जरा हटके सोचो : भाग तीन


 

जरा हटके सोचो : भाग तीन

वेगवेगळया क्षेत्रातील कौशल्य विकासाला सध्या सर्वत्र प्राधान्य दिलं जात आहे. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी असे कौशल्य उपयुक्त ठरत असल्याचं सिध्द झालं असल्याने अशा अभ्यासक्रमांना मागणीही वाढत आहे. यंदा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र किंवा आयटीआय मध्ये १० मध्ये ९० टक्के गुण मिळवलेल्या ब-याच विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केल्याचे दिसून आले.आयटीआय मध्ये कौशल्य निर्मितीचे असंख्य अभ्यासक्रम करता येतात. हे अभ्यासक्रम केल्यावर आपण स्वबळावर उभे राहू शकतो,याची खात्री बऱ्याच जणांना पटल्याचा हा पुरावाच ठरतो. कौशल्य प्राप्ती ही कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यात प्राविण्य मिळवले तर, कुणालाही पुढे काय करायचे? ही समस्या भेडसावीत नाही.

स्टायलिस्ट फॉर इंटेरिअर्स

पर्ल ॲकॅडेमी ही डिझाइन क्षेत्रातील एक महत्वाची खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेने  १० वी उत्तीण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य निर्मितीचे बरेच अभ्यासक्रम सुरु केले आहेत.त्यापैकी एक अभ्यासक्रम आहे-सर्टिफिकेट कोर्स इन स्टायलिस्ट फॉर इंटेरिअर्स. कालावधी- ११ महिने. यामध्ये इंटेरिअर ॲण्ड सेट डिझाइन, इंटेरिअर स्टायलिंग फॉर कर्मशिअल स्पेसेस, स्टायलिंग फॉर होम, टेक्सटाईल ॲण्ड ट्रेंड फोरकास्टिंग, या विषयघटकांचा समावेश आहे.  

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात-(१) इंटेरिअर डेकोरेटर्स, (२) इंटेरिअर ‍डिझायनर्स, (३) स्टायलिस्ट वुइथ फर्निशिंग इंडस्ट्री, (४) स्टायलिस्ट वुइथ इंटेरिअर फर्म्स, (५) इंटेरिअर ‍डिझायनर्स /स्टायलिस्ट (६) सोर्सिंग मॅनेजर वुइथ इंटेरिअर ॲण्ड फर्निचर फर्म्स (७)डिझायनर कंसलटन्ट (मॅगेझिन/इव्हेंट्स/हॉटेल्स)

संपर्क- https://pearlacademy.com/academics/courses

०००

 

वैद्कीय क्षेत्रासाठी कौशल्य

 सध्या वैद्यकीय क्षेत्र आणि आरोग्य सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्राचा आधार डॉक्टर आणि परिचारिका आणि परिचर असले तरी आता याही क्षेत्रात डॉक्टरांच्या साहाय्यासाठी वेगवेगळे कौशल्य प्राप्त केलल्या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. ही गरज भागवणारे काही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम पी.डी हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरने सुरु केले आहेत. या अभ्यासक्रमांना राज्यशासनाचे कौशल्य विकास मंडळ आणि केंद्र सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषदेने मान्यता प्रदान केली आहे.

हे अभ्यासक्रम‍ पुढील प्रमाणे आहेत-(१) मेडिकल रेकॉर्डस ॲण्ड हेल्थ इन्फॉर्मेशन टेक्निशिअन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-सहा महिने, अर्हता-कोणत्याही विषयातील पदवीधर, (२) आयसीयू टेक्निशिअन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं, अर्हता-बीएसस्सी, (३) ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं, अर्हता-बीएसस्सी, (४) रेडिऑलॉजी टेक्निशिअन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं,अर्हता-बीएसस्सी, (५) पॅथॅलॉजी टेक्निशिअन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी- एक वर्षं, अर्हता-बीएसस्सी, (६) डायलेसीस टेक्निशिअन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं,अर्हता-बीएसस्सी, (७) डायलेसिस टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम, कालावधी-दोन वर्षे,अर्हता-१२वी विज्ञान  शाखा, (८) मेडिकल लॅब टेक्नॉलाजी पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-दोन वर्षे, अर्हता- १२ वी विज्ञान  शाखा,  (९) सेंट्रल स्टराइल सप्लाय डिपार्टमेंट असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी एक वर्षं,अर्हता-कोणत्याही विषयातील पदवीधर, (१०) हॉस्पिटल फ्रंटडेस्क कुऑर्डिनेटर,कालावधी सहा महिने,अर्हता-कोणत्याही विषयातील बारावी, (१०) जनरल ड्युटी असिस्टंट अभ्यासक्रम, कालावधी-सहा महिने,अर्हता-दहावी.

हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी सहाय्य केले जाते.

संपर्क-पी.डी हिंदुजा हॉस्पिटल, ललिता गिरधर टॉवर एक, तळ मजला, दिलीप गुप्ते रोड, माहीम, मुंबई-१६, दूरध्वनी-८२९१७५८०६० ,संकेतस्थळ-www.hindujahospital.com/academics, ईमेल-

alliedhealthscience

0000

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी