जरा हटके सोचो : भाग चार


 

जरा हटके सोचो : भाग चार

पर्सनल स्टायलिंग ॲण्ड इमेज कंसलटन्सी सर्टिफिकेट-

या अभ्यासक्रमाचा कालावधी-११ महिन्यांचा आहे. १० वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो. या अभ्यासक्रमात- पर्सनल स्टायलिंग, पॉवर ऑफ इमेज, मेकअप ॲण्ड हेअर स्टायलिंग, पर्सनल ब्रँडिग या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

आजच्या काळात प्रत्येकाची स्टाईल ही त्याची ओळख बनते. ही स्टाइल त्याच्याविषयी शब्दातील वर्णनापेक्षा अधिक सांगून जाते. या अभ्यासक्रमामध्ये व्यक्तीगत‍ स्टायलिंग, स्व: सादरीकरणाचे तंत्र आणि व्यवस्थापन, प्रतिमा निर्मिती आणि तिचे उन्नतीकरण, फॅशन आशयाची निर्मिती  आणि संवाद कौशल्ये यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना सैध्दांतिक माहिती दिली जाते आणि संकल्पना स्पष्ट केल्या जातात. व्य‍क्तीमत्व उठावदार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषाखांचा साठा, व्यक्तीमत्वानुसार अशा पोषख निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे डिजिटल स्टायलिंग आदी बाबी शिकवल्या जातात.

संपर्क https://www.pearlxstudio.com/course/personal-styling-and-image-consultancy

०००

डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन

बॉम्बे फ्लाईंग क्लब या संस्थेने एक वर्षं कालावधीचा, डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने सुरु केला आहे. विमानतळावरील व्यवस्थापकीय आणि पर्यवेक्षीय जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना कार्यान्वयन (ऑपरेशन), टर्मिनल मॅनेजमेंट, एअर साईड ड्युटीज, वित्त, सुरक्षा, मनुष्यबळ विकास, वाहतूक व्यवस्थापन, नियामकांची भूमिका (रेग्युलेटरी रोल) आदी करिअर संधी मिळू शकतात. अर्हता - कोणत्याही विषयातील पदवी. १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. किंवा १० वीनंतर वर्षे कालावधीची गणित विषयासह अभियांत्रिकी पदविका किंवा ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स या विषयातील पदविका.

करिअर संधी- हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात. () एअरपोर्ट सुपरव्हायजर, () एअरपोर्ट मॅनेजर, () एअरपोर्ट ऑपरेशन्स मॅनेजर, () एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर, () एअरलाइन ॲण्ड स्टाफ मॅनेजर, () कार्गो मॅनेजर, () एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोलर, () फायनांशिअल ॲनॅलिस्ट फॉर एअरलाइन्स, () एविएशन फॅकल्टी.

 संपर्क - बॉम्बे फ्लाईंग क्लब, जुहू एरोड्रम, नानावटी रुग्णालयाच्या विरुध्द दिशेला, एस.व्ही रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६

(५) सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंस्टिट्यूट फॉर डिझाइन इलेक्ट्रिकल मेझरेमेंट्स इंस्ट्रुमेंटेशन या संस्थेने कौशल्य निर्मिती आणि रोजगार स्वयंरोजगास प्राधान्य देणारे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

(१) ॲनिमेशन ॲण्ड  मल्टिमीडिया टेक्नॉलॉजी- या अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. (२) ॲडव्हान्सड वेब डिझायन ॲण्ड ॲनिमेटर - दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने.

(३) थ्री डी-ॲनिमेशन ॲण्ड  स्पेशल इफेक्टस, - या अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने . १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो.

संपर्क- स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन चुनाभट्टी, मुंबई २२ संकेतस्थळ-https://idemi.org/ ईमेल-training@ idemi.org

सुरेश वां सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रुम  येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. कालावधी- चार वर्षे.

(२) सर्टिफिकेट कोर्स इन मशिनिस्ट- कालावधी दोन  वर्षे. (३) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स-कालावधी तीन वर्षे.  हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते.

या तिनही अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसुचित जाती आाणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये १० टक्क्यांची सूट. वयोमर्यादा खुला संवर्ग-१५ ते १९ वर्षे. अनुसुचित जाती आाणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना    वर्षाची सूट. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना शैक्षणिक शुल्कातून सूट.

दहावी मध्ये पास श्रेणीत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या संस्थेतील सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटनंस ॲण्ड  वेल्डिंग ऑपरेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन मशिन टूल ॲण्ड  वेल्डिंग ऑपरेशन या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकतो. या अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी एक वर्षाचा आहे.

संपर्क-इंडो जर्मन टूल रुम ,पी ३१, एमआयडीसी, चिखलठाणा इंडस्ट्रिअल एरिआ, औरंगाबाद- ४३१००६, संकेतस्थळ-www.igtr-aur.org, ईमेल-info@igtr-aur.org

 

 

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी