरपोर्ट मॅनेजमेंट हा दीड वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
यात सहा महिन्याची पेड इंटर्नशीप आहे. १०० टक्के प्लेसमेंट आहे. तथापि या अभ्यासक्रमालाही
फार कमी मराठी मुलं जात असल्याचं दिसून आलं
आहे. असाच अभ्यासक्रम बॉम्बे फ्लाईंग क्लबनेही सुरु केला आहे.
५)आयआयटी म्हणजेच इंडियन इंस्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत
कोणत्याही शाखेतील १२वी झालेल्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळू शकतो,हे आपल्यापैकी बऱ्याच
जणांना ठाऊक नसते. आयआयटी मुंबईच्या स्कूल ऑफ डिझाइन मध्ये अशी संधी मिळू शकते.या
संस्थेतील प्रवेशासाठी स्वतंत्र चाळणी परीक्षा घेतली जाते. गेल्या दोन वर्षापासून या
परीक्षेतील गुणांचा आधार घेऊन आयआयटी हैदराबाद,आयआयटी दील्ली,आयआयटी गौहाटीच्याही
स्कूल ऑफ डिझाइनमध्ये प्रवेश मिळू शकतो.
आयआयटी मद्रास मध्ये
गेल्या वर्षी पर्यंत कोणत्याही शाखेतील १२वी झालेल्या विद्यार्थ्यांना इंटीग्रेटेड
एम ए इन डेव्हपमेंटल स्टडीज व एम ए इन इंग्लीश स्टडीज या अभ्यासक्रमाला प्रवेश
दीला जात असे. यंदापासून कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना
प्रवेश दिला जाईल. यंदापासूनच एम ए इन इकॉनॉमीक्स हा अभ्यासक्रमसुध्दा सुरु
करण्यात आला आहे.
६) इंडियन मेरीटाईम युनीव्हर्सीटीने बॅचलर ऑफ ॲडमीनीस्ट्रेशन
(बीबीए)इन मेरीटाईम लॉजीस्टीक हा तीन वर्षे
कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे.यामध्ये एक वर्षाची पेड इंटर्नशीप आहे. या शीवाय बीबीए इन लॉजीस्टीक,रिटेलींग ॲण्ड ई कॉमर्स
हा अभ्यासक्रम सुध्दा करता येतो. दोन्ही अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२वी झालेल्या विद्यार्थ्यास करता येतात.
७)नवी मुंबई परीसरातील खारघर येथे नॅशनल इंस्टीटयूटऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे
देशातील सर्वोत्कृष्ट कॅम्पस आहे. या ठिकाणी पदवी आणी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसोबतच
कौशल्य निर्मितीचे अल्प कालावधीचे अभ्यासक्रम करता येतात.त्यापैकी एका अभ्यासक्रम आहे
- कंटेमप्रेरी ब्रायडल डीझाइन.
सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे.लग्न तुमच्या आमच्या सारख्यांच्या
घरचे असो की अंबाणीसाहेबांच्या घरचे असो,नववधूच्या पोषाखाला सर्वाधीक महत्व दिले जाते.
सध्या डीझायनर पोषाखच हवे असतात. या अनुषंगाने
हा सहा महीने कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम
कोणत्याही शाखेतील १२ वी झालेल्या विद्यार्थ्यास करता येतो. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षीकांवर अधीक भर दिला जातो.
तो केल्यावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी सहजतेने मिळू शकतात.
ही काही नमुन्यादाखल स्मार्ट अभ्यासक्रमांची माहीती आहे.
हे अभ्यासक्रम केल्यास आपले पुढे काय होणार, कसे होणार हे प्रश्न नक्कीच मिटू शकतात.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment