चलो,अलग सोचते है! भाग दोन


 

चलो,अलग सोचते है!  भाग दोन

कोणताही ऑफबिट अभ्यासक्रम  किंवा प्रशिक्षण हा कौशल्य निर्मितीला चालना देणारा असतो. याचा अर्थ हा अभ्यासक्रम केल्यावर एखादी कला किंवा तंत्र हस्तगत करता येणे शक्य होते. अशी कला किंवा तंत्र हे तुम्ही कशारीतिने वापरता किंवा त्याचा उपयोग करता यावर संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे अवलंबून असते. मात्र ज्यांच्या मनात ऑफबिटचा किडा वळवळत असतो, त्यांची गाडी सुसाट सुटू शकते,याची असंख्य उदाहरणं आपल्या अवती भवती दिसतातच की..

 

इलुस्ट्रेशन फॉर फॅशन इंडस्ट्री

फॅशनचे ट्रेंड सतत बदलतात,असं आपण सतत ऐकत असतो.याचा अर्थ असा की मार्केटमध्ये दर पंधरवाडयात किंवा महिन्यात नवे आकर्षक असे पोषाख आणि वेगवेगळया प्रकाराचे परिधान येतात. वेगळवेगळी रंगसंगती,आकार आणि स्टाइलच्या या पेहराव/पोषाख/परिधानाकडे ग्राहक चटदिशी आकर्षित होतो. फॅशनच्या नव्या आकर्षक कल्पना या आधी कागदावर उतरतात.त्याबरहुकूम मग पोषाखांचे डिझाइन करुन यंत्राव्दारे त्यास मूर्तरुप दिले जाते.फॅशन उद्योगात म्हणूनच डिझायनिंगची पहिली कल्पना कागदावर उतरवण्याचे कौशल्य प्राप्त केलेल्या इलुस्टेशनकारास किंवा रेखाटन कारकास महत्वाचे स्थान मिळतं. या विषयाशी संबधित सहा म‍हिने कालावधीचा अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या दिल्ली कॅम्पस येथे सुरु उकरण्यात आला आहे.कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास इलुस्ट्रेशन फॉर फॅशन इंडस्ट्री,हा अभ्यासक्रम करता येतो.या कलेत जितकी पारंगतता मिळवू,तितकी अधिक संधी हे मात्र ध्यानात ठेवायला हवे.एकावेळी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

संपर्क-नॅशनल इंस्टिटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी,हौज खास,गुलमोहर पार्क जवळ,नवी दिल्ली-११००१६,दूरध्वनी-०११-२६८६७७०४,ईमेल-campusdirectordelhi@gmail.com,director.delhi@nift.ac.in संकेतस्थळ-https://www.nift.ac.in/delhi

०००

चला,मटन शिकू या..

कुकरी म्हणजे विविध पदार्थ बनवण्याची कला, आई-आजी-काकू-दिदी-वहिनी एकमेकींचं आवडीनं बघत आणि प्रत्यक्ष हात चालवून शिकतात.मात्र ज्यांना ही कला शिकता आली नाही त्यांचं काय?किंवा एखाद्यास किंवा एखादीस जर काही स्पेशलाईज्ड डिशेश तयार करण्याची कला शास्त्रशुध्द पध्दतीने शिकायची असेल तर काय करायचं?त्यातही मटनाच्या विविध प्रकारात पारंगतता मिळवायची असेल तर?

तर अशी व्यवस्था आणि‍िसु‍विधा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजेंट या संस्थेनं उपलब्ध करुन दिलीय.भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेचं मुंबईतलं कॅम्पस दादर येथे आहे. या संस्थेन कुकरी या विषयाशी निगडित १२ आठवड्यांचा
अभ्यासक्रम सुरु केलाय.कोणत्याही विद्याशाखेतील १२वी उत्तीर्ण तरुण-तरुणीला हा अभ्यासक्रम करता येतो.या अभ्यासक्रमात  विविध पदार्थांच्या निर्मितीचे प्रशिक्षण दिलं जातं.यामध्ये मटनाच्या पुढील विविध प्रकारांचा समावेश आहे.() मुर्ग मुस्सलम, ()मुर्ग मखणी,() मुर्ग डुंगरी,() मुर्ग रोगिनी,() मुर्ग मेथी,()मटन धनसक,() मटन मुल्लीगटवनी,() मटन कोल्हापुरी,() मटन सागवाला,(१०) आचारी गोस्त, (११)‍गोवन फिशकरी‍,(१२) चिकन छेत्तीनाद, (१३) धानीवल खोर्मा, (१४) मालवणी कोंबडी वडा, (१५) मच्छी अमृतसरी,(१६) पत्राणी मच्छी.

हे प्रशिक्षण जुलै ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते एप्रिल या कालावधीत १२ आठवडे, सोमवार ते शुक्रवार दुपारी ते दुपारी या वेळेत घेतलं जातं.संपर्क- इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन,वीर सावरकर मार्ग,दादर पश्चिम,मुंबई-४०००२८,दूरध्वनी-०२२-२४४९५७४१, ईमेल- info@ihmctan.edu, संकेतस्थळ ihmctan.edu

000

फायनांशिएल मार्केट्स (राइड्स ऑन इनव्हेस्टमेंट)

वित्तीय नियोजन,गुंतवणूक,शेअर मार्केटस या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी दडलेल्या आहेत. प्रारंभिक अभ्यासपूर्ण केल्यानंतर चिकाटीने टिकून राहिल्यास लक्ष्मी देवताप्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.

मुंबईतील केसी कॉलेजने या अनुषंगाने सर्टिफिकेट कोर्स इन फायनांशिएल मार्केट्स (राइड्स ऑन इनव्हेस्टमेंट) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो. मात्र त्यास या क्षेत्राबद्दल उत्सुकता आणि आवड हवी तसेच परीश्रम करण्याचीही तयारी हवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी ४५ तासांचा आहे. साधारणत: २३ वर्ग (सेशन) होतात. प्रात्याक्षिकांवर अधिकाधिक भर दिला जातो.शेअर मार्केटमधील खरेदी विक्रीचे ज्ञान दिले जाते. त्यामुळे लहान वयातच मुले-मुली सुयोग् गुंतवणुकीचा श्रीगणेशा करु शकतात.

संपर्क- के.सी.कॉलेज, १२४ दिनशा वाच्छा रोड,चर्चगेट मुंबई-४०००२०, दूरध्वनी- ०२२-२२८५५७२६, ईमेल- support@kccollegw.edu.in.संकेतस्थळ-https://www.kccollege.edu.in/

०००

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी